Submitted by नानबा on 16 May, 2010 - 10:33
ह्या धाग्याच्या मूळ उद्देशात मी गृप बूकिंगसाठी लोक जमतात का हे पहायचं असं लिहिलं होतं..
पण काही प्रतिसादांमधे असे गृप ऑल्रेडी आहेत आणि त्यांना अनुभवही आहे असे प्रतिसाद आले - त्यांचं म्हणणं पटल्यानं आणि चर्चेचं मूळ स्वरूप हळूहळू बदलून "पुण्यातल्या चालू प्रोजेक्ट्सची/लोकेशन्सची माहिती/घर विकत घेताना लक्षात घ्यायच्या गोष्टी" - असं झाल्यानं माझं हे मुळच पोस्ट मी बदलतेय.
--- पुण्यात घर विकत घेऊ इच्छिणार्यांना शक्य ती माहिती मिळावी - म्हणून हा बाफ!
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
गूड ल्यांड काउण्टी (इथे वर
गूड ल्यांड काउण्टी (इथे वर लिंक दिली होति) बद्दल अजुन कहि माहीती आहे का कोणाला? असेल तर जरूर सांगावे.....
ही लिन्क पहा
ही लिन्क पहा
http://ravikarandeekarsblog.blogspot.in/
Everything about Real estate projects in Pune.
रवि करंदीकरांबद्दल या
रवि करंदीकरांबद्दल या धाग्यावर मागे प्रतिक्रिया व्यक्त झाल्या आहेत. फारसा उपयोग नाही जाहिरातीसारखा प्रकार आहे.... नसेल त्याला झोडायचे असा खाक्या आहे....
मी मागच्याच महिन्यात DSK
मी मागच्याच महिन्यात DSK विश्व मधे १बी एच के चा रीसेल चा फ्लॅट घेतला. २१ लाख मधे सर्व खर्चासहित..
(नविन ३४ लाख.)
तसेच हिंजवडी इथे KULECO चा रेट ३७०० आहे. नविन १बी एच के सर्व मिळून २६ लाख ला जातो. पझेशन २०१४
नांदेड सिटी, सिंहगड रोड रेट ४२५० आहे. नविन १बी एच के सर्व मिळून ३३ ला जातो.२बी एच के ४२ लाख. ३ बी एच के ६६ लाख. पझेशन २०१३(वन टाईम मेंटेनन्स).
परांजपे ब्लू रीज रेट ५०००.
नांदेड सिटीत रेट खूप झाला की
नांदेड सिटीत रेट खूप झाला की आता.
माझ्या मैत्रिणीने बूक केला तेव्हा सर्व मिळून १ बीएचके तिला २५ लाखाला पडला. (आम्ही बुकिंग करायला गेलो तेव्हा पार्किंग उपलब्ध होतं) ऐन फॉर्मभरताना पार्किंग संपल्याचा निरोप आला.
मी मागच्याच महिन्यात DSK
मी मागच्याच महिन्यात DSK विश्व मधे १बी एच के चा रीसेल चा फ्लॅट घेतला. २१ लाख मधे सर्व खर्चासहित..
(नविन ३४ लाख.>> अभिनंदन
स्वस्त मिळाला फ्लॅट असे म्हणतो.
हाय्ला swati_rajesh, लॉटरी
हाय्ला swati_rajesh, लॉटरी लागली की तुम्हाला!
अभिनंदन!
रवि करंदीकरांबद्दल या
रवि करंदीकरांबद्दल या धाग्यावर मागे प्रतिक्रिया व्यक्त झाल्या आहेत. फारसा उपयोग नाही जाहिरातीसारखा प्रकार आहे >> ब्लॉग लिहीण्याचा उद्देश काही असो पण पुण्यातील वेगवेगळ्या स्किम्सबद्दलची इतकी सविस्तर माहिती मिळण्याचा दुसरा स्त्रोत मलातरी सापडला नाहीये. पुर्णवेळ ब्लॉगरसाठी उत्पन्नाचे काहीतरी साधन लागणारच. आपल्याला हवी ती माहिती घेऊन बाकी गोष्टींकडे दुर्लक्ष करणे योग्य.
