लहानपणापासून आईचा शिस्तीचा स्वयंपाक पहात आले मी. त्यामुळे सकाळी अकरा ते दुपारी पाच हा वेळ आईचा स्वतःचा असे. माझ्या लग्नानंतर नोकरीत जाणारा माझा ११ ते ५/६/७ जाणारा वेळ पहाता माझ्या स्वतः साठी मला वेळ काढायला मला जे स्वयंपाकाचे व्यवस्थापन उपयोगी पडले ते तुमच्याशी शेअर करावे वाटते. हे काही माझ्या आईकडून आलेले, काही कालानुरूप घडलेले, काही अनुभवातून शिकलेले. जवळ जवळ तीस वर्षात घडलेली ही सारी प्रक्रिया. एका दमात सांगणे अवघड. पण जसे जमेल तसे लिहित जाते. तुम्हीही आपले अनुभव, प्रयोग शेअर कराल ? नव्या गृहिणींना नक्की उअपयोगी पडतील यातले काही नुक्से !
१. शक्यतो करावयाची भाजी आधल्या दिवशी आणुन ठेवावी, निवडण्याची असेल तर निवडूनही आधल्या दिवशीच निवडून ठेवावी. चिरण्याचे काम मात्र आयत्या वेळेसच करावे, चव टिकून राहते.
२. सकाळी चहा - दूध उकळवत असतानाच, स्वयंपाकाच्या तयारीचे विचार, मनाच्या एका कोपर्यात कुठेतरी सुरू करावेत.
३. फ्रिजमधून भाजी, मिरच्या, कोथींबीर, आलं, कढिपत्ता काढून ठेवावे.
४. चहा उकळे पर्यंत कुकरची तयारी करावी. डाळ, भात कुकरमध्ये लावावा. ( स्वयंपाकात उकडलेला बटाटा लागणार असेल तर तोही कुकरमध्ये टाकावा - जसे साबुदाण्याची खिचडी नाश्त्याला असेल तर...)
५. चहा उकळला की तिथे कूकर गॅसवर ठेवावा. अन निवांत चहा प्यावा, पेपर वाचावा.
६. कूकरने शिट्ट्या दिल्या की उठून गॅस बारीक करावा अन स्वयंपाकाला लागावे
७. भाजी चिरावी चिरावी. मग कूकर उतरवून भाजीसाठी कढई तापत ठेवावी. मिरच्या, किथिंबीर चिरावी. फोडणी करून भाजी मोठ्या आचेवर परतावी. आता आच कमी करून झाकण ठेवावे.
८. कणीक घेऊन त्यात मीठ, चमचाभर तेल अन थोडे पाणी घालावे. ( आताच मळू नये.)
९. नाश्त्यासाठी कांदा चिरणे/ पोळ्यांचा कुस्करा करणे/ रवा भाजणे वा तत्सम तयारी करणे. मधून मधून झाकण काढून ( झाकणाखाली साचलेले पाणी भाजीतच पडेल हे पहावे ) भाजी परतणे, झाकण पुन्हा ठेवणे ( हट्टी भाज्यांसाठी झाकणावर पाणी ठेवणे. )
१०. आता परत कणके कडे वळावे. हवे तितके पाणी घालून कणीक भिजवावी. त्यावर पोळ्यांचा डबा झाकून ठेवावा.
११. एव्हाना भाजी होत आली असेल. त्यात मीठ (गरजे नुसार गूळ ) टाकून भाजी परतत ठेवावी. भाजीत मीठ घातल्यावर लगेचच गॅस बंद करू नये. मीठ टाकल्यावर भाजीला पाणी सुटते, ते पुन्हा भाजीतच मुरले तरच भाजी चविष्ट लागते. तेव्हा मीठ टाकल्यावर किमान २-४ मिनिट भाजी गॅसवर ठेऊन परतावी. १२. नाश्त्यासाठी कढई/ भांडे गॅसवर ठेवावे. दुसर्या गॅसवर आवश्यक असेल तर ( उपमा, शिरा इ. साठी ) पाणी / दूध गरम करत ठेवावे. फोडणी करून नाश्ता करावा. त्यावर झाकण ठेऊन वाफ यायला ठेवावे.
