लहानपणापासून आईचा शिस्तीचा स्वयंपाक पहात आले मी. त्यामुळे सकाळी अकरा ते दुपारी पाच हा वेळ आईचा स्वतःचा असे. माझ्या लग्नानंतर नोकरीत जाणारा माझा ११ ते ५/६/७ जाणारा वेळ पहाता माझ्या स्वतः साठी मला वेळ काढायला मला जे स्वयंपाकाचे व्यवस्थापन उपयोगी पडले ते तुमच्याशी शेअर करावे वाटते. हे काही माझ्या आईकडून आलेले, काही कालानुरूप घडलेले, काही अनुभवातून शिकलेले. जवळ जवळ तीस वर्षात घडलेली ही सारी प्रक्रिया. एका दमात सांगणे अवघड. पण जसे जमेल तसे लिहित जाते. तुम्हीही आपले अनुभव, प्रयोग शेअर कराल ? नव्या गृहिणींना नक्की उअपयोगी पडतील यातले काही नुक्से !
१. शक्यतो करावयाची भाजी आधल्या दिवशी आणुन ठेवावी, निवडण्याची असेल तर निवडूनही आधल्या दिवशीच निवडून ठेवावी. चिरण्याचे काम मात्र आयत्या वेळेसच करावे, चव टिकून राहते.
२. सकाळी चहा - दूध उकळवत असतानाच, स्वयंपाकाच्या तयारीचे विचार, मनाच्या एका कोपर्यात कुठेतरी सुरू करावेत.
३. फ्रिजमधून भाजी, मिरच्या, कोथींबीर, आलं, कढिपत्ता काढून ठेवावे.
४. चहा उकळे पर्यंत कुकरची तयारी करावी. डाळ, भात कुकरमध्ये लावावा. ( स्वयंपाकात उकडलेला बटाटा लागणार असेल तर तोही कुकरमध्ये टाकावा - जसे साबुदाण्याची खिचडी नाश्त्याला असेल तर...)
५. चहा उकळला की तिथे कूकर गॅसवर ठेवावा. अन निवांत चहा प्यावा, पेपर वाचावा.
६. कूकरने शिट्ट्या दिल्या की उठून गॅस बारीक करावा अन स्वयंपाकाला लागावे
७. भाजी चिरावी चिरावी. मग कूकर उतरवून भाजीसाठी कढई तापत ठेवावी. मिरच्या, किथिंबीर चिरावी. फोडणी करून भाजी मोठ्या आचेवर परतावी. आता आच कमी करून झाकण ठेवावे.
८. कणीक घेऊन त्यात मीठ, चमचाभर तेल अन थोडे पाणी घालावे. ( आताच मळू नये.)
९. नाश्त्यासाठी कांदा चिरणे/ पोळ्यांचा कुस्करा करणे/ रवा भाजणे वा तत्सम तयारी करणे. मधून मधून झाकण काढून ( झाकणाखाली साचलेले पाणी भाजीतच पडेल हे पहावे ) भाजी परतणे, झाकण पुन्हा ठेवणे ( हट्टी भाज्यांसाठी झाकणावर पाणी ठेवणे. )
१०. आता परत कणके कडे वळावे. हवे तितके पाणी घालून कणीक भिजवावी. त्यावर पोळ्यांचा डबा झाकून ठेवावा.
११. एव्हाना भाजी होत आली असेल. त्यात मीठ (गरजे नुसार गूळ ) टाकून भाजी परतत ठेवावी. भाजीत मीठ घातल्यावर लगेचच गॅस बंद करू नये. मीठ टाकल्यावर भाजीला पाणी सुटते, ते पुन्हा भाजीतच मुरले तरच भाजी चविष्ट लागते. तेव्हा मीठ टाकल्यावर किमान २-४ मिनिट भाजी गॅसवर ठेऊन परतावी. १२. नाश्त्यासाठी कढई/ भांडे गॅसवर ठेवावे. दुसर्या गॅसवर आवश्यक असेल तर ( उपमा, शिरा इ. साठी ) पाणी / दूध गरम करत ठेवावे. फोडणी करून नाश्ता करावा. त्यावर झाकण ठेऊन वाफ यायला ठेवावे.
