Submitted by नानबा on 16 May, 2010 - 10:33
ह्या धाग्याच्या मूळ उद्देशात मी गृप बूकिंगसाठी लोक जमतात का हे पहायचं असं लिहिलं होतं..
पण काही प्रतिसादांमधे असे गृप ऑल्रेडी आहेत आणि त्यांना अनुभवही आहे असे प्रतिसाद आले - त्यांचं म्हणणं पटल्यानं आणि चर्चेचं मूळ स्वरूप हळूहळू बदलून "पुण्यातल्या चालू प्रोजेक्ट्सची/लोकेशन्सची माहिती/घर विकत घेताना लक्षात घ्यायच्या गोष्टी" - असं झाल्यानं माझं हे मुळच पोस्ट मी बदलतेय.
--- पुण्यात घर विकत घेऊ इच्छिणार्यांना शक्य ती माहिती मिळावी - म्हणून हा बाफ!
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
खाली हात आया है, खाली हात
खाली हात आया है, खाली हात जायेगा असे श्री श्री श्री अझिझ नाझाजीसाहेब आम्हाला रोज सांगतात.
>>
आणि नन्तर "जाम उठाले .....' असे ते आणि त्यांचे झीलकरी तारस्वरात ओरदतात ते कानात घुमू लागले...
नाही हो जाम उठवण्यापासून थोडे
नाही हो जाम उठवण्यापासून थोडे दुरच
यवतच्या जागेला जर कोणी जाउन
यवतच्या जागेला जर कोणी जाउन आलात तर Please Information share करावी.
गुगल map वर तर काहि यवत जवळ अशी township दिसत नहिये....
टाऊनशिप नाही हो,
टाऊनशिप नाही हो, बंगल्यांसाठीचे मोकळे प्लॉट... ते कसे दिसतील गु.मॅ.वर?
बाळूदादा म्हणजे ते एखाद्या
बाळूदादा म्हणजे ते एखाद्या विकसकाने विकायला काढले आहेत का?
असो, जर कोणी जाउन आलात तर क्रुपया सगळी आवश्यक माहिती टाकावी. (Like - N/A, गुन्ठेवारी वगेरे)
(मी अमोल ला फोन केला होता पण तो अग्निरथ हाकत आसल्याने थोड्या वेळाने callback करतो म्हणाला)
मला नाही माहीत बोवा. इथे जी
मला नाही माहीत बोवा. इथे जी चर्चा चालू होती त्यावरून मी म्हणतो आहे. मी कशाला बघतोय. इथे पगार पुरेना अन कुठे इन्वेस्टमेटची स्वप्ने पाहू?
पगाराचा अन स्वप्नांचा काय
पगाराचा अन स्वप्नांचा काय संबंध बाजो? बेसिकमे राडा ! स्वप्न पाहावित माणसाने असे श्रीमंत शारुखराव बोबडे हे , तुम जब सच्चे दिलसे कुछ पाने की लिये .. सारी कायनाथ तब" असे शांती मंत्रात सांगुन गेलेत. तस्मात स्वप्न पाहा.
हे कोण नाथ केदार? किरायाच्या
हे कोण नाथ केदार?
किरायाच्या घरात नेहमी राहीले तरी >>> नक्कीच लीजवर घ्यायचं
बा.जो. तो कुठल्या सोसायटी चा
बा.जो. तो कुठल्या सोसायटी चा रेट आहे?
आम्ही नुकताच तिकडे घेतलाय..
माझ्या सोसायटीत ५००० रेट आहे.
माझ्या सोसायटीत ५००० रेट आहे. कॅम्पच्या जवळ ( २.५ किमी) आहे फक्त.
भाव खरा सांगितला आहे, पण ही माहिती आपली उगाचच. ४०० वी पोस्ट आपली पडावी म्हणुन.
अवनी सुन्दर सहवास फेज २
अवनी सुन्दर सहवास फेज २ ...सनसिटीच्या समोर रस्ताच्या पलिकडे
मी ग्रीन एकरेजचा यवतजवळचा
मी ग्रीन एकरेजचा यवतजवळचा प्लॉट पाहुन आले. गोळीबार मैदान (कॅम्प चौक) पासुन बरोब्बर ४८ किमी. आम्ही दोन प्लॉट्स घेतो आहोत.
थॅन्क्स मनिमाऊ, यवत
थॅन्क्स मनिमाऊ, यवत स्टेशनपासून किती लांब आहे? तसेच पुणे सोलापूर हायवे हून?
यवत स्टेशनहुन माहित नाही, पण
यवत स्टेशनहुन माहित नाही, पण सोलापुर हायवेला उजवीकडे वळलं कि साधारण ५ किमि आहे. आजुबाजुला सगळा डी झोन डिक्लेअर झाल्यामुळे मोठमोठ्या कंपनीजनी जागा घेतल्या आहेत. एक जर्मन कंपनी ( शी: नाव लक्षात नाही. अभिजीत पवारांची आहे.), महिंद्रा & महिंद्रा, कुमारची एक नविन स्कीम इ इ डेवलपमेंटस चालु आहेत. बाकी अनेक कंपनीजनी जागा घेवुन आणि बर्याच कंपनीजनी कन्स्ट्रक्शन ही चालु केलं आहे. एकच ड्रॉ बॅक कि लॅन्ड NA नाही आणि त्यामुळेच स्वस्त आहे. पुढेमागे हा भाग R झोन होइल अशी बातमी आहे. नाहीतरी घर कुणाला बांधायचंय तिथे. पुढे मागे विकुनच टाकणार आहे.
