Submitted by नानबा on 16 May, 2010 - 10:33
ह्या धाग्याच्या मूळ उद्देशात मी गृप बूकिंगसाठी लोक जमतात का हे पहायचं असं लिहिलं होतं..
पण काही प्रतिसादांमधे असे गृप ऑल्रेडी आहेत आणि त्यांना अनुभवही आहे असे प्रतिसाद आले - त्यांचं म्हणणं पटल्यानं आणि चर्चेचं मूळ स्वरूप हळूहळू बदलून "पुण्यातल्या चालू प्रोजेक्ट्सची/लोकेशन्सची माहिती/घर विकत घेताना लक्षात घ्यायच्या गोष्टी" - असं झाल्यानं माझं हे मुळच पोस्ट मी बदलतेय.
--- पुण्यात घर विकत घेऊ इच्छिणार्यांना शक्य ती माहिती मिळावी - म्हणून हा बाफ!
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
पुण्यातील 'नंदन स्पेक्ट्रा'
पुण्यातील 'नंदन स्पेक्ट्रा' या बालेवाडीतील प्रोजेक्ट बद्दल कोणाला काही माहिती आहे का?
तुमच्यापैकी कोणी किंवा माहितीतल्या कोणी तिथे बुकिंग केले आहे का?
बिल्डर कसा आहे?
नंदन चा बिल्डर चांगला असावा.
नंदन चा बिल्डर चांगला असावा. बाणेरलाच नंदन प्रॉस्पेरा म्हणुन कॉम्प्लेक्स आहे तो चांगला बांधला आहे.
त्यांचे बरेच हाय एंड प्रोजेक्ट्स असतात. (औंध, वाकड भागात त्यांचे प्रोजेक्ट्स सुरु आहेत.)
मी बालेवाडीत राहतो. इथे बरेच चांगले प्रोजेक्ट्स सुरु आहेत. रेट्स साधारण ५००० च्या आसपास आहेत.
धन्यवाद mansmi18. तुम्हाला
धन्यवाद mansmi18.
तुम्हाला संपर्कातून इ-मेल केली आहे.
शिवणे एन.दि. ए - पुणे
शिवणे एन.दि. ए - पुणे परिसरातील १ बि. एच . के .रूम च्या शोधात आहे , नवीन आणि अधिकृत जागा असल्यास प्रथम पसंती असेल साधरण तिथला रेट काय चालू आहे या बद्द्ल कोणी मार्गदर्शन करू शकाल का ? तसेच त्या ठिकाणी रूम माहित असेल तर तेही सुचवावे .
शिवणे एन.दि. ए - पुणे
शिवणे एन.दि. ए - पुणे परिसरातील १ बि. एच . के .रूम च्या शोधात आहे >>> We book 2 BHK flat in this area around 1 year before that time rate was around 2000 but we booked through one broker and gave him around 50,000. He negotiated with builder and gave rate of 1700 to us. So it was around 12 lakh for one flat. After that , that area comes under Pune corporation and they susupended registries. We did an agreement on the flat and now waiting for registry. Now we are here in US but probably when we will go to India will do regostry. If you are interested i can give details about the builder.
I am sorry i am the reader in maayboli but difficult to write in marathi.
धन्यवाद …. माहिती
धन्यवाद …. माहिती पुरविल्याबद्दल , बिल्डर ची माहिती ( नाव व दूरध्वनी क्रमांक ) जर तुम्ही पुरवलीत तर मला नक्कीच उपयुक्त ठरेल .
आम्हाला पूर्णपणे गुंतवणूक
आम्हाला पूर्णपणे गुंतवणूक म्हणून, आपलं एक नावाचं घर असावं म्हणून १ बीएचके घ्यायचं आहे. ते रेंटवर देऊन आम्ही हवं तिथे - जिथे घर घेणं परवडत नाहीये तिथे - भाड्याने राहू असा विचार केला आहे.
बजेट मॅक्स - २५-३०.