१३. आता भाजी झाली असेल. ती उतरवून पोळ्यांचा तवा बारीक गॅसवर तापायला ठेवा. भाजीत त्यात कोथिंबीर, खोबरे टाकावे. आता झाकण ठेऊ नये. झाकून ठेवलेली कणीक उघडा. आता तेलाचा हात लावून छान मळून घ्या. त्यांचे मुठीच्या अंदाजाचे गोळे करून ठेवा. (त्यांना आताच पोळळी लाटण्यायोग्य आकार देऊ नका. तसेच उबड धोबड असू द्या.)
१४. एकदा नाश्त्याच्या कडे बघा ( म्हणजे तो हलवा, फक्त प्रेमळ दृष्टी नको ) तो झाला असेल तर गॅस बंद करा, झाकण तसेच ठेवा.
१५. प्रत्येक पोळी लाटताना प्रत्यक गोळ्याला पोळपाटावर पुन्हा पटकन मळून गोल करा.) पोळ्या करून घ्या. ( शक्य असेल तर पाठीला वारा लागेल असा फॅन सुरू करा अन मग पोळ्या करा. चिडचिड कमी होते )
पहिली पोळी तव्यावर टाकण्याआधी तव्यावर चिमुटभर पीठ भुरभुरवा. पोळी तव्याला चिकटणार नाही. तसेच पोळी तव्यावर टाकली की ती हलतेय ना, चिकटली नाही ना हे तपासा, चिकटत असेल तर एकदा सोडवून घ्या.
गॅस प्रथम बारीक ठेवा. पोळी पहिल्यांदा उलटवली की मग गॅस मोठा करा. पहिली पोळी तव्यावरून खाली घेताना गॅस पुन्हा बारीक करा. सर्व पोळ्या करून घ्या.
१६. आता तोंड, हात गार पाण्याने स्वच्छ धुवा, खसाखसा पुसा. एक भांडं गार पाणी प्या, हुश्स्य म्हणा
१७. कूकर काढून त्यातली डाळ मोडून घ्या. हवा तो मसाला घालून, पाणी घालून कमी आचे वर उकळवत ठेवा. दुसरीकडे नाश्ता पुन्हा गरम करा. माश्त्यासाठी सगळ्यांना टेबलावर बोलवा. नवरा-मुलं यांना ताटल्या, पाणी घ्यायला लावा ( हे सर्वात अवघड काम ) आमटीला हलवा. गॅस बंद करा. तुमचे आंघोळीचे पाणी गिझरला लावा. सर्वांचे दुधाचे कप भरा. अन मग सगळे नाश्ता करा.
१८. नाश्ता झाला की नवर्याला सर्वांचे डबे टेबलावर काढून ठेवायला सांगा अन तुम्ही तुमचे आवरायला जा.
१९. आता सगळ्यांचे डबे भरा. तुम्ही फारच चतूर अन गोड बोलणार्या असाल तर हे काम नवर्यावर सोपवा.
२०. तयार व्हा. आरशात पहा. आरशात स्वतःलाच म्हणा, "आजची पहिली मोहिम फत्ते ! " आरशात स्वतःकडे बघून छानसे हसा ! नोकरीसाठी, नव्या मोहिमेसाठी बाहेर पडा
स्वयंपाकाचे व्यवस्थापन
Submitted by अवल on 26 March, 2012 - 01:43
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
आपली (त्यात पुर्वीचा मी पण)
आपली (त्यात पुर्वीचा मी पण) सवय जात नाही ना. रोज चपाती, भाजी, भात, आमटी शिवाय तोंडी लावणे एवढे करावेच लागते.
