लहानपणापासून आईचा शिस्तीचा स्वयंपाक पहात आले मी. त्यामुळे सकाळी अकरा ते दुपारी पाच हा वेळ आईचा स्वतःचा असे. माझ्या लग्नानंतर नोकरीत जाणारा माझा ११ ते ५/६/७ जाणारा वेळ पहाता माझ्या स्वतः साठी मला वेळ काढायला मला जे स्वयंपाकाचे व्यवस्थापन उपयोगी पडले ते तुमच्याशी शेअर करावे वाटते. हे काही माझ्या आईकडून आलेले, काही कालानुरूप घडलेले, काही अनुभवातून शिकलेले. जवळ जवळ तीस वर्षात घडलेली ही सारी प्रक्रिया. एका दमात सांगणे अवघड. पण जसे जमेल तसे लिहित जाते. तुम्हीही आपले अनुभव, प्रयोग शेअर कराल ? नव्या गृहिणींना नक्की उअपयोगी पडतील यातले काही नुक्से !
१. शक्यतो करावयाची भाजी आधल्या दिवशी आणुन ठेवावी, निवडण्याची असेल तर निवडूनही आधल्या दिवशीच निवडून ठेवावी. चिरण्याचे काम मात्र आयत्या वेळेसच करावे, चव टिकून राहते.
२. सकाळी चहा - दूध उकळवत असतानाच, स्वयंपाकाच्या तयारीचे विचार, मनाच्या एका कोपर्यात कुठेतरी सुरू करावेत.
३. फ्रिजमधून भाजी, मिरच्या, कोथींबीर, आलं, कढिपत्ता काढून ठेवावे.
४. चहा उकळे पर्यंत कुकरची तयारी करावी. डाळ, भात कुकरमध्ये लावावा. ( स्वयंपाकात उकडलेला बटाटा लागणार असेल तर तोही कुकरमध्ये टाकावा - जसे साबुदाण्याची खिचडी नाश्त्याला असेल तर...)
५. चहा उकळला की तिथे कूकर गॅसवर ठेवावा. अन निवांत चहा प्यावा, पेपर वाचावा.
६. कूकरने शिट्ट्या दिल्या की उठून गॅस बारीक करावा अन स्वयंपाकाला लागावे
७. भाजी चिरावी चिरावी. मग कूकर उतरवून भाजीसाठी कढई तापत ठेवावी. मिरच्या, किथिंबीर चिरावी. फोडणी करून भाजी मोठ्या आचेवर परतावी. आता आच कमी करून झाकण ठेवावे.
८. कणीक घेऊन त्यात मीठ, चमचाभर तेल अन थोडे पाणी घालावे. ( आताच मळू नये.)
९. नाश्त्यासाठी कांदा चिरणे/ पोळ्यांचा कुस्करा करणे/ रवा भाजणे वा तत्सम तयारी करणे. मधून मधून झाकण काढून ( झाकणाखाली साचलेले पाणी भाजीतच पडेल हे पहावे ) भाजी परतणे, झाकण पुन्हा ठेवणे ( हट्टी भाज्यांसाठी झाकणावर पाणी ठेवणे. )
१०. आता परत कणके कडे वळावे. हवे तितके पाणी घालून कणीक भिजवावी. त्यावर पोळ्यांचा डबा झाकून ठेवावा.
११. एव्हाना भाजी होत आली असेल. त्यात मीठ (गरजे नुसार गूळ ) टाकून भाजी परतत ठेवावी. भाजीत मीठ घातल्यावर लगेचच गॅस बंद करू नये. मीठ टाकल्यावर भाजीला पाणी सुटते, ते पुन्हा भाजीतच मुरले तरच भाजी चविष्ट लागते. तेव्हा मीठ टाकल्यावर किमान २-४ मिनिट भाजी गॅसवर ठेऊन परतावी. १२. नाश्त्यासाठी कढई/ भांडे गॅसवर ठेवावे. दुसर्या गॅसवर आवश्यक असेल तर ( उपमा, शिरा इ. साठी ) पाणी / दूध गरम करत ठेवावे. फोडणी करून नाश्ता करावा. त्यावर झाकण ठेऊन वाफ यायला ठेवावे.