वाकड / हिंजेवडी ह्या भागात रेंटवर नक्की जाईल असं वाटतयं, अजून काही एरीयाज आहेत का ? परवडेल आणि थोडफार तरी रेंट येईल असे ?
समजा ३-४ वर्षांनी विकायची वेळ आली तर निदान लॉस होऊ नये अशी अपेक्षा आहे - मार्केट मधे फारचं झोलझाल झाले तर लॉस होईलही म्हणा.
२५ पर्यंत वाकड हिंजवडी मधे
२५ पर्यंत वाकड हिंजवडी मधे चांगली सदनिका मिळणे अवघड आहे*. हिंजवडी मधे परांजपे ब्लू रिज पण ३२ का ३५ चालू आहे. प्राधिकरण मधे वूड्सव्हिले चालू आहे तिथे पहा. बहुतेक २५ ते ३० रेंज मधे आहे. गुंतवणूक म्हणून घेणार असाल तर शक्यतो मोठ्या स्किम मधे घ्यावा असे माझे मत. रिसेल ला किंमत पण व्यवस्थित मिळेल आणि लवकर पण जाईल. शिवाय लोन ला पण जास्त कटकट होत नाही.
*( जर तुम्हि ३० च्या वर जाणारच नसाल तर २५ च्या रेंज मधे पहा कारण नंतरचे खर्च भरपुर असतात.)
हो स्टँप ड्युटी रजिस्ट्रेशन
हो स्टँप ड्युटी रजिस्ट्रेशन होणारच वर खर्च २५ च्या.
प्राधिकरण मधे वूड्सव्हिले
प्राधिकरण मधे वूड्सव्हिले चालू आहे तिथे पहा>>> वुड्सव्हिले प्राधिकरणात येत नाही.
कॉर्पोरेशन येरीयात येतं.
फक्त त्यानी अक्सेस रोड प्राधिकरणाच्या रोडवरुन घेतलाय. आणि त्यांची साइट प्राधिकरण हद्दीपासुन जवळ आहे.
लोकेशन चांगलं आहे पण खुप चांगल्या / गजबजलेल्या / मेन मार्केट येरीया अशा ठिकाणी राहिलेली व्यक्ती हे फार लांब आहे म्हणु शकेल. भविष्याच्या ड्रुष्टीने योग्य आहे.
वूड्सव्हिले>> याबद्दल काही
वूड्सव्हिले>>
याबद्दल काही फीडबॅक आहे का?
माझा २ बी.एच.के. फ्लॅट
माझा २ बी.एच.के. फ्लॅट परांजपेच्या युथिका स्कीम मध्ये (बाणेर हायवे जवळ) आहे. तातडीने भाडयाने द्यायचा आहे. फुल्ली फर्निश्ड. भाडे १८००० + सोसायटी मेन्टेनन्स (सोसायटी अजून झालेली नाही. मात्र जेव्हा होईल आणि मेन्टेनन्स ठरवेल तेव्हा दरमहा द्यावा लागेल). कुणी असल्यास संपर्कः ९९२१३५१९८४ (अनुराधा) किंवा ८८०५१५२९५१ (शरद)
याबद्दल काही फीडबॅक आहे का?>>
याबद्दल काही फीडबॅक आहे का?>> प्राची, माझ्या व्ह्यु ऑफ रेफरन्चे ने सांगतो.
बिल्डर क्वालितीवाइ़ज चांगला आहे. लोकेशन चांगले आहे. भविष्यात अजुन चांगल लोकेशन डेव्हलप होणार.
कनेक्टिव्हीटी चांगली आहे. नाशिक हाय्वे, जुना मुम्बै पुणे हायवेला.
अजुन तरी खुप बस वै सुरु नाहियेत तिकडे पण हळुहळु सुरु होइल.
पुण्यात पिरंगुट भागात घर
पुण्यात पिरंगुट भागात घर घ्यायचा विचार आहे,
कोणत्या चांगल्या schemes आहेत ? बिल्डर ची नावे फोन नंबर मिळतील का?
