Submitted by नानबा on 16 May, 2010 - 10:33
ह्या धाग्याच्या मूळ उद्देशात मी गृप बूकिंगसाठी लोक जमतात का हे पहायचं असं लिहिलं होतं..
पण काही प्रतिसादांमधे असे गृप ऑल्रेडी आहेत आणि त्यांना अनुभवही आहे असे प्रतिसाद आले - त्यांचं म्हणणं पटल्यानं आणि चर्चेचं मूळ स्वरूप हळूहळू बदलून "पुण्यातल्या चालू प्रोजेक्ट्सची/लोकेशन्सची माहिती/घर विकत घेताना लक्षात घ्यायच्या गोष्टी" - असं झाल्यानं माझं हे मुळच पोस्ट मी बदलतेय.
--- पुण्यात घर विकत घेऊ इच्छिणार्यांना शक्य ती माहिती मिळावी - म्हणून हा बाफ!
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
>>मामी , एवढे पैसे घेऊन हे
>>मामी , एवढे पैसे घेऊन हे लोक क्वालिटी देत नाहीत याचेही दु:ख आहे. मध्ये ठाण्यात हिरानन्दानी ची एक बिल्डिंग पाहण्यात आली. काय एखाद्या राजवाड्यासारखे भक्कम बांधकाम होते.ऐसपैस लॉबीज ,विस्तीर्न लिफ्ट्स , मोठाले बाथरूम्स. इथल्या जिन्यातून आणि टॉयलेट मधून एखाद्या स्थूल माणसाला जाणेही अशक्य व्हावे इतकी यांची स्पेस चोरी...
पुण्यात मालाच्या क्वालिटी पेक्षा गरजेचे पैसे वसूल करतात असे वाटते.
बाजो,
एकदम मार्मिक! वास्तविक हीरानंदानीशी ईतर बिल्डर्स ची तुलना करूच नये.. जमीन आसमानाचा फरक आहे. हीरा चे फ्लॅट १ करोड ला असतात देखिल पण पुरेपूर पैसा वसूल असतात सर्व अंगाने, पार फाटकावरील सिक्युरीटी पासून ते बाथरूम मधील शॉवर फिटींग पर्यंत.
नात्या,
पुण्यातील एकंदर बिल्डर्स बद्दल मी "घरखुळ" मध्ये आधीच ईतकं लिहीलय की अजून काही विशेष लिहायचे बाकी नाहीये. http://www.maayboli.com/node/2294
माझा तेव्हाचा अनुभव (२००८) आजही "प्रातिनिधीक" आहे हे या बा.फ. वरील पोस्ट वाचल्यावर लक्षात येतय. मला बिल्डरच्या नावापेक्षा कामाच्या दर्जाचे आणि एकंदर सेवेचे महत्व जास्त वाटते- मग एखादा नवशिका बिल्डर जरी त्या कसोटीत ऊतरला तरी माझ्या दृष्टीकोनातून तो "ऊत्तम" ठरेल.
माझे मत अजूनही असेच आहे की बिल्डर ला नावे ठेवण्या आधी आपण किती सक्षम आहोत, जागरूक आहोत, नीट तपासणी, जाणकारांशी सल्लामसलत हे सर्व जागा घेण्या आधी केले आहे का याचे ऊत्तर तपासून पाहिले तर बरेच वेळा आपले दोष अधिक समोर येतील. IT मूळे आज मध्यमवर्गीयाच्या खिशातही घर "गुंतवणुकीसाठी" पैसा आला आहे हे बिल्डर्स ना पुरेपूर ठावूक असल्याने ते दर्जा, सेवा, सवलती, ई. सर्व फाट्यावर मारून १००० चौ. फू. जागा जो घेईल त्याला विकत द्यायच्या ईराद्याने संकुले पाडतात (कविता पाडतात या तालावर). बा.जो. म्हणतात ते अगदी खरे आहे, किमती आणि ईतर बाबी यांना मूळ जबाबदार आपल्यातलाच ग्राहक आहे. डिमांड्-सप्लाय चे गणीत सगळीकडे सारखेच आहे.
पण बिल्डर लॉबी राजकीय वरदहस्ताने इतकी ताकदवान झालेली आहे की या सर्वाविरुध्ध काहिही अपेक्षा करणे म्हणजे वाळवंटात म्रुगजळाच्या मागे धावण्या सारखे आहे.