पाषाण सूस रोडला 'पद्मालय' चे
पाषाण सूस रोडला 'पद्मालय' चे प्लान तीन महिन्यांपूर्वी पाहिले होते. सिलिंगची उंची कमी वाटल्याने विचार बारगळला होता, पण गेल्या आठवड्यात काम पूर्ण झालेले फ्लॅट पाहिले. छान फ्लॅट आहेत.
सोसायटी देखिल शांत आणि चांगली आहे.
शेजारीच त्यांची नवीन साईट सुरू होते आहे. त्याचे भाव अजून त्यांनी डिक्लेअर नाहीत केले. तीन महिन्यांपूर्वी ४५०० चा भाव सांगितला होता.
भूगाव येथे एक नवीन स्किम चालू
भूगाव येथे एक नवीन स्किम चालू होते आहे. सध्या प्रि लाँच मध्ये असल्याकारणाने कुठे माहिती सापडणार नाही जास्त. SKYi बिल्डर्स - नाव साँग बर्डस. चांदणी चौकापासून अडिच किलोमिटरवर. एकूण एरीया ४२ एकर.
काल अचानक कळल्यामुळे मी तिथे जाऊन आलो. मला एरिया आवडला. सध्या ३९०० रू रेट आहे.आणि २ बिएचके चे पॅकेज साधारण ४८ पर्यंत जाते. चांदणी चौक - भुगाव - पिरंगुट हा रस्ता २०० फुट होणार आहे. ह्या स्किम पासून अजून पुढे तीन किलोमिटर वर परांजप्यांची फॉरेस्ट हिल्स ही योजना आहे. त्यात भाव सध्या ४३०० रू आहे.
वर सगळ्या टेकड्या अन टेकड्या ते नदी अशा मधल्या पट्यात ही पूर्ण योजना आहे. पि वाय सी जिमखान्यासारखे एक भव्य स्टेडियम पण ह्यातच बांधन्यात येणार आहे. एकुण योजना मला खरंच आवडली. व रोड सँक्शन असल्या कारणाने ( व लवासा ह्या रोडनेच पुढे असल्यामुळे शरदरावजी पवारसाहेब, हा रस्ता करणारच ह्यात दुमत नाही) २-३ वर्षात हा भाग कोथरुडला चटकन जोडला जाईल.
चांदणी चौक ते भुगाव रस्त्यावर अनेक मोठ्या स्किम्स येत आहेत. त्यातली मार्व्हल रिअलटर्सची एक स्किम अगदी चौकापासून १ किमी अंतरावर आहे. ८ -१० हजार स्वे फुट चे बंगलो साधारण ८ ते १८ करोड रू, ३४०० स्वे फुट फ्लॅट साधारण अडिच करोड रू असा भाव आहे. तिथून पुढे ही योजना (वरील) केवळ दिड किमी आहे.
जाऊन पाहून यावे अशीच जागा. एकदम निसर्गाच्या सानिध्यात. पण घर बुक करावे की नाही हा प्रश्न मात्र अजून पडलेलाच आहे.
आणखी एक म्हणजे आक्टो मध्ये ही स्किम लाँच होणार तेंव्हा त्याचा दर ४२ ते ४३०० रू असणार आहे असे तेथील लोकांनी सांगीतले. ( अर्थात ३९०० ऐवजी ४१०० होईल असा माझा अंदाज आहे.)
आपल्यापैकी इंटरेस्टेड लोक तिथे जाऊन आले तर मग आपण मिळून नक्कीच काहीतरी विचार करू शकतो.
केदार, फॉरेस्ट "ट्रेल्स"
केदार, फॉरेस्ट "ट्रेल्स" म्हणायचे आहे ना?
मी तो भाग एक दोन वेळा बघून आलो होतो. अजून ३-४ वर्षांनी राहायला योग्य होईल असे वाटले. तेथून हिंजवडीला रस्ता झाला पाहिजे दुसर्या बाजूने. तर फायदा आहे.