भाडे १८००० + सोसायटी
भाडे १८००० + सोसायटी मेन्टेनन्स >> बापरे!
इतका जास्त रेट आह. बाणेरमधे?
मी कालच एकानी ४७ लाखाला बावधन मधे १ बेडरूम चं घर घेतल्याचं ऐकलं..
मला चक्कर यायची बाकी आहे...
:सर जो तेरा चकराये, या दिल
:सर जो तेरा चकराये, या दिल डूबा जाये.... :
मी दोन महीन्यापुर्वी "झिग
मी दोन महीन्यापुर्वी "झिग सॉलिस - झीग्रेट फेज-२" (डेक्कन पॅव्हेलिअन हॉटेल जवळ - आंबेगाव) मध्ये शिफ्ट झालो.....
दोन महीन्यातला बिल्डरचा अनुभव फारच चांगला आहे.... एका महीन्यापुर्वी त्याने सगळ्या ओनर्सची मिटींग घेउन फीडबॅक मागितला..... जे काही थोडेफार पॉइंटस होते ते लिहुन घेतले आणि चक्क एका महीन्यात त्यात सुधारणा झाली.... एकूणच आफ्टरसेल्स सर्विस खुप चांगली वाटली
अजुनही त्याच्या एक-दोन फेज होणार आहेत.... आणि सध्याच्या फेजमध्येही काही फ्लॅट (2.5 & 5)शिल्लक आहेत
As a proud owner, I will recommend it to you guys
सध्या रेट साधारण ५०००-५२०० चालू असावा
बाणेर भागात कोणते नवीन मोठे
बाणेर भागात कोणते नवीन मोठे (बरीच घरे असलेले, एखादी इमारत नव्हे) चांगले प्रोजेक्ट्स चालु आहेत याची माहिती कोणी देऊ शकेल काय? रोहन लेहेर-२, युथिका असे २ दिसले. ते कसे आहेत काही कल्पना?
बाणेरमधल्या घरांची चवकशी करताना लोक म्हणताहेत त्यापेक्षा बालेवाडीत घ्या. ते रहायला कसे वाटते?
बाणेर-बालेवाडीत घरं बघताना
बाणेर-बालेवाडीत घरं बघताना हायवेच्या अलीकडे आहेत की पलीकडे ते नक्की बघून घ्या. हायवेच्या अलीकडचा भाग चांगला डेव्हलप झालाय आता. पलीकडचा भाग अजून तितका नाही.
रोहन लेहेर २ रोहन लेहेर १ ला जोडूनच असेल बहुतेक. तिथे आजूबाजूला काहीही झालेले नाही अजून.
युथिका बाणेर रोडपासून थोडेसे आत आहे. तिथले रस्ते चांगले आहेत.
एकुणात बाणेर-बालेवाडीत पॅचेसमध्ये डेव्हलपमेंट आहे. काही भागांत रोजच्या वस्तू आणायला टू-व्हीलरची सुद्धा गरज नाही इतके सगळे जवळ मिळते तर काही पॅचेस अजून डेव्हलप व्हायचे आहेत.
बालेवाडी राहायला चांगले आहे. पण परत प्रोजेक्टचे लोकेशन नक्की कुठे आहे ते कळल्यावरच जास्त माहिती देता येईल.
पुण्याजवळील हिंजवडी येथे
पुण्याजवळील हिंजवडी येथे कोलते-पाटील डेव्हलपर्स चे "लाइफ रिपब्लिक' येथे माझ्या मैत्रिनिला तीन बेडरूम चा फ्लॅट घ्यायचा आहे.या बद्द्ल कोनि जास्तिची माहिती देउ शकेल का?
बावधानमधील welworth
बावधानमधील welworth tinseltown या प्रोजेक्टविषइ कोणाला माहिती आहे का? तिथला काही अनुभव आहे का?
