Submitted by नानबा on 16 May, 2010 - 10:33
ह्या धाग्याच्या मूळ उद्देशात मी गृप बूकिंगसाठी लोक जमतात का हे पहायचं असं लिहिलं होतं..
पण काही प्रतिसादांमधे असे गृप ऑल्रेडी आहेत आणि त्यांना अनुभवही आहे असे प्रतिसाद आले - त्यांचं म्हणणं पटल्यानं आणि चर्चेचं मूळ स्वरूप हळूहळू बदलून "पुण्यातल्या चालू प्रोजेक्ट्सची/लोकेशन्सची माहिती/घर विकत घेताना लक्षात घ्यायच्या गोष्टी" - असं झाल्यानं माझं हे मुळच पोस्ट मी बदलतेय.
--- पुण्यात घर विकत घेऊ इच्छिणार्यांना शक्य ती माहिती मिळावी - म्हणून हा बाफ!
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
अमेरिकेत राहणारे नातेवाईक
अमेरिकेत राहणारे नातेवाईक कोंढव्याला क्लाउड ९ च्या नाइन हिल प्रॉजेक्टमधे अपार्टमेंट घेण्याचा विचार करताहेत. कुणाला या प्रॉजेक्टबद्दल माहिती आहे का?
http://epaper.pudhari.com/det
http://epaper.pudhari.com/details.aspx?ID=324172&boxid=13241218&pgno=3&u... हे पाहिले का?
पुणे शहर भागात (सदाशिव,
पुणे शहर भागात (सदाशिव, शनिवार, नारायण पेठ) १ बीएचके किंवा अगदी १ रूम किचन जागा हवी आहे. बजेट २० ते २५ पर्यंत. १० ते १२ वर्षांपेक्षा जास्त जुनी नको. तिसर्या मजल्याच्या वर असेल तर लिफ्ट असावी. पार्किंगची गरज नाही. कोणी सुचवू शकेल का ?
देहू आळंदी रोडवर चिखली येथे
देहू आळंदी रोडवर चिखली येथे परमार ग्रुपचा रिव्हर रेसिडेन्सी नावाचा एक प्रोजेक्ट आहे.
या बद्दल कोणाला माहिती आहे का ? लोकेशन, रेट, इ. योग्य आहे का ?
महेश तुम्हाला गुगल मॅप्स वर
महेश तुम्हाला गुगल मॅप्स वर लोकेशन कळेल.
त्यानी साधारण ३३०० प्लस रेट ठेवला असेल.
११ की १२ मजल्याची बिल्डिन्ग्स आहेत.
आता लगेच राहण्याचा विचार केला तर तिकडे बस वै फ्रिक्वेन्सी कमीये.
रादर चिखली गावात जाउन मग देहु आळंदी बस पकडणे हाच मार्ग.
चिखली गावात देखील काही प्रोजेक्ट (विस्टेरीया वै) सुरु आहेत ते ही बघा.
ते आताशी सुरु होत असल्याने रेट कमी असेल.
महेश , 'सकाळ ' मधल्या छोट्या
महेश , 'सकाळ ' मधल्या छोट्या जाहिराती वाचा.
दीपली काटे, ती पेड न्यूज आहे
दीपली काटे, ती पेड न्यूज आहे हे स्प्ष्ट आहे. दराबाबत अर्थातच मौन पाळले आहे. राहण्याची ज्याना भ्रान्त आहे त्यांच्यासाठे हा प्रोजेक्ट नाही हे स्पष्ट आहे...
Sheroff Soleno Baner-
Sheroff Soleno Baner- Mahulange road मध्ये कोनाचा flat अहे का?
konala tya badal kahi mahiti ahe ka?
I am booking there resale flat ( 4 yr old building). I want to know resale rate in this area.
Also, any other information related with this? Please share.
I have serach on internet no review is found for this scheme.
Please guide/
अल्ट्रॅक बिल्डर्सच्या
अल्ट्रॅक बिल्डर्सच्या आंबेगावातील "झिग सोलिस" स्कीमबद्दल कुणाचा काही बरा वाईट फीडबॅक माहित आहे का?
मी आज बघून आलो.... स्कीम आणि फ्लॅट आवडला
१२०० स्क्वे. फुटाच्या २.५ BHK ला ७० लाख किंमत योग्य आहे का?
