पुण्यात घर घ्यायचय?

Submitted by नानबा on 16 May, 2010 - 10:33

ह्या धाग्याच्या मूळ उद्देशात मी गृप बूकिंगसाठी लोक जमतात का हे पहायचं असं लिहिलं होतं..
पण काही प्रतिसादांमधे असे गृप ऑल्रेडी आहेत आणि त्यांना अनुभवही आहे असे प्रतिसाद आले - त्यांचं म्हणणं पटल्यानं आणि चर्चेचं मूळ स्वरूप हळूहळू बदलून "पुण्यातल्या चालू प्रोजेक्ट्सची/लोकेशन्सची माहिती/घर विकत घेताना लक्षात घ्यायच्या गोष्टी" - असं झाल्यानं माझं हे मुळच पोस्ट मी बदलतेय.
--- पुण्यात घर विकत घेऊ इच्छिणार्‍यांना शक्य ती माहिती मिळावी - म्हणून हा बाफ!

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

पुण्यातील वेगवेगळ्या एरियातील सध्याचे दर कुठे पाहायला मिळतील ? मी काही साईट्स पाहिल्या पण ते दर एक-दोन वर्षांपूर्वीचे वाटले. सध्या औंध आणि कोथरुड इथे २बीएचके घ्यायचे झाल्यास साधारण कितीला पडेल ? औंध/ कोथरुड अ‍ॅनेक्स नाही, मध्यवर्ती भागात.

पुण्यातल्या प्रॉपर्टीचे अंदाजे दर मला वाटते पुणे टाइम्स या टाइम्स्च्या आवृत्तेत असत्तत. तसे नकी दर देने शक्य नसतेच. कारन शेजार शेजारच्या इमारतीतले दर अ‍ॅमेनिटीज प्रमाणे बदलतात. तुम्ही म्हनता त्या एरियात ८००-ते ९०० चौ फू च्या नव्या २ बी एच केला किमान ६० ते ७० लाख लागावेत.तेही प्रत्यक्ष कारपेट ६५० च्या वर मिळत नाही

तुम्ही म्हनता त्या एरियात ८००-ते ९०० चौ फू च्या नव्या २ बी एच केला किमान ६० ते ७० लाख लागावेत >>> हाच रेट दोन वर्षांपूर्वीही ऐकला होता. म्हणजे त्यानंतर किंमती स्थिर आहेत का ? असतील तर चांगलेच आहे. एकाच एरियात दर बदलतात त्याची कल्पना आहे. एक किमान बेस प्राईस काय ते जाणून घ्यायचे होते Happy

अगो, सध्या कोथरुडात (गावठाण व आजूबाजूचा एरिया) माझ्या माहितीनुसार नव्या बांधकामाचा (नवा फ्लॅट) रेट ८०००/- ते ९०००/- रु. प्रति स्क्वे. फू. आहे तर जुन्या बांधकामाचा (रि-सेल फ्लॅट) ५०००/- ते ६०००/- रु. प्रति स्क्वे. फू. आहे. तरी पुन्हा चौकशी करून सांगेन.
३५ लाखात दोन / अडीच रूम्सचा फ्लॅट तर नक्कीच मिळू शकेल. (पेठेचा एरिया, कोथरुड, सिंहगड रोड, सोलापूर रोड परिसर)

औंध मधे ५५ ते ६० मधे सानेवाडी, नागरस रोड येथे २ BHK आरामात मिळेल. तो पण ९०० ते १००० चौ. फू.

मी मराठी, ३५ लाखात जागा मिळेल. तुम्हाला किती गुंठे हवी आहे त्यावर सगळे आहे. पिंपळे गुरव, पिंपळे सौदागर, नवी सांगवी येथे मिळेल दिड ते दोन गुंठे या भावात.

(काही लोकांच्या मते हे विभाग पुण्यात नसतील कदाचित Happy )

उरुली कांचन हे गाव पुण्यापासून ३० किमीवर सोलापूर रोडवर आहे. तिथे मोकळी जागा १६०० रु. चौ फू आहे. २००० फुटांचा प्लॉट ३२ लाखाला पडतो. पिपले गुरव व इतर भाग पिंचि मनपात येतो.

