लहानपणापासून आईचा शिस्तीचा स्वयंपाक पहात आले मी. त्यामुळे सकाळी अकरा ते दुपारी पाच हा वेळ आईचा स्वतःचा असे. माझ्या लग्नानंतर नोकरीत जाणारा माझा ११ ते ५/६/७ जाणारा वेळ पहाता माझ्या स्वतः साठी मला वेळ काढायला मला जे स्वयंपाकाचे व्यवस्थापन उपयोगी पडले ते तुमच्याशी शेअर करावे वाटते. हे काही माझ्या आईकडून आलेले, काही कालानुरूप घडलेले, काही अनुभवातून शिकलेले. जवळ जवळ तीस वर्षात घडलेली ही सारी प्रक्रिया. एका दमात सांगणे अवघड. पण जसे जमेल तसे लिहित जाते. तुम्हीही आपले अनुभव, प्रयोग शेअर कराल ? नव्या गृहिणींना नक्की उअपयोगी पडतील यातले काही नुक्से !
१. शक्यतो करावयाची भाजी आधल्या दिवशी आणुन ठेवावी, निवडण्याची असेल तर निवडूनही आधल्या दिवशीच निवडून ठेवावी. चिरण्याचे काम मात्र आयत्या वेळेसच करावे, चव टिकून राहते.
२. सकाळी चहा - दूध उकळवत असतानाच, स्वयंपाकाच्या तयारीचे विचार, मनाच्या एका कोपर्यात कुठेतरी सुरू करावेत.
३. फ्रिजमधून भाजी, मिरच्या, कोथींबीर, आलं, कढिपत्ता काढून ठेवावे.
४. चहा उकळे पर्यंत कुकरची तयारी करावी. डाळ, भात कुकरमध्ये लावावा. ( स्वयंपाकात उकडलेला बटाटा लागणार असेल तर तोही कुकरमध्ये टाकावा - जसे साबुदाण्याची खिचडी नाश्त्याला असेल तर...)
५. चहा उकळला की तिथे कूकर गॅसवर ठेवावा. अन निवांत चहा प्यावा, पेपर वाचावा.
६. कूकरने शिट्ट्या दिल्या की उठून गॅस बारीक करावा अन स्वयंपाकाला लागावे
७. भाजी चिरावी चिरावी. मग कूकर उतरवून भाजीसाठी कढई तापत ठेवावी. मिरच्या, किथिंबीर चिरावी. फोडणी करून भाजी मोठ्या आचेवर परतावी. आता आच कमी करून झाकण ठेवावे.
८. कणीक घेऊन त्यात मीठ, चमचाभर तेल अन थोडे पाणी घालावे. ( आताच मळू नये.)
९. नाश्त्यासाठी कांदा चिरणे/ पोळ्यांचा कुस्करा करणे/ रवा भाजणे वा तत्सम तयारी करणे. मधून मधून झाकण काढून ( झाकणाखाली साचलेले पाणी भाजीतच पडेल हे पहावे ) भाजी परतणे, झाकण पुन्हा ठेवणे ( हट्टी भाज्यांसाठी झाकणावर पाणी ठेवणे. )
१०. आता परत कणके कडे वळावे. हवे तितके पाणी घालून कणीक भिजवावी. त्यावर पोळ्यांचा डबा झाकून ठेवावा.
११. एव्हाना भाजी होत आली असेल. त्यात मीठ (गरजे नुसार गूळ ) टाकून भाजी परतत ठेवावी. भाजीत मीठ घातल्यावर लगेचच गॅस बंद करू नये. मीठ टाकल्यावर भाजीला पाणी सुटते, ते पुन्हा भाजीतच मुरले तरच भाजी चविष्ट लागते. तेव्हा मीठ टाकल्यावर किमान २-४ मिनिट भाजी गॅसवर ठेऊन परतावी. १२. नाश्त्यासाठी कढई/ भांडे गॅसवर ठेवावे. दुसर्या गॅसवर आवश्यक असेल तर ( उपमा, शिरा इ. साठी ) पाणी / दूध गरम करत ठेवावे. फोडणी करून नाश्ता करावा. त्यावर झाकण ठेऊन वाफ यायला ठेवावे.
१३. आता भाजी झाली असेल. ती उतरवून पोळ्यांचा तवा बारीक गॅसवर तापायला ठेवा. भाजीत त्यात कोथिंबीर, खोबरे टाकावे. आता झाकण ठेऊ नये. झाकून ठेवलेली कणीक उघडा. आता तेलाचा हात लावून छान मळून घ्या. त्यांचे मुठीच्या अंदाजाचे गोळे करून ठेवा. (त्यांना आताच पोळळी लाटण्यायोग्य आकार देऊ नका. तसेच उबड धोबड असू द्या.)