१३. आता भाजी झाली असेल. ती उतरवून पोळ्यांचा तवा बारीक गॅसवर तापायला ठेवा. भाजीत त्यात कोथिंबीर, खोबरे टाकावे. आता झाकण ठेऊ नये. झाकून ठेवलेली कणीक उघडा. आता तेलाचा हात लावून छान मळून घ्या. त्यांचे मुठीच्या अंदाजाचे गोळे करून ठेवा. (त्यांना आताच पोळळी लाटण्यायोग्य आकार देऊ नका. तसेच उबड धोबड असू द्या.)
१४. एकदा नाश्त्याच्या कडे बघा ( म्हणजे तो हलवा, फक्त प्रेमळ दृष्टी नको ) तो झाला असेल तर गॅस बंद करा, झाकण तसेच ठेवा.
१५. प्रत्येक पोळी लाटताना प्रत्यक गोळ्याला पोळपाटावर पुन्हा पटकन मळून गोल करा.) पोळ्या करून घ्या. ( शक्य असेल तर पाठीला वारा लागेल असा फॅन सुरू करा अन मग पोळ्या करा. चिडचिड कमी होते )
पहिली पोळी तव्यावर टाकण्याआधी तव्यावर चिमुटभर पीठ भुरभुरवा. पोळी तव्याला चिकटणार नाही. तसेच पोळी तव्यावर टाकली की ती हलतेय ना, चिकटली नाही ना हे तपासा, चिकटत असेल तर एकदा सोडवून घ्या.
गॅस प्रथम बारीक ठेवा. पोळी पहिल्यांदा उलटवली की मग गॅस मोठा करा. पहिली पोळी तव्यावरून खाली घेताना गॅस पुन्हा बारीक करा. सर्व पोळ्या करून घ्या.
१६. आता तोंड, हात गार पाण्याने स्वच्छ धुवा, खसाखसा पुसा. एक भांडं गार पाणी प्या, हुश्स्य म्हणा
१७. कूकर काढून त्यातली डाळ मोडून घ्या. हवा तो मसाला घालून, पाणी घालून कमी आचे वर उकळवत ठेवा. दुसरीकडे नाश्ता पुन्हा गरम करा. माश्त्यासाठी सगळ्यांना टेबलावर बोलवा. नवरा-मुलं यांना ताटल्या, पाणी घ्यायला लावा ( हे सर्वात अवघड काम ) आमटीला हलवा. गॅस बंद करा. तुमचे आंघोळीचे पाणी गिझरला लावा. सर्वांचे दुधाचे कप भरा. अन मग सगळे नाश्ता करा.
१८. नाश्ता झाला की नवर्याला सर्वांचे डबे टेबलावर काढून ठेवायला सांगा अन तुम्ही तुमचे आवरायला जा.
१९. आता सगळ्यांचे डबे भरा. तुम्ही फारच चतूर अन गोड बोलणार्या असाल तर हे काम नवर्यावर सोपवा.
२०. तयार व्हा. आरशात पहा. आरशात स्वतःलाच म्हणा, "आजची पहिली मोहिम फत्ते ! " आरशात स्वतःकडे बघून छानसे हसा ! नोकरीसाठी, नव्या मोहिमेसाठी बाहेर पडा
स्वयंपाकाचे व्यवस्थापन
Submitted by अवल on 26 March, 2012 - 01:43
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
प्रिंसेस... कदाचित माझ्या
प्रिंसेस... कदाचित माझ्या लिहिण्याच्या (अ)कौशल्यामुळे तुमचा गैरसमज झाला असावा. मी कामात बदल/विरंगुळा म्हणून स्वयंपाक करणे हे मानत असलो, तरी आठवड्यातून होणार्या बहुतेक स्वयंपाकामधे बर्यापैकी मदत करत असतो. बायको मुंबईला गेली (२/३ वर्षातून एकदा) की महिना महिना मुली आणि मी असतो, तेव्हा न्याहारी, दुपारचे आणि रात्रीचे जेवण तयार करतो.