हाच रेट दोन वर्षांपूर्वीही ऐकला होता. म्हणजे त्यानंतर किंमती स्थिर आहेत का >>>

परवाच्याच दिवशी एका रिअल इस्टेटर (एजंट नाही) बोलणे झाले. गेले ६ महिने थोडीफार स्थिरता आली आहे असे त्याचे म्हणणे. आता नवीन प्रोजेक्ट लाँच होतात पण चार बिल्डिंग पैकी दोन पहिले, नंतर दोन. मोठा प्रोजेक्ट असेल तर एक विंग आधी नंतर उरलेल्या चार अशी गंमत इथे बघायला मिळत आहे. भाव स्थिर झाले असे वाटतात पण मग त्यात दुसरी गोची अशी की स्वेअर फुट गुणिले रक्कम ही आजकाल टोटल पॅकेज च्या ८० टक्क्यापर्यंत किंवा त्या पेक्षा कमी भरते आहे. अजूनही बिल्डर लोक भाव कमी करायला तयार नाही. थोडेफार २००९ मध्ये झाले तसेच. कदाचित ह्या ६ महिन्या नंतर भाववाढ परत होईलही वा परत स्थिरच राहील. कोणी सांगावे.

औंध आणि कोथरुड इथे २बीएचके घ्यायचे झाल्यास साधारण कितीला पडेल >>

चांगल्या सोसायटीत ८० लाख औंध मध्ये. कोथरूड मध्येही तसेच.

अतरंगी ५५ लाखवाली स्किम इथे लिहून सांगाल का? आजच जाऊन पाहून येतो. फारच स्वस्त वाटत आहेत. औंधच्या मानाने. अगदी पिंपळे सौदागरला ५१-५२ अन वाकड मध्ये ५० ते ५५ असताना औंध मध्ये इतके स्वस्त म्हणजे जरा आश्चर्य वाटत आहे.

कोथरुड मध्ये भुजबळ मध्ये ८० लाख भाव आहे. त्या बाजूला अजून पुढे माझ्या मावस भावाने घेतला त्याला ६५ ला मिळाला. पण तिथपर्यंत एखादी मोठी कार घेऊन जाणे थोडे अशक्य आहे. कोथरुड ही ७० च्या पुढेच

एक राहिलंच. त्या वेवसाईट वर जर ५० लाख असे दिसत असेल तर ती बेस किंमत त्यावर अजून १० अ‍ॅड करा ती प्लॅटची किंमत. वेबसाईटवरील किमती प्रत्यक्षात तेवढ्याच नाहीत असा अनुभव आहे.

खरेच हे सगळे sustain होईल असे तुम्हाला वाटते का?
>> हे सस्टेन होइलच. कारन यातील जेन्युइन पर्चेसर ४० टक्केही नसावेत. केवळ इन्वेस्टमेन्त आणि दोन नम्बरचे पैसे व्हाईट करण्यासाठी गुंतवणूक आहे. आयटीचे कारण न पटणारे आहेत. ७-८ वर्षापूर्वी आयटीवाल्याना जे पगार होते तेवढे आता आहेत काय्?राजकीय लोकांचा पैसा आणि बिल्डरांचे डोके अशी ही युती आहे.राहुलनगर अतुलनगर हा प्रोजेक्ट विरोधी पक्षातल्या एका मोठया पुढार्‍याचा आहे. काळा पैसा गुन्तवला असल्यास त्याना विकायची घाई नसतेच्.त्यामुळे फुगवलेले भाव तसेच मेन्टेन ठेवणे परवडते.

अतरंगी यांची माहिती बरोबर् वाटत नाही. पुण्यात पाण्याचे फार प्रॉब्लेम आहेत . बिल्डरला विचारल्यास तो सरळ बोअर आहे असे सांगून टाकतो. बोअरचे पाणि आज असते तर उद्या आटू शकते. मग टँकर बोलवा. आमच्या शेजारच्या गटारी नाल्यात एक बोअर घेऊन त्यातून टँकर भरले जातात. मग ते कशाला वापरतात कुणास ठाऊक?