१४. एकदा नाश्त्याच्या कडे बघा ( म्हणजे तो हलवा, फक्त प्रेमळ दृष्टी नको ) तो झाला असेल तर गॅस बंद करा, झाकण तसेच ठेवा.
१५. प्रत्येक पोळी लाटताना प्रत्यक गोळ्याला पोळपाटावर पुन्हा पटकन मळून गोल करा.) पोळ्या करून घ्या. ( शक्य असेल तर पाठीला वारा लागेल असा फॅन सुरू करा अन मग पोळ्या करा. चिडचिड कमी होते )
पहिली पोळी तव्यावर टाकण्याआधी तव्यावर चिमुटभर पीठ भुरभुरवा. पोळी तव्याला चिकटणार नाही. तसेच पोळी तव्यावर टाकली की ती हलतेय ना, चिकटली नाही ना हे तपासा, चिकटत असेल तर एकदा सोडवून घ्या.
गॅस प्रथम बारीक ठेवा. पोळी पहिल्यांदा उलटवली की मग गॅस मोठा करा. पहिली पोळी तव्यावरून खाली घेताना गॅस पुन्हा बारीक करा. सर्व पोळ्या करून घ्या.
१६. आता तोंड, हात गार पाण्याने स्वच्छ धुवा, खसाखसा पुसा. एक भांडं गार पाणी प्या, हुश्स्य म्हणा
१७. कूकर काढून त्यातली डाळ मोडून घ्या. हवा तो मसाला घालून, पाणी घालून कमी आचे वर उकळवत ठेवा. दुसरीकडे नाश्ता पुन्हा गरम करा. माश्त्यासाठी सगळ्यांना टेबलावर बोलवा. नवरा-मुलं यांना ताटल्या, पाणी घ्यायला लावा ( हे सर्वात अवघड काम ) आमटीला हलवा. गॅस बंद करा. तुमचे आंघोळीचे पाणी गिझरला लावा. सर्वांचे दुधाचे कप भरा. अन मग सगळे नाश्ता करा.
१८. नाश्ता झाला की नवर्याला सर्वांचे डबे टेबलावर काढून ठेवायला सांगा अन तुम्ही तुमचे आवरायला जा.
१९. आता सगळ्यांचे डबे भरा. तुम्ही फारच चतूर अन गोड बोलणार्या असाल तर हे काम नवर्यावर सोपवा.
२०. तयार व्हा. आरशात पहा. आरशात स्वतःलाच म्हणा, "आजची पहिली मोहिम फत्ते ! " आरशात स्वतःकडे बघून छानसे हसा ! नोकरीसाठी, नव्या मोहिमेसाठी बाहेर पडा
स्वयंपाकाचे व्यवस्थापन
Submitted by अवल on 26 March, 2012 - 01:43
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
विनय चांगली पोस्ट. अवल ,
विनय चांगली पोस्ट. अवल , नियोजन चांगल आहे.
आमच्या घरी इतक स्वयंपाकाच व्यवस्थापन कराव लागत नाही. स्वयंपाकाचा छंद असुनही. म्हणजे तो ठरावीक वेगवेगळे पदार्थ करण्यापुरता मर्यादित आहे त्यामुळ असेल.
कणीक मळुन ठेवणे, भाज्या निवडुन ठेवणे , डाळ/बटाटे वगैरे शिजवून ठेवणे एवढयावरच संपते ते.
इथं वाचल्यावर खरतर माझ्या लक्षात आल आहे कि , घरी तिघे असताना मी एकटी किचन मध्ये आहे अस एकदीही झालच नाहीये. आमच्या घरी कामाची विभागणी वगैरे पण भानगड नाही. जे समोर काम दिसेल ते दोघांपैकी कुणीतरी करायचे आहे एवढ माहिती आहे. त्यामुळ हे काम मालकांचे , माझ काम ते असली भानगड नाही. मला चपात्या चांगल्या येतात. त्या मी करते. मालकांइतके भांडी डिशवॉशरला चांगले लावण्याचे काम कोणीच करु शकणार नाही. (माझी निम्मी भांडी सिंक मध्येच रहातात. ) मला लंच बॉक्स उत्तम भरता येतात. मालक काउअंटर टॉप उत्तम स्वच्छ करु शकतात. भाज्या मोस्टली मी करते. ते उत्तम भाज्या चिरु शकतात. (त्या पट्टीने मोजल्या तर एकसारख्या निघतील.
) पण एकुणच सगळीच कामे एकमेकांना करता येतात. दर्जा कदाचित कमीअधिक असु शकेल. पण अडुन रहात नाही.
