पुण्यात घर घ्यायचय?

Submitted by नानबा on 16 May, 2010 - 10:33

ह्या धाग्याच्या मूळ उद्देशात मी गृप बूकिंगसाठी लोक जमतात का हे पहायचं असं लिहिलं होतं..
पण काही प्रतिसादांमधे असे गृप ऑल्रेडी आहेत आणि त्यांना अनुभवही आहे असे प्रतिसाद आले - त्यांचं म्हणणं पटल्यानं आणि चर्चेचं मूळ स्वरूप हळूहळू बदलून "पुण्यातल्या चालू प्रोजेक्ट्सची/लोकेशन्सची माहिती/घर विकत घेताना लक्षात घ्यायच्या गोष्टी" - असं झाल्यानं माझं हे मुळच पोस्ट मी बदलतेय.
--- पुण्यात घर विकत घेऊ इच्छिणार्‍यांना शक्य ती माहिती मिळावी - म्हणून हा बाफ!

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

गृप नी बुकिंग करायचा नेबरहुड (लोकॅलिटी), शाळा आणि बाकी सोयींबद्दल अधिक माहिती मिळण्यासाठी फायदा होइल फारतर पण घराचा भाव नेगोशियेट करता येइल हा उद्दिष्ट पण आहे का?
असेल तर त्यात मला शंका आहे म्हणुन विचारतोय.

घराचा भाव नेगोशियेट करता येइल हा उद्दिष्ट पण आहे का
>> होय.. तो मुख्य मुद्दा आहेच...
माझ्या माहिती प्रमाणे मिळतं डिस्काऊंट.. (अगदी ब्लूरिड्ज मधेही सांगितलेलं हे)

डिस्काऊंट मिळते , पण किति ? ४- ५ लाख, जर तुम्हि १० लोक असल तरच !

मी सध्या औन्ध मध्ये राहतो , नविन प्रोजेक्ट च्या २ BHK ची किमन्त ७५ लाख सान्गत आहेत ते पण without parking, stamp duty, one time maintenance.

म्हन्जेच तो फ्ल्ट अन्दाजे ८४-८५ लाखा पर्यन्त येइल.

आतो तो किति जणाणा परवडणार ? पण लोकान कडे पेसे आहेत, आनि त्यानि फ्लट बूक केले देखिल !!

Happy
पण औंध मधेच फ्लॅट घ्यायचा असं ठरवणार्‍या माणसांची तयारी असेल ना तशी आर्थिक/मानसिक?

माझे प्रेफरन्सेस - वारजे, बावधन, वाकडच्या आसपास चा एरिया

मामी आणि महेश तुम्ही कुठल्या भागात घर/खोल्या घेण्यात इन्टरेस्टेड आहात?

आतो तो किति जणाणा परवडणार ? पण लोकान कडे पेसे आहेत, आनि त्यानि फ्लट बूक केले देखिल !!
---- माझ्या मित्राच्या म्हणण्यानुसात असे फ्लॅटस पण त्वरित विकल्या जातात, फ्लॅटस पुर्ण व्हायच्या आधीच संपुर्ण बुकींग होते. आहे लोकांकडे अमाप पैसा आहे, रंग विचारायचा नाही.

आहे लोकांकडे अमाप पैसा आहे, रंग विचारायचा नाही>>> सगळे लोक ब्लॅक मनी वापरुन चांगल्या एरिआत घर घेतात असं काही नाही.

मध्यंतरी काही आयटीवाल्यांनी याच कारणासाठी एकत्र येऊन एक याहू ग्रुप स्थापन केला होता (insignia) आणी एक बिल्डर शोधुन (राणे) एक स्कीम बावधनात सुरु केली होती. या स्किममधील सगळे फ्लॅट्स या ग्रुपच्या सभासदांनी विकत घेतले होते (भाव साधारण २४०० च्या आसपास चुभुद्याघ्या). काही दिवसापुर्वी या स्किमचे बिल्डर राणे यांचा जमिन खरेदीविक्रीच्या संबंधातील काही कारणांवरुन खुन झाला. त्यांची बायको ही स्किम पुढे चालवणार असे ऐकले होते पुढे काय झाले माहीत नाही. अधिक माहितीकरता insignia pune असा याहू ग्रुप शोधा.

कोणी जमीन घेणार असेल तर मला इंटरेस्ट आहे!
१०-१२ लोक असतील तर फ्लॅटच्या बजेटमध्ये रॉ-हाउस बनु शकत पण थोड लांब जाव लागेल!

कोणी जमीन घेणार असेल तर मला इंटरेस्ट आहे!
१०-१२ लोक असतील तर फ्लॅटच्या बजेटमध्ये रॉ-हाउस बनु शकत पण थोड लांब जाव लागेल!
>> लांब म्हणजे किती लांब आणि कुठल्या दिशेला?

आयला!
सदाशिव पेठ, टिळक रोड, जिमखाना, कर्वे रोड इथे का नाही लोक घरे घेत? आपटे रोडवर पण बर्‍यापैकी घरे आहेत. अगदी स्वारगेटला सुद्धा चालेल. तेथून ३ नंबरची बस जायची टिळक रोडवरून.
तसेच वानवडीला, स्वारगेटच्या पुढे दोन तीन मैल, सायकलवरून बरेचदा गेलो होतो! तिथून लक्ष्मी रोड, टिळक रोड, अगदी जिमखाना सुद्धा फार लांब नाही, त्यातून आतातर काय, लोकांकडे स्कुटरी असतात!