केदार,

नागरस रोड ला, कुमार पद्मालया, वायरलेस कॉलनी मधे तुम्हाला ५२ ते ५५ ला २ bhk मिळेल. तिथे साई रेसिडेन्सी मधे पण हाच भाव आहे.

साने वाडी मधे फिल्डिंग लावून शांत पणे वाट पहा. तिथे पण US, UK ला जाणारे बर्‍या पैकी कमी मधे सदनिका सोडुन जात असतात. काहीना घाई अघाई, काही ना विना कटकट करता, जास्त घासाघीस न करता चांगल्या लोकांशी डिल करुन निसटायचे असते.

मी स्वता: सानेवाडी मैदाना जवळ राहतो, मागच्या वर्षी तिथेच २ bhk 53 लाखाला गेला. माझ्या भावाला आंनद नगर मधे २ १/२ bhk (११५० चौ. फू) ६२ लाखाला मिळाला.

पैसे तयार ठेवायाचे आणि सदनिका शोधत रहायचे ६ महिने ते १ वर्षामधे कुठे नाकुठे बरोबर मिळतो फ्लॅट

अहो ते कुमार पद्मालया ६-७ वर्षे जुने आहे. तुम्ही रिसेल म्हणत आहात तर ते ठिक. पण नवीन २ BHK हा ८० च्या घरात जातो.
कोणी विकणारे मिळाले तर मलाही सांगा.

XBria बद्द्ल खुप उलट सुलट चर्चा चालु आहे.
कोणाला काही माहित आहे का ?
Project properly approved आहे का?
bilder पुण्यात नविन वाट्त आहे.

(Latest news – booking is full)

हो केदार, लिहायचे राहून गेले. मी लिहिलेल्या सर्व किमती रिसेलच्या आहेत.

कुमार पद्मालया ची शेवटची ईमारत ४ वर्षे जुनी आहे.

तुम्ही जवळपास रहात असाल तर फ्लॅट वर लक्ष ठेवणे सोपे आहे.

चार वर्षे जुनी सदनिका घेऊन वीस लाख वाचत असतील तर रिसेल घेण्यातच फायदा आहे. मनाप्रमाणे इंटिरियर करुनही बरेच लाख वाचतील. दहा वर्षांच्या आतली असेल तर फार जुनी नाही ( माझ्या मते ) Happy
एक नक्की, भारताबाहेर राहून घर शोधण्याचा अट्टहास आता करणार नाही. आम्हा दोघांचे आईवडीलही पुण्यात नाहीत. अतरंगी म्हणतात तसे 'धीर धरी' मोड बरा असतो असे आता वाटते. ते साधायचे तर घर घ्यायचे त्याच शहरात मुक्काम पाहिजे.

माझ्या मते तरी नविन सदनिकेला ७० ते ८० घालवण्यापेक्षा आता रिसेल मधे ८ ते १० वर्षे जुनी सदनिका ५५ ते ६० पर्यंत घेउन त्याचे थोडेफार रिनोव्हेशन करुन रहाणे काय वाईट ? पुढे मागे जाईलच कि ती पुर्ण ईमारत रिनोव्हेशन ला. आणि सानेवाडी मधील जुनी बांधकामे चांगली आहेत अजुन १५ वर्षे तरी आम्हाला कटकट होईल असे वाटत नाही.

आणि RCC बांधकाम असले तर ईमारत ५ ते १० वर्षे जुनी असली तरी काय फरक पडतो?

हा पण एक आहे कि नवीन स्किम मधे जे क्लब हाउस, जलतरण तलाव आणि बाकि सुखसोयी असतात त्या मिळत नाहीत. पण मी स्वता: अशा स्किम मधे रहात होतो. चार वर्षात एकदाही क्लब हाउस मधे गेलो नाही. मग ते असले काय आणि नसले काय.....