सध्या फॉरेस्ट ट्रेल्स व तेथपर्यंतचा पूर्ण रस्ता टीपिकल पुण्याबाहेरच्या खेड्यासारखाच दिसतो. मधे भूगावही आहेच. फ्लॅट्स मधे लोक राहायला येउ लागले की सगळी सपोर्ट इंडस्ट्री आजूबाजूला तयार होईल (रेस्टॉ, दवाखाने, किराणा, लॉन्ड्री, "शॉपीज" ई.). आत्ता मात्र काहीही नाही तेथे.
त्यात अजून महापालिकेच्या हद्दीत नाही. हद्दीतील सोसायट्यांचे सुद्धा पाण्याचे प्रश्न होते उन्हाळ्यात. बाहेरच्यांचे काय होईल माहीत नाही. 'टाउनशिप' असेल तर बिल्डरला काय काय करणे बंधनकारक असते ते माहीत करून घ्यायला पाहिजे.
हो हिल्स नाही ट्रेल्स. बरोबर
हो हिल्स नाही ट्रेल्स. बरोबर आहे.
हा प्रोजेक्ट भूगाव हे गाव लागण्याआधीच चालू होतो. दौलत लॉन्सच्या बाजूला ४ सिझन्स सोसायटी आहे, तिथून खाली उतरायचे.
सध्यातरी खेड्यासारखे वाटते, पण मी माझे सध्याचे घर घेताना अशाच लांब ठिकाणी घेतले, आज तो एरीया प्राईम झाला आहे.
बरोबर. त्यामुळेच मला असे
बरोबर. त्यामुळेच मला असे वाटते की आत्ता घेऊन आता लगेच राहायचे असेल तर योग्य नाही. ३-४ वर्षांनंतर सगळे डेव्हलप झाल्यावर चालेल.
पुण्यात घर हवे आहे. एरीया
पुण्यात घर हवे आहे. एरीया प्रभात रोड, कर्वे रोड, जीमखाना, जंगली महाराज रोड, सदाशीव पेठ, भांडारकर इन.रोड. ८०० ते १००० स्क्वे.फु. सध्या काय रेट चालु आहे?
हो पझेशनच डिसें २०१४ ला
हो पझेशनच डिसें २०१४ ला मिळणार. पुढच्या ५ वर्षात तिथे रेटच कायच्या काही असतील असे वाटते. कारणे.
१. २०० फुटी रस्ता.
२. चांदणी चौक जवळ
३. पिरंगूट वरून डावीकडे फेज ३. रिंग रोड ऑलरेडी सॅंक्शन त्यामुळे फेज ३ मध्ये फार तर ३० मिनिटात पोचता येईल.
४. पिरंगुट ते फेज ३ जागा अजिबात शिल्लक नाही. सर्व बिल्डर्स नी विकत घेतली आहे.
अर्थात मी पुढच्या ५-७ वर्षांचा विचार करत आहे. पझेशन मिळाल्यावर एखाद दोन वर्षे अडचणी येऊ शकतात. पण मग तेंव्हा रेट ही ६००० क्रॉस करेल. (अनडेव्हलप्ड आहे म्हणून रेट कमी)
परवा धानोरीला जाऊन आलो. तिथे पण पवार साहेब आहेतच. पवार साहेबांची कॉलेज सिटी आहे म्हणून एकाच रोडवर खूप सारे प्रोजेक्ट आले आहेत. रोड अजिबात नाहीत अन येरवड्याकडे यायचे झाले तर धानोरी - विश्रांतवाडी - येरवडा असे एकाच रस्त्याने यावे लागते. तरी पण स्किम्स सोल्ड आउट !
सध्या काय रेट चालु आहे? >>> प्रभात, एरंडवणे वगैरे १२००० रू.
तिकडेच दोन मोठे टॉवर्स येत आहेत. एक दशभुजा समोर. केवळ २ करोड रू. व दुसरा स्वप्नशिल्पच्या आजूबा़जूला. १.८ करोड.
मोकीमी, सदाशिव पेठ सोडुन बाकी
मोकीमी, सदाशिव पेठ सोडुन बाकी तुम्हाला हव्या असलेल्या भागात ८ ते १२ हजार भाव पडेल. पेठेत कमी.
पेठेत साधारण किती असेल? आणि
पेठेत साधारण किती असेल? आणि तिकडच्या इमारतींना गाडीचे पार्किंग मिळेल ना ? कोणी एजंट असल्यास विपुत सांगु शकाल का ?