मी मुद्दाम हा बा. फ. पहात होतो, मला एक खोली भाड्याने रहायला मिळाली तर हवी होती! म्हंटले ओळखीचे मालक असले म्हणजे बरे.

केव्हढ्याला मिळते हो पूर्वीच्या व्हेस्पा, लँब्रेट्टा सारखी स्कूटर? नि बुलेट सारखी मोटर सायकल??

कुणाला तरी भेट म्हणून द्यायचा विचार आहे, म्हणून विचारले.

बावधन काय, वाकड काय, बाणेर काय! या भागांना पुण्यातले म्हणायचे?
क्कैच्च्या क्कैच्च!!
Light 1

काय करणार झक्की.. गरीब लोकं आम्ही... आम्हाला गावात परवडत नाही (लई ट्रॅफिकभी असतं..)
आम्ही आपलं दुधाची तहान ताकावर ह्या उक्तीप्रमाणे बावधन, वारज्यालाच पुणं म्हणतो... Wink
(कली मातला आहे, दुसरं काय!)

चांगला आहे धागा,
मी वा़कड्,बाणेर किंवा पिं सौदागर मधे फ्लॅट घेउ इच्छीतो.

मला वाटतं जर आपण त्या-त्या भागतील बिल्डर्स्,प्रोजेक्ट्स, तेथील सुविधा व किंमत्त जर शेअर केला तर
लवकरच इच्छुक लोकांची यादी तयार करु शकु.

थोडे बाहेर म्हणजे सिंहगड रोड, औंध इ. ठिकाणी रिसेल च्या काय किमती आहेत २ बेड साठी? १० ते १५ वर्षे जुना चालेल. रो हाउस ची कल्पना पण चांगली आहे.

अरे अगदी उपयुक्त धागा आहे.. धन्स नानबा..

मी सुद्धा इच्छुक आहे.. पण मी रेडी पसेशन किंवा रीसेल पहात आहे.. २ BHK
प्रेफरेन्सेस - बाणेर, बावधन, पाषाण, कोथ्रुड, वारजे, सातारा रोड..

Julie , पाषाण, बाणेर वैगेरे मधे सध्या ३७००-३८०० / स्क्वे.फु रेट चाल्ला आहे..
सिंहगड रोड वर सुद्धा ३५०० -३६०० पर्यंत आहेत रेट्स.. हे सगळे रेडी पसेशन किंवा ५-६ महिन्यात पसेशन्स चे आहेत.
कोथरुड मधे ४०००-६००० मधे रेट्स आहेत.. औन्ध मधे पराग यानी सांगितलेल्या प्रमाणेच आहेत रेट्स
मला माहित असलेले काही प्रोजेक्ट्स चे डीटेल्स टाकतो मी इकडे..

मोठा प्लॉट घेऊन डेव्हलप करण्याचा विचार असेल तर मला पण आवडेल. रो हाउसेस किंवा मग छोटेखानी बंगले तरी.

दोन वर्षांपूर्वी घरांसाठी पुण्यात हिंडताना राणे कन्स्ट्रक्शन ची घरे फार आवडली होती. हे राणे फक्त रेडी पझेशन वाले फ्लॅटच विकतात. पण अतीषय सुंदर लेआउट. आणी काम पण छान वाटलं. किंमत अर्थात परवडणारी नव्हती रेडी पझेशन मुळे. पण मोहात पडायला झालं होतं घरांच्या. आमचे एक नातेवाईक आर्किटेक्ट आहेत. ४०+ वर्ष अनुभव आहे. त्यांनी देखील प्लॅन आणी एकूणच बांधकाम अप्रतीम असल्याचं सर्टिफिकेट दिलं होतं.कुणाच्या रेंज मधे बसलं तर जरूर विचार करा त्यांच्या प्रोजेक्टमधे घर घ्यायचा.वाकड थेरगाव मधे साधारण २९०० ते ३००० चा रेट निदान सहा महिन्यापूर्वी पर्यंत तरी होता.( हा रेट राणेंचा नाही. इतर बिल्डर)

कोणी जमीन घेणार असेल तर मला इंटरेस्ट आहे!
१०-१२ लोक असतील तर फ्लॅटच्या बजेटमध्ये रॉ-हाउस बनु शकत पण थोड लांब जाव लागेल! >>
थोडं म्हणजे कमीत कमी १०-१५ किमी लांब जावं लागेल. आज भूगाव मध्ये जमिनीचा (NA न झालेल्या) भाव रू.५००+/स्क्वे. फूट आहे. पिरंगूटच्या आसपास रू.३०० च्या आसपास आहे. जर NA झालेले आणि रोडस् वगैरे केलेले प्लॉटस् घ्यायचे असतील तर किंमत अजून थोडी वाढते.

उंड्री कडं अजून बर्‍यापैकी स्वस्त आहे जागा बहूतेक.

<<<बावधन काय, वाकड काय, बाणेर काय! या भागांना पुण्यातले म्हणायचे?>>>
झक्की, तुम्ही आता 'जुने-पुराने' झालात. नवीन लोकांची, नवीन जागांची तुम्हाला सवय करून घ्यायला हवी! Happy

Pages