१३. आता भाजी झाली असेल. ती उतरवून पोळ्यांचा तवा बारीक गॅसवर तापायला ठेवा. भाजीत त्यात कोथिंबीर, खोबरे टाकावे. आता झाकण ठेऊ नये. झाकून ठेवलेली कणीक उघडा. आता तेलाचा हात लावून छान मळून घ्या. त्यांचे मुठीच्या अंदाजाचे गोळे करून ठेवा. (त्यांना आताच पोळळी लाटण्यायोग्य आकार देऊ नका. तसेच उबड धोबड असू द्या.)
१४. एकदा नाश्त्याच्या कडे बघा ( म्हणजे तो हलवा, फक्त प्रेमळ दृष्टी नको ) तो झाला असेल तर गॅस बंद करा, झाकण तसेच ठेवा.
१५. प्रत्येक पोळी लाटताना प्रत्यक गोळ्याला पोळपाटावर पुन्हा पटकन मळून गोल करा.) पोळ्या करून घ्या. ( शक्य असेल तर पाठीला वारा लागेल असा फॅन सुरू करा अन मग पोळ्या करा. चिडचिड कमी होते )
पहिली पोळी तव्यावर टाकण्याआधी तव्यावर चिमुटभर पीठ भुरभुरवा. पोळी तव्याला चिकटणार नाही. तसेच पोळी तव्यावर टाकली की ती हलतेय ना, चिकटली नाही ना हे तपासा, चिकटत असेल तर एकदा सोडवून घ्या.
गॅस प्रथम बारीक ठेवा. पोळी पहिल्यांदा उलटवली की मग गॅस मोठा करा. पहिली पोळी तव्यावरून खाली घेताना गॅस पुन्हा बारीक करा. सर्व पोळ्या करून घ्या.
१६. आता तोंड, हात गार पाण्याने स्वच्छ धुवा, खसाखसा पुसा. एक भांडं गार पाणी प्या, हुश्स्य म्हणा
१७. कूकर काढून त्यातली डाळ मोडून घ्या. हवा तो मसाला घालून, पाणी घालून कमी आचे वर उकळवत ठेवा. दुसरीकडे नाश्ता पुन्हा गरम करा. माश्त्यासाठी सगळ्यांना टेबलावर बोलवा. नवरा-मुलं यांना ताटल्या, पाणी घ्यायला लावा ( हे सर्वात अवघड काम ) आमटीला हलवा. गॅस बंद करा. तुमचे आंघोळीचे पाणी गिझरला लावा. सर्वांचे दुधाचे कप भरा. अन मग सगळे नाश्ता करा.
१८. नाश्ता झाला की नवर्याला सर्वांचे डबे टेबलावर काढून ठेवायला सांगा अन तुम्ही तुमचे आवरायला जा.
१९. आता सगळ्यांचे डबे भरा. तुम्ही फारच चतूर अन गोड बोलणार्या असाल तर हे काम नवर्यावर सोपवा.
२०. तयार व्हा. आरशात पहा. आरशात स्वतःलाच म्हणा, "आजची पहिली मोहिम फत्ते ! " आरशात स्वतःकडे बघून छानसे हसा ! नोकरीसाठी, नव्या मोहिमेसाठी बाहेर पडा
स्वयंपाकाचे व्यवस्थापन
Submitted by अवल on 26 March, 2012 - 01:43
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
कांद्याचे दोन भाग करून
कांद्याचे दोन भाग करून कापलेला भाग पाण्यात काही वेळ बुडवून ठेवून मग कापले तर डोळ्यांना झोंबत नाहीत >>>>>>>> त्या पेक्षा हॅल्मेट घाला डोक्यात .... कांदा निट दिसतो पण आणि डोळ्यांना झोंबत ही नाही..