मी पाहुन आलो रविवारी यवतची
मी पाहुन आलो रविवारी यवतची जागा. मला तरी हायवेवरुन खुप आत वाटली. डेव्हलपमेंट व्हायलाही खुप वेळ लागेल शिवाय एन ए नाही. अशीच एक स्कीम देहुगावात पण आहे गाथामंदिराशेजारुन रस्ता आत जातो , सगळीकडे गंधर्व विहारचे बोर्ड आहेत. ३.५ लाख गुंठा असा भाव आहे सध्या. बर्यापैकी प्लॉटस गेले आहेत एन ए नसुनही.
रविवारी पुंटोत एक कपल आलेलं यवतला. मला विचारावसं वाटत होतं मायबोलीवर माहीती मिळाली का म्हणून
आम्ही मे २०१३ मध्ये भारतात
आम्ही मे २०१३ मध्ये भारतात परतन्याच्या विचारात आहोत, मुलगी १ लीत जाईल. पुण्यात CBSE and ICSE चा चागल्या शाळा कुणी सागू शकेल का प्लिज? औन्ध, बाणेर, कोथरुढ, वाकड परिसरात.
ब्लु रिज चा current rate माहित आहे का कुणाला?
दीप्स (मनीमाऊ), तुमच्या
दीप्स (मनीमाऊ), तुमच्या माहितीवरून काही शंका येतात. जमीन एन ए नाही मग सिन्गल प्लॉट कसे विकतात? तसे विकता येत नाहीत. तुम्हाला तुमच्या प्लॉट्चा स्वतन्त्र सातबारा कसा मिळेल.? शिवाय डेव्हलपमेन्त झोन कोणता आहे रिजनल प्लॅनमध्ये? आर झोन म्हनजे काय ? पुढेमागे म्हनजे कधी? मनीमाऊ तुमच्या नावाचा स्वतन्त्र सातबारा मिळाला का? बहुधा एकाच सर्व्हे नम्बरमध्ये सगळ्याप्लॉटहोल्डरची नावे असतील. तुम्ही विकत घेतल्यावर एन ए कोण करणार आहे? तुम्ही?
बाळू जोशी, ती जमीन ग्रीन झोन
बाळू जोशी, ती जमीन ग्रीन झोन मध्ये आहे.
तेच मी म्हनतोय. गीन झोन
तेच मी म्हनतोय. गीन झोन म्हनजे एन ए नाही. एन ए नाही म्हनजे स्वतन्त्र सातबारा नाही. स्वतन्त्र सातबारा नाही म्हणजे त्यात जे काही शे पाचसे प्लॉट होल्डर असतील त्यांच्या परवानगीशिवाय तुम्हाला तुमचा प्लॉट (खरे तर प्रपोर्शनेट क्षेत्र) विकता येनार नाही. त्यासाठी तुम्हाला झोन बदलेपर्यन्त थाम्बावे लागेल. याचे एन ए चे प्रपोजल कोण टाकणार.? तुमचा एन ए नसलेला अॅग्रिकल्चरल प्लॉट कोण विकत घेणार याबाबत डेवलपरने काही माहिती दिली आहे का?
डी झोन हा एम आय डीसीने
डी झोन हा एम आय डीसीने टॅक्सेशनकरता केलेले क्लासिफिकेशन असते. व तिथे इन्डस्ट्रिअल एन ए असते तिथे रेसिडेन्शियल एन ए मिळत नाही. त्यामुळे कम्पनी साठी घेतलेल्या जमिनी या इन्डस्ट्रियल पर्पजसाठी घेतलेल्या असतील.
मी नुकताच विश्रांतवाडीला N A
मी नुकताच विश्रांतवाडीला N A plot घेतला.... plot घेताना बराच त्रास होतो .... बाजोनी मांडलेले मुद्दे अगदी बरोबर आहेत.... जरी investment म्हनुन घेत असाल तरी वर सांगितलेल्या propertiesche रेट भविष्यातपण वाढत नाहीत..... गुंतवणुक करताना योग्य सल्ला घ्या.... गरज असल्यास मला संपर्क केला तरी चालेल.......
