Submitted by नानबा on 16 May, 2010 - 10:33
ह्या धाग्याच्या मूळ उद्देशात मी गृप बूकिंगसाठी लोक जमतात का हे पहायचं असं लिहिलं होतं..
पण काही प्रतिसादांमधे असे गृप ऑल्रेडी आहेत आणि त्यांना अनुभवही आहे असे प्रतिसाद आले - त्यांचं म्हणणं पटल्यानं आणि चर्चेचं मूळ स्वरूप हळूहळू बदलून "पुण्यातल्या चालू प्रोजेक्ट्सची/लोकेशन्सची माहिती/घर विकत घेताना लक्षात घ्यायच्या गोष्टी" - असं झाल्यानं माझं हे मुळच पोस्ट मी बदलतेय.
--- पुण्यात घर विकत घेऊ इच्छिणार्यांना शक्य ती माहिती मिळावी - म्हणून हा बाफ!
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
२०१४ मध्ये पुण्यात शिफ्टलो.
२०१४ मध्ये पुण्यात शिफ्टलो. अर्थात नोकरीनिमित्तानीच. आधी जवळजवळ दीड वर्षे रेन्टवर धानोरीमध्ये होतो. रिसेंटली याच भागांत घर घेतलंय. थोडक्यात अनुभव -
विश्रांतवाडी-धानोरी-लोहगांव-टिंगरे नगर या भागांत गेले जवळजवळ ६ महिने घरं पाहीली. अगदी सगळ्या प्रकारांची पाहीली- स्टँडलोन बिल्डिंग, स्टँडलोन अंडर कन्स्ट्रक्शन, रिसेल चे फ्लॅट्स, बंगलोज सगळं. थोड्याफार फरकांनी किंमती सारख्याच आहेत.
शेवटी श्रीराम प्रॉपर्टीज च्या १० वृंदावन मध्ये फ्लॅट घेतला.
दणकून बार्गेनिंग करणे याला पर्याय नाही.
सध्या पुण्यात सगळ्याच एरिंआंमध्ये बरेच प्रोजेक्ट्स आहेत आणि ग्राहक म्हणून आपल्याला चॉईस भरपूर आहे.
विमाननगर पेक्षा धानोरी/वाडी जवळ असून निम्म्यापेक्षाही कमी किंमत आहे. पीएमसीमध्येच आहे हा भागही. मुख्य पुण्यापासून थोडा लांब आहे पण रस्ते ठीकठाक असल्यानी काही वाटत नाहीये सध्यातरी.
धानोरीपासून वाहनाने नॉर्मल ट्रॅफिक असतांना-
) व्हाया वाघोली - ३० मिनिटे (मेन पुण्यातून ज्यांना नगर > औरंगाबाद > नागपूर जायचं असेल त्यांना हा रस्ता अतिशय सोयिचा आहे. विमाननगर, चंदनवाडी, वाडेश्वर मंदीरापर्यंतच सगळ वैताअग ट्राफिग सहज स्किप होतं)
रेल्वे स्टेशन - २० ते २५ मिनिटे
गुंजन टॉकीज - १५ मिनिटे
एअरपोर्ट - १५ मिनिटे
फिनिक्स मार्केट्सिटी मॉल - २० मिनिटे
नगर रोड (विळद घाट
दिघी - १५ मिनिटे
भोसरी - २० मिनिटे
खडकी - १० ते १२ मिनिटे
डि वाय पाटील जवळच्या प्राईड वर्ल्ड सिटीतही जाऊन आलो. अजून जेमतेम बिल्डिंग उभ्या राहातायेत तर ६५ लाखाला 2BHK! बाबौ!
माझं मेन ऑफिस औंध मधे आहे पण
माझं मेन ऑफिस औंध मधे आहे पण मला फिरावं लागतं मगरपट्टा, फातिमानगर अन् कोथरूड तसेच वाकड, पिंपरी ही आहेच. मेगापोलिसपासून वाकड ( जरा) जवळ म्हणून ते लोकेशन पहातो आहे... विश्रांतवाडीपासून comparatively पुण्याच्या अलिकडची ठिकाणं जवळ पडतील ना?