आणि माझी लिस्ट ईथे न दिलेलीच बरी.. dsk ने फुकटात बांधून दिले तरी घेवू नका असा सल्ला मी नुकताच एका निवासी संकुलाचे मोठे काम देवू पाहणार्या एका co. soc. ला दिला (dsk चे पुण्यातील ४ साईट्स मी स्वतः बघून आलो.. या बाबत "घरखुळ" मध्येही थोडा उल्लेख आहेच.)
असो. शेवटी कुणाला काय आवडेल ही खाजगी बाब आहे. पण आपल्या किमान अपेक्षा कुठलाही बिल्डर पुर्या करत असेल तर त्या बिल्डर ला प्राधान्य दिलेले बरे.
ज्या घरात दिवसाखेर निवांत आराम आणि समाधान मिळत नसेल तिथे (राहण्यासाठी) पैसे गुंतवणे मला तरी अयोग्य वाटते. दिवसाचे १२-१६ तास आपण साधारणपणे कामाच्या व्यापात घालवतो. ऊरलेला वेळ संपूर्ण आयुष्य एखाद्या वास्तूत घालवायचे असते. शेवटी हा एक long term निर्णय असतो त्यामूळे खूपच काळजीपूर्वक गुंतवणूक करायला हवी.
नमस्कार ..मी हा भाग कायम वाचत
नमस्कार ..मी हा भाग कायम वाचत आसतो ,छान माहिति उपलब्ध होते .
माझा दाजिनीं त्यांचि ७००० स्के. जागा एका बिल्डर रा विकसित करायला दिली आहे .त्यांनि त्या बद्ल्यात साधारन ५२५ स्के.फु .चे २ फ्याट घेतले आहे .त्यानां ते विकायचे आहे .रेट :साधारन ३१००-३२०० लोकेशन : खराडि ,रेडिसन होटेल चा मागे ...
कोणाला हवे असल तर समप्कांतुन मेल करा .मि दाजिंचा नम्बंर देईल
समीर, लोन नॅशनलाइज्ड बँकेचे
समीर,
लोन नॅशनलाइज्ड बँकेचे जास्त चांगले. त्यातल्या त्यात स्टेट बँक. मात्र तरी सुद्धा गरज, अॅव्हेलिबिलिटी आणि वेळेची बचत यासुद्धा महत्व्वाच्या बाबी असतातच! Ultimately, one has to strike the balance.
>>लोन नॅशनलाइज्ड बँकेचे जास्त
>>लोन नॅशनलाइज्ड बँकेचे जास्त चांगले. त्यातल्या त्यात स्टेट बँक
२००% खरे आहे. hdfc, icici, वगैरे ईतर बँका अगदी ४ दिवसात लोन पास करू देतील पण त्यात बिल्डर अन बँक यांचे हित-संबंध गुंतलेले असतात. ग्राहकाचे हित किमानपक्षी, risk management हे स्टेट बँक ऊत्तम रितीने करते- म्हणूनच काटेकोर तपासणी, कागदपत्रे ई. सर्व कामात ते वेळ घेतात अशी तक्रार "फास्ट सेवा" हवी असलेला ग्राहक करतो.. अगदी ठरल्या तरखेला डिस्बर्स्मेंट करत नाहीत अशी तक्रार बिल्डर करतात . चोर कुठले, त्या ठरल्या तारखेला बिल्डरने ठरलेले काम पूर्ण केलेलेच नसते. आर्किटेक्ट, ईंजीनीयर ने ते ठरलेले काम "पूर्ण झाले" असा शिक्का दिल्याशिवाय स्टेट बेंक डिस्बर्स्मेंट शक्यतो करत नाही. तेव्हा वेळ लागला तरी चालेल पण गृह कर्जाच्या बाबतीत "वाहने सावकाश हाका" हे लक्षात ठेवणे फार गरजेचे आहे. There is no short cut to success!