हा पण एक आहे कि नवीन स्किम मधे जे क्लब हाउस, जलतरण तलाव आणि बाकि सुखसोयी असतात त्या मिळत नाहीत. पण मी स्वता: अशा स्किम मधे रहात होतो. चार वर्षात एकदाही क्लब हाउस मधे गेलो नाही. मग ते असले काय आणि नसले काय.....
>>> ह्यालाही + १ Happy मी मघाशी लिहिणार होते पण राहून गेले.
आमच्या सोसायटीतल्या जिममधील अर्धी उपकरणे बंदच पडलेली असायची. त्यातून चालू असली तरी हव्या त्या वेळी मशीन मोकळे मिळायची शक्यता कमीच. तिथे थांबून कोण राहणार किंवा परतपरत जाऊन कोण चेक करणार. आता तर मला वाटते मेंटेनन्स जमत नाही म्हणून सगळी उपकरणे काढलीच आहेत.
शहराच्या बाहेर राहत असाल तर मोठ्या संकुलात राहायचा फायदा होतो. पण मध्यवर्ती भागात राहत असाल तर खाली उतरल्यावर दहा गोष्टी मिळतात उदा. सुसज्ज जिम, मुलांसाठी अ‍ॅक्टिव्हिटीज अशावेळी मोठ्या संकुलात राहणे किंवा न राहणे ह्याने फारसा फरक पडत नसावा.
सिक्युरिटी म्हणाल तर आमच्या सोसायटीत प्रत्येक बिल्डिंगसाठी वॉचमन असूनही चोर्‍या झालेल्या आहेत, गाड्याही चोरीला गेल्या आहेत.
हे grass is greener on the other side असे असू शकेल. मी राहत होते ते संकुल गावाबाहेर आहे म्हणून मला जो आहे तो फायदा वाटला. गावात राहिले असते तर तो वाटलाच असता ह्याची खात्री नाही.

***********************
विषयांतर होत असल्यास सांगा. पोस्ट उडवेन. हा ह्या धाग्याचा विषय नाही पण वरच्या पोस्टसना अनुसरुन वाटले म्हणून लिहिले.

हे घराच्या डायरेक्ट संबधीत नाहिये पण होम लोन संदर्भात आहे.
म्हणुन लिहितोय.

बिल्डरच्या शहाणपणामुळे होम लोन आधी अ‍ॅप्रुव्ह करुन ठेवल.
नंतर काहितरी टेक्निकल लफडा होउन अ‍ॅग्रीमेण्ट पुढे पुढे ढकलत गेल.
लोनला एक वर्ष पुर्ण झाल तरी अ‍ॅग्रीमेन्ट न झाल्याने डिसबर्समेन्ट नाही झाली.
नंतर अ‍ॅग्रीमेन्ट झाल्यावर डिस्बर्समेन्ट साठी चेक केल तेव्हा एजंटने फाइल क्लोज झाली आहे.
तुम्हाला परत प्रोसेसिन्ग फी भरुन नवीन लोन फाइल करावी लागेल अस सांगितल.
मग इकडुन तिकडुन अजुन माहिती काढण्याचा प्रयत्न केला.
मायबोलीकर दक्षिणा हिच्या कडुन बॅन्केतील एका अधिकार्‍याचा फोन नंबर मिळाला.
त्याना फोन करुन सर्व परिस्थिती समजाउन सांगितली. ते बोलले की नवीन लोन फाइल जरी करावी लागली तरी
तुम्हाला परत प्रोसेसिन्ग फी भरायची गरज नाही. जुनी फी नवीन फाइल साठी अ‍ॅडजस्ट होइल.
मग त्याप्रमाणे सगळे प्रोसेसींग केले.
माझे ह्या सगळ्यात जवळपास १० हजार वाचले. फक्त फॉर्म बॅन्केत जाउन आणणे आणि सगळी डॉक्युमेन्ट्स घेवुन बॅन्केत जाणे ही दोनच काम वाढली.
बॅन्केत तर तिथले अधिकारी बोलले की तुम्ही नुसता फोन जरी केला असता की एक वर्ष होउन गेलय पण अजुन अ‍ॅग्रीमेंट झालेल नाहिये लवकरच होइल तर फाइल क्लोज झालीच नसती. अर्थात एक वर्षाने फाइल क्लोज होते , पुन्हा लोन फाइल करावी लागते, त्याला परत प्रोसेसिन्ग फी भरावी लागेल असल काही एजंट लोक्स आधी सांगतच नाहीत.
असो माबोकर दक्षीचे आभार कसे मानु हे कळात नसल्याने आभार मानत नाही. Happy