नविन लग्न झाल्यावर मी एकदा पाणी , ताट वगैरे मालकांच्या हातात नेवून दिले तर त्यांनी त्यावर अर्ध्या तासाचे प्रवचन ऐकविले आणि तो वेळ , SQL च certification करण्यात घालवावा अस सांगितले. तेव्हापासून ते बंदच झाले. मी मात्र घेते पाणी वगैरे आयत सोफ्यात बसून.![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
सो एकुण काय जर विभागणी असेलच तर ती "कौशल्यावर " आधारीत आहे अस समजण्यास हरकत नाही.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
त्यामुळ एक होत कि जे काम जो कुणी करतो ते "उत्तम" असत. आणि ते काम आहे अस वाटत नाही.
कुणाला तर वाटेल स्त्री पुरुष समानता वगैरे. तर तसलाही काही अभिर्वाव नाही. इक्वल डेसिग्नेशन असलेली आमची टिम आहे एवढचं.
>>इक्वल डेसिग्नेशन असलेली
>>इक्वल डेसिग्नेशन असलेली आमची टिम आहे एवढचं.
मस्तच.
बाकी आम्ही स्वयंपाक फार करत नसल्याने, इथे 'युक्तीच्या गोष्टी चार' काही लिहिता येणार नाहीत. सध्या नीधपने दाखवलेल्या तक्त्याप्रमाणे संध्याकाळच्या स्वयंपाकाचे व्यवस्थापन करण्याचा प्रयत्न चालू आहे.
काटेकोरपणे, हिशेबीपणे नाही
काटेकोरपणे, हिशेबीपणे नाही केले तरी कामं मात्र वाटुनच करतो घरातली>> रैना, सीमा उत्तम पोस्ट्स.
माझा नवरा ही कुकर लावणे, भांडी घासणे, मुलीला तयार करणे, ब्रेकफास्ट बनवणे हे आवडीने करतो.
दोघांनी कामे आनंदाने वाटुन घेतली की स्वयंपाकाचे च काय तर संसाराचे पण व्यवस्थापन सोपे होते आणि बरासचा वेळ वाचतो. मुलांना पण हलकी कामे करायला द्यावीत त्यांना ही मजा येते.
बाकी घरगुती कामे पण तो अगदी मनापासुन करतो. काही भाज्या, दाल फ्राय असे प्रकार तर माझ्या पेक्षा तोच छान बनवतो. बाकी त्यांचही मत आहे की किचन मध्ये जास्त वेळ घालवु नये
एनीवे, हे चित्र आजकाल सगळीकडे पहायला मिळतंय (खुश झालेली बाहुली)
सांगायचं म्हणजे माझ्या सासर्यांना स्वयंपाकाची प्रचंड आवड. इथे आले की मला भाजी आणुन/चिरुन देणे, लोणचं करुन देणे, चहा करणे, तळण करणं ही त्यांची आवडीची कामे. त्यांनी त्यांच्या संसारात पण स्त्री-पुरुष समानता छान राबवली होती/आहे. ते दोघे जेंव्हा नोकरी करत होते तेंव्हा त्या काळात ,खेडेगावात राहुन सुद्धा त्यांनी आईंच्या बरोबरीने सगळी कामे केली (मुलांना तयार करणे, डब्बा भरणे, वेळप्रसंगी सगळा स्वयंपाक करणे इ.)
पॉईटाचा मुद्दा हाच की कामाचं विभाजन झालं तर भार जरा हलका होतो.
हम्म्म.. मी स्वयंपाक करत नाही
हम्म्म..![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
)तर एका मोठ्ठ्या प्लास्टिक डब्यात ते सगळे पुडे भरुन ठेऊन देते ![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
मी स्वयंपाक करत नाही रोज पण काही टिप्स सांगितल्या तर चालतील नं?
महिन्याभर लागणार्या सगळ्या किराण्याची एक यादी मी एक्सेल मध्ये बनवलीये. म्हणजे एक टेबल बनवलेय ज्यात एका कॉलम मध्ये ही यादी आहे. पुढचे बारा कॉलम १२ महिन्याचे आहेत. याचं प्रिंटाउट घेऊन ठेवते दरवर्षी (१पेपर फक्त). दर महिन्याला हव्या त्या वस्तुपुढे "किती हवी " ते पेनानी लिहिते. आणि ही यादी जवळच्या किराणावाल्याला देते. तो सामान घरी आणून देतो (यादी सहित)
आलेलं सामान जर लगेच डब्यात भरलं नाही तर तसंच पडून रहातं. जर ते लगेच भरून ठेवायला वेळ नसेल (किंवा इच्छा नसेल
अजून लिहिते थोड्या वेळानी..
पॉईटाचा मुद्दा हाच की कामाचं
पॉईटाचा मुद्दा हाच की कामाचं विभाजन झालं तर भार जरा हलका होतो. >>
माझा मुद्दा वेगळा होता .
