पुण्यात घर घ्यायचय?

Submitted by नानबा on 16 May, 2010 - 10:33

ह्या धाग्याच्या मूळ उद्देशात मी गृप बूकिंगसाठी लोक जमतात का हे पहायचं असं लिहिलं होतं..
पण काही प्रतिसादांमधे असे गृप ऑल्रेडी आहेत आणि त्यांना अनुभवही आहे असे प्रतिसाद आले - त्यांचं म्हणणं पटल्यानं आणि चर्चेचं मूळ स्वरूप हळूहळू बदलून "पुण्यातल्या चालू प्रोजेक्ट्सची/लोकेशन्सची माहिती/घर विकत घेताना लक्षात घ्यायच्या गोष्टी" - असं झाल्यानं माझं हे मुळच पोस्ट मी बदलतेय.
--- पुण्यात घर विकत घेऊ इच्छिणार्‍यांना शक्य ती माहिती मिळावी - म्हणून हा बाफ!

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

तेथे दोन आहेत बहुधा. फॉरेस्ट ट्रेल्स आणि कदाचित युथिका. त्यातील कोणता?

फॉरेस्ट ट्रेल्स ची मधे खूप चर्चा ऐकली होती. पण एकतर प्रचंड महाग आहे आणि चांदणी चौकापासून पुढे ५-६ किमी. जवळपास फक्त भूगाव. त्यांच्या कॉम्प्लेक्स मधे शाळा चालू झालेली आहे. पण प्रत्यक्षात कोणी राहायला आले आहे की नाही माहीत नाही.

धन्यवाद फारएण्ड.
मी फॉरेस्ट ट्रेल्स बद्दल विचारत होतो. तुमच्या माहितीत जर कोणी तिकडे बुकींग केले असेल तर प्लिज सांगा. माझ्यासाठी हे प्रोजेक्ट सोयीचे वाटत आहे कारण ते पुढच्या २/३ वर्षात तयार होईल व तोपर्यंत मी मुलांच्या शाळा वगैरे जबाबदारीतुन मोकळा झालेलो असेन. आणि सोसायटी व काँप्लेक्स मोठा असल्यामुळे एकंदरीत ईतर सोयी तोपर्यंत आजुबाजुला निर्माण होतील असे वाटते.

समंजस, आमच्या ओळखीच्या एकांनी तेथे फ्लॅट चे बुकिंग केलेले आहे. ते साधारण अडीच तीन वर्षांनी तयार होतील, तोपर्यंत माझ्या अंदाजाने तेथे आजूबाजूची सपोर्ट सिस्टीम (किराणा दुकाने, रेस्टॉ., मेडिकल दुकाने, डॉक्टर्सचे क्लिनिक वगैरे) तयार होतील. हॉस्पिटल मात्र तेथे जवळपास नाही असे वाटते. शाळा आतच आहे (श्री श्री रविशंकर) आणि चालू झाली आहे (दुसरीकडची तेथे शिफ्ट झाली आहे).

त्यांनी काल टाईम्स व इतर पेपर्स मधे मोठी जाहिरात दिली, त्यामुळे या वीकेण्डला तेथे खूप गर्दी झाली होती असे ऐकले. तुम्ही फोन करून बघा, कदाचित साईट व्हिझिट्स ही चालू केल्या असतील.

पण चांदणी चौकातील टोल नाक्यापासून पाच किमी आहे. मधे भूगाव चा एकदम अरूंद रस्ता आहे. एक त्याला बायपास करून जाणारा रस्ता होणार आहे असे म्हणतात, पण माहीत नाही.

आणि मी परवा चुकून युथिका लिहीले - त्या रस्त्यावर दुसरी स्कीम आहे ती परांजपे ग्लोरिया.

४००० रू पर स्क्वे फूट. हा फ्लॅटसाठी. काही बंगलेही आहेत पण ते बहुधा प्रचंड महाग आहेत. पावणे दोन कोटीहून पुढे असे ऐकले.

फारएण्ड, फॉरेस्ट ट्रेल मधे मी एका फ्लॅटचे बुकींग केले आहे (चला, पहिली पायरी तर गाठली).
मी तुम्हाला वेगळी मेल टाकतो तेव्हा जमल्यास तुमच्या परिचितांचा संपर्क दिलात तर बरे होईल. म्हणजे ईतर गोष्टींची चर्चा करता येईल. धन्यवाद.