सुनिधी बाणेर - पॅनकार्ड क्लब
सुनिधी
बाणेर - पॅनकार्ड क्लब भाग
अमित सेरेनो
वेलवर्थ पॅरेडाईझ
सुप्रीम एस्टाडो
क्ल्पतरु जेड
बालेवाडी:
जिनी विविआना
४४ प्रिवेट ड्राईव
पार्क एक्सप्रेस
पार्क ग्रॅजर
एक दिवस डेडीकेट करुन या भागात फिरा आणि पहा. (बालेवाडी हे हिंजवडी किंवा सिटीच्या कनेक्टीविटी साठी आणि अगो यानी लिहिल्याप्रमाणे चांगलेच आहे पण स्वतः फिरुन पाहिलेले सगळ्यात उत्तम)
अगो व मनस्मी, खुप
अगो व मनस्मी, खुप धन्यवाद.
शोधुन पहाते.
मी बावधणमधे राहतो. आमच्याकडे
मी बावधणमधे राहतो. आमच्याकडे अजून कार्पोरेशनचे पाणी आलेले नाही. मला इथले पाणी अजिबात आवडत नाही. आमच्याकडे जे फिल्टर आहे ते जड पाणी हलके करते. फक्त प्यायच्यापुरते हे आम्ही करु शकतो. बिल्डींगमधे घर जरी चांगले असले तरी फार शुकशुकाट पसरलेला असतो. तरुण लोक नोकरीला गेलेले असतात आणि आईवडील घरी असतात. शेजारीपाजारी म्हंतले की जे संवाद होत राहतात ते इथे होताना दिसत नाही. सगळी घरे भरली आहेत पण लोकांमधे संवाद नाही हे फार जाणावत राहते.
फार शुकशुकाट पसरलेला असतो.
फार शुकशुकाट पसरलेला असतो. तरुण लोक नोकरीला गेलेले असतात आणि आईवडील घरी असतात. शेजारीपाजारी म्हंतले की जे संवाद होत राहतात ते इथे होताना दिसत नाही. सगळी घरे भरली आहेत पण लोकांमधे संवाद नाही हे फार जाणावत राहते.>>>>>>> बी, हे आता बरेच ठिकाणी आहे. मुलांचा वावर सुरु झाला की मग आवाज सुरु होतात.
देवकी, मुल आहेत सोसायटीमधे पण
देवकी, मुल आहेत सोसायटीमधे पण ती सतत प्ले ग्राऊंड मधे खेळत असतात. तसे त्यांचे खेळण्याचे आवाज घुमत असतात. पण मोठ्यांचीच जास्त पंचाईत आहे. कुणी कुणाशी बोलत म्हणून नाहीच. खूप ऑड वाटत मला ते. आपण स्मित केल की त्याला प्रतिसाद मिळत नाही.
बी, तू हायवेच्या पलिकडे
बी, तू हायवेच्या पलिकडे रहातोस का मराठामंदिर बाजूला?
मराठा मंदिर साईडचं बावधन व्यवस्थित डेवलप झालेलं आहे. फार फार वर्षांपूर्वी पासून
मी पुनावळे ( नेक्स्ट टू वाकड
मी पुनावळे ( नेक्स्ट टू वाकड ) मध्ये घर घ्यायचा विचार करतो आहे . काही अनुभव / माहिती ?
आमची राहती सदनिका, ७८०/-
आमची राहती सदनिका,
७८०/- स्क्वे. फु., दुसरा मजला, दोन बी. एच. के., कर्वे नगर विकुन आम्ही दोन बी एच के च पण जरा बावधन एरिया मध्ये सदनिका बघण्याच्या विचारात आहोत......जिथे मुख्यत्वे लिफ्ट असेल. कृपया मार्गदर्शन करावे.
थोडे अर्जंट आहे...
-प्रसन्न
housing.com ही साईट Map mode
housing.com ही साईट Map mode मध्ये बघा.
Pages