पेठेत साधारण किती असेल? आणि
पेठेत साधारण किती असेल? आणि तिकडच्या इमारतींना गाडीचे पार्किंग मिळेल ना ? >> माझी माहिती जुनी आहे आणी बाहेर होतात तितक्या नविन स्किम्स तिकडे होत नाहीत त्यामुळे वर्तमानपत्रात जाहिराती दिसणार नाहीत. सध्या परिस्थिती बदलली असल्यास माहित नाही पण गावात होणार्या स्किम्समध्ये कार पार्किंग एकंदरीत कमीच असते. साधारण १० फ्लॅट्समागे ३-४ जागा आणी बहुतेक सगळ्या स्कीम्स मध्ये कमर्शियल/दुकाने असल्याने बाहेरुन येणारे लोकही सगळीकडे पार्किंग करतात. हल्ली रस्त्यांवरही दुतर्फा पार्किंग असल्याने पार्कींग करणे जरा अवघडच. अर्थात अपवाद असतीलच. रेट्स माझ्यामते ४ ते ६ हजार मध्ये असावेत.
१. २०० फुटी रस्ता. >> तो
१. २०० फुटी रस्ता. >> तो प्रत्यक्षात कधी येतो ते बघायला हवे. बाणेर-पाषाण लिंक रोड कितीतरी वर्ष रखडला होता अजुनही पुर्ण झालाय की नाही माहीत नाही. तसेच सध्याचा रस्ता बघितला तर चांदणी चौकापासुन सुरुवातीचा भाग आणी भुगाव गावात रस्ता मोठा करणे अशक्यप्राय वाटते. मुळ चांदणी चौकालाही पुर्ण रिडीझाईनची गरज आहे विशेषतः कोथरुडकडे जाणार्या व येणार्या मार्गासाठी. तसेच अॅम्ब्रोसियाजवळ असणारा अनधिकृत (!!!) टोलबुथ हलण्याचीही काही चिन्हे नाहीत. तिथे प्रत्येक जण आपल्या मनाप्रमाणे नियम लावत असतो. पण भारतात हे मुद्दे बर्याच वेळा गौण ठरतात. अर्थात कोथरुडपासुन जवळ नविन बांधकामासाठी हाच भाग तसा उरला आहे.
त्यातली मार्व्हल रिअलटर्सची एक स्किम अगदी चौकापासून १ किमी अंतरावर आहे. ८ -१० हजार स्वे फुट चे बंगलो साधारण ८ ते १८ करोड रू, ३४०० स्वे फुट फ्लॅट साधारण अडिच करोड रू असा भाव आहे. >> विंडमीलमधले ही सगळे प्लॉट्सही विकले गेले नाहीयेत तिकडेही प्लॉट्स मिळु शकती. त्यांनी २००५ मध्ये ही प्लॉट स्किम सुरु केली तेव्हा ३००० स्क्वे फी प्लॉट ३१ लाखाला होता तेव्हा अर्थात तो भाग काहीच्याकाही वाटला होता.
1) I feel Bhugaon, Pirangut,
1) I feel Bhugaon, Pirangut, & Paud will not be included in PMC. Rather they will form another municipal corporation for this area.
2) a) Xrbia project is being sold on lease basis. If the flat is bought on lease basis then while selling the same you have to pay the transfer charges to the developer & that too as decided by him. In case of free hold flat the transfer charges are to be paid to the society, that too only Rs.25000/- per flat irrespective of the price.
b) 1BHK 230 sq ft carpet (Built up 299 sq ft), 7 storied building, 22 flats on one floor & only two lifts.
c) The rooms are not square / rectangular in shape.
मोकिमी, सपे मध्ये प्रशस्त
मोकिमी, सपे मध्ये प्रशस्त पार्किंग असणारी, प्रवेशद्वारातून चारचाकी गाडी जायला-यायला कोणताही अडथळा नसणारी सदनिका व सोसायटी मिळणे अवघड आहे. तरी पाहायला हरकत नाही.