घरातली नित्यनेमाची कामे नवरा बायको दोघांना जमायला हवीत - रोज केली नाही तरी . यात बिले, कर्जाचे हप्ते , गाड्यांचे मेंटेनंस , गुंतवणूक, शाळेचे उपद्व्याप, कौटुंबीक ऑब्लिगेशन्स, रोजचा पोटभरीचा स्वैपाक , घराची स्वच्छ्ता, नित्य नेमाची खरेदी, तब्येतीबद्दलची कामे असतील ( ब्लड टेस्ट्स करणे , थेरपी इत्यादी ) हे सर्व आले.
रोजचं विभाजन हे प्रत्येक कुटूंबाचं वेगळं असणार अन एकेका घरातसुद्धा परिस्थितीनुसार बदलत असणार .
धागा एकदम मस्त! फक्त
धागा एकदम मस्त! फक्त स्वयंपाकाचे व्यवस्थापननसून हा धागा...work-life balance च व्यवस्थापनाचा असेल तर जास्त मजायेईल वाचायला.
BS व्यायाम दुसर्यासाठी करता
BS व्यायाम दुसर्यासाठी करता येत नाही.. तेव्हा तो स्वतःचा स्वतःलाच करायला हवा..
मेधाचा मुद्दा : १००%
मेधा +१
मेधा +१
घरातली नित्यनेमाची कामे नवरा
घरातली नित्यनेमाची कामे नवरा बायको दोघांना जमायला हवीत << सोला आने सच!!
घरातली नित्यनेमाची कामे नवरा
घरातली नित्यनेमाची कामे नवरा बायको दोघांना जमायला हवीत >> सहमत!
वरदा >> कणीक मळताना आणि भाजी
वरदा >> कणीक मळताना आणि भाजी चिरतानाचा वेळ हा माझा सगळ्यात छान क्रिएटिव थिन्किंगचा वेळ असतो असं लक्षात आलंय. अभ्यासातल्या अनेक अवघड आणि अनघड जागा माझ्या या वेळात सुटल्यात, नवे सनसनाटी विचार सुचलेत.. तेव्हा स्वयंपाकघरातल्या कामांमधे माझं हे अभ्यासाचं पण व्यवस्थापन आहे >>> अनेक मोदक!
दोन प्रकारचे स्वयंपाक असतात एक रिक्रिएशन म्हणुन आणि दुसरा नाईलाज म्हणुन! अवल ने जे व्यवस्थपन दिलय ते नाइलाज म्हणुन चे आहे असे माझे मत! दुस्र्या प्रकारच्या स्वयपाकाबद्दल परदेसाईंनी लिहील आहे! बर्याच वेळेस ताण घालवायचा असेल तर मला किचन मधे वेळ घालवायला आवडतो. विद्यार्थी दशेतील ही सवय ... कामाच्या विभागणित विकएंड्सला किचन माझ्या ताब्यात असते (बिचारा पार्ट्नर :-)) ! स्वैंपाक रिक्रिएशन म्हणुन केल्याने हे व्यवस्थापनेचे मुद्दे कधी लक्शात आले नाहीत... पण पुढे मागे उपयोगी येतील तेंव्हा बायकांनी करायची का पुरुषांनी असे फाटे न फोडता... व्यवस्थापनावर लिहा ... उपयोग होइल![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
*
*
तब्येतीबद्दलची कामे असतील (
तब्येतीबद्दलची कामे असतील ( ब्लड टेस्ट्स करणे , थेरपी इत्यादी ) <<< मला वाटतं हे मुलांना डॉक्टर कडे नेणे/आणणे या अनुशंगाने मेधा लिहीत आहे.. स्वतःची ब्लडटेस्ट नव्हे..![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
(विषय कामं वाटणी करण्याच्या आहे.. खरंतर स्वयंपाक नियोजनाचा)..
तब्येतीबद्दलची कामे असतील (
तब्येतीबद्दलची कामे असतील ( ब्लड टेस्ट्स करणे , थेरपी इत्यादी ) <<< मला वाटतं हे मुलांना डॉक्टर कडे नेणे/आणणे या अनुशंगाने मेधा लिहीत आहे.. स्वतःची ब्लडटेस्ट नव्हे.. >>> oops!
अस आहे तर्...माझीच समजण्यात चूक झाली. सद्या वरची पोस्ट उडवते आणि जमेल तस तिथे विषयाला धरुन माझ्या काही स्वयंपाकाचे व्यवस्थापनाच्या ideas लिहीते.
. आम्ही अजिबातच करत नाही इतकं
:).