पण विषय व्यवस्थापनाचा आहे.
दिनेशचे म्हणणे पटले.. आहे त्या वाणसामानातून चांगलं जेवण करता यायला हवं, आणि ते मला येतं.
मी स्वयंपाकघराचे व्यवस्थापन करत नाही. पण जे काही करेन ते शिस्तीत, स्वच्छ, आणि वेळेत होईल याबद्दल दक्ष असतो..
दूध एकतर दर आठेक तासांनी
दूध एकतर दर आठेक तासांनी तापवून टिकवावे किंवा फ्रीझमध्ये ठेवून. दोन्ही करायची गरज का भासावी? मी अजिबात दूध तापवत नाही. वापरायचे तितकेच गरम करते.
मी वर लिहिल्याप्रमाणे वेळेचे
मी वर लिहिल्याप्रमाणे वेळेचे व्यवस्थापन आणि कच्च्या मालाचे व्यवस्थापन करताना,
स्वतःचे आणि घरातील लोकांचे आरोग्य, स्वतःसाठी वेळ या सगळ्याकडे लक्ष देता
आले पाहिजे.
आपण खुपदा (म्हणजे भारतात असताना मीदेखील) भारताच्या परिस्थितीचाच
विचार करतो. पण जिथे आजूबाजूला दुकान नाही, भाज्या मिळायची वानवा असते,
बाहेर जाऊन खाण्यासाठी चांगल्या जागा नसतात, बाहेर खाणे महागच नसून असुरक्षित देखील असते.. अशा ठिकाणी हेच कौशल्य कामाला येते.
मी अनेकवेळा बघितलेय कि नोकरीसाठी तरूण वयात मुले परदेशात एकटी येतात.
घरच्या कुठल्याच कामाची सवय नसते. कपडे धुता येत नाहीत, इस्त्री करता येत नाही. साधे पदार्थ शिजवता येत नाहीत. वरकामाला नोकर ठेवणे परवडत नाहीत, मग व्यवस्थापन तर दूरच राहिले.
जर किरकोळ कामे जमत असतील तरच व्यवस्थापन करणार ना ? मग सांजसकाळ
मॅगी उकडून खायची. यात मानसिक आणि शारीरीक, दोन्ही आरोग्याची हानी होते.
आजकालच्या जमान्यात कुणी असे म्हणू शकेल का ? कि मला मोबाईल कसा
चालवायचा ते कळत नाही. मला कॉम्प्युटर कसा चालवायचा ते कळत नाही.
तूमच्या कार्यक्षेत्राशी निगडीत असो वा नसो, ही कौशल्ये तूम्ही शिकताच ना ?
मग ज्या कलेचा संबंध तूमच्या आरोग्याशी आहे, तिचे प्राथमिक शिक्षण घेतले तर
कुठे बिघडते ?
-------
दूध पाश्चराईज्ड केलेले असले तरी वितरकाकडून दुकानात आणि दुकानातून घरी
आणताना कोल्ड चेन तूटतेच. त्यामूळे ते तापवून ठेवणेच योग्य.
यु.एच्.टी. करुन टेट्रा पॅकमधे असलेले, खास करुन दिर्घकाळ टिकणारे दूध असेल
तर बाब वेगळी. पण असे दूध निर्जीव असते. त्याचे दही नीट लागत नाही.
भारतात चांगल्या प्रतीची दूध पावडर आता मिळते का ? मिळत असेल तर तिच
वापरणे चांगले.