मुंबईतील पश्चिम उपनगरांमध्ये
मुंबईतील पश्चिम उपनगरांमध्ये माहिमपासून ते दहिसपर्यंत १५ ते २० लाख सदनिका या रिकाम्या आहेत. पूर्व उपनगरांतही साधारण तितक्याच रिकाम्या असल्याचा अंदाज गृहनिर्माण विभागाच्या अधिकाऱ्यांना आहे. मुंबईत उभ्या राहणाऱ्या प्रत्येक टोलेजंग इमारतीत राहायला जाण्यापेक्षा त्याच्या वाढणाऱ्या किमतींमुळे गुंतवणूकदार सदनिकांमध्ये पैसा गुंतवत आहेत. शेअर बाजार, सोने, किंवा कमॉडिटी मार्केटमध्ये गुंतवलेल्या पैशावर मिळणाऱ्या फायद्यापेक्षा मुंबईतील प्रॉपर्टीमध्ये गुंतवलेल्या पैशांवर लवकर व प्रचंड फायदा मिळतो आहे. त्यामुळे अनेक मोठे गुंतवणूकदार शेकडो कोटी रुपये या व्यवसायात ओतत आहेत. त्यांच्यामुळे तेजीत आलेल्या या बाजाराच्या मागे काही मध्यमवर्गीयही लागले आहेत. हाच प्रकार ऐंशीच्या दशकात लंडनमध्ये झाला होता. कालांतराने लंडनचे प्रॉपर्टी मार्केट कोसळले आणि लाखो छोटे गुंतवणूकदार देशोधडीला लागले. दोन वर्षांपूर्वी अमेरिकेला आर्थिकदृष्टय़ा झोपवण्यास हाच प्रकार कारणीभूत ठरला आणि दुबई, पोर्तुगाल, ग्रीनलंड अशा अनेक देशांची वाताहात याच प्रॉपर्टी इनव्हेस्टर्सनी लावली. मात्र तरीही केंद्र किंवा राज्य सरकारला याचे काहीही पडलेले नाही. .....
..... लोकसत्तातून...
धन्यवाद शरद, योग, स्वरूप
धन्यवाद शरद, योग, स्वरूप
बाजोंच्या गेल्या काही
बाजोंच्या गेल्या काही दिवसातल्या ह्या बाफवरच्या सगळ्या पोस्टस पटल्या!
हे सगळं कोसळेल असं खूप स्ट्राँगली वाटतं! काहीतरी चुकतय.. पण नक्की काय ते कळण्याइतकी मी तज्ञ नाही..
लोक जोपर्यंत फ्लॅट घेत नाहीत
लोक जोपर्यंत फ्लॅट घेत नाहीत तोपर्यंत त्यांना रिअल इस्टेट लवकरात लवकर कोसळाव अस वाटत असत आणि फ्लॅट घेतल्या दिवसाला त्यांच ते मत बदलत
>>लोक जोपर्यंत फ्लॅट घेत
>>लोक जोपर्यंत फ्लॅट घेत नाहीत तोपर्यंत त्यांना रिअल इस्टेट लवकरात लवकर कोसळाव अस वाटत असत आणि फ्लॅट घेतल्या दिवसाला त्यांच ते मत बदलत
अगदी..
>>बाजोंच्या गेल्या काही दिवसातल्या ह्या बाफवरच्या सगळ्या पोस्टस पटल्या!
हे सगळं कोसळेल असं खूप स्ट्राँगली वाटतं! काहीतरी चुकतय.. पण नक्की काय ते कळण्याइतकी मी तज्ञ नाही..
तज्ञ मीही नाही तरिही अनुभवावरून असं म्हणता येईल की भारतातील बूम हा बराचसा ऑर्गॅनिक आहे, मुळात वाढत्या मागणीवर आणि वाढत्या buying power वर आधारीत आहे, दुबई सारखा speculation फुगवट्यावरील फुगवटा नव्हे. तेलाच्या चढ्या किमतीवर दुबई अन गल्फ ची अर्थव्यवस्था आधारीत आहे. भारताचे तसे नाही.. आपल्याकडे रियल ईस्टेट मार्केट कोसळणे म्हणजे फार तर पुण्यात ४२०० वरून रेट ३८००/४००० वर येणे आहे.. मुंबईत गेले अनेक वर्षात जागेचे भाव "कोसळलेले" मी तरी पाहिलेले नाहीत.. कायम वाढतच असतात. गेल्या दशकात वाढीव एफेसाय बद्दल सरकारने केलेल्या अनुकूल पॉलिसींमूळे भविष्यात देखिल हे भाव वाढण्याची शक्यताच जास्त आहे. यावर एक आडमार्गी ऊपाय म्हणजे बॅकेच्या गृहकर्जावरील व्याज वाढवणे, कर्ज मंजूरीची अट १०% वरून १५% पर्यंत करणे (जागेच्या किमतीच्या १५% रक्कम कर्जदाराने भरणे), ई. ऊपाय सरकार करत असते. पण ज्यांना निव्वळ पैसे गुंतवायचे आहेत त्यांच्यावर याचा काहीही परिणाम होत नाही, ज्यांना घर कर्जाऊ घ्यायचे आहे त्यांना नक्कीच चाप बसतो.