आम्ही अजिबातच करत नाही इतकं स्वयंपाकाचं प्लॅनिंग, माझी किचन मॅनेजमेन्ट फक्त किचन लावणे पुरती मर्यादित आहे, जनरली किचन मधे कॅटॅगरीज प्रमाणे सामान लावणे, जे सतत वापरलं जातं ते ह्ताशी इतकं बेसिक तत्त्वं पाळालं तरी किचन व्यवस्थित लावलं जातं.
स्वयंपाकात कणिक भिजवून ठेवण्या पलिकडे काही तयारी नाही करत.
खरं सांगायचं तर मी तेवढं महत्वच देत नाही स्वयंपाक या गोष्टीला :), आय मीन विचार करून प्लॅन करावं , इतकी मोठी गोष्ट नाही वाटत मला कुकिंग ( २ लोकांचाच सुटसुटीत स्वयंपाक असेल तर, कामाच्या वेळा फ्लिक्ग्जिबल असतील तर.).
खायला आणि स्वयंपाक करायला आवडत असला तरी रोजच्या जेवणात साधी पट्कन होणारी भाजी आणि फुलके च करते, वाटण वगैरे लागणार्या भाज्या नाहीच करत रोजच्या जेवणात, ब्रे.फा ला ऑम्लेट- बॉइल्ड एग्ज-ओटमील टाइप पटकन होणारे पदार्थं.
कधी पार्टी वगैरे असेल, खूप लोक येणार असतील तर करते प्लॅनिंग, त्यामुळे मोठय कुटुंबात स्वयंपाक करणे या गोष्टीला प्लॅनिंग-मॅनेजमेन्ट लागु शकते हे मात्रं मान्य ! :).
अवांतर आणि नो ऑफेन्स टु एनिवन :
गंमत म्हणून आम्ही आईला, सा.बा . वगैरे पब्लिक ला चिडवतो कायम काय तुमच्या डोक्यात खाण्या बद्द्दल विचार चालु असतात.. ब्रेकफास्ट झाला कि लंच ला काय करायचं, लंच झाल्यावर रात्रीच्या जेवणात काय, रात्री दुसर्या दिवशीच् प्लॅनिंग :).
देसाई, स्वयंपाकाबद्दलची पोस्ट
देसाई, स्वयंपाकाबद्दलची पोस्ट भारी! तुमच्या सारखे शिकायला हवे.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
सीमा![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
सॉलीड ढासू आयडीया मिळाल्यात
सॉलीड ढासू आयडीया मिळाल्यात मुख्य परदेसाईंच्या पोस्टमधून कारण ते परदेशात असल्यामुळे...:) माझ्याकडे अॅडवण्यासाठी काही नाहीये..पण उगीच वाटलं म्हणून सांगते,
मी सकाळी काहीच करत नाही...म्हणजे मुलांना त्यांच्या पाळणाघरात जेवण असतं..ते त्यांना खाण्यासारखं नसेल तर त्यांच आणि इतर वेळी आमचं दुसर्या दिवशीच्या दुपारचं जेवण हे नेहमी आदल्या किंवा आधी उरलेल्यातलं असेल याची काळजी मी पाच दिवस घेते....
न्याहारीला लागणारं जे काही असतं जसं ओटमिल इ. ते मायक्रोवेव्हेबल असतं किंवा एखाद्या दिवशी अंड्याची न्याहारी असेल तर ती नवर्याची फ़र्माईश असल्याने तोच करून ताटात आणून देतो.....त्यामुळे काही नाही इथल्या फ़्रीजमधुन तिथल्या फ़्रीजमध्ये आणि मग तिथल्या मायक्रोवेव्हमध्ये नंतर मग संध्याकाळी एकाने जेवण आणि दुसर्याने साफ़-सफ़ाई या तत्वावर गेले बरीच वर्षे सुखात काढलीत असं हे सग्ळं वाचल्यावर मला म्हणावंसं वाटतं..
सकाळी उठल्या उठल्या डायरेक्ट पोळ्या/कुकर इ. वगैरे स्वतःच्या बाबतीत मला सहन होत नाहीये..अर्थात देश तसा वेश पण माझ्या आईने इतकी वर्षे हे कसं केलं असेल हे मात्र आज जाणवून थोडं वाईटच वाटलं...तरी माझे बाबाही तिला मदत करणारेच ...पण तरी काम ते काम....