I feel Bhugaon, Pirangut, &
I feel Bhugaon, Pirangut, & Paud will not be included in PMC >..
बरोबरच आहे तुमची फिलिंग
PMRDA ची स्थापना होते आहे. श्रेय कोणी घ्यायचे ह्यावर मतभेद असल्यामुळे गेले ६ महिने घोंगडे भिजत पडले आहे. एकदा श्रेयनामावली जाहीर झाली की हिंजवडी, मान, बालेवाडी (हायवे च्या पुढची जिथे इकोलॉच आहे तो भाग) फेज ३, रिहे, पिरंगुट ते भुगाव व चांदखेड, म्हाळूजीं हे सर्व PMRDA मध्ये येईल. आज ना उद्या तिथे PMRDA येणार म्हणून ह्या सर्व भागात सध्या नॉन एन ए (फार्म प्लॉटस) ची विक्री जोरात चालू आहे.
दशभुजाच्या समोर जे कुमार चे
दशभुजाच्या समोर जे कुमार चे टॉवर आहेत ते ईतके महाग नाहीत माझ्यामते.....
त्या प्रोजेक्टला काहीतरी २५ रु प्रति मजल्याला राईज आहे बहुतेक. आणि आत्ताचा भाव ८५०० चालु आहे त्याप्रमाणे पण ईतका नाही जाणार हो. १००० sq ft सगळं मिळुन साधारण १ किंवा १.२ करोड पर्यंत जाईल जास्तीत जास्त.
पण या प्रोजेक्ट चे प्रॉबलेम म्हणजे सगळे २ bhk, बिल्डिंगच्या रोड साईडला आहेत. कर्वे रोडच्या वाहतुकिच्या आवाजाचा बर्यापैकी त्रास होईल. दुसरं म्हणजे ती जागा कोणत्या तरी मुस्लिम ट्रस्ट च्या नावावर आहे आणि ती जागा भाडेतत्वावर दिलेली आहे त्यावर कुमार बांधकाम करुन सदनिका विकतो आहे (कसे काय काय माहित). तिसरं म्हणजे प्रोजेक्ट खुप लेट झालेलं आहे २००९ मधे त्यांनी पहिल्या टॉवरचा ताबा २०१४ मधे देणार असे सांगीतले आहे पण ते पुर्ण व्ह्यायची चिन्हं दिसत नाहीत.
अजुन एक म्हणजे हे भाव रॉ फ्लॅटचे आहेत. म्हणजे ते फक्त भिंती बांधुन देणार, फरश्या, प्लॅस्टर, रंगकाम, वायरिंग, प्लंबिग या सगळ्याचे भाव वेगळे. अथवा ते तुमचे तुम्ही करुन घ्यायचे बाहेरुन.
माझ्या माहिती प्रमाणे तरी प्रभात रोड, लॉ कॉलेज रोड, भांडारकर रोड ईथे ८००० वगैरे ला काही मिळत नाही आजकाल. १० ते १३००० चा भाव चालू आहे.
८ ते १० हजार भोसले नगर, मॉडेल कॉलनी मधे चालू आहे.
पुण्यात वा थोडसं बाहेर अशा
पुण्यात वा थोडसं बाहेर अशा कोणत्या जागा आहेत का कि तिथे घराजवळ व्यायमासाठी वगैरे सहज जाऊ शकतो? जिम वगैरे नाही तर पर्वती वगैरे सारखी ठिकाणे, टेकडी, डोंगर जवळ असलेल्या जागा. अर्थात ते डोंगर पवारांनी विकत घेऊन पाडले नाही म्हणजे मिळवले. असे काही असेल तर तिथे काय स्किम्स चालु आहेत ते पहाता येईल.
SKYi ग्रुपचा iris नावाचा
SKYi ग्रुपचा iris नावाचा प्रोजेक्ट आहे बावधनला. कुणाला ठाऊक आहे का?
सागर त्याबद्दल मी ह्याच
सागर त्याबद्दल मी ह्याच पानावर लिहिले आहे इथे. मी जाऊन आलो व विचारात आहे. आज बहुदा पेपर्स पाहायला जाईन.