>>कुणी काय काम करावं हा
>>कुणी काय काम करावं हा ज्याचा त्याचा वैयत्तिक/कौटुंबिक प्रश्न आहे. हे केलंच पाहीजे अशी जबरदस्ती कशाला ?>>+१
प्रिंसेस, मस्त लिहिलयं... एकदम आवडले. लेख आणि बर्याच (:डोमा:) विषयाला धरुन असलेल्या प्रतिक्रिया आवडल्या.
दूध एकतर दर आठेक तासांनी
दूध एकतर दर आठेक तासांनी तापवून टिकवावे किंवा फ्रीझमध्ये ठेवून. दोन्ही करायची गरज का भासावी? मी अजिबात दूध तापवत नाही. वापरायचे तितकेच गरम करते.>>> मृदुला मी सुद्धा असच करते. पण भारता मधे नाही असं करता आलं मला. ते लवकर खराब होतं.
बापरे......१५५
बापरे......१५५ प्रतिसाद.............म्हणजे यांना हे देखील शिकवावे लागले....
.
.
हे माझ्या भावी बायकोसाठी कॉपी करुन घेत आहे...........ती ही अशीच निघाली तर... सुधारता येईल तिला
नवरा स्वयंपाक करत नसेल, पण
नवरा स्वयंपाक करत नसेल, पण इतर कामात अधिक वाटा उचलत असेल तर? उगाच संताप करण्यात काय हशील >>> अशा नवर्यांच्या बायका 'मला बरं नाहीये पण लेकीसाठी/लेकासाठी वरण-भात करायला तरी उठलच पाहिजे' असं म्हणताना ऐकल्या आहेत. इमर्जन्सी कधी/काय येणार हे आपल्या हातात नसते. घरातली स्वयंपाक करणारी व्यक्ती धडपडली/बेड रिडन झाली काही कारणाने तर अगदी शुन्यातुन सुरुवात असते बाकीच्यांची. हेच ड्रायव्हिंगच्या बाबतीत. घरातला ड्रायव्हरच आजारी असेल आणि त्यालाच डॉक्टरकडे न्यायचे असेल तर पंचाइतच.
मी तरी घरातली/बाहेरची कामं थोड्या फार फरकाने घरातल्या प्रत्येक व्यक्तीला आलीच पाहिजेत आणि सवयीची असली पाहिजेत ह्या मताची आहे.
मग ज्या कलेचा संबंध तूमच्या
मग ज्या कलेचा संबंध तूमच्या आरोग्याशी आहे, तिचे प्राथमिक शिक्षण घेतले तर कुठे बिघडते ? <<
अगदीच.
जेवायला लागतं ना? चहा लागतो ना? मग ते करता आलं पाहिजे. रोज करा नका करू ज्या त्या घराचा प्रश्न.
अवल, कालपासून जसं जमेल तसं
अवल, कालपासून जसं जमेल तसं वाचते आहे. सर्वांनी दिलेल्या टिप्स अतिशय छान आहेत.
दिनेशदा, एक्क नंबर..
दिनेशदा, एक्क नंबर..
जेवायला लागतं ना? चहा लागतो
जेवायला लागतं ना? चहा लागतो ना? मग ते करता आलं पाहिजे. रोज करा नका करू ज्या त्या घराचा प्रश्न.>>>>>>
असे प्रतिसाद हुकुमीपणे धाग्याला हवी ती दिशा देतात, किमान देऊ पाहतात
स्वयंपाक व्यवस्थापन या धाग्यावर व त्यावर दिलेल्या प्रतिसादांवर या वरील प्रतिसादाने चेंडू सीमेपार पाठवायलाच हवा असे नाही
काही मैदानांच्या सीमा भिन्न असूही शकतात
इतक्या पोस्ट
इतक्या पोस्ट वाचून(व्यवस्थापनाच्या) मी अचंबित झाले. उलट मी विचार करायला लागले.. काल घरी गेल्यावर माझे किचनात पण नजर फिरवली?(मी चिठ्ठी वगैरे लिहून ठेवत नाही वगैरे)
वाचून पडलेले प्रश्ण...
