पुण्यात घर घ्यायचय?

Submitted by नानबा on 16 May, 2010 - 10:33

ह्या धाग्याच्या मूळ उद्देशात मी गृप बूकिंगसाठी लोक जमतात का हे पहायचं असं लिहिलं होतं..
पण काही प्रतिसादांमधे असे गृप ऑल्रेडी आहेत आणि त्यांना अनुभवही आहे असे प्रतिसाद आले - त्यांचं म्हणणं पटल्यानं आणि चर्चेचं मूळ स्वरूप हळूहळू बदलून "पुण्यातल्या चालू प्रोजेक्ट्सची/लोकेशन्सची माहिती/घर विकत घेताना लक्षात घ्यायच्या गोष्टी" - असं झाल्यानं माझं हे मुळच पोस्ट मी बदलतेय.
--- पुण्यात घर विकत घेऊ इच्छिणार्‍यांना शक्य ती माहिती मिळावी - म्हणून हा बाफ!

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आत्तापर्यंत मिळालेली माहीती (Storvi)

घराची खरेदी किंमत आताच्या पैशात ही बेस किंमत धरली जाते.
म्हणजे १० लाखाला (२०००) मधे घेतलं असेल तर आजच्या चलनाच्या भावात त्याची किंमत १२ लाख झाली असेल. (हे कसे काढायचे याचा Reserver Bank चा Formula आहे).
घरात Major Improvement साठी १ लाख खर्च केले.
आता तुम्ही ५० लाखाला विकलं तर ५० -(१२ +१) वर भारतात कर भरायचा.
भारतात बहुतेक बँका तुम्हाला $ चेक देऊ शकतील.
त्या नफ्यावर तिकडे टॅक्स भरल्यामुळे इथे भरावा लागत नाही असं ऐकतो..

म्हणजे तुम्हाला ३७ लाख वजा टॅक्स झालेला नफा आणता येईल...

यात दोन नियम नक्की काय आहे त्याची माहिती आहे का कोणाला?

(भारतातील) "earned income" less than $80,000 - यावर अमेरिकेत पुन्हा टॅक्स भरावा लागत नाही. घराची विक्री केल्यावर मिळणारे उत्पन्न याच कॅटेगरीत येते काय?

दुसरे म्हणजे भारताबाहेर किती पैसे एका वेळेस नेता येतात (चेक, ईलेक्ट्रॉनिक ट्रान्स्फर ने सुद्धा) - म्हणजे वरच्या उदाहरणात ३७ लाख धरले तर ते डॉ मधे परत अमेरिकेत न्यायला काही बंधन आहे का?

exactly, earned income नेमकी कुठल्या कॅटेगरीत पडते?

ते पैसे इथे आणण्यावर काही निर्बंध आहेत का?

टॅक्स एवीही पडणार आणि तेवीही पडणार असेल, तर इथे एखाद्या ५२९ प्लॅन मध्ये गुंतवणे बरे की तिथेच reinvest करणे योग्य???

अमेरिकेत देशातून किती पैसे आणता येतात नक्की माहीत नाही पण मधे भारत सरकार ने ती रक्कम बरीच वाढवली होती. पण तो जो भारतात नफ्यावर टॅक्स भरावा लागतो तो तसा बराच आहे. २०% आहे बहुतेक. तिथुन इथे पैसे आणणे फारसे फायद्यात पडत नाही. आम्ही ४ एक वर्षांपूर्वी हा विचार केला होता आणि फारसा फायदा नाही असं कन्क्लूजन निघालं होतं. नवर्‍याला डीटेल्स आठवत असतील तर विचारून लिहिते.

सध्या वाकड-पिंपळे सौदागर-काळेवाडे फाटा येथे घरांचा भाव काय चालू आहे? मी ऑगस्ट पासून पुन्हा एकदा घर शोध मोहीम सुरू करतोय , तेव्हा जर सुरुवातीला काही अंदाज आला तर बरं होईल.

रंगासेठ..

epaper.timesofindia.com ची शनिवारची रीअल ईस्टेट पुरवणी पहा त्यात लेटेस्ट भाव असतात.

मला वाटते ३५००-४००० भाव वाकड मधे सुरु आहे.