आईने कधी, भाजी / आमटी म्हणून एकच प्रकार केला तरी वैतागायचो.
त्यामानाने बहुतांशी युरोपीयन लोकांचा रोजचा आहार मला सोपा वाटतो.
यात सलाद. मग प्रथिने असणारा एक प्रकार यात मांस आणि मासे असे दोन्ही आले.
आणि एक स्टार्च चा प्रकार यात पास्ता, मॅश्ड पोटॅटो, भात वगैरे.
बाकी सॉस, चीज, केचप आधी करुन ठेवलेले.
आऊटसोर्सचा विषय कुणी काढलाय?
आऊटसोर्सचा विषय कुणी काढलाय? मी इथे मंगळूरात दिवा घेऊन शोधली तरी स्वैपाकीण मिळत नाहिये. एक बाईसाहेब आल्या होत्या. महिना पाच हजार. त्या कूकर लाव्णार नाहीत. चपात्या त्याना करता येत नाहीत. (आठवड्यातून दोनदा पुर्या करतील) भाजी चिरणार नाहीत. वाटण घाटण वगैरे करणार नाहीत.
मला त्याना कोपरापासून नमस्कार सांगावा लागला. वर्ष्भरात मलाच पोळ्या चांगल्या करता यायला लागल्या पण स्वैपाकीण काही मिळेना
मागच्या आठवड्यात विजापूरकडची बाई येऊन चपाती नाही. पण भाकर्या बडवून देईन म्हणून सांगून गेली होती. एक तारखेपासून कामाला येणार होती. इतक्यात परवा तिची सासू वारली म्हणून गावाला गेली.
>>त्या कूकर लाव्णार नाहीत.
>>त्या कूकर लाव्णार नाहीत. चपात्या त्याना करता येत नाहीत. (आठवड्यातून दोनदा पुर्या करतील) भाजी चिरणार नाहीत. वाटण घाटण वगैरे करणार नाहीत.
नंदिनी, खरंच कोपरापासून नमस्कार आहे
मलाच पोळ्या चांगल्या करता
मलाच पोळ्या चांगल्या करता यायला लागल्या>>>
त्या स्वैपाकीणी मुळे झाले हे साध्य!! तिला फी दे ह्याची आता!
कांदा कापण्याविषयी पोस्टी
कांदा कापण्याविषयी पोस्टी वाचल्यावर इथल्याच युक्ती सुचवा युक्ती सांगावर या आणि अश्या अनेक प्रकारच्या युक्त्या सुचवल्या गेलेल्या आहेत. जुन्या आणि नव्या मायबोलीतले आहारशास्त्र आणि पाककृतीवरचे सगळे मदत बाफ वाचून काढल्यास स्वयंपाकघरातील व्यवस्थापनासाठी बर्याच क्लृप्त्या/ युक्त्या मिळतील.
मग काय करणार होत्या त्या ? हे
मग काय करणार होत्या त्या ?
हे चपात्या आणि भात दोन्ही एकाच जेवणात हि आपली रीतच नव्हती पुर्वी.
कोकण भागात नुसता भात तर इतर महाराष्ट्रात भाकर्या (चपात्या नंतर आल्या) हेच
आपले अन्न होते.
कोकण भागात कधीमधी तांदळाच्या भाकर्या होत असत. तर इतर भागात फक्त सणासुदीला भात.
तसं बघायला गेलं तर तांदळात (हातसडीच्या) आणि गव्हात पोषणमूल्याच्या दृष्टीने
फारसा फरक नाही. त्यामूळे एका जेवणात, यापैकी एकच असले तरी चालेल.
आपले पुर्वज असाच आहार घेत होते.
आपण पाश्चात्य देशांशी तुलना
आपण पाश्चात्य देशांशी तुलना करुन चालणार नाही. प्रत्येक ठिकाण्चा आहार हा तिथली भोगोलिक रचना आणि हवामान यावर अवलंबून असतो. त्यामुळे तिथे वेळ स्वयंपाकत वेळ कमी जातो म्हणून ते चांगलं असं म्हणणे चुकीचे होइल.