१. काही लोकं खूपच स्वंयपाक घरात इतका वेळ घालतात... सॅलूट! (चांगलं वा वाईट काही नाही, आपण इतकं करत नाही हे जाणवलं)
२. इतके ठरवून आपल्याला जमणं शक्य नाही.. (आजची रात्रीची भाजी, उद्याचा नाश्ता... परवाची भाजी.. तेरवाचा चहा कधी, किती व कोणी करायचा? वगैरे) दिल चाहता है सारख्या सुबोध सारखे...
डोक्याला स्ट्रेस नाही होत का?
३. काम पुढे मागे होवु शकते, कोणी का करेना पण इतके रोज शिस्तबद्द कसे जमवतात? गरज म्हणून म्हणा किंवा काहीही, कमाल वाटली लोकांची(चांगल्या भावनेने कमाल वाटली)
दोघेही नोकरी करतोय पण आमच्याकडे इतके प्लॅनिंग न करताही आतापर्यंत ठिक चाललेय.. इतक्या विचारंच्या स्ट्रेस नंतर मग "पुन्हा" एकदा पटले की हा फक्त "वैयक्तिक आवडीचा/नावडीचा" भाग आहे. आवडीचा भाग असेल तर स्ट्रेस येत नाही, नावडीचा असेल तर नक्कीच येतो.
कोणाशी तुलना करण्याची गरजच नाही. जैसे है वैसे ठिक आहे. असे म्हणून मी किचनाच्या बाहेर आले.
कोणाशी तुलना करण्याची गरजच
कोणाशी तुलना करण्याची गरजच नाही. जैसे है वैसे ठिक आहे. असे म्हणून मी किचनाच्या बाहेर आले. >> छान विचार झंपे
दिनेश तुमच्या दोन्ही पोस्टी प्रचंड पटल्या..
स्वयंपाक घरात खरच प्रचंड काम असते उरकता उरकत नाही.
एक छोटं उदा घेऊ कोशिंबिर...
एक छोटं उदा घेऊ कोशिंबिर... ती पण फोडणी न देता करायची असेल तर स्टेप बाय स्टेप काय काय करावं लागतं... आपल्या लक्षात येत नाही पण एक छोटा पदार्थ करताना प्रचंड अॅक्टिव्हिटी असते.
फ्रिज उघडा काकड्या, दही बाहेर काढा, साल काढणी काढा, सालं काढा, किसणी काढा, काकडी किसा, पातेलं घ्या, त्यात तो किस काढा, सोलाणं, चाकू/विळी किसणी धुवा, काकडीची सालं ओल्या कचर्यात भरा... ओटा पुसा, किस चमच्याने सारखा करा.. त्यात मिठ दही, साखर, घाला शेंगदाण्याचं कुट घाला, ते तयार नसेल तर शेंगदाणे भाजून करून घ्या... फ्रिजात टाका.
स्वयंपाकाची पुर्वतयारी आणि पश्चात आवरा आवरी प्रचंड वेळ खाऊ असते. अॅक्चूअली फोडण्या टाकायला काहीही वेळ लागत नाही.
.
.
दक्स तुला +१०० म्हणून म्हणतात
दक्स तुला +१००
म्हणून म्हणतात ना की बायकांचीच घरी, दारी, किचनमधे, हपिसात मल्टी टास्किंगची कपॅसिटी जबरी असते.................इथे कुणापेक्षा हे उल्लेखलं नाही.
वादाला विषय नको!
>>म्हणून म्हणतात ना की
>>म्हणून म्हणतात ना की बायकांचीच घरी, दारी, किचनमधे, हपिसात मल्टी टास्किंगची कपॅसिटी जबरी असते.................इथे कुणापेक्षा हे उल्लेखलं नाही.
