पुण्यात घर घ्यायचय?

Submitted by नानबा on 16 May, 2010 - 10:33

ह्या धाग्याच्या मूळ उद्देशात मी गृप बूकिंगसाठी लोक जमतात का हे पहायचं असं लिहिलं होतं..
पण काही प्रतिसादांमधे असे गृप ऑल्रेडी आहेत आणि त्यांना अनुभवही आहे असे प्रतिसाद आले - त्यांचं म्हणणं पटल्यानं आणि चर्चेचं मूळ स्वरूप हळूहळू बदलून "पुण्यातल्या चालू प्रोजेक्ट्सची/लोकेशन्सची माहिती/घर विकत घेताना लक्षात घ्यायच्या गोष्टी" - असं झाल्यानं माझं हे मुळच पोस्ट मी बदलतेय.
--- पुण्यात घर विकत घेऊ इच्छिणार्‍यांना शक्य ती माहिती मिळावी - म्हणून हा बाफ!

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

www.rosegardens.in
ह्या scheme बद्दल कोणी ऐकलाय का? पुण्यापासून लांब आहे मुंबई नाशिक highway वर, पण invt म्हणून घ्यायचाय आणि २ bhk १९+ लाख माझ्या budget मधे आहे.

Hi,

Following are the details of builder from which I am planning to book a flat.

Scheme name: Shantiban
Builder Add: (not site address)
236,patil plaza,parvati road,near sara baug,pune 411009
Tel:91-20-24446865,24445297 fax:912024443963
email:suranaworld@rediffmail.com
website:www.suranaworld.com

dont have much idea about this builder and also about Pune..could someone please help..is it a good builder? Is the area good? Thanks much!

च्यायला ५० जरा अति होतात. >>> केदार माझ्या बिल्डिंगमधे २ बीएचके (१२५० स्क्वेअर फुट) ७६ लाखाला आहे. मागच्या बुधवारी गणपतीच्या मुहुर्तावर ११व्या मजल्यावरचे चारही फ्लॅटस एकाच माणसाने विकत घेतले. Uhoh

आश्चर्य वाटलं, पण चक्रमपणा जास्त वाटला मला. एवढ्या किंमतीत एक सुंदर बंगला नसता का घेता आला? अर्थात त्यांना इन्वेस्टमेंट म्हणुन घेवुन नंतर विकायचे असतील तर कल्पना नाही. Happy

अर्थात त्यांना इन्वेस्टमेंट म्हणुन घेवुन नंतर विकायचे असतील तर कल्पना नाही>>>>>>>>
माझ्याकडे ३ कोटी असते तर चांगले एफ डी मधे टाकले असते.. ९% ने सुद्धा महिन्याला २,२५,००० व्याज मिळाले असते. काही न करता आरामात टीवी पहात बसलो असतो. Happy

सध्या आपल्या ७५,००,००० वगैरे ऐकुन भुवया उंचावतात हेच दहा वर्षाने .. काय स्वस्त होते हो..आता ५ कोटीच्या खाली काही मिळत नाही. तेव्हा ७५,००,००० ला मिळत होता असे उद्गार येतील Happy

केदार धानोरीत सहारा सिटी आली आहे. विश्रांतवाडी (जेल शेजारुन, कॉमरझोन शेजारुन , गोल्फ क्ल्ब शेजारुन येरवड्याच्या माघच्या बाजुने संगमवाडी )ते शिवाजीनगर रोड झाला आहे. फक्त मधला गोल्फ क्लबच्या तिथे १००-२०० मी बाकी आहे. तसाच धानोरी ते विश्रांत्वाडी पण रोड आहे पण त्याच काम चालु झाल नाहीये. जर हा रोड पुर्ण झाला तर शरद पवार स्कुल ते शिवाजी नगर १२-१३ कीमी असेल. सध्या त्या भागात सहारा सिटीमुळे सगळ चित्रच बदल आहे. पुर्वी विश्रांत्वाडी - धानोरी - लोहगाव रोडवर भाव २५००-३००० होते सध्या ते ४५०० चालु आहेत. कल्याणी नगर विमान नगर याला पर्याय म्हनुन हाच भाग सध्या आहे आणि जागा पण आहेत.
वरती कोणीतरी विचारल होत की घराच्या जवळपास व्यायामाला वगैरे जाण्यासारख्या टेकड्या माझ्या घराच्या अगदी जवळ आहेत धानोरीला. शरद पवार स्कुलच्या दोन्ही बाजुला. पावसाळ्यात त्या येकदम हिरव्या गार असतात पण उन्हाळ्यात रखरखीत असतात. जर पुण्यात असलो तर मी आणि माझा मुलगा शनिवार रविवार सकाळी सकाळी त्या टेकड्यांवरच असतो.
सहारा सिटी जर वेळेत पुर्ण झाली तर ४-५ वर्षात धानोरीत सगळ काही असेल मगरपट्टा सिटी किंवा अमनोरा सारख. पण पाणी असेल की नाही याची खात्री नाही.