पुण्याला जिथे आम्ही घर घेतले (३४०० चा भाव) २००८ मध्ये तिथे आज ४२०० चा रेट आहे.. थोडक्यात बाजार वरच चढतो आहे.
असो. मा.बो. वरील अर्थतज्ञ केदार जोशी (ऊसगाव वाले) याबाबत अधिक लिहू शकतील.
सरकारला खरच जर काही उपाय
सरकारला खरच जर काही उपाय करायचे असतील तर खुप मोठ्ठ्या प्रमाणावर म्हाडासारख्या स्कीम्स ठिकठिकाणी व्हायला हव्यात.... समाजातल्या सर्व स्तरांचा विचार करुन रास्त गृहनिर्माण व्हायला हवय!
आणि त्याठिकाणी फ्लॅट देताना सुद्धा आधी त्या शहरात त्या माणसाच्या किंवा कुटुंबीयांच्या नावावर फ्लॅट नाहीये ना, अमुक वर्षे फ्लॅट विकता येणार नाही यासारख्या अटी घातल्या आणि पाळल्या गेल्या तर खुप फरक पडू शकतो!
पण इतकी इच्छाशक्ती असलेले नेते आपल्याकडे नाहीयेत हे दुर्दैव
मागणी कमी होणार नाहीच आहे... उलट दिवसेंदिवस वाढणारच आहे.... अश्या परिस्थितीत मुबलक पुरवठा केला तरच किमती आटोक्यात येतील!
सर्वसामान्य माणसाला कळणारे हे गणित सरकारला कळत नसेल असे थोडेच आहे.... पण स्वताच्या पोतड्या भरण्यातच स्वारस्य असणार्याना लोकांची काय फिकीर!
माझा अॅक्सिस बँकचा अनुभव
माझा अॅक्सिस बँकचा अनुभव चांगला आहे. लोन प्रोसेसिंग फास्ट केले. पुन्हा जेव्हा व्याज दर कमी होत गेले तेव्हा माझा फ्लोटींग व्याज दर कमी झालाय (जवळपास २% तेही २.५ वर्षात). नॅशनलाईस्ड बँका, सहकारी बँका, आयसीआयसीआय इतक्या मोठ्या प्रमाणात व्याज दर कमी करतात, असे मला वाटत नाही .
मुंबईत राहणारे व तिथे
मुंबईत राहणारे व तिथे दुसर्या जागेत पैसे गुंतवणे परवडत नाही म्हणणारे अनेकजण गेली अनेक वर्षे पुण्यात जागा विकत घेत आहेत. परदेशात, विशेषतः आखाती देशात राहाणार्या अनेकांनी गुंतवणूक म्हणून पुण्यात फ्लॅट घेण्याचेही बर्याच वर्षांपासूनचे प्रघात आहेत. पुण्यात शिक्षणासाठी बाहेरील राज्यांतून येणार्या मुलांचे आईवडिलही त्यांना पुण्यात फ्लॅट विकत घेऊन देतात. बिझनेस कम्युनिटीमधील लोक (खास करून सिंधी, मारवाडी, गुज्जु, पंजाबी) कॅश पेमेन्ट भरून फ्लॅट्स घेताना दिसतात. त्यांना त्यात आपला काळा पैसा दडपता येतो. अशा तर्हेने पुण्याच्या उपनगरांतील गृहसंकुलांमध्ये अनेक फ्लॅट्स विकले गेलेले पण रिकामे असतात. वानवडी, विमाननगर, कोंढवा, औंध इत्यादी उपनगरांतील सोसायट्यांमध्ये असे अनेक रिकामे फ्लॅट्स एके काळी मी पाहिले होते. सद्य स्थिती माहित नाही.
एवं च काय.... खरोखर ज्यांना घराची गरज आहे त्यांच्यापेक्षा इतर प्रकारची व मालदार गिर्हाईके बिल्डर्सना मिळत असताना, व ते देतील त्या किमतीत ही मंडळी फ्लॅट विकत घ्यायला तयार असताना त्या किमती फार उतरतील ही आशा करणे फोल आहे.