बोंबला! आता "असं म्हणून बायकांचं मानसिक कंडिशनिंग केलं जातं" अशा पोष्टी येतील
हं!!!!!!!!!! पहा मी काहीच
हं!!!!!!!!!! पहा मी काहीच म्हटलं नाही तरी मंदारची पोस्ट आलीच लगोलग! असो..........मीही किचनातून बाहेर!
दक्षिणा, हेच काम कसे सोपे
दक्षिणा, हेच काम कसे सोपे करता येईल ते बघ.
१) दाण्याचे कूट, आहे कि नाही ते आधीच बघायचे.
२) काकडीची साले डस्टबिनवरच काढायची, म्हणजे वेगळी उचलून टाकावी लागत
नाहीत.
३) साले काढल्याबरोबर पीलर घूवून, पुसून ठेवायचा.
४) भांडे / बोल घ्यायचा, किसणी घ्यायची, आणि काकडी त्यातच किसायची.
५) किसणी धुवून टाकायची.
६) त्यात मिरची, कोथिंबीर घालून (मीठ नाही) ते भांडे बाजूला ठेवायचे.
या आधी काढून ठेवायची गरज नाही. देठ डस्टबिनमधेच डायरेक्ट टाकायचे आणि
मिरची कोथिंबीर चिरून थेट टाकायची, वेगळा बोर्ड घ्यायची गरज नाही.
७) भाजी आमटीला फोडणी करताना, त्यातली चमचाभर काढून कोशिंबीरीत टाकायची (वेगळी फोडणी करायची गरज नाही.)
८) अगदी जेवताना त्यात कूट, दही, मीठ घालून, ढवळून घ्यायचे.
जर अनेक पदार्थात कांदा, मिरच्या, कोथिंबीर लागणार असेल, तर ते एकाचवेळी
कापायचे. फोडणीपण एकदाच करायची.
यावेळी मंद संगीत चालू ठेवायचे.
उगाच बढाई मारत नाही, पण मी रविवारचे जे पदार्थ करतो, त्याला काय घटक
लागतील एवढेच नव्हे तर तयार डिश कशी दिसेल याचाही विचार मी करुन
ठेवलेला असतो.
अनेकदा ऑफिस ते घर प्रवासात आपल्याला काहीच काम नसते, त्यावेळी हा विचार करता येतो.
परत मला एकदा कबूल केलेच पाहिजे, कि हे काम माझे अत्यंत आवडते आहे.
आणि त्यातून मला ताण न येता, आनंदच मिळतो.
दक्षिणे,
दक्षिणे,
दिनेश तुम्ही सांगताय ते
दिनेश तुम्ही सांगताय ते करण्याशिवाय पर्यायच कुठे असतो? साग्रसंगित कापाकापी करत बसले तर हपिसला दुपारीच पोचायची वेळ येईल..
मला ओट्यावर पसारा असेल तर खपत नाही म्हणजे कामच सुचत नाही पुढे त्यामुळे कधी कधी डबल काम पडतं. रात्री ३ वेळा भांडी घासली जातात माझी. ऑफिसातून आल्या आल्या डबे. मग जेवण गरम केलं की ती भांडी.. सिंकात ठेवली की खूपलीच डोळ्याला.. जेवताना कुठलीही काम पेंडींग नको... थोडा न्यूरॉसिझम आहे हा.. पण इलाज नाही. जेवण शांतपणे करायचं असेल तर हे करावंच लागतं. जेवल्यावर एक ताट राहिलं सकाळपर्यंत तर काय बिघडतं? नाही पण...
शिवाय तुम्ही सांगता ते सगळं मी हाताबरोबरच आवरते. कोथिंबिर तर धुवुन थेट उकळत्या आमटीत कात्रिने कापते. मिरच्या सुधा सेम.... सध्या मावे असल्याने कुटाची फार भानगड होत नाही. मावेत शेंगदाणे टाकले की छान भाजले जातात. पुर्वी उगिच मंद आचेवर वेळ दवडत बसायला लागायचं.