मी Forest Trails च्या launch weekend ला पुण्यात होतो, जाऊन बघून आलो. डोंगरावर township असे स्वरूप आहे. Views छान आहेत. Rate Rs 4000/-. 3 BHK 1Cr (premium), 67 Lacs (Value). Villas are amazing, but > 2 Cr.

कोणाला या वाकड मधील scheme बद्दल माहिती आहे का? http://www.pridepurplegroup.com/park_titanium_introduction.htm. त्यांनी Premium Luxury Apartments असे advertise केले आहे. मोठ्या ३ आणि ४ bhk apts आहेत (२००० & २६०० sq ft), पण महाग आहेत - 1.2 Cr/1.5 Cr. इतके काय आहे या scheme मध्ये? कुणी जाऊन आले आहे किंवा इथे book केले आहे काय? तसेच वाकड भागाची आजची स्थिती आणि future potential बद्दल कुणी सांगू शकेल काय? धन्यवाद!

कायच्या काय किमती झाल्या आहेत पुण्यात.

दक्षिणा | 2 March, 2012 - 17:50नवीन

अक्षरश: प्राची नुसते रेट ऐकूनच फेफे उडते.
>>>>

यावरून मुम्बैत चांगले चांगले लोकही झोपडपट्टीत का राहतात हे कळावे.... मुम्बैत पोलीस कॉन्स्टेबल्स किंवा तत्सम लोकही झोपडपटीत राहतात.

किमती कृत्रिम रित्या वाढवलेल्या आहेत . १ कोटी २ कोटी काहीही सांगतात . NRI , investors , आणि काळा पैसा असणारे investment म्हणून property घेतात . सध्या चर्चेत असणारे कृपा शंकर सिंघच बघा . मुंबईत सामान्य माणसाला जागा नाही . ह्यांनी तर properties मोजता येणार नाही एवढ्या जमा केल्यात . आता एकाच माणसाने इतकि property बुक केल्यावर बाकीच्यांनी कुठे राहायचे ?

पिम्परी चिन्चवड मध्ये हि किमती फार वाढल्या आहेत. Sad
आता तर लोकं नाइलाजाने जिकडे मिळेल तिथे घर घेत आहेत.
पार नाशिक हायवेला टच झालेत प्रोजेक्ट.
कुठे कुठे तर ग्रामपंचायतीत (देहु गाव वैगेरे) आहेत. पण बजेट कमी आहे त्याना ऑप्शनच नाहिये.

कोथरुड मधील "कुमार परिसर" बद्दल कुणाला माहीती आहे का? इथेही रिसेल चे flat कोटीच्या कोटी उड्डाणे करीत आहेत. Happy खरेच काही super amenities आहेत की उगीचच किंमत फुगवलेली आहे? खरेच हे सगळे sustain होईल असे तुम्हाला वाटते का? Is India real estate heading to what happened to USA real estate in (and since) 2007?

मला तरी वाटतं घरांच्या किंमती कमी होणार नाही.. सोन्याचे भाव पहा... महागाई वाढली आहे... रुपयाची Purchaing power कमी झाली आहे... लोकांचे उत्पन्न वाढले आहे...

अभिजित, तुमची शंका अगदी रास्त वाटते. भाव खूपच फुगवलेले वाटत आहेत. पायाभूत सुविधा काही नाहीत आणि रेट मात्र काहिच्या काही.पाण्याचा प्रश्न तर दरवर्षी अधिकाधिक बिकट होतो आहे. बिल्डर लोकांचा ताठा मात्र अजून कमी झालेला नाही.