योग, खरयं, पुण्यात किंमती
योग, खरयं, पुण्यात किंमती पडल्या तर जास्तीत जास्त ४२००/- वरुन ४०००/- येतील.
लोनच्या बाबतीत SBI आणि HDFC च नाव ऐकलय. पण कर्ज घेताना इतकी कागदपत्रे असतात आणि नियम असतात की गोंधळ उडतो.
अकु च्या आख्या पोस्टला अनुमोदन. अगदी सत्य आहे.
वाकडला Capital towers म्हणुन
वाकडला Capital towers म्हणुन एक प्रोजेक्ट आहे. ABS properties चा. तो कसा आहे? मी बघून आलोय... आवडलाय. कुणी आणखी माहिती देउ शकेल का?
विष्णू, प्रोजेक्ट बहुतेक
विष्णू, प्रोजेक्ट बहुतेक आवडतातच. खरी गोम दर आणि बांधकाम यांचा दर्जा, पाणीपुरवठा , ताब्यास विलम्ब यातच असते.
कुणी SSPMS मैदानावर सुरु
कुणी SSPMS मैदानावर सुरु असलेल्या 'क्रेडेइ' आयोजित वास्तुप्रदर्शनाला जाऊन आलय काय? रविवार पर्यंत आहे हे प्रदर्शन.
लोक जोपर्यंत फ्लॅट घेत नाहीत
लोक जोपर्यंत फ्लॅट घेत नाहीत तोपर्यंत त्यांना रिअल इस्टेट लवकरात लवकर कोसळाव अस वाटत असत आणि फ्लॅट घेतल्या दिवसाला त्यांच ते मत बदलत >>> पटलं.
वास्तुप्रदर्शने म्हणजे सापळे
वास्तुप्रदर्शने म्हणजे सापळे आहेत की काय असे वाटायला लागले आहे... ५०० रु. वाढवून दोनशे रु. कमी करून दाख्विण्याची गेम. आता सचिनची जाहिरात करून भाव वाढवायला अमित मोकळा. सचिन जन्मात तिथे कधी राहील की नाही देव जाणे!
सरकारी ब्यान्का वेळखाऊपणा करत
सरकारी ब्यान्का वेळखाऊपणा करत असल्या तरी त्यातून स्वतःचे आणि ग्राहकांचे हित संरक्षित केले जाते. प्रोजेक्ट्ची सगळी कागदपरे व्यवस्थित तपासून मगcअ लोन स्यांक्शन केले जाते. यात साधारण आठ ते २५ दिवस वेळ जातो. आधीच अॅप्रूव्ह केलेला प्रोजेक्ट असेल तर वेळ कमी लागतो. व्याजदर वाढले की अगदी कमीतकमी वेळात खाजगी ब्यान्का बदल करत्यात मात्र सरकारी खाक्यामुळे सरकारी ब्यान्का थोडा वेळ घेतात. त्याचाही आपल्याला फ़ायदा होऊ शकतो.
प्रत्येक डिस्बर्समेन्टच्या वेळी एक वरिष्ठ अधिकारी येऊन काम कुठेवर झाले आहे याची खात्री झाल्यावरच पेमेन्ट मिळत असे. हे अर्थातच ग्राहकाच्या हिताचेच आहे. १५-२० वर्षे कर्ज फ़ेडणार आहोत तसेच आयुष्यभराची कमाई या दृष्टीने जर आपण बघत असू तर ४ दिवसात लोन स्यन्क्शन करणार्या ब्यान्केपेक्षा सर्व तपासून नियमाप्रमाणे वागणार्या ब्यान्केला प्राधान्य देणे केव्हाही उचीत. असेही बिल्डर सान्गितल्या तरखेला आपल्याला कुठे काय देतात.? ४-६ महिन्याचा उशीर हा अगदी प्रमाण मानला जातो.
गिरीराज, सहमत. मी काल
गिरीराज, सहमत.