तरीही ती वरची घाऊकमध्ये कांदे कापून तळून/भाजुन ठेवायची आयडीया वापरेन...संध्याकाळी कामाला येईल....(आणि कांदे मला कापावे लागत नाहीत बरेचदा तेव्ह...:))
डीजे किती मोदक देऊ!! माझं सेम
डीजे किती मोदक देऊ!! माझं सेम असेच आहे. नीलच्या जेवणाचेच प्लॅनिंग करते, बाकी आम्ही जे दिसेल ते/इच्छा होईल ते/संपवायचे असेल ते असंच खातो. आणलेली ग्रोसरी खराब व्हायच्या आत संपवायची इतकंच मेन उद्दीष्ट!. अवांतराबद्दलही मोदक. सारखे हेच आणि असेच विचार करणे म्हणजे मला शिक्षा वाटते. आईला नेहेमी चिडवते मी, वेळ मिळाला आहे तर बस जरा. सारखी निघाली पुढचं प्लॅनिंग करायला!![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
धागा चांगला आहे, पण मला खरंच हे कधी जमेल असे वाटत नाही.
आणलेली ग्रोसरी खराब व्हायच्या
आणलेली ग्रोसरी खराब व्हायच्या आत संपवायची इतकंच मेन उद्दीष्ट!.![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
<<< टोटली
टाइम टेबल प्रमाणे वागण्या इतकी शिस्तं/आवड पण नाही माझ्यात खरं तर.. शाळेत असताना मैत्रीणी अभ्यासाचं टाइम टेबल करायच्या म्हणून मी पण करून पाहिलं पण नाहीच जमलं कधी ठरवल्या प्रमाणे अभ्यास करणे.. स्वयंपाक वगैरे तर टेक इट इझी च गोष्ट वाटते मला :).
हुश्श.. आत्ता झाले सगळे
हुश्श.. आत्ता झाले सगळे वाचून.![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
ज्यांचे नवरे घरात स्वैपाकात मदत करतात त्यांच्यासाठी - नवरे आपसूकच मदत करत असतील तर त्या नवर्यांचे कौतुक.. ज्यांचे नवरे आपसूक करत नव्हते पण आता करतात त्या बायकांचे डब्बल कौतुक.
आमच्याकडे एकदम वेगळा सीन
आमच्याकडे एकदम वेगळा सीन असतो.
ज्याला जे जमतं, आवडतं ते त्याने करावं. मला काही गोडी नाही इतकी स्वैपाकाची, तेव्हा ते नवरा व मी बाहेरची कामं असे न सांगता सुरु आहे इतकी वर्षे. ह्यात एकदम लिंगनिरपेक्षता.![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
बरं, स्त्री-पुरुष समानता वर गाडी कधी घरंगळणार?
ज्याना जे करायचे आहे ते करु दे ना. ते त्यांच्या विश्वात खुष आहेत ना? मग कशाला उगाच हे का, ते का? तुम्ही काय करता व कसे करता तुमच्या किचनात ते लिहा की. इतर बीबी आहेतच असली चर्चा करायला.
परदेसाईंची पोस्ट चांगली
परदेसाईंची पोस्ट चांगली आहे.
१,२,७,८ पटले.
आम्ही इतके प्लनिंग नाही करत. पण एखादा जो दिवस वाटतो तो दिवस जेवण व ग्रोसरीचा. शनिवारी वाटले तर शनिवार, रवीवारी वाटले तर रवीवार. तसे मुलीच्या अॅकटीवीटीज प्रमाणे. तिला जर सॉकरची प्रॅक्टीस वगैरे, मला कुठे बाहेर जायचे, नवर्याला काही काम तसे दिवस ठरवायचा.
बाकी कसलाच विचार करत नाही.
आठवड्यातून २-३ वेळा बाहेर जेवतोच कारण वेळ असतो/नसतो त्याप्रमाणे व भाजी/मासे उरले असतील तर. कारण तितकी काही ग्रोसरी करत नाही म्हणून किलोच्या भाज्या आणतच नाही. ज्या भाज्या दिसल्या त्या घेतल्या, मासे व मटण नेहमीच घेतो/खातो पण.
शाकाहारी जेवण करणे वेळखाउ असते व डोके घालावे लागते. वैताग वाटतो मला जर करावेच लागले तर नवरा बाहेर असेल तर.
मांसाहारी पटकन होते. त्यामुळे तेच ज्यास्त असते रात्रीला.
ज्याला जमतं ते त्याने करावं हेच तत्व. कोणावर दादागिरी नाही/ओझं नाही की तु हे कर, ते कर. सरळ गाडी काढतो व जेवून येतो बाहेर मला भांडी वगैरे रोज घासायला आवडत नाही मग उगाच सिंक मध्ये टाकून ठेवण्यापेक्षा बाहेर जेवायचे. बस्स. काम फत्ते!
शाकाहारी जेवण करणे वेळखाउ
शाकाहारी जेवण करणे वेळखाउ असते व डोके घालावे लागते>>>>>>![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
म्हणजे बिनडोक्याचा मांसाहारी स्वयंपाक एकदम पटकन होतो वाटतं.