मला काही प्रश्न आहेत. जाणकार मंडळी कदाचित प्रकाश पडू शकतील. सध्या इथे जी चर्चा आहे त्यात बरेच लोक इन्वेस्टमेंट म्हणून घर घेऊ पाहता आहेत. मला पण घ्यायची इच्छा आहे पण म्हणावा तसा फायदा दिसत नाहीये. समजा जर का एखाद्याने कर्ज काढून घायचे म्हटले तर खरी किंमत बरीच जास्तच पडते असे दिसते. भाडे मिळेलच ह्याची खात्री नाही. जरी मिळाले तरी वेगवेगळे कर आणि घराची देखभाल हा खर्च वजा जाता तेच पैसे जर क एफडी मध्ये टाकले तर किती फरक पडेल? घर मिळवतानाच आणि ते सांभाळण्याचा त्रास ह्याची किंमत कशी काय पकडायची. जरी भरपूर घरांच्या किमती वाढल्या तरी देखील ते विकून त्यावर कर जावून खरोखर फायदा असा किती होणार. माझ्या महित्तल्या लोकांचे म्हणणे की कर वाचवण्यासाठी दुसरे घर घ्यायचे. आता दुसरीकडे घर घ्यायचे म्हटले तरी स्वस्तात कसे मिळेल? किंवा त्याच किमतीत पाहिजेल त्या ठिकाणी पण मिळणार नाही. म्हणजे पुन्हा घरातच पैसे घालायचे. म्हणजे कितीही घराची किंमत असली तरी देखील ती आपल्याला कधीच मिळणार नाही. नुसतेच म्हणायचे माझी मिळकत इतकी झाली पण खरोखरीच हातात तितके पैसे कधीच नाही. माझ्या माहितीतल्या एकानेच घर विकले आणि एकदम दुरवर स्वस्तात राहायला गेले. पण त्यांच्यावर घर विकण्याची वेळ आली म्हणून. एकंदरीत इन्वेस्टमेंट म्हणून घर घेणे हे आता मला पटत नाहीये. ज्यांच्याकडे बऱ्यापैकी जमीन होती किंवा वाडे ज्यांच्या मालकीचे होते ते विकून तिथे १-२ फ्लाट मिळाले आणि भरपूर पैसे पण मिळाले अशी उदाहरणे पूर्वी होती. पण सध्या जर का नुसताच फलट घेतला तर फायदा वाटतो का? कोणाचा वेगळा अनुभव असेल तर जरूर सांगावा.

पुणे शहर भागात (सदाशिव, शनिवार, नारायण पेठ) १ बीएचके किंवा अगदी १ रूम किचन जागा हवी आहे. बजेट २० ते २५ पर्यंत. १० ते १२ वर्षांपेक्षा जास्त जुनी नको. तिसर्‍या मजल्याच्या वर असेल तर लिफ्ट असावी. पार्किंगची गरज नाही. कोणी सुचवू शकेल का ?

सहारा सिटी जर वेळेत पुर्ण झाली तर ४-५ वर्षात धानोरीत सगळ काही असेल मगरपट्टा सिटी किंवा अमनोरा सारख. पण पाणी असेल की नाही याची खात्री नाही.>>

http://www.thehindu.com/business/companies/article3843576.ece

ही बातमी वाचा

लोक्स तुम्ही लगड मळा, लोकमत ऑफिसच्या मागे, नांदेड सिटीच्या अलिकडे ह्या येरीयात राजयोग सोसायटीच्या जवळपास बघत नाहिये का? सिंहगड रोडला लगतच आहे. ४ ते ५ प्रोजेक्ट सुरु आहेत तिकडे. ते तसं सिटीला अटॅच असलेल उपनगर आहे म्हणु शकतो. (स्वारगेट अंदाजे १०-१२ किमी)
रेट ४ ते ४.५ असेल.. फक्त तिथे त्या फ्लायओव्हरच काम सुरु आहे. ते पुर्ण होइपर्यंत ट्रॅफिकचा त्रास आहे.

सध्या सिंहगड रोडला ट्रॅफिकचा चिक्कार त्रास आहे.
माझ्या सोसायटीतून कॅनॉलवरून मागे सिंहगड कॉलेजला एक पूलाचं काम सुरू आहे असं म्हणतात.. (मला तरी काम सुरू असताना दिसलं नाहिये कधी) पण तो झाल की वडगाव पासून पुढचं पब्लिक त्या रस्त्याने थेट दौलत नगर आणि विठ्ठलवाडीकडे निघू शकेल. कारण सध्या संतोष हॉल हा चोकिंग एरिया आहे. नदिकिनारा सुद्धा रस्त्यासाठी तयार होतोय म्हणे, नक्की माहीती नाही.