उदा. फोटो बघा
दिनेशदा पटलं पण कसं आहे कि वन
दिनेशदा पटलं पण कसं आहे कि वन डिश मिल हा योग्य आहार नव्हे हे माझं मत. भात आमटी, भाजी आणि पोळी हविच जेवणात, त्याशिवाय जेवण होत नाहि.. म्हनजे इकडे वेळ वाचवायचा आणि Gym मधे वेळ घालवायचा, एकूण हिशेब एकच.. त्यपेक्षा सरळ सांगा बाहेर वेळ घालवायला आवदतो म्हणून.. :p
उद्या... हा तुच वाटतोय्स!!!
उद्या... हा तुच वाटतोय्स!!!
उदय
उदय
त्या पेक्षा हॅल्मेट घाला
त्या पेक्षा हॅल्मेट घाला डोक्यात > आणि फोटो >
अहो झोंबूदे कि पण काय हरकत
अहो झोंबूदे कि पण काय हरकत आहे, डोळे चांगले होतात कोणत्याहि स्टॉंग रसाने..
उदय तुम्हि बाईक वापरत नहि असं दिसतय.. नाहितर प्रवासानंतर हेल्मेट परत डोक्यात घालावसं वाटलं नसतं..
अहो झोंबूदे कि पण काय हरकत
अहो झोंबूदे कि पण काय हरकत आहे, डोळे चांगले होतात कोणत्याहि स्टॉंग रसाने.. >>> समीर, ओले तिखट कांदे चिरलेत का कधी? मत बदलेल वेळ आली तर.
उदय, तुच असणार तो हेल्मेटवाला. आता किचनसाठी स्पे. एक हेल्मेट खरेदी करते मी.
मनी तु किचन मधे जातच नाहीस मग
मनी तु किचन मधे जातच नाहीस मग हॅल्मेट चे काय करणार तु....उलट मावुशींना घेउन दे
समीर, हे सर्व अन्नघटक मिळतील
समीर, हे सर्व अन्नघटक मिळतील अशा तर्हेनेच वन डिश मिल्स योजलेली असतात.
वेगवेगळे शिजवण्यापेक्षा ते एकत्र शिजवलेले असतात, एवढेच.
उदय, रविवारी मी किचन क्वीन
उदय, रविवारी मी किचन क्वीन असते.
अच्छा....अस हाय व्हय...
अच्छा....अस हाय व्हय...
डोळ्यात लेन्सेस घातल्यास
डोळ्यात लेन्सेस घातल्यास कांदा चिरताना पाणी येत नाही कारण कांदा चिरताना त्यातनं निघणार्या फ्युम्स डोळ्यांना लागत नाहीत. हे उगाच माहितीसाठी. त्यासाठी लेन्सेस घालाव्या असं काही सुचवत नाहीये.
आधी मी इथे काही वेगळंच लिहिणार होते पण इथे लिहिणार्या बर्याच जणींच्या पोस्टी (ज्यांना स्वयंपाकाची आवड नाही आणि भारतात आहेत) बघून वाटले- तुम्ही "आउटसोर्सींग" हा पर्याय का विचारात घेत नाही? त्यात कमीपणा वाटतो का? आजचे संपुर्ण जग आउट्सोर्सींग वर चाललेय मग आपल्या गृहिणीच का "प्रत्येक काम मीच्च केलंच्च पाहिजेच्च" असं करताय?
जे कौशल्य वा आवड आपल्याकडे नाही/ जे low-end, कमी कौशल्याचे वेळखाऊ काम आहे/ जे काम करण्याचा आपल्याला फायद्याच्या मानाने त्रास जास्त होतो/ जे काम दुसर्ञाने केल्यानेही फायनल प्रोडक्ट मध्ये अजिबात फरक पडत नाही/ ज्या कामात घातलेला वेळ आपल्याला स्ट्रेस देतो ते काम आउटसोर्स करणे उत्तम. ते बाईला करा/नवर्या-मुलांना करा किंवा डायरेक्ट बाहेरनं तयार भाज्या/निवडलेलं धान्य/दुधाचे टेट्रापॅक्स/दही वगैरे विकत आणा.