आमच्याकडे २ वर्षांपासून
आमच्याकडे २ वर्षांपासून स्वयंपाकघराचे संपूर्ण व्यवस्थापन माझ्याकडे आहे. त्यापूर्वी माझा वाटा मदत करण्यापुरता होता. पण अवल यांनी वर्णन केलेली हातघाईची लढाई करायची गरज आमच्याकडे नसल्याने इथे काही लिहिलेले नाही.
इथे बर्याच जणींनी लिहिलेले वाचून (आणि प्रत्यक्ष पाहून) मला असं वाटतंय की वेळ वाचवण्यासाठी फुड प्रोसेसरसारख्या यंत्राचा उपयोग का होत नाही? हाताची चव जेवणात उतरावी म्हणून का?
<स्वयंपाकाच्या तयारीचे विचार, मनाच्या एका कोपर्यात कुठेतरी सुरू करावेत.>
हे आदल्या रात्री, खरे तर रविवारीच केलेले असावे. त्या त्या आठवड्यात कोणत्या भाज्या करायच्या त्या आधीच आणून ठेवलेल्या असणार. जिथे पूर्वतयारीची गरज असते अशा उसळीसाठी कडधान्ये भिजविणे यासारख्या गोष्टी आदल्या रात्री, कधी आदल्या सकाळीही करायला लागतात. (हे केले जात असेलच, लिहायचे राहिले असेल)
अवलताई, उत्तम माहीती. नवीनच
अवलताई, उत्तम माहीती. नवीनच संसारात पडलेल्या व हौस असणार्या मुलींना तर अगदी उपयुक्त. काही जणींना मनात नसेल किंवा असेल तरी स्वैपाकाची जबाबदारी उचलावी लागते. नवर्याने सगळ्या कामांत मदत करणे योग्यच पण हे सगळीकडे नाही होऊ शकत. आणि कित्येकदा गृहीणींना स्वतःलाच आवड असते हे सगळे हौसे हौसेनी करायची. त्यामुळे अशा सर्वांना नक्कीच फायदा होईल तुमच्या प्रदीर्घ अनुभवातून लिहिलेल्या माहीतीचा.
परदेसाई, तुमची पोस्ट खरच खुप
परदेसाई, तुमची पोस्ट खरच खुप आवडली!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
आता पुढच्या पोस्टस वाचते!
मला असं वाटतंय की वेळ
मला असं वाटतंय की वेळ वाचवण्यासाठी फुड प्रोसेसरसारख्या यंत्राचा उपयोग का होत नाही? हाताची चव जेवणात उतरावी म्हणून का?<<<
माझ्याकडे आहे फुप्रो आणि क्वचित वापरला जातो. अगदी जेव्हा स्वैपाकाला बाई नव्हती तेव्हासुद्धा. दोन माणसांच्या जेवणासाठी फूड प्रोसेसर रोजच्या रोज सगळा पसारा काढणे, वापरणे, धुणे ह्यापेक्षा पटकन हाताने करून मोकळे व्हावे असं माझं तरी व्हायचं.
बाकी हाताची चव हा प्रकार माझ्याबाबत तरी अतर्क्य![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
डिजे, येस्स!
माझ्या मते हाताची चव म्हणजे
माझ्या मते हाताची चव म्हणजे "त्या" व्यक्तीचे स्वैपाकाचे कौशल्य. उदा. भाजी कशी चिरली त्यावर चव बदलते . पाट्यावर वाटली तर ती वेगळी चव येते वाटाणाला मिक्सरच्या चवीपेक्षा. फोडणी करताना काय आधी काय नंतर घालता त्यावरही बदलते. आच किती ठेवता त्यावरही असते. आणि ह्या सगळ्या गोष्टी फक्त कृती वाचून नाही उमगत. आजीच्या हातची चव म्हणजे तिची कस्टमाईज्ड स्वैपाकाची पद्धत. आमची आजी खडे मिठ घालायच्या आमटीत चवीसाठी. हळद, तिखट, मसाला घरचा...साधा कढीपत्ता फोडणीत घालताना दोन हातामधे चुरून घालणार. त्याने स्वाद खुलतो म्हणायची. आजीच्या हातच्या आमटीच्या चवीचे रहस्य ह्यातच असावे.
सगळ्याच जणींच्या नवर्यांची
सगळ्याच जणींच्या नवर्यांची स्वयंपाकात मदत मिळावे हा आग्रह कशासाठी?
माझे पति एमबीए करत असतांना सकाळी ७ ला घराबाहेर पडत आणि रात्री ११.४५ ला घरी पोहचत. अशावेळी त्यांच्या मदतीची अपेक्षा करणे केवळ चुकीचे नाही तर दुष्टपणाचे देखील ठरले असते.