संतोश हॉल हा चोकिंग एरिया राहनारच आहे. कारण स्वारगेट, राजाराम पुलाकडून येणारी वाहतूक संतोष हॉलपर्यन्त तरी किमान डायव्हर्ट होत नाही. नदीकिनार्‍याच्या रस्त्याने फक्त सन सिटी वाल्यांचीच होईल... सन्तोष हॉलसमोरची सनसिटीकडे जाणारी गल्ली कसली चिंचोळी आहे !

नदिकिनारा सुद्धा रस्त्यासाठी तयार होतोय म्हणे, नक्की माहीती नाही.
>> हो हा रस्ता झालाय बराचसा.. मझ्या घ्रातून दिसतो मला रोज.. Happy

माझ्याकडे ३ कोटी असते तर चांगले एफ डी मधे टाकले असते.. ९% ने सुद्धा महिन्याला २,२५,००० व्याज मिळाले असते. >>>> ते बँकेत ठेवायचे पैसे नसतात हो Wink रंग माझा वेगळा... Happy

लाइफ रिपब्लिक बद्दल कोणी ऐकलाय का? ३८०० -४२०० रेट सांगत आहेत. मागच्या महिन्यात लंडनला Property Exhibition ला आले होते.

good forum

कोंढव्यात साधारण ३८००-४४००/- रेट सुरु आहे. कुमार आणि सोभा डेवेलपर्सचे प्रोजेक्ट सुरु आहेत, बाकीच्यांबद्दल माहिती नाही.

गेल्या विकांताला कोंधवा एरीया पाहून आलो. पुष्कळशी मॉमेडीयन वस्ती आहे ती.
वाघोली आणि हडपसर ह्या २ एरीयांविषयी ह्या बाफवर जास्त काहीच माहीती दिसली नाही. कुणाचा अनुभव असेल तर पोस्टणार का? निव्वळ इन्वेस्ट्मेंट ह्या बेसिस वर गुंतवणुक करण्याचे डोक्यात आहे.

निव्वळ इन्वेस्ट्मेंट ह्या बेसिस वर गुंतवणुक करण्याचे डोक्यात आहे. >>> मग हिंजवडी काय वाईट आहे? रेटही हडपसर किंवा कोंढवासारखे आहेत. फेज १ च्या अलिकडेच, ब्रिजच्या पुढे ५० लाखाच्या आसपास २ बिएचके मिळेल. ( ४४०० च्या आसपास रेट) पझेशन मात्र एखाद दोन वर्षांनी. किराया देखील २०१४ पर्यंत सहज १३ ते १५००० मिळेल.

वाघोली, धानोरी हे एरिया आता इन्वेस्ट्मेंट साठी योग्य राहिले नाहीत कारण तिथेही ४० ते ४५ लाख लागतात. आणि सोयी काहीच नाही आणि होतील तेंव्हा होतील. दिड एक वर्षापूर्वी वाघोली बरे होते. साधारण ३५ लाख. तिथे खूप स्किम चालू आहेत पण मला त्या गुंतवणूकीसाठी (इतके पैसे देऊन ) योग्य वाटल्या नाहीत. मी देखील हिंजवडीतच गुंतवणूक केली आहे.

हिंजवडी, वाकड, पिंपळे सौदागर, पिंपळे गुरव, वाघोली ह्या भागांमधे Return on Investment चांगलेच असेल.
जमल्यास, आंबेगाव नर्‍हे पण बघून या. दिर्घकालीन गुंतवणूकी साठी योग्य.

बजेट जास्त असल्यास प्रभात रोड, लॉ कॉलेज रोड, या विभागात गुंतवणूक करता येईल. ईमारत सुरु झाल्या झाल्या सदनिका घेऊन ईमारत पुर्ण झाल्यावर विकणे इष्ट. २ ते ३ हजार प्रति चौ. फुटाने भाव वाढलेले असतात. दोन ते तीन वर्षात २ बीएचके वर कमीत कमी २० ते २५ लाखाचा फायदा!!!!!