तर तुम्हाला एका दिवसाचा पगार १० हजार पेक्षा कमी असेल तर अशा परिस्थितीत सरळ एक दिवस सुट्टी काढुन स्वतः काम केलेल चांगल. Happy

ह्या ब्यांक लोनला एजन्ट लागतातच का? बँका देखील एजंटाना अ‍ॅप्रोच व्ह्यायला सांगतात. ते अपुरी/चुकीची माहिती देतात. बँक अधिकारी बॉरोअरशी डील का करत नाहीत?

बाळू जोशी,

गेल्या २ वर्षामधे माझ्या घरात ३ जणांनी गृहकर्ज घेतले. एकाही वेळेस आम्हाला एजंटची गरज पडली नाही. आपली सगळी कागदपत्रे (प्लॉटची/ फ्लॅटची, तसेच पगाराचे सर्टी, फॉर्म १६, बँकेची पासबूक आणि ईतर ) असतील तर काही गरज पडत नाही.

पण मी पण ऐकुन आहे कि आजकाल बँका नाही पण कर्ज sanction करणारे काही मॅनेजर लोक स्वता:च्या स्वार्थासाठी अडवणूक करतात.

ह्या ब्यांक लोनला एजन्ट लागतातच का?>>

आपल्याला घरपोच सेवा मिळते हेच एक कारण.
ती सुविधा चांगली आहे पण एक्स्ट्रा पैसे आपल्याकडुन कोणी काढतय का ह्यासाठी जागरुक असावं.

बावधनला हायवेच्या जवळ शेरलीन रिजन्सी मधे आम्ही १ वर्षापूर्वी आम्ही फ्लॅट बुक केला. ३८०० रेट होता. ३ रूम्स ३२, ४ रुम्स ४१ आणि ५ रुम्स ५२. आता रेट ४३०० झालाय.

अतरंगी ; तुमची माहिती चांगली आहे. नागरस एरिया चांगला आहे. सानेवाडीही. आम्हाला इन्टरेस्ट आहे.४५-५० पर्यन्त. चांगला एजन्ट आहे का विश्वासार्ह तिथे कुणी ?

बाळु,

वंशज कियोना रेट ४८०० होता मागे. एरीया उत्तम आहे. (आम्ही तिथेच जवळ आहोत). पण त्या बिल्डिंग मधे मुळ जमिन मालकाना दिलेले जवळ जवळ १९ फ्लॅट्स आहेत. आणि ते लोक फुकटात मिळालेले फ्लॅट बंद करुन ठेवतात त्यामुळे इतर लोकाना प्रति महिना त्यांचा भार उचलावा लागतो. याची तयारी असेल तर प्रोजेक्ट चांगला वाटतो मला तरी.

मूळ मालकांचा कोणता भार उचलावा लागतो? ते रहातच नसल्याने त्यांचे कॉमन वीज पाणी बील तर नॉमिनलच येत असेल ... ते एक फाल्तूचे क्लब हाऊस दिसते आहे. त्याचा फार चार्ज नसेल. तसा कॉमन खर्च कोणीही राहत असेल तर येतच राहणार ना? २ बी एच के कितीला पडतो तिथे? कारण राणे बिल्डर तयार फ्लॅटच विकतात बुकिंग घेत नाहीत . ४८०० कधीचा रेट आहे? त्यांच्या वेबसाईट्वर फारसे डिटेल्स नाहीत.....

Pages