माझ्याकडे स्वयंपाकाच्या मावशी
माझ्याकडे स्वयंपाकाच्या मावशी आहेत, त्यामुळे त्यांचा पगार देण्यासाठी मी पैसे कसे कमवायचे, एवढंच माझं व्यवस्थापन. रविवारी मात्र त्यांना सुट्टी असते. मग मी किचन क्वीन ! ब्रेफा, लंच, कधी कधी डिनर सुद्धा घरीच बनवलं जातं. मला दाल, कोशिंबीर, भाजी, साइड डिश, मसाला वाटणे अशा वेगवेगळ्या कारणांसाठी बर्यापैकी कांदा लागतो. तीन मिल्स मिळुन ५-६ कांदे तरी लागतातच. प्रत्येक वेळेला अश्रु गाळत सारखं डोळे आणि हात धुवायला बेसीनवर पळावं लागतं, त्यामुळे हे काम फार्रच कंटाळवाणं वाटतं. मी सनग्लासेस घालुन कापुन पाहिला, पण व्यर्थ. डोळे झोंबतातच. ( शिवाय घरातले टर उडवता॑त ती वेगळीच)
तर आता प्रश्न असा कि मी दिवसभराचा कांदा फुप्रोवर एकदाच कट करुन एअरटाइट डब्यात टाकुन फ्रीजमधे टाकला तर चालतं का? मी चिरुन ठेवलेल्या कांद्याबद्दल एक भयावह मेल वाचली होती, त्यामुळे हिंमत होत नाही. कापुन ठेवलेल्या कांद्याने खरंच काही अपाय होतो का? मी मेलवर विश्वास ठेवु कि स्वतःची सोय बघु, कळत नाही.
मी डब्यातले ओले पदार्थच
मी डब्यातले ओले पदार्थच डब्यात नेत असे. चपात्या, फॉइलमधे.(सध्या जेवण ऑफिसमधेच.)
आमच्याकडे डबे वगैरे ऑफिसमधले मदतनीस धुवून टाकत. त्यामूळे ते काम नसे.
शिवाय कधी कधी डब्यांना घरी जाईपर्यंत आंबूस वास येत असे, म्हणून ऑफिसमधेच आवरायचे ते.
सध्या समजा काहि केलेच तर सिंकमधे साबणाचे पाणी करुन भांडी त्यात ठेवतो.
रात्री सिनेमा / इमेल्स वगैरे बघून झाल्या, कि शेवटच्या कॉफी / कोकोच्या कपाबरोबर सगळे साफ करुन टाकतो.
मनिमाऊ, कांदे कापायला मला तरी
मनिमाऊ,
कांदे कापायला मला तरी व्ही स्लाईसरच सोयीचा वाटतो. तो खुप धारदार असतो, जपून हाताळावा लागतो. पण कांदा हवा तसा जाड, बारिक कापून होतो. कोबी, गाजर, टोमॅटो, सिमला मिरच्या, बटाटे सगळेच हवे तसे कापून होते. हातानेच करायचे असल्याने, वीज वगैरे लागत नाही. सफाई पण फुड प्रोसेसरच्या मानाने
कमी.
दिनेशदा, पण स्लाइसरने सुद्धा
दिनेशदा, पण स्लाइसरने सुद्धा डोळे झोंबतीलच. फुप्रोमधे एका मिनिटात फाइन कट करुन होतात तेही भरपुर. पण तसे चिरुन फ्रीजमधे ठेवले तरी चालतील का, हा प्रश्न आहे. मी एक मेल वाचली होती कि कांदा चिरुन ठेवायचा नाही म्हणुन. हा त्या मेलमधला काही भाग -
When food poisoning is reported, the first thing the officials
look for is when the 'victim' last ate ONIONS and where those onions
came from (in the potato salad?). It's probably the
onions, and if not the onions, it's the POTATOES.