उदा. १.रोज कमीत कमी भाजी निवडायला,चिरायला आणि कणीक मळायला बाईला सांगितले तर तुमचा घाईच्या वेळात बराच वेळ वाचेल शिवाय तुम्हाला/घरच्या लोकांना त्याच चवीच्या, घरच्या पोळ्या आणि भाजी मिळतील. किंवा जवळच्या भाजीवालीला रोज भाजी चिरुन द्यायला सांगा. ह्या सगळ्यासाठी २००-३००रु महिना जास्त लागला तरी विशेष फरक पडत नाही बहुतेक घरांत.
२.दुधाचे टेट्रापॅक आणल्यास सतरांदा दुध तापवायला लागणारा वेळ आणि गॅस वाचतो. पुन्हा ते महिना-महिना खराब होत नाही. फाटत तर कधीच नाही. त्यामुळे होणारा मनस्तापही वाचतो. त्यासाठी थोडी जास्त किंमत द्यायला मागे-पुढे बघू नये.
३.फ्रीजमध्ये जर फ्रोजन मटार किंवा पनीर वगैरे ठेवले तर एखाद्या घाईच्या दिवशी विशेष चिराचिरी न करता भाजी करता येते.
४.चटण्या/मसाले रवीवारी करुन ठेवले तर बाकीचे दिवस भाज्यांमध्ये वापरता येतील.
५. पालेभाज्या जर आपल्याकडे १०रु जुडी असतील तर तुम्ही नेहमीच्या भाजीवालीला ५रु जास्त देऊन निवडलेली , ताजी भाजी घेऊ शकता. भरपूर वेळ वाचेल. (दुर्दैवाने/सुदैवाने भारतात श्रमाच्या कामांचं मोल फार कमी आहे, त्यामुळे अगदी २-५ रु जास्त देऊन आपलं मोठ्ठं काम होतं आणि त्या भाजीवालीलाही extra income होतं. हा आमच्या आजीचा फंडा )
ह्या सगळ्यामुळे स्ट्रेसमुळे तुमच्या शरीरावर जो वाईट परिणाम होतो, तोही कमी होईल.
Take good care of yourselves ladies!
हुश्श फायनली वेल सेड थँक्स
हुश्श फायनली
वेल सेड
थँक्स नताशा
दिनेशदा - या युक्त्या मी पण
दिनेशदा - या युक्त्या मी पण वापरते.
>>जर अनेक पदार्थात कांदा, मिरच्या, कोथिंबीर लागणार असेल, तर ते एकाचवेळी
कापायचे. >>> नंतर दुसर्या पदार्थासाठीच्या चिराचिरी वरचा वेळ नक्कीच वाचतो. सफाईचा पण वेळ वाचतो, भांडी कमी पडतात, पाणी वाचते.
>>फोडणीपण एकदाच करायची. >> यामुळे तेलाची बचत होते पर्यायाने पदार्थ हेल्दी बनतात.
>>यावेळी मंद संगीत चालू ठेवायचे. >> याशिवाय तर मी किचन मधे जातच नाही. कपाट आवरताना, कपडयांच्या घड्या, इस्त्री इ. इ. काम करुच शकत नाही. हात भरभर चालतो संगीत चालू असेल तर. नाहीतर आमचा जिवलग मित्र आळस येतोच.
>>वेल सेड
थँक्स नताशा>>+१
कांदा आणि
कांदा आणि हेल्मेट...लोल्स...
बाकी देशात राहिलं तर नताशा ++
कांदा कापणं मी घरच्या घरी आउटसोर्स करत असते....(दुसरी सोय तशीही नाहीये......मिळणार नाही/परवडणार नाही....इ.इ...)