नवरा मान्युफाकचरिंग मध्ये आहे.. पुण्यात त्याला कुठे नोकरी मिळेल माहिती नाही त्यामुळे नक्की घर कुठे घ्यावं कळत नाहीये.. बाणेर मध्ये flat आहे पण बंगला बने न्यारा चा हेका काही सुटत नाहीये... आता परत घर शोधणे आले..पुण्यात कुठे रो हौसेस किवा बंगले स्कीम वैगैरे आहे का.. इतक्यात कोणी अशा स्कीम बघितल्या असतील तर प्लीज सांगणार का..

डी.एस्.के सप्तसुर प्रोजेक्ट बद्दल कूणाला माहिती आहे का?
जर असेल तर प्लीज कळवा. तिकडे ३ बी.एच.के घ्यावा की नाही हा विचार करत आहे..

आवळा -तिथे पाण्याचा काहीतरी लोच्या आहे असे आइकते. म्हणजे, टाउनशिपवाले जास्त पैसे मागत आहेत व सोसायटी वाले विरोध करत आहेत. कोणाशी तरी बोलून घ्या ह्याबाबत.

पुण्याच्या कोणत्याही भागात आता ३५०० पेक्षा कमी भाव चालू नाहीत...
म्हणजे ९०० च्या फ्लॅटसाठी किमान ४० लाख जवळ असल्याशिवाय या बीबी ला भेट देऊ नये Happy

आंबेगावला (नर्‍हे जवळ) एका नातेवाईकांनी ५५ लाखला २ बी एच के (+ २ बाल्कनीज) नवा फ्लॅट घेतला. अ‍ॅमेनिटीज आहेत चांगल्या. क्लबहाऊस, स्विमिंग पूल, टेटे कोर्ट, भरपूर पार्किंग स्पेस वगैरे. राजाराम पुलापासून वाहनाने १० मिनिटांच्या अंतरावर आहे. पुण्याहून जायचा रस्ता ओके आहे, तिथून परतीचा रस्ता ओबडधोबड, खाचखळगे इत्यादीवाला आहे. मजबूत ड्रायव्हिंग करायची इच्छा + क्षमता + सशक्त वाहन असल्यासच या एरियाचा विचार करावा. किंवा कंपनीचे वाहन तिथपर्यंत येत असेल तर. आजूबाजूला भरपूर गृहसंकुले आहेत, मात्र अनेक फ्लॅट्स रिकामे आहेत. (सेकंड होम म्हणून गुंतवणूक) तसेच मार्केट प्रकार फारसा नाही.

दुसर्‍या एका नातेवाईकांना नुकताच कोथरुडला परांजपे शाळेजवळ ८ वर्षे जुना रिसेलचा, ३ रा मजला (लिफ्ट आहे), १ बी एच के (साधारण ६७० एरिया) रजिस्ट्रेशनसकट ३८ लाखाला पडला.

रजिस्ट्रेशनसकट ३८ लाखाला पडला.
>>
पार्किंग आहे का? हा एक कळीचा मुद्दा.सन सिटी आणि वारज्याच्या एका जुन्या टाऊनशिप मध्ये रिसेल फ्लॅट पाहण्याचा प्रसंग आला.प्लॅट अर्थात आवडण्यासारखे होतेच. दरही त्या एरियाशी सुसंगत होता :फिदी:. पण दोन्ही ठिकाणी पार्किंग नव्हते. सध्या पार्किंगसाठी वेगळे ३ लाख रु द्यावे लागतात्.जुन्या सोसायट्यात पार्कि,न्ग फार् सिरियसली घेतले जायचे नाही. उलट कशाला खरचाचा आयटेम म्हणून बिन पार्किंगचे फ्लॅट घेतले जायचे. दोन्ही ठिकाणी 'सोसायटीत भरपूर मोकळी जागा आहे, तिथेच रस्त्यावर सगळे गाड्या उभ्या करतात. पार्किंगची गरज पडत नाही "वगैरे वगैरे सांगण्यात आले . पण हल्ली प्रत्येक घरात किमान दोन ते ३ टू व्हीलर्स असतात. पाच दहा वर्षात हीच स्थिती फोर व्हीलर्सचीही होनार आहे. किमान मोठी गाडी व नॅनोसारखी छोटी गाडी . त्यावेळी पार्किंंगसाठी नक्कीच मारामार्‍या होणार आहेत. व उशीरा येणार्‍या गाड्या सोसायटीच्या बाहेर रस्त्यांवर लावाव्या लागणार आहेत. आताच प्रभात रोडसारख्या ठिकाणी बर्‍याच गाड्या रात्री रस्त्यावर लावलेल्या दिसतात. रस्त्यावर रात्रभर लावलेली गाडी किती व्हल्नेरेबल असू शकते ते पहा. आणि पळवून नेलेल्या गाडीचा काय काय उपयोग होऊ शतो. एक मालक म्हणून तुम्हाला त्याबद्दल किमान काहीतरी उठबशा काढायलाच लागतील ...:फिदी: पार्किंग नसेल तर फ्लॅटची रेसेल वॅल्यू एकदम कमी होते. आम्ही दोन्हीही फ्लॅट खूप आवडलेले असूनही सोडून दिले. विशेष म्हणजे आमच्याकडे एकही गाडी नाही...