त्यावेळी मी अगदी कणखरपणे घर चालवु शकले ते या नियोजनामुळेच. नवरा चार डब्बे सोबत नेत असे, मुलगा दोन डब्बे घेउन ८ ला घराबाहेर पडायचा. आणि मी गर्भवती
नवर्याला बाहेरचे खाणे पथ्यामुळे चालत नसे. पण एखाद्या दिवशी अगदीच जमले नाही तर नवरा बाहेर खात असे.
मज्जा म्हणुन, सहज म्हणुन स्वयंपाक करणारे पुरुष असतात ना.. पण रोजच्या रोज पूर्ण स्वयंपाकाचे काम कुठल्या पुरुषाने एकाहाती सांभाळले आहे का ? जसे बर्याचशा बायका सांभाळतात तसे.
परदेसाईंची पोस्ट आवडली. पण त्यांचे किंवा वैद्यबुवांचे जेवण बनवणे केवळ रिलॅक्सेशन साठी आहे... असे ध्वनित होते आहे. ती त्यांची रोजची जबाबदारी नाही असे वाटते. असो.
आता पूर्णवेळ कामाला बाई असुनही माझे आठवडाभराचे नियोजन दर रविवारी तयार असते. त्यात सहसा बदल घडत नाही.
माझ्या टिप्स :
मी कणिक दोन दिवसांची भिजवते.
भाज्या आणल्या बरोबर निवडुन फ्रीजमध्ये ठेवते. भाज्या निवडतांना नवरा मदत करायचा/ करतो.
पालेभाज्या आणि इतर भाज्या अशी लिस्त बनवुन फ्रीजला लावुन ठेवते. जे वापरुन झाले त्यावर काट मारते.
मेनु फ्रीजला लावलेला असतोच, बदल करायचा असल्यास भाज्यांच्या लिस्टमधुन निवड करणे सोपे पडते.
पूर्वी जेव्हा चार डब्बे द्यायची तेव्हा उसळ रात्रीच करुन ठेवायचे. भाजी मात्र सकाळी. सॅलड काकडी, गाजर फक्त धुवुन झिपलॉक मध्ये द्यायची.
मुलाला पराठे किंवा भाताचे प्रकार द्यायचे. पराठा साठीचे सारण रात्रीच बनवायचे. व्हेज राईस बनवणार असेल तर त्या भाज्या रात्रीच वेगळ्या करुन ठेवायचे .
सकाळी एका बर्नरवर दुध, एका बर्नरवर भाजी आणि एकावर चपात्या. दुध उतरवले की मुलासाठीचा भात किंवा पोळ्या करुन झाल्यात की पराठे. जो मुलाचा जेवणाचा डब्बा आहे तोच बहुदा नवर्याचा आणि माझा नाष्टा असायचा. त्यामुळे तो एक डब्बा नवर्यासाठी पण भरायचा.
पण आता एवढे करावे लागत नाही कारण हाताशी कामवाली आहे. म्हणुन महत्वाची टिप खूप काम पडत असेल आणि नवर्याकडुन मदत मिळणे शक्य नसेल तर कामवाली ठेवा![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
"माझ्या नवर्याला चहाही येत नाही" हे कौतुकाचे उद्गार नसतात
माझ्या नवर्याला खरेच काहीही येत नाही . पण त्याचे त्याला किंवा मला कौतुक वाटत नाही. स्वयंपाकघरात तो मदत करु शकत नाही म्हणुन बाकीची बरीच कामे तो एकहाती सांभाळतो.
मी फुड प्रोसेसरला
मी फुड प्रोसेसरला स्वयंपाकघरात मानाची जागा दिली आहे. त्यामुळे रोजची कणीक मळणे; भाज्या विशेषतः कांदे चिरणे हे तो अगदी आनंदाने करतो. रोज वापरायची सवय लागल्याने त्याची भांडी/पाती काढून पटकन स्वच्छ करून ठेवणे अंगवळणी पडले आहे.![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
अगदी पहिल्यांदा जेव्हा कणीक मळली होती, तेव्हा चिकटलेले भांडे सोडवायला त्याला त्याच्या डॉक्टरांकडे न्यावे लागले होते
ओट्याच्याच आकाराचे एक स्टोरेज युनिट, त्याच्या वर्कटॉपवर मायक्रोवेव्ह ओव्हन (याला मराठीत लघुलहरी भट्टी असे म्हणतात असे आताच कळले), फुप्रो, मिक्सर-ग्राइंडर विराजमान आहेत. अर्थात आमचे किचन सर्वसाधारण किचनपेक्षा प्रशस्त असल्याने हे शक्य झाले. भांडी , उपकरणे, स्वयंपाकाचा कच्चा माल यांची मांडणी आणि स्टोरेज हा या स्वं.गृ.व्यवस्थापनातला अत्यंत महत्त्वाचा भाग आहे.
Pages