पण माझ्या एका मैत्रीणीची ट्रीक वापरून पहा..ती जितके कांदे कापायचे असतील तितके आदल्या दिवशी फ़्रीजमध्ये ठेवते (सालासकट त्यांना काहीही न करता) मग कापायला घेताना अजीबात पाणी येत नाही.....मी नेहमी हे विसरलेले असते त्यामुळे फ़ार अनुभव नाही......
दक्षिणा, >>>मला ओट्यावर पसारा
दक्षिणा,
>>>मला ओट्यावर पसारा असेल तर खपत नाही म्हणजे कामच सुचत नाही................. सिंकात ठेवली की खूपलीच डोळ्याला............ थोडा न्यूरॉसिझम आहे >>>>> मला पण. आणि त्यामुळे काम कधी कधी वाढतं.
आउटसोर्सिंग विषयी नताशा +१.
आउटसोर्सिंग विषयी नताशा +१.
.
.
मस्त लेख. पुर्वि आमचिहि खुप
मस्त लेख. पुर्वि आमचिहि खुप घाई व्हायचि. दोघे असताना सगळा आनन्दच होता. बाहेर खाणे, sat cooking, उरलेले सम्पवणे, नोकरी साम्भाळून पुर्ण स्वयंपाक करण अशक्य आहे अस म्हणण हे सगळ करुन झाल.
मुल झाल्यावर मात्र आधि योग्य वाटणार चुकिच वाटु लागल. मग हे routine ठरवल
नवरा सकाळी उठून चहा करतो आणि cooker लावतो. मी तो पर्यन्त मुलाच आवरते आणि मग नाष्ता, भाजी आणि दुपारचा डब्बा ( simple meal such as sandwich, rolls etc) करते. कणीक w/e ला मळून, छोटे पोर्शन्स फ्रीझ करते. सकाळी फ्रोझेन कणीक बहेर कढून ठेवते. सन्ध्याकाळी घरी आल कि पोळ्या करते मग ६:३०-७ ला जेवण. नवरा डिश washer लावतो. मग आम्ही तिघे मजा करायला मोकळे.
पटकन कांद्याबद्दल लिहिते.
पटकन कांद्याबद्दल लिहिते. कांदा कापुन ठेवला तर त्यात बॅक्टेरिआ वाढतात म्हणुन कच्चा कापुन ठेवु नये.
दुसरे म्हणजे कापताना डोळ्यात पाणी येउ नये म्हणुन माबो.वरच कोणीतरी एग्झॉस्ट-फॅन सुरु करुन त्यापाशी कापावा म्हणजे डोळ्याला पाणी येत नाही असे लिहिले होते, तो हमखास यशस्वी उपाय आहे. मी यशस्वीरित्या करुन पाहिलाय, कारण मला सिनेमात कोणी कांदा कापला तरी डोळ्यातुन पाणी येते. .. हा उपाय म्हणजे जादु आहे जादु. ज्यानी लिहिला होता त्याचे इथेच जाहीर आभार.
मेधाशी सहमत. मी पण घरी सांगितलय, आपल्या सर्वांना जगण्यासाठी लागणार्या सर्व गोष्टी व्यवस्थीत नसल्या तरी कामचलाऊ यायला हव्यात कारण ईमजंसी कधी कोणावर सांगुन येत नसते. तेव्हा आणीबाणीच्यावेळी शुन्यापासुन सुरुवात करुन कशी चालेल?
त्याचप्रमाणे घरगुती कामात समजा इतरांना जास्त वेळ देता येत नाही तर त्यावर त्यांना असे सांगुन ठेले आहे की, "ठीक आहे, आपणहुन तुम्हाला हे करु ते करु लक्षात येत नसेल पण तुम्ही घरात असताना जेव्हा मी एखाद्या गोष्टीत मला ही मदत हवी आहे असे सांगते तेव्हा ती गोष्ट तुम्ही करायला हवी, कारण मी काही आकाशातला तारा तोडायला सांगणार नाहीये, सोपीच कामे सांगणार आहे.' आवडत नसताना घराबाहेर कदाचीत आपण खुप गोष्टी करतोच मग तेच घरात पण केले तर आपल्याच माणसांसाठी असते.