माझ्या मते....२-३ वर्षात २० लाखाचा फायदा ही फसवी गोष्ट आहे. मी फ्लॅट बावधनला फ्लॅट बुक केला तेव्हा भाव होता ३८०० रु. ताबा मिळायला लागली दोन वर्षे. ८ लाखाचे डाउन पेमेंट सुरुवातीला (२ वर्षाचे व्याज १०% प्रमाणे झाले २ लाख) लोनचा व्याजाचा सुरुवातीचा अ‍ॅव्हरेज हप्ता दरमहा १५ह. म्हणजे २ वर्षाचे झाले साडेतीन लाख. (ताबा मिळेपर्यंत हे खर्च इन्कम टॅक्सला दाखवताही नाही येत. ) रेडी पझेशनची किंमत वाढली ६ लाख. मग फायदा जास्त नाही झाला. आणि स्कीमच्या सुरुवातीला फ्लॅट घेताना रिस्क पण जास्त असते. रेडी पसेशन म्हणजे रिस्क कमी. फायदा म्हणायचा तर फ्लॅट चांगल्या लोकेशनचा मिळतो हा मात्र आहे. रेडी पसेशनला कोपर्‍यातले, उरलेले सुरलेले फ्लॅट्स घ्यावे लागतात.

सुमेधाव्ही,

प्रभात रोड ला २००९ मधे १० हजार आणि मोक्याच्या ठिकाणी १३ हजार चा भाव चालू होता. आज ज्या इमारती पुर्ण / चालू आहेत, त्यांचा भाव १५ ते १६ हजाराच्या दरम्यान आहे. जर १२०० चौ. फुटाची सदनिका असेल तर ३ हजार प्रति चौ फुटाचा राईज मिळाला म्हणजे ३६ लाख झाले. बाकी सगळे खर्च आणि कटकटी चे पैसे वजा केले तरी २५ ते ३० लाख राहतात. पण त्या साठी एक ते दिड करोड चे बजेट पाहिजे.

तसेच कुमारची दशभुजा समोर जी इमारत चालू आहे त्याचा भाव २००९ मधे ४५०० प्रती चौ. फूट होता. आता तिथे ६५०० का ७००० चा भाव चालू आहे. म्हणजे ज्यांची साधारण १८०० चौ फूटाची सदनिका असेल त्यांना ३६ लाख चा फायदा आत्ताच झाला. अजून इमारत पुर्ण पण नाही झाली.

हे सगळे आकडे कमीत कमी आहेत. आणि इमारतीचे बांधकाम चालू झाल्यावर घेतला आणि इमारत पुर्ण झाल्यावर विकला असे समजून लिहिले आहे. जर थांबून, वाट बघून विकायचा असेल तर अजुन फायदा यायची शक्यता जास्त.

अंतरंगी, मी लिहीलेला हिशोब माझ्या फ्लॅटचा आहे जो मी आत्ता बावधनला घेतला आहे. अजून ताबा मिळाला नाहीये. मी देखील आधी तुमच्याच मताची होते परंतु अनुभवाने जे जाणवले ते लिहीले. प्रभात रोड वगैरे एरिया काय किंवा बावधन काय्..गुंतवणुकीची किं आणि मिळणारा फायदा ह्यांचे गुणोत्तर फार बदलणार नाही. तसेच २००९ नंतर भाव जास्त वाढले होते तुलनेने ह्या वर्षी कमी भाव वाढलेत. त्यामुळेही फरक आहेच.

कालच्या लोकसत्तामध्ये एक रिसर्च रिपोर्ट आलेला.
त्यात लिहिल होतं की ५ वर्षात हिंजवडीच्या आसपासचे भाव डबल होतील. Uhoh

झकासराव, त्यांनी असं गृहित धरलय की IT क्षेत्रात भरपूर गुंतवणुक होईल आणि नोकर्‍यांची संख्या वाढेल. त्यामुळे जास्तीत जास्त लोक या भागात राहायला येतील. IT मध्ये पगार किती काळा पर्यंत गलेलठ्ठ राहतो ते पाहायला हवे. Happy

अतरंगी,

तुम्ही दिलेले "सनी डे" सीनॅरियोज आहेत. कुठलेही मार्केट कधिही लिनीयरली वर जात नाही वा खाली येत नाही.
रीयल इस्टेट मधील गुंतवणुक कधिही टाईम करता येत नाही आणि करुही नये (२-३ वर्षासाठी). त्यासाठी किमान ८ ते १० वर्षे होराईझन हवे. जर कोणी १ ते १.५० कोटी गुंतवणुक करणार असतील (२-३ वर्षासाठी) तर रीअल इस्टेट पेक्षा एफ डी मधे ३ वर्षात किमान २०% नफा मिळेल (गॅरंटीड). इमॅजिन करा तुम्ही सांगितलेली प्रोसेस कोणी २००७ मधे केली असती तर त्याची काय अवस्था झाली असती.

चांगल्या मार्केट मधे तुमचे म्हणण रास्त आहे.

खरंतर गुंतवणुकिच्या दृष्टीकोनातून पुण्याचे सर्वच भाग कमी अधिक फरकाने फायद्याचे आहेत.

Pages