आंबेगाव ला पण रेट ५००० वर
आंबेगाव ला पण रेट ५००० वर गेला..... मला ३५०० त ४००० ऐकुन माहित होता...
स्वरूप आंबेगाव हे टाऊन
स्वरूप आंबेगाव हे टाऊन प्लॅनिंग मध्ये येतं बहुतेक. as far as my knowldege is concerned तिथले फ्लॉट्स NA नव्हते म्हणे. अलिकडे काही डेव्हलपमेंट झाली असेल तर माहित नाही. पण २ बीएचकेला आंबेगावात ७० लाख म्हणजे लैच झाले.
आंबेगाव म्हणजे प्रॉपर पठारावर
आंबेगाव म्हणजे प्रॉपर पठारावर नाहीये.... नवले लॉन्सच्या जस्ट पुढे आहे!
कार्पोरेशन मध्ये येत म्हणे!
२ BHK नाहीय २.५ आहे पण ०.५ पण बर्यापैकी मोठी आहे ३ म्हंटले तरी चालेल.... ले आउट पण बरा वाटला
मला जरा बिल्डरबद्द्ल फीडबॅक हवा होता.... नेट धुंडाळून फार काही सापडले नाही
प्री लाँच फेज मधे बूकिंग केलं
प्री लाँच फेज मधे बूकिंग केलं तर टॅक्स बेनिफिट मिळतो का नाही ?
गेल्या महीन्यात "झिग सोलिस"
गेल्या महीन्यात "झिग सोलिस" मध्ये फ्लॅट घेतला... २.५बीएचके (१२०० स्क्वे फू)... सगळे मिळून ६८ पर्यंत गेला (स्टॅम्प ड्युटी, रजिस्ट्रेशन, ३ वर्षाचा मॅन्टेनन्स धरुन)!
दोनेक महीने बर्याच स्कीम्स बघून ही फायनल केली...तिथे आधीच्या फेज मध्ये राहणार्या बर्याच लोकांशी बोललो आणि सगळ्यांकडून एकुणात बरा-चांगला फीडबॅक मिळाला
अल्ट्रॅक म्हणून फर्म आहे.... जोशी-शहा असे दोघे पार्टनर आहेत
आत्तापर्यंत तरी बिल्डरचा अनुभव चांगला आलाय
सुदर्शननगर, चिंचवड येथे २
सुदर्शननगर, चिंचवड येथे २ बीएचकेचे भाव काय आहेत?
पुणे आणि लोणावळा मधे कोणता
पुणे आणि लोणावळा मधे कोणता चांगला प्रॉजेट माहीत आहे का?३ ते ४ बेड रूम चा फ्लाट किंवा रो हाउस/ डुप्लेस हवा आहे १ करोड मॅक्स.
स्वरूप अभिनंदन
स्वरूप अभिनंदन
अदिती पुण्यात १ करोड मध्ये रो
अदिती पुण्यात १ करोड मध्ये रो हाऊस येत नाही. अगदी कुठल्याही भागात. रो हाऊस १.५ +/-
बाणेरला हायवे च्या दुसरर्या बाजूला सुप्रिम आणि लेहर आहेत. तिथे कदाचित १ करोड पर्यंत. ३ BHK मिळेल
आदिती, www.esakal.com वर
आदिती,
www.esakal.com वर छोट्या जाहिरातींमधे पहा. (गुरुवार आणि शनिवार ला बर्याच जाहिराती असतात).
रिसेल मधे निगोशिएट करुन बालेवाडी/बाणेर भागात १.१० करोडपर्यंत मिळु शकेल असे वाटते. सध्या मंदी असल्याने निगोशिएट करता येउ शकेल बहुतेक. १ करोड बजेट चांगले आहे. ३/४ बी एच के फ्लॅटचे चांगले पर्याय उपलब्ध आहेत..
लोणावळ्यात फ्लॅट्स किती उपलब्ध आहेत माहित नाही. साधारण तिथे बंगल्याना जास्त मागणी असते. पण बंगल्यांच्या किमती स्टार्टिंग अॅट २.५० करोड इ. पाहुन तिथे पुढे काही विचारायची हिम्मतच होत नाही.
तळेगाव इथे रो हाउस्/बंगला साठी बजेट चांगले आहे. तिथे सोमाटणे इथे एमिरेट हिल्स, लीलावती ग्रीन्स इ. मधे ७५-८० लाखापर्यंत मिळु शकेल.