मला वाटतं इथे आऊटसोर्सिंग
मला वाटतं इथे आऊटसोर्सिंग करावं की करु नये असा मुद्दा या लेखात नसून जर घरी करायचे असेल तर काय करायचे हा मुद्दा सगळे चर्चा करत आहेत.
तसे तर मग माझ्याकडेही इतकी वर्षे आउटसोर्सच केले होते हे काम. तरीही वर संताप वगैरे लिहायचा अर्थ हा की हे काम करायचेच नाही असा अॅटीट्यूड नसावा, आवड नसणे वगैरे ठीक आहे, मलाही फार नाही, पण एकदा थोडेफार शिकून ट्राय करायला हरकत नाही. असो.
स्वैपाकात विरंगुळा काहींना वाटतो काहींना अजिबात वाटत नाही, त्यांना तोच वेळ दुसर्या कशात तरी द्यावसा वाटू शकतो.
धन्यवाद वरदा, कलकत्ता हे
धन्यवाद
वरदा, कलकत्ता हे वेगळंच रसायन आहे खरं. काम दिलं तरी लोक करायला तयार नसतात पण कुठल्याही दादा-दिदीच्या मोर्च्यांना नारे लावायला धावत जातील पण रिलायन्स फ्रेश्/स्पेन्सर्स् वगैरे सुपरमार्केट मध्ये तरी मिळत असतील ना चिरलेल्या भाज्या, मोड आलेली कडधान्य वगैरे? किंवा घरी काम करणार्या बाईला वगैरे थोडं पटवून बघ. असो.
मवा, आउटसोर्सींग हा व्यवस्थापनाचा एक भाग म्हणून लिहिलंय. ज्यांच्या घरी नवरे मंडळी अजिबात सवय/आवड नसल्याने मदत करत नाहीत त्यांना घरात भांडणे किंवा सगळं स्वतः करणे यापेक्षा हा मार्ग सोपा आहे.
घरात प्रत्येकाला जरुरीपुरती सगळी महत्वाची कामं यावीत याला माझा अर्थातच पाठिंबा आहे. पण काही घरात स्रुवातीपासून तशी सवय्/अॅटिट्युड नसल्याने किंवा निव्वळ इगोमुळेही नवरे मदत करत नाहीत ही वस्तुस्थिती आहे. तेव्हा बायका रोज भांडू शकत नाहीत, त्यामुळॅ स्वतःच सगळं करायचा प्रयत्न करतात. ते त्यांच्यासाठी योग्य नाही, म्हणून आउटसोर्सींग, असं म्हणायचं होतं.
माझ्या माहितीप्रमाणे आयुष्य
माझ्या माहितीप्रमाणे आयुष्य आणि काम दोन्ही सोपे, योग्य, फायदेशीर असे होण्यासाठी व्यवस्थापन करायचे असते. त्यामुळे आउटसोर्सिंग हे पण व्यवस्थापनाचे महत्वाचे अंग आहे.
आउटसोर्सींग हा व्यवस्थापनाचा
आउटसोर्सींग हा व्यवस्थापनाचा एक भाग म्हणून लिहिलंय. >> अगं मग बाफ एका पोष्टीतच संपला असता ना
बरं मग आता आऊटसोर्सिंग एजंट न आल्यास काय करावे याचे व्यवस्थापन लिहा बरे कोणीतरी.