डिसेंबर मधे जवळपास ५० प्रोजेक्ट शोधुन नंतर आम्ही नर्‍हे ला एवन गृप च्या "नक्षत्र" मधे २-बीएचके जानेवारी-२०१२ मधे बुक केला. ३३५० रेट होता. ९८३ स्क्वे. फु. चा फ्लट एकुण ३८.२५ लाख (सगळ धरुन) पडला. सोई भरपुर आहेत. पझेशन डिसेंबर २०१३ मधे आहे. ईथे माहिती मिळेलः
http://www.aoneshelters.in

--
कानडा

कानडा ....धन्यवाद....Pune Bangalore highway वरच्या reference ने सान्गता यील का.....एखादा landmark

हा प्रोजेक्ट Pune Bangalore highway ला लागुन असलेल्या तक्षशीला प्रोजेक्ट च्या बरोबर मागे आहे. या हायवे च्या आंबेगाव-नर्‍हे रस्त्याच्या ब्रिज ची एक्झिट घेतली कि तिथे बरेच होर्डिंग दिसतील 'नक्षत्र' चे.

साईट नर्‍हे टेक्निकल कंपस च्या शेजारी आहे. जवळच हायवे ला लागुन BAPS स्वामिनारायण मंदीराची साईट आहे.

त्यांच्या साईट वर लोकेशन चा नकाशा आहे: http://www.aoneshelters.in/map.php

--
कानडा

ठाण्यातील एजंटबद्दल माहिती हवी आहे. शक्यतो रीसेलचे / रेडी पझेशन बघतो आहोत आणी आई-बाबांच्या सोयीसाठी १/२ माळ्यावर हवे आहे. वर्तक नगर्/शास्त्री नगर भागात असेल घर तर जास्त उत्तम.ईथे किंवा माझ्या वि पु त/ संपर्कातुन मेल करुन कळवले तरी चालेल. धन्यवाद.

रवी करंदीकरांचा ब्लॉग फारसा उपयोगी वाटत नाही. तो बहुधा प्रमोशनल ब्लॉग आहे. जाहिरातीसारखीच माहिती त्यात असते. फार तर साईट फोटोज असतात ...

रवी करंदीकर यांच्या दृष्टीने पुणे... आपले काय मत आहे?

Why home buyers are deserting Pune? What's wrong with Pune?," the learned Mumbai investor asks.

"Because, Pune is deteriorating and dying...no infrastructure - no roads, water cuts, power shortage, air pollution, contaminated rivers and ground water, stinking garbage, rising crime rate - from chain snatching to murder & rape , flourishing sex tourism, increasing dominance of all kinds of mafias & drug dealers, capital of all types of swindles & scams, increasing threats of terrorist attacks, unhygienic living conditions - infectious diseases like malaria - swine flue and all, growing slums, unauthorized - illegal - construction, passive citizens, no governance.....Pune is deteriorating and dying.....,"

स्वतःचा अपमान करुन घ्यायचा असेल तर रवी करंदीकरला जरुर फोन करा. एवढा condescending attitude मी कोणात पाहिला नाही आतापर्यंत.

एक्झर्बिया प्रोजेक्ट बद्दल त्याने जी बदनामीची मोहीम ब्लॉगवर उघडली आहे त्यावरून हा प्राणी काही डील सेटल न झाल्याने भलताच तळतळलेला दिसतोय Happy . म्हनजे प्रोजेक्ट भिकार असेल (नव्हे तो असणारच आहे)पन या भाषेत म्हनजे टू मच होतेय. अगदी मिनिस्टरला अनावृत्त पत्र काय आन्खी काय काय.... तसे शोषक अमितवाले नाहीत काय? तेंडुलकरला ६ की ९ कोटी अ‍ॅम्बेसडर म्हणून दिले ते काय खिशातून.? ते तर प्रोजेक्टवर लावून खरेदीदारांच्या माथी मारले असणार. केवळ सचिनच्या बंद फ्लॅटच्या अवती भोवती रहायला मिळावे म्हणून किमान ५०० रु.चौ फू जादा देणारे मूर्खच म्हटले पाहिजेत..:)

रवी करन्दीकरचा एकच मुद्दा पटतो तो म्हणजे जादा पैसे गेले तरी रेडी पझेशनच फ्लॅट घ्या बुकिंगमध्ये घेऊ नका.

पुण्यात ३५ लाखापर्यंत कुठे जागा मिळू शकते काय? ज्याचं budget जास्त नाहीये त्यांनी काय करायचं? सध्या Resale च्या पण किमती खूप आहेत. माझ्या काकूला जागा घ्यायची आहे.

Pages

Back to top