मी काल आंबेगाव भागातील काही साइट्स पाहून आलो. वेंकटेश ग्रूपच 'लेक विस्टा', साइ मिस्टिक, निर्माण विवा, अमित ग्रूपचे 'ब्लूमफिल्ड', केंजळे ग्रूपचा 'स्प्रिंग मिडोज', केबी डेवलपर्स चा 'ग्रँडूअर' आणि, नवजीवनचा 'सुंदरबन'. सगळ्यांचे रेट्स साधारणतः ३१००-३४०० आहेत, पण काँपॅक्ट होम्सच्या नावाने कारपेट एरिया कमी आहे, २BHK साधारणतः ९५० (टोटल सेलेबल एरिया) आहे त्यामुळे अगदीच छोटा वाटत होता. पण १BHK साधारणतः २२ लाखापर्यंत मिळू शकेल आणि २ BHK साधारणतः ३०-३६ लाखापर्यंत मिळतो. यात पार्किंगचा एक घोळ म्हणजे आत्ता ओपन पार्किंग पण आत्ता विकत घ्याव लागतयं. सगळ्यात खटकलेली गोष्ट म्हणजे या सर्व प्रोजेक्ट्सचे पजेशन डिसेंबर २०१२ दरम्यान मिळणार आहे. तसेच लेक विस्टाचा प्रोजेक्ट सोडल्यास बाकीचे प्रोजेक्ट्स बहुदा अजून कॉर्पोरेशन मध्ये नाहीयेत त्यामुळे पाण्याची पण व्यवस्था काय आहे हे माहिती नाही.
२ वर्षं पजेशनसाठी थांबावं काय? मधल्या काळात EMI आणि सध्याच्या घराचे भाडे हे दोन्ही भरावे लागेल.
हे लै लोचेदार हय. दोन वर्षे
हे लै लोचेदार हय. दोन वर्षे यांच्या क्याश फ्लोचे काय? २ वर्षात होइल याची काय ग्यारन्टी? पझेशन २वर्षात होइल याची खात्री नाही. शिवाय घरे खूपच लहान आहेत. ६५० च्या दरम्यान कारपेट पडते. हे एके काळी १ बीएच केचे क्षेत्र होते
यात पार्किंगचा एक घोळ म्हणजे
यात पार्किंगचा एक घोळ म्हणजे आत्ता ओपन पार्किंग पण आत्ता विकत घ्याव लागतयं. >>>>>>>>>
माझ्या माहिती प्रमाणे काहि दिवसांपुर्वी न्यायालयाने दिलेल्या निर्णया प्रमाणे या वर बंदी घातलेली आहे.
Builders and developers are not authorized to sell open parking area.
>>Builders and developers are
>>Builders and developers are not authorized to sell open parking area.
Not only open but the closed one also!
नाही बूमरँग. माझ्या माहिती
नाही बूमरँग.
माझ्या माहिती प्रमाणे फक्त ओपन पार्किंग विकण्या वर निर्बंध आहेत.
धानोरी भागात पण काही चांगले
धानोरी भागात पण काही चांगले प्रोजेक्ट्स आहेत असं ऐकलं, पुढच्या शनिवार-रविवारी जाईन पहायला तिकडे.
कुणाला धानोरीतील प्रोजेक्ट्स बद्दल काही माहिती , अनुभव आहे?
पार्किंग संबंधीत माहिती "कार पार्किंगची दुसरी बाजू
कोणाला डांगे चौकातल्या
कोणाला डांगे चौकातल्या 'ग्रीन्स' बद्दल माहीती आहे का?
पुण्यात 1 rk स्कीम बद्द्ल (
पुण्यात 1 rk स्कीम बद्द्ल ( नवीन , बुकिंग मधे) माहिती हवी आहे. भुगाव, धायरी, किंवा इतर ठिकाण्च्या. कोणाला माहिती अस्ल्यास नक्की सांगा.
रावी, सध्या चाकणमध्य सुरु आहे
रावी, सध्या चाकणमध्य सुरु आहे अशी स्कीम. तो एरिया चालेल का?
आस, शक्क्यतो येव्ढ्या लांब
आस, शक्क्यतो येव्ढ्या लांब पहात नाहीये. तरीही काही वेब्-साईट, फोन नं. असेल तर देऊन ठेव.
मगरपट्टा भागात घर घेण्याबद्दल
मगरपट्टा भागात घर घेण्याबद्दल काही माहिती असेल तर प्लिज लिहीणार का इथे.
कोणाला माहिती नाही वाटते? असो.
मी सहज म्हणुन नेटवर पहात होते तेव्हा कोरेगाव, कल्याणीनगर , मगरपट्टा ह्या भागातली घरे अतीमहाग आहेत असे दिसले. ७ ते ८००० रेट आहे. असे काय आहे त्या भागात? कोरेगाव पार्क तर बाप रे बाप!!!
Pages