Onions are a huge magnet for bacteria, especially uncooked
onions. You should never plan to keep a portion of a sliced onion.
It's not even safe if you put it in a zip-lock bag and put it in your
refrigerator. It's already contaminated enough just by being cut open
and out for a bit, that it can be a danger to you.
If you take the leftover onion and cook it like crazy you'll
probably be okay, but if you slice that leftover onion and put on your
sandwich, you're asking for trouble. Both the onions and the moist
potato in a potato salad will attract and grow bacteria faster.
So, how's that for news? Take it for what you will. I am going
tobe very careful about onions from now on.
Please remember it is dangerous to cut onion and use or cook
the next day. It becomes highly poisonous for even a single night and
creates toxic bacteria which may cause adverse stomach infections
because of excess bile secretions and even food poisoning.
कांद्याचे दोन भाग करून
कांद्याचे दोन भाग करून कापलेला भाग पाण्यात काही वेळ बुडवून ठेवून मग कापले तर डोळ्यांना झोंबत नाहीत किंवा कमी झोंबतात
कांदा कापून ठेवू नये, हे माझे
कांदा कापून ठेवू नये, हे माझे पण मत आहे. बॅक्टेरिया वगैरे नाही सांगता येणार, पण कापलेल्या कांद्याचा वास उडून जातो आणि कितीही हवाबंद ठेवला, तरी फ्रीजमधल्या बाकीच्या पदार्थांना त्याचा वास लागतो.
डोळ्यातून पाणी कमी येण्यासाठी, अख्खे कांदेच (निदान कापण्यापुर्वी अर्धा तास) फ्रिजमधे ठेवले तर चांगले.
भरत, थँक्स. हे करुन बघते.
भरत, थँक्स. हे करुन बघते. दिनेशदा, तुमची टीप पण शक्य आहे. दोन्ही करुन बघेन.
दुसरी एक मजेशीर टीप -
एका पार्टीला जाताना मी कलर्ड लेन्सेस लावल्या होत्या. घरी आल्यावर काही कारणाने, लेन्स काढायच्या आधीच घाईघाईत कांदा चिरायची वेळ आली. अगदी नविन आणि तिखट कांदा असुन डोळ्यातुन एक थेंब नाही आला. डोळे झोंबले पण अगदी किंचित. खरं तर नाहीच. तोच कांदा इतरवेळी वापरताना नाक & डोळ्याची आग आग व्हायची. आता मला शास्त्रीय कारण माहित नाही, पण हे करुन पहा भारीच इफेक्टिव आहे. माझ्या नंबरच्या लेन्स असत्या तर नेहमीच वापरल्या असत्या कांदा चिरताना.
मनिमाऊ, बाकिच्यांचे वाईट
मनिमाऊ, बाकिच्यांचे वाईट अनुभव होते, लेन्स लावून कांदा चिरण्याचे !!
----
एकट्या दुकट्याचे जेवण करायचे असते त्यावेळी, वन डिश मिल हा चांगला प्रकार असतो. याचे अनेक प्रकार आहेत तिथे. शिवाय काही प्रकार (उदा. सँडविच..) टिव्ही
वगैरे बघत करता येतात.
एखादा दिवस जेवणाला फाटा देऊन, नुसता फलाहार करुन बघा. (फ्रुट सलाद नाही.) मस्त वाटते.
कामात बदल म्हणजेच विश्रांती, असे इंदिरा गांधी म्हणत असत. रोजच्या रुटीनमधे थोडासा बदल करुन बघा. दुसर्या दिवशी कामाला भिडताना, आणखी उत्साह येतो.
रुटीनमधे बदल म्हणजे अगदी झोपायची जागा पण बदलून बघा !
कांद्याचे दोन भाग करून
कांद्याचे दोन भाग करून कापलेला भाग पाण्यात काही वेळ बुडवून ठेवून मग कापले तर डोळ्यांना झोंबत नाहीत >>+१
Pages