नक्कीच धनश्री. मी स्वतः त्या
नक्कीच धनश्री.
मी स्वतः त्या आहाराचा पुरस्कार करत नाही. फक्त तो सोपा आहे एवढेच.
आता आपल्याला जास्त वेळ स्वयंपाकघरासाठी देता येत नाही, तरीही आहार
मात्र पारंपारीकच हवा असतो. मग काहीतरी मध्यममार्ग शोधायचे प्रयत्न इथे चालू
आहेत. त्या चर्चेतले हे एक केवळ निरिक्षण.
मी काल सकाळी स्वयंपाक करून
मी काल सकाळी स्वयंपाक करून हपिसात गेले व आल्यावर पाहते तर लोक्स तोच स्वयंपाक खाऊन आरामात जेवत होते. इतके बरे वाटले. सामानाची तीन खोकी एका कुलुप बंद खोलीत अडकली आहेत त्यामुळे कनीक आहे तर लाट्णे नाही अशी परिस्थिती होती.
चिकन नको मी तोंडल्याची भाजी पोळी खाईन असे वाक्य ऐकल्यावर काय वाट्ते ते शब्दात व्यक्त करता येत नाही.
माझ्या प्रिय मैत्रिणीनो,
माझ्या प्रिय मैत्रिणीनो,
सर्वांनी मस्त दिनक्रम लिहिला आहे...
एक गृहिणी म्हणून किती multi -Tasking कराव लागत ते आपल्यालाच माहित.....खूप काही नवीन टिप्स पण मिळाल्या..धन्यवाद...
असो, ह्यात additional म्हणून सांगते... सवय traditional वाटेल पण छान आहे...
माज्या आई कडे आणि इकडे पण , घरातील गृहिणी अंघोळ केल्याशिवाय स्वयंपाकाला हात लावत नाही, स्वयंपाक घराची शुद्धता पाळायची म्हणून ....( इति परंपरा )
आत्ताच्या काळात हे थोड अवघड आहे... पण जमत.......आधी जे काही Gas वर बनवू ते अग्नी ला थोडेसे देऊन मग आपण सुरु कराव......
आधी मला पण खूप जड वाटायचं.. .पण आता job ( 9 ते 6 /7 चा ) सांभाळून हि निट सांभाळते, स्वतःलाच छान वाटते ...
नंदिनी मी काढला विषय पण काही
नंदिनी मी काढला विषय पण काही ठिकाणी आउटसोर्स करणं कठीण आहे असं दिसतंय. वरदा पण तेच म्हणतेय.
तुझी बाई महान आहे. ती ५००० मध्ये काय करणार होती?
एखदी स्वयंपाकी नसलेली बाई मिळू शकेल का? ती रोज कणीक भिजवणे, भाज्या चिरणे,किसणे आणि विकेंड्ला लसूण सोलणे, चटण्या,मसाले वाटणे, रवा/दाणे/पोहे/बेसन वगैरे भाजणे अशी वेळखाऊ कामं करु शकेल. तुला शिकवावे लागेल पण जमेल. अशी हेल्प मिळण्यासाठी खुप पापड बेलावे लागतात, हे खरंच. पण शोधा म्हणजे सापडेल आणि नेहमी त्याच गावात रहायचे अस्ल्यास तेवढा वेळ इन्वेस्ट करणे फायद्याचे ठरेल.
रोज कणीक भिजवणे, भाज्या
रोज कणीक भिजवणे, भाज्या चिरणे,किसणे (फूडप्रोसेसर) आणि विकेंड्ला लसूण सोलणे, चटण्या,मसाले वाटणे (मिक्सर), रवा/दाणे/पोहे/बेसन वगैरे भाजणे (मायक्रोवेव) अशी वेळखाऊ कामं करु शकेल. असल्या उपकरणामुळे माझा वेळ खरंच खूप वाचतो. शिवाय मी बर्याचशा भाज्या प्रेशर कूक करते. भाज्या अथवा आमटीमधे वाटण वगैरे माझे नसतेच. आठवड्यातून एकदा मी वाटण करून फ्रीझमधे ठेवते. तेव्हढेच पुरेसे होते.