खरे तर कुठलीही जमीन घेताना
खरे तर कुठलीही जमीन घेताना जानकार वकीलाकडून सर्च रिपोर्ट घेतला पाहिजे. त्यात ३० वर्षापासूनची जमिनीची कुन्डली मांडलेली असते. १० लाखाची जमीन घेणारी माणसे २०-२५ हजार रुपयाचा (त्यापेक्षा कमीच) सर्च रिपोर्टचा खर्च अनावश्यक म्हणून टाळतात आणि १० लाखाची गुन्तवणूक कायद्याच्या कचाट्यात अडकवतात. बरे एकदा टायटल फॉल्टी असेल तर तुमची जमीन निम्म्या किमतीत सुद्धा कोणी घेत नाहीत. पुणे परिसरात बरेचसे व्यवहार बनावट खरेदीखते, बनावट सात बारे, यांच्या सहाय्याने खोटी टायटल्स तयार करून होत असतात. ठाणे, पुणे , नाशिक सारख्या शहरात ७५ टक्के जमिनी तरी वादग्रस्त असतात.
बाळु जोशी , उपयोगी माहिती.
बाळु जोशी , उपयोगी माहिती. धन्यवाद.
बाप रे, काय रेट्स वाढलेत
बाप रे, काय रेट्स वाढलेत
आम्ही ५ वर्षापूर्वी कल्याणी नगर ला इन्व्हेस्ट केलं तेंव्हा असे आकडे नव्हते म्हणून करु शकलो.. अत्ताचे रेट्स बघून इथे राहून सुध्दा पुण्यात प्राइम एरीआ मधे घर घ्यायला अजिबात न परवडवणारेच रेट्स वाटतायेत !
हिंजेवाडीमधल्या Saarrthi's
हिंजेवाडीमधल्या Saarrthi's Signor प्रोजेक्टची माहिती हवी होती... तो एरिया कसा आहे? पाणी, वीज, लोकल ट्रान्सपोर्ट कसा आहे? बिल्डर कसा आहे? त्या किंवा जवळपास अजून काही चांगले प्रोजेक्टस आहेत का? ५० लाखांपर्यत बजेट आहे...
५० लाखात तुम्हाला काही मिळेल
५० लाखात तुम्हाला काही मिळेल तिथे असे वाटत नाही. एरियाबद्दल म्हणाल तर जे लोक हिंजवडी (हिंजेवाडी नव्हे) शी व्यवसायानिमित्त संबंधित आहेत त्यानाच असे प्रोजेक्ट सोईचे असतात.प्रचंड वाहतूक, धूळ, गुन्हेगारीने आणि म्हणून शांतपणे राहण्यासाठी हा प्रदेश नाही. स्वतःचे वाहन ठेवावे लागेल . महिलांनी पब्लिक ट्रान्सपोर्टचा उपयोग करणे धोकादायक. पी एम्टी वगळून्.कोणताही बिल्डर कधीही चांगला नसतो.पुण्यात सर्व प्रोजेक्ट मध्ये हल्ली पाणी बोअरचे असते. पुण्यातले बहुसंख्य प्रोजेक्ट हे बुकिंग ओपन झाल्याबरोबर इन्वेस्टर हायजॅक करतात्.मग तुम्हाला गैरसोईचे अनवान्टेड फ्लॅट शिल्लक ठेवतात. नामवन्त बिल्डरांकडे लोक प्रोजेच्क्ट अनांऊस व्हायच्या आधीच पैसे डिपॉझिट करतात.
सिग्नोर साठी हे पहा:-
http://www.allcheckdeals.com/project-saarrthi-signor-hinjewadi-pune.php
ह्या किमतीत ८-९ लाख रु. इतर चार्जेस अॅड करा.
सारथी हे सुस्थिर बिल्डरसल्याने कॅश फ्लोचा त्याना प्रॉब्लेम येणार नाही असे वाटते त्यामुळे प्रकल्प वेळेत पूर्ण होइल एवढेच.
धन्यवाद बाळू जोशी.
धन्यवाद बाळू जोशी.
प्रचारी असले तरी बरा आहे हा
प्रचारी असले तरी बरा आहे हा ब्लॉग. पुण्यातल्या घरबांधणीतील नव्न्व्या माहितीसाठी
http://ravikarandeekarsblog.blogspot.com/
आत्ताचे रेट्स बघून इथे राहून
आत्ताचे रेट्स बघून इथे राहून सुध्दा पुण्यात प्राइम एरीआ मधे घर घ्यायला अजिबात न परवडवणारेच रेट्स वाटतायेत ! >>>
बरोबर आहे. परवडतच नाही.
रो हाऊस सध्याची पुण्यात किंमत सव्वा करोड रुपये! ( फक्त $२५००००)
३ बेडरूम - ६० ते ८५ लाख!
२ बेडरूम ४० ते ५५ लाख!
अमेरिकेत घर घेणे सोपे आहे कारण व्याज तरी कमी, पण पुणे / मुंबईमध्ये अमेरिकेसारखी किंमत. (आणि भारतीय पगार )
भुगाव येथील परांजपे बिल्डर्स
भुगाव येथील परांजपे बिल्डर्स च्या नवीन प्रोजेक्ट बद्दल कोणाला माहिती आहे का? म्हणजे ती जागा रहाण्याच्या सोयीच्या दृष्टीने कशी आहे? आपल्या पैकी कोणी तिथे घर घेतले आहे का?
Pages