केदार, काल iris बावधनचा
केदार, काल iris बावधनचा प्रोजेक्ट पाहून आलो. काँपॅक्ट 3BHK आवडल्यास घ्यावा असा विचार होता.
त्या भागात सध्या ती एकच इमारत आहे. आजूबाजूला होतीलही, पण त्यात ही इमारत झाकल्या जाईल असं वाटतयं. दोन फ्लॅटमधली लॉबी फारच अरूंद वाटली.
तिथे रस्ते केंव्हा बांधून होतील तेही सांगणे अवघड आहे. पाण्याची सोय (सध्या) नाहीये. कॉर्पोरेशनच्या हद्दीबाहेर पाच किलोमीटरपर्यंत पाणी घेता येते अशी माहिती साईटवरच्या माणसाने दिली. हे पहिल्यांदाच ऐकले. त्याबद्दल जरा शंकाच आहे.
साँग बर्डचा प्रोजेक्टही काल पाहून आलो.
१०० पक्षी सापडले, त्यातले ३० (की ४०) गाणारे पक्षी म्हणून नाव साँग बर्डस इत्यादी कथा ऐकून झाली. झाडे जोपासणार आहेत म्हणताएत. लवासामधे बायोडायव्हर्सिटीचे काम करणारी आणि इथे काम करणारी कंपनी एकच ! त्यामुळे त्याबाबतीत शंकाच आहे.
पण याकडे दूर्लक्ष करणार असू तर टाऊनशिप म्हणून जागा चांगली आहे.
सध्या तीन बिल्डींगचे प्लान त्यांनी ओपन केलेत. फ्लॅटचे डिटेल्स आज ई मेलने पाठवणार आहेत.
आठ नंबरच्या इमारतीतील फ्लॅटच्या खोल्या मोठ्या आहेत.
केदार, iris पेक्षा साँग बर्ड्स ला जाऊन येणे सोपे वाटले (मुद्दाम टु व्हिलरवर गेलो होतो) सध्या आतपर्यंत बांधलेला रस्ता नाही, पण तो पुढे होईलच.
दोन आठवड्यात निर्णय कळवा म्हणालेत. भाव ३९००.
अरे मी साँग बर्डस बद्दल
अरे मी साँग बर्डस बद्दल लिहिले आहे. इरिस बद्दल नाही. त्यांचे अनेक सर्टिफिकेशन्स आणि क्लिअरंस मी मला पाहायला हवेत, त्या शिवाय बुक करणार नाही असे म्हणालो आहे. त्यांनी फोन करून सांगीतले की ते दाखवू शकतील.
आणि ते जे १०० + फ्लॅट्स बुक झाले त्वरा करा, वगैरेवर विश्वास कमी ठेव कारण ज्यांची जागा आहे त्यांचेही काही फ्लॅट असणारच. अर्थात काही जेन्युईन झाले आहेत. मी ती वही पाहिली. प्रोजेक्ट म्हणून मला आवडला.
ओकीज !! मी इरिसबद्दलच विचारलं
ओकीज !!
मी इरिसबद्दलच विचारलं होतं. असो.
आम्हीही बूकिंगच्या विचारात आहोत. काही नवीन माहिती कळाल्यास विपू करा. मिही काही कळाले तर कळवेन.
इरिस कडे गेलो होतो, सहा
इरिस कडे गेलो होतो, सहा महिन्यांपूर्वी. तिथे जायला नीट रस्ता नाही.
परवा अंशूल इव्हा नावाचा प्रोजेक्ट आहे त्याबद्दल ऑर्किड फेअर मध्ये माहिती मिळाली. आज उद्यात जाईल तिकडे. हायवेवरूनच एन्ट्री / एक्झिट आहे. (थोडक्यात आदित्य गार्डन सिटी सारखे) २ BHK 54 अन १०० चा डिस्काउंट असा ५२ ला पडेल. अपफ्रंट पैसे जास्त द्यायची तयारी (अर्थात लिगल) असल्यास तो ५० ला ही मिळेल असे वाटते.
च्यायला ५० जरा अति होतात. २ BHK साठी. त्यापेक्षा किरायाच्या घरात राहून ३५ मध्ये BMW घ्या ! नाही तरी जीवन नश्वर आहे.
Pages