मला स्वैपाक करण्याचं टेन्शन येत नाही. लेकीला सांभाळत स्वैपाक करणे कठीण. सुदैवाने मी ज्या बिल्डिंग्मधे राहते तिथे वॉचमन केबिनमधे दोन बायका ठेवलेल्या आहेत. त्यापैकी एक बाई माझ्याकडे धुणे भांड्याचे काम करते. संध्याकाळी अथवा दुपारी स्वैपाक करताना तिला हाक मारली की ती येते आणि लेकीला सांभाळते. टीव्हीवर कुठलेतरी मल्याळम चॅनल लावून बसते हाच काय तो एक ताप!!! रात्रीचे जेवण झाल्यवर पुन्हा तिला हाक मारली की येऊन भांडी घासून जाते. त्या एका बाबतीत मी सुखी!!
नंदीनी, लहान मुलांचे
नंदीनी, लहान मुलांचे व्यवस्थापन हा पण एक महत्वाचा विषय आहे.
खुपदा असे संभाळणारे कुणी भेटत नाही.
माझ्या एका शेजारणीने, जेवण करताना तान्ह्या बाळाला बसण्यासाठी एक आरामखुर्ची
तयार करुन घेतली होती. जेवण करता करता ती, बाळाशी अखंड बोलत असे.
बाळावर पण लक्ष रहात असे आणि कामही होत असे.
ती खुर्ची मस्त होती. बाळाला हातपाय हलवता येत पण बाहेर पडता येत नसे.
छान केलेय वर्णन
छान केलेय वर्णन ....................या व्यवस्थापनाच्या टिप्स बद्दल धन्यवाद.
दिनेशदा ही खुर्चीची युक्ती
दिनेशदा ही खुर्चीची युक्ती खरंच छान आहे. मला लवकरच अशा काही युक्त्यांची गरज पडणार आहे. तेव्हा तुम्हाला विपु करुन त्रास देइनच!!!
कांदे कापायला मला तरी व्ही
कांदे कापायला मला तरी व्ही स्लाईसरच सोयीचा वाटतो.>>>
दिनेशदा
व्ही स्लाईसरच।.. फोटो... टाकाना....
http://shopping.rediff.com/pr
http://shopping.rediff.com/product/home-decor-&-appliances/original-v-sl...
इथे आहे व्ही स्लाईसर !
धनश्री, नक्कीच.
धन्यवाद..........दिनेशदा...
धन्यवाद..........दिनेशदा...
व्ही स्लाईसरने दुधी भोपळा
व्ही स्लाईसरने दुधी भोपळा वगैरे भाज्यांचे तुकडे पण होतात क चांगले?
हो कुठल्याही भाजीचे होतात.
हो कुठल्याही भाजीचे होतात. मात्र त्याचे सेफ्टी होल्डर वापरूनच भाज्या कापायच्या.
तसेच साफ करताना काळजी घ्यायची, कारण त्याची पाती अत्यंत धारदार असतात.
त्यांना हात / बोट अजिबात लावायचे नाही.
धन्यवाद दिनेशदा. मी ते तुम्ही
धन्यवाद दिनेशदा. मी ते तुम्ही दिलेल्या लिंक वरुन ऑर्डेर करायचा प्रयत्न केला पण ते
"out of stock" आहे. अजून एखादी लिंक देउ शकाल का? मी पण शोधतेच आहे.
स्लो कुकर कोणी वापरत नाही
स्लो कुकर कोणी वापरत नाही का?त्याच्यामुळे काम पुष्क्ळ सोपं होतं तसं..