पार्किंग टू व्हीलरसाठीच आहे! Proud कार असल्यास / घेतल्यास जवळपासच्या कोठल्या तरी गल्लीत पार्क करायला लागेल!

प्रत्यक्ष गावात (सपे, शुक्रवार पे) अजूनच वाईट स्थिती आहे पार्किंगची! माझे एक परिचित राहतात जिलब्या मारुतीपाशी आणि कार पार्क करतात कॉर्पोरेशनजवळ! तिथून घरी ये-जा टू-व्हीलर वरून किंवा रीक्षाने!! Proud

एका मित्राचे शनिपारापाशी घर आहे. तो त्याची कार तीन-चार गल्ल्या पलीकडे कोठेतरी (जिथे जागा मिळेल तिथे) पार्क करतो. रोज 'काल रात्री कार पार्क कोठे केली होती' हे आठवणे व धुंडाळणे हा खेळ असतो!

सपेत माझ्या अनेक परिचितांना कार असूनही ती इमारतीच्या पार्किंगमध्ये जागेअभावी पार्क करता येत नाही. जवळपासच्या गल्लीबोळात कारपार्किंग करावे लागते.

अकु, सपे पार्किंग बद्दल अगदी अगदी. दर वेळी जाते तेव्हा नाकी-नउ येतात त्यापायी. कुठल्या कुठे लावावी लागते गाडी विचारु नकोस. आणि खबदाडींमधल्या जागांमध्ये लावलेली गाडी सुखरुन कोणाचे लुक्स न झेलता काढणे म्हणजे त्याहून दिव्य. अर्धा सेकंद पण न थांबता १ सेमी जागेतूनही घुसवत राहतात जेणेकरुन दुसर्‍याला हलता येऊ नये. असो. विषयांतराबद्दल क्षमस्व.

खबदाडींमधल्या जागांमध्ये लावलेली गाडी सुखरुन कोणाचे लुक्स न झेलता काढणे >> अगदी, शिवाय तिला व शेजारच्या गाड्यांना इजा न होता ती काढायची बाहेर म्हणजे आणखी दिव्य!!

बाजो, हो, पण नव्या कन्स्ट्रक्शनचे भाव काही कमी नाहीत हो... रिसेलचे तुलनेने कमी आहेत.

कोणाला ग्रीन एकरच्या यवतजवळच्या प्रोजेक्टबद्द्ल माहिती आहे का? ५५०० sq ft चा बंगलो प्लॉट साधारण ३.८० लाखात मिळतो आहे मला. इनवेस्टमेंट म्ह़णुन घ्यायचा मोह होतो आहे. या रविवारी साइट बघायला जाणार आहे. काही माहिती असेल तर प्लीज शेअर करा.

केदार, ३.८०च. ३८ नाही. पण जागा कुठे, कशी माहित नाही. ऑफिसमधल्या दोन जणांनी घेतली आहे. ते अशा इनवेस्टमेंटस बर्‍याच वेळा करतात आणि लॉसमधे पैसे घालवतील असे दोघेही जण नाहीत. Happy त्यामुळे आशा आहे कि चांगला प्रोजेक्ट असावा. या रविवारी जाणार आहे.

केदार, उद्या सकाळी टाकते. आज फोन केला तेव्हा व्हिजिटींग कार्ड ऑफिसमधेच राहिलं.
कस्टमरला साइट दाखवण्यासाठी त्यांची दर रविवारी गाडी जाते पुण्यातुन. ४० मिनिटे लागतात म्हणे पोचायला.