मेगापोलीस ची जी ऍड चालू आहे
मेगापोलीस ची जी ऍड चालू आहे त्याचं पझेशन 2 वर्षांनंतर आहे. 50 लाखाला 2 बीएचके
मेगापोलीस ची जी ऍड चालू आहे
मेगापोलीस ची जी ऍड चालू आहे त्याचं पझेशन 2 वर्षांनंतर आहे. 50 लाखाला 2 बीएचके >>>> कुठे आहे हे ??? म्हणजे लोकेशन कुठल आहे ??
Punawale madhe flat baghto
Punawale madhe flat baghto ahe . Ek shanka ahe tithe garbage duump yenar ahe ase aikale. Koni exact location sangu shakel Kay ani tyacha punawale madhe kiti effect hoil
Punawale madhe flat baghto
Punawale madhe flat baghto ahe . Ek shanka ahe tithe garbage duump yenar ahe ase aikale. Koni exact location sangu shakel Kay ani tyacha punawale madhe kiti effect hoil
प्रभात रोड, केतकर रोड, जयराम
प्रभात रोड, केतकर रोड, जयराम शिलेदार - कलमाडी -भोंडे पथ ह्या भागात रिसेल फ्लॅटचे काय दर? पर स्क्वे. फूट? ह्या भागातील चांगले इस्टेट एजन्ट सुचवाल का?
१३००० ते १५०००. भरपूर व्हाईट
१३००० ते १५०००.
भरपूर व्हाईट मनी असेल, रेडी पेमेंट असेल आणि लक्ष ठेऊन राहिलं तर एखादं चांगलं डिल कमी मध्ये मिळू शकेल.
ब्रोकर, घाटपांडे प्रॉपर्टीज. प्रोफेशनल आहेत. मला मागे त्यांनी एक दोन फ्लॅट दाखवले होते. फ्लॅट दाखवायला येणारी मुले चांगली आणि वक्तशीर आहेत.
धन्यवाद अतरंगी.
धन्यवाद अतरंगी.
मेगापोलीस हिंजवडी मध्ये. फेज
मेगापोलीस हिंजवडी मध्ये. फेज ३
बहुतेक 2bhk तिथे ५० लाखाला
बहुतेक 2bhk तिथे ५० लाखाला आहेत. ९५० स्क्वे. स्मार्ट होम्स.
रास्ता पेठ, केईम रूग्णालयाजवळ
रास्ता पेठ, केईम रूग्णालयाजवळ घर घ्यायचे आहे, वन bhk. तिथे काही नवीन प्रोजेक्ट चालू आहे का, जागेचा भाव काय चालू आहे. ब्रोकरविषयी माहिती असेेल तर प्लीज सांगा.
तिथे काही नवीन प्रोजेक्ट चालू
तिथे काही नवीन प्रोजेक्ट चालू आहे का, जागेचा भाव काय चालू आहे. >>>> नविन सध्यातरी नाही.आतल्या गल्ल्यांमधुन चक्कर टाकावी लागेल. पर स्केवर फुट ८५००-१२००० भाव सध्या आहे.रीसेल चे फ्लॅट साधारण ४० लाख ते ८५ पर्यंत आहेत.एकदा ऑनलाईन सर्च करा.थोडी कल्पना येईल.
वाकड , बावधन, भूगाव आणि
वाकड , बावधन, भूगाव आणि परिसरात सध्या २ bhk पाहत आहे , काही चांगले प्रकल्प असतील तर सुचवा
रावेत एरीया कसा आहे. PCMC
रावेत एरीया कसा आहे. PCMC मध्ये येतो का?
टाऊनशिप विरुद्ध हौसिंग
टाऊनशिप विरुद्ध हौसिंग प्रोजेक्ट यांचे काय फायदे / तोटे आहेत?
हिंजेवाडीतील कोहिनूर फार्मविले व VTP, Godrej , solitaire यांच्या टाऊनशिप बद्दल माहिती आहे का?
मॉडेल कॉलनी मध्ये माझ्या
मॉडेल कॉलनी मध्ये माझ्या भावाची नविन स्कीम चालू होते आहे. बहुतेक 3bhk आहेत पण काही 4bhk आणि काही 2bhk पण आहेत. इंटरेस्ट असेल तर अधिक माहितीसाठी मला संपर्कातून ईमेल करा.
Pages