अदिती मेल चेक करा प्लिज.
अदिती मेल चेक करा प्लिज.
आदिती पुण्यात सूस परिसरात
आदिती
पुण्यात सूस परिसरात 'यश्विन' नावाचा विलास जावडेकरअस्सोसिअएट चा प्रोजेक्ट बरा वाट्तो. ४ बि-एच्-के ड्युप्लेक्स साठी चौ़कशी करता येईल. अधीक माहिती त्यांच्या वेब साईट वर मिळेल.
निवडणुका जवळ आल्या की
निवडणुका जवळ आल्या की घरांच्या किंमती उतरतील का ?
कालचं माझ्या एका मित्राशी बोलणं झालं ( तो स्टॉक मार्केट, म्युच्युअल फंड, एल आयसी ची कामं बघतो ). तो म्हणाला आत्ता घर घेण्याची घाई करू नका. निवडणुका जवळ आल्या की २०-२५% करेक्शन येऊ शकतं. राजकारणी लोकांना पैसा लागतो म्हणून. (हे कसं ते मला फारसं कळलं नाही)
मीही कुठेतरी वाचलं की मुंबईत बरीचं घरं पडून आहेत.
अगदी २०-२५% नाही पण अव्वाच्या सव्वा किंमती १०-१५% जरी कमी झाल्या तरी खूप आहे.
प्रजक्ता हे मी गेली ८ वर्षे
प्रजक्ता हे मी गेली ८ वर्षे ऐकतो आहे. घरांच्या किमती आता कधीही खाली येने शक्य नाही. जी मोकळी घरे आहेत त्या सगळ्या दोन नम्बरच्या गुन्तवणुकी आहेत. त्याना ते पैसे व्हाईट करायचे आहेत त्यामुळे ते गुन्तून राहिले तरी त्याना काही फरक पडत नाही....
IT मध्ये पगार किती काळा
IT मध्ये पगार किती काळा पर्यंत गलेलठ्ठ राहतो ते पाहायला हवे. स्मित
>>
पुण्यात आयटीमध्ये नवीन लागलेल्या पोरांचे पगार न सांगण्याइतपत लज्जास्पद झाले आहेत. पुण्यातल्या वाढलेल्या दरांचा आयटीशी फार कमी संबंध आहे. पुण्यात घरबांधणीत मुम्बैतला आणि व पुण्यातला दोन नम्बरचा पैसा गुन्तलेला आहे. त्यामुळे कोणत्याही भावात प्रॉपर्टी विकत घेऊन अॅप्रिसिएशन दाखवण्याचे हे धन्दे आहेत...
प्रजक्ता हे मी गेली ८ वर्षे
प्रजक्ता हे मी गेली ८ वर्षे ऐकतो आहे. घरांच्या किमती आता कधीही खाली येने शक्य नाही. >>>>
अनुमोदन! अपवाद ४-५ वर्षांपूर्वीचा.मुंबईत थोड्या अवधीकरिता भाव उतरले होते.महिना - दिड महिना. परत
दणक्यात वाढले.
pune patrakar nagar area
pune patrakar nagar area 735sq feet for 65 lakhs.. 2bhk 1 bathroom..
no covered parking but some area is available to park near society..
more than 10 years old flat..
i am in usa.. but relatives back in india.. says good investment as location is good..
not sure.. what u guys will suggest
रेट प्रमाणे तर ठिक आहे. पण २
रेट प्रमाणे तर ठिक आहे. पण २ बीएचके साठी १ बाथरुम, सोसायटी चे/ स्वताचे पार्किग नसल्याने बरिच गैरसोय व्हायची शक्यता. कार महागातली असेल तर रस्त्यावर लावायची झाल्यास अजुनच टेन्शन
६५ लाखा मधे अजुन बार्गैन करा. कारण अशा सदनिका लवकर विकल्या जात नाहीत.
thanks for response
thanks for response
कोलते-पाटीलांचा लाईफ रिपब्लिक
कोलते-पाटीलांचा लाईफ रिपब्लिक प्रोजेक्ट कसा आहे?
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे ला
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे ला इंदिरा कॉलेजच्या पुढे पुनावळे, रावेतला डीएसकेची नविन साईट सुरु झालीय.
कुणाला अनुभव आहे का तिथला?????
Pages