स्लो कुकर अगदी सुरूवातीला
स्लो कुकर अगदी सुरूवातीला भातासाठी वापरला...त्याचा फ़ायदा म्हणजे भात लावुन बाहेर गेलं तरी आपोआप बंद होऊन तो गरम राहतो..पण आता वरण तर करावंच लागतं ना म्हणून नाही वापरत फ़ारसा..स्नेहा तू आणखी काय करतेस स्लो कुकरमध्ये....
वेका तुझी गफलत होते आहे का
वेका तुझी गफलत होते आहे का स्लो कुकर आणी राईस कुकर मधे? स्लो कुकर मधे बर्याचशा उसळी, डाळी, चिकन, इतर मीट्स, सूप्स आणी खीरी सारखी डिझर्टस वगैरे छान शिजवता येतात.
वेका,प्रॅडी बरोबर म्हणते
वेका,प्रॅडी बरोबर म्हणते आहे..
मी तिच्यासारखंच सूप, उसळी ,चिकन साठी वापरते..खूप सोपं होतं ते करायला.कधीकधी तर मी छोले, राजमा वगैरे न भिजवताच उसळ करते त्याच्यात.
प्रॅडी, खीर कशी करतेस त्याच्यात?
>>तुझी गफलत होते आहे का स्लो
>>तुझी गफलत होते आहे का स्लो कुकर आणी राईस कुकर मधे???बहुतेक....स्लो कुकर मग मी नसणार वापरला...सध्यातरी मारामारी होत नाहीये स्वयंपाकाची त्यामुळे त्याशिवाय निभावू शकते...मुलं मोठी झाली की ही टीप कामाला येईल असं वाटतं...
http://online2.esakal.com/esa
http://online2.esakal.com/esakal/20120323/5451235675982660189.htm
हे वाचा.
सॅलड, फळे डब्यातून नेण्यासाठी
सॅलड, फळे डब्यातून नेण्यासाठी सोलणे चिरणे ते डब्यात भरणे ही कामे सकाळच्या गडबडीत वेळखाऊ होत असतील तर अख्खी काकडी, टोमॅटो, गाजर, उकडलेलं बीट इत्यादी धुवून नेता येईल. संत्री, सफरचंद, पेअर, चिकू, केळी इत्यादी फळे अख्खी नेता येतील. रविवारी रात्री कलिंगड, खरबूज, टरबूज, पपई इत्यादी सोलून कापून खायची फळं फ्रिजाम्ध्ये डब्यात भरून ठेवता येईल. सोमवारी सकाळी फळ धुवायचं एक काम कमी होईल
हे सगळे अनुभवातून आलेले
हे सगळे अनुभवातून आलेले दिसतेय.
मला फक्त एकच सांगायचे होते कि हि सर्व तयारी एकट्या स्त्रीने अजिबात करु नये.
घरातील सर्वांचा सहभाग असायलाच हवा.>>>>>>>>>>>>> सहमत.
शक्य तो कांदा चिरणे किंवा भाजी चिरणे हे प्रकार स्वतःच करायला पाहिजे हे कोणी सांगितलेय.... जो कोणी घरात त्यावेळी उपलब्ध असेल त्याला जर प्रेमाने विचारून करून घेवू शकतो आपण. मी हि कामे माझ्या नवर्याकडून करून घेते त्या बदल्यात त्यांना आवडता पदार्थ किंवा भजी वैगरे तत्सम वस्तू बनवण्याची तयारी दाखवते........:)
संत्री, सफरचंद, पेअर, चिकू,
संत्री, सफरचंद, पेअर, चिकू, केळी इत्यादी फळे अख्खी नेता येतील>> हे मी करते. नाहीच वेळ झाला तर सुका मेवा नेते. किंवा टेबलात एक सुरी ठेवते. आयत्यावेळी कापायला. काकडी गाजर पण तसेच नेते.
Pages