यवत म्हणजे दौंड रस्त्यावर/रेल्वे लाईन वर जे स्टेशन आहे ते का? हडपसर्/मगरपट्टा मधे काम करणार्‍यांना उपयोगाचे होईल भविष्यात कदाचित.
दुसरे म्हणजे पुणे-दौंड रेल्वे मार्गाचे विद्युतीकरण पुढच्या काही वर्षात होण्याचे चान्सेस आहेत. तसे झाले तर तेथे लोकलही चालू होईल (रेल्वे प्रवासी संघाची जुनी मागणी). हे जर यवत स्टेशन जवळ असेल तर पुढे किंमत वाढेल.
मनिमाऊ/केदार - पाहून आलात येथे लिहा त्याबद्दल. ती ४० मिनीटे बहुधा सोलापूर रोड जेथून चालू होतो तेथून असतील Happy

मनिमाउ डिटेल्स ईथे किंवा विपुत शेअर करणार का प्लिज ? मी पण बघुन घेइन. आज कळवलेस तर कदाचित या रविवारी मला पण शक्य होइल.

३५०० च भाव आहे? पुण्यात ? इथं काय धाड भरल्ये मग ६५०० सांगताहेत लोक. Sad खड्डे आहेत रस्ते नाहीतच! पाणी नाही! वीज नाही! तरीही...

@ केदार, हा नंबर - 9850319050 - अमोल.
@ फारएण्ड, हो तेच यवत. मला खात्री नाही, पण असं ऐकलं आहे कि कुरकुंभचा केमिकल झोन येथुन जवळ आहे, त्यामुळे पुढे मागे ही इनवेस्टमेंट फायदेमंद ठरावी. मी कॅम्पजवळ रहाते त्यामुळे गोळीबार चौक्/सोलापुर रोड ५ मिनिटं अंतरावर. तिथुन पुढे ४० मिनिटं जर लागत असतील तर एक तास अंतर फार वाटत नाही. Happy
@ आस, नंबर तुझ्या विपुत पण टाकला आहे.

३५०० च भाव आहे? पुण्यात ? इथं काय धाड भरल्ये मग ६५०० सांगताहेत लोक

>>
आय डू ३५०० हा दर पुण्यातला मिनिमम दर आहे बाजुच्या खेड्यातला जिथे रस्ते नाहीत पण होणार आहेत. कॉर्पोरेशन पाणी कधीतरी देनार आहे अशा ठिकाणी . प्रभात रोड गल्ली तर १०००० कधीच क्रॉस करून गेला.

ही पहा पुण्यातली लूट...

ही लूट संघटीत आणि प्रातिनिधीक आहे.

हे दर सन सिटी जवळील बांधकाम चालू असलेल्या एका स्कीमचे आहेत.

एकूण एरिया= ९९९ स्क्वे.फू. (टेरेस, धरून.)
दर=५१०० रू.
एकूण किं= ५०,९४,९००
इतर (१) = १,५०,००० रु
इतर (२)= १,००,०००
स्टॅम्प ड्युटी २,३७,१०० रु.
रजिस्ट्रेशन ३०,०००
लिगल फी ९,०००
व्हॅट ५०.९००
सर्व्हिस टॅक्स १,३१,०६७ रु

एकूण= ५८,०२,९६७ रु.

यात कार्पेट एरिया फक्त ७००+ आहे हे लक्षात ठेवा....
ईतर (१) म्हणजे पार्किंग. कोर्ट निर्णयामुळे पार्किन्ग ही सुविधा विकता येत नाही फ्री द्यायची असते म्हणून ही शक्कल.
इतर २ म्हनजे एम एस ई बी चे चार्जेस...

कधी कधी (म्हणजे नेहमीच) असे वाटते की ४५ लाखाला तो ९०० अन १००० स्वेअर फुटांचा फ्लॅट घेण्यापेक्षा न घेतलेला बरा. किरायाच्या घरात नेहमी राहीले तरी परवडेल. नाहीतरी फ्लॅट कुठे घेऊन जाणार? तेवढ्या पैशात मस्त पैकी पुण्यापासून ५०-६० किमी दुरवर २ एक एकर शेत घेऊन ठेवले व १५ लाखाची गाडी घेतली तर स्वतःच्या शेतातील भाज्या तरी दर आठवड्यात खाता येतील. अर्थात गाडी घेऊन पुण्यात चालवणार कशी हा उपप्रश्न आहेच. त्यापेक्ष पुण्याबाहेरच जावे. ( म्हणजे उदया सेना अन मनसे पुण्याचा मराठी टक्का कमी झाला हे आंदोलनही करतील Wink ((नाहीतरी पुण्यात मराठी नाहीत असे म्हणले जातेच.))

खाली हात आया है, खाली हात जायेगा असे श्री श्री श्री अझिझ नाझाजीसाहेब आम्हाला रोज सांगतात.

Pages