निरनिराळ्या व्हेंडरांना
निरनिराळ्या व्हेंडरांना आउटसोर्स करावे म्हणजे बॅकअपही रहातो आणि स्पर्धेमुळे आपोआपच सगळे सरळ वागतात
मग आता निरनिराळ्या
मग आता निरनिराळ्या व्हेंडरांचे व्यवस्थापन कसे करायचे असेही कुणी विचारेल.. ;).... चला जाऊदे, आता बास करते माझ्याकडून. .. ( परत द्यायचा राहीला होता. :))
@सुनिधी दुसरे म्हणजे कापताना
@सुनिधी
दुसरे म्हणजे कापताना डोळ्यात पाणी येउ नये म्हणुन माबो.वरच कोणीतरी एग्झॉस्ट-फॅन सुरु करुन त्यापाशी कापावा म्हणजे डोळ्याला पाणी येत नाही असे लिहिले होते, तो हमखास यशस्वी उपाय आहे. मी यशस्वीरित्या करुन पाहिलाय, कारण मला सिनेमात कोणी कांदा कापला तरी डोळ्यातुन पाणी येते. .. हा उपाय म्हणजे जादु आहे जादु. ज्यानी लिहिला होता त्याचे इथेच जाहीर आभार.
>>>> हो १००% खात्रीचा उपाय, आणि फॅनच्या जितक्या जवळ चिराचिरी असेल तेव्हढा त्याचा प्रभाव चांगला. इति नवरोबा. आमच्या घरी कांदा चिरणे नवर्याचे काम असते. तो गॅस रेंजवर कटिंग बोर्ड ठेवून कांदा कापतो आणि मग पूर्णवेळ वरचा एग्झॉस्ट-फॅन सुरु. मी अगदीच वेळ पडली तर चिरते. पण हा चांगला उपाय आहे.
उलटा त्रास उदभवू शकतो तिला,
उलटा त्रास उदभवू शकतो तिला, 'नवर्याला फारच कलते' >> माझी तीच परिस्थिती आहे, नवरा सगळा स्वयपाक उत्तम करतो, पोळ्या करणे सोडून घरातले (फक्त स्वयपाकघर नाही) एकही काम असे नाही कि तो करत नाही, पण मग मला सुचना चालू होतात, but I am not complaining at all, there are times when I can leave the kitchen totally on him and relax or do whatever is my priority at that point
सगळ्या कामाकडे एक कला / छंद म्हणून बघायची सवय लावायची>> couldnt agree more, करायच्या प्रत्येक पदार्थात मी इतकी रमते की तो सगळा एक खेळ होउन जातो
व्यवस्थापनात माझा ऑफिसमधला अनुभव उपयोगि पडतो, I work backwords and decide when to start, take help on routine things like cleaning and cutting vegetables
भाज्या आधी निवडून, स्वच्छ
भाज्या आधी निवडून, स्वच्छ करुन जरुर ठेवाव्यात पण शक्यतो आयत्यावेळी
कापाव्यात.
अनेक आग्नेय आशियायी देशात, बायका स्वयंपाक घरात एवढा वेळ घालवत नाहीत.
शिजवलेला भात किंवा नूडल्स तयार आणतात आणि घरी भाजी / करी करतात. सोबत सलाद आणि फळे.
मुंबईत तरी चपात्या (आणि हवी तर भाजी ) बाहेरून आणून, घरी भात आमटी
करायची सोय आहे.
आपल्याकडे चांगले खबूस (पिटा ब्रेड) दिसले नाहीत. गल्फ मधे, नायजेरियात ती
चांगली सोय असायची. हे खबूस म्हणजे भाकरीच जवळजवळ. फ्रिजमधे व्यवस्थित टिकतात. आयत्यावेळी गरम करून घेता येतात.
गल्फमधे तर ताजेच मिळतात. त्यातही कणकेचे पण मिळतात.
दिनेशदा, छान सांगितलेत.
दिनेशदा, छान सांगितलेत. स्वयंपाकघरात कमीत कमी वेळ घालवून गुणात्मक स्वयंपाक कसा करता येतो याचेही मार्गदर्शन नवोदितांसकट सगळ्यांनीच घेतले पाहिजे. सोपा मेनू व सोपा आहार हे तंत्र इतर देशांत लोकांच्या अंगवळणी पडलेले दिसत आहे.
Pages