१ कन्डेन्सड मिल्कचा कॅन(साधारण ८ oz)
2 कप मिल्क पावडर (कार्नेशन ब्रॅन्डची नॉन फॅट ड्राय मिल्क)
अनसॉल्डेड बटर- १ स्टिक,
चवीप्रमाणे पिठीसाखर.
शोभेकरता बदाम, पिस्ता,केशर इ.
मायक्रोवेव्ह मध्ये चालणार्या खोलगट बोलमध्ये साखर, ड्रायफ्रूट्स सोडून सर्व जिन्नस एकत्र करुन घ्यावेत.३ मिनिटांकरता मायक्रोवेव्ह करुन घ्यावेत. बाहेर काढून एकदा नीट ढवळून घ्यावेत. परत मायक्रोवेव्हला टाकून दोन मिनिटं गरम करावं. परत एकदा बाहेर काढून ढवळून घेऊन पुन्हा मायक्रोवेव्हला १ मि. गरम करावे.
बाहेर काढून केशर, बदाम ,पिस्ते इ. ड्रायफ्रूटस घालवीत. आणि चांगलं घोटून चवीप्रमाणे पिठीसाखर घालावी व तूप लावलेल्या प्लेटमध्ये पसरुन गार झाल्यावर वड्या पाडाव्यात. वरुन हवे असतील त्याप्रमाणे बदाम, केशर, पिस्ते पसरावेत.
ह्याचेच पेढे करण्याकरता: वरील प्रमाणेच घोटून घेतल्यावर थोडं गार होईपर्यंत थांबून पेढे वळावेत.
इथे ८ औंसाचा कन्डेन्स्ड मिल्कचा/मिल्कमेडचा कॅन मिळत नाही. जो मिळतो तो १४ औंसाचा आहे. तेव्हा तो सगळा वापरला तरी चालेल (पान क्र. २ वर ह्याबद्दल लिहिलेलं आहे)
मूळ रेसिपीत जरी पिठीसाखर घाला असं म्हटलं असलं तरी साखर घालावी लागत नाही.
किती त्या मलई बर्फीचे
किती त्या मलई बर्फीचे फॅन्स
>>> कंबख्त, तूने खायी ही नहीं ... ( असं तर नाहीये ना तुझं ? )
हो तसंच आहे अगो मी केलेलीही
हो तसंच आहे अगो
मी केलेलीही नाहीये कधी आणि खाल्लीही नाहीये.
आडो, सगळे जिन्नस तिथे मिळत
आडो, सगळे जिन्नस तिथे मिळत असतील तर करुन बघ आणि सांग.
जियो मंजू काल मंजूने दिलेले
जियो मंजू
काल मंजूने दिलेले प्रमाण वापरून मलई बर्फी केली. मऽऽऽस्त झाली आहे.
केशर घातल्याने छान केशरी रंग आणि स्वाद आला आहे बर्फीला.
काय सुरेख दिसतेय बर्फी तों
काय सुरेख दिसतेय बर्फी तों पा सु!!
या रविवारी मी ही बर्फी केली
या रविवारी मी ही बर्फी केली मंजुडीच्या प्रमाणाने . चवीला छान झाली पण थोडी चिकट झाली. मी गॅसवर केली होती. मिश्रण बहुतेक जास्त वेळ ठेवले गेले माझ्याकडुन. पुढच्या वेळेस कमी वेळ ठेवुन बघेन. पण मायक्रोशिवाय करताना बाकी कोणाकडे अजुन काही वेगळ्या टिप्स आहेत का ? तसेच मी कन्डेन्सड मिल्कचा कॅन थोडा वापरुन फ्रीजमधे ठेवलाय तर तो अजुन किती दिवस टिकेल? म्हणजे एकदा उघडल्यावर साधारण किती दिवस टिकतो?
लवकर संपवलेला बरा आस.
लवकर संपवलेला बरा आस.
प्राची काय मस्त दिसती आहे
प्राची काय मस्त दिसती आहे बर्फी. !!!
स्लर्प स्लर्प.. काय मस्त कलर
स्लर्प स्लर्प.. काय मस्त कलर आहे प्राची.
मी काल केली हि
मी काल केली हि बर्फी...लग्नच्या वाढदिवसानिमित्त..नवरा एकदम खुष... धन्यवाद सायो..
आस, कंडेन्स्ड मिल्क टीन मधे
आस,
कंडेन्स्ड मिल्क टीन मधे ठेऊ नकोस. स्वच्छ कोरड्या काचेच्या बाटलीत काढुन फ्रिज मधे ठेवल्यास १-२ आठवडे आरामात वापरता येते. उघडलेल्या टीन मधे ठेवल्यास, टीन ला बाहेरची हवा लागल्यामुळे टीन रस्ट होन्याची प्रक्रिया सुरु होते आणि मग कंडेस्ड मिल्क लगेच खराब होते.
सायो, बाकी कुठे रिस्पॉन्स
सायो, बाकी कुठे रिस्पॉन्स देशील याची गॅरंटी नाही म्हणून हाच बीबी वर काढते.
मलई बर्फी करायला साहित्य आणलंय, त्यापूर्वी काही शंका :
१) मी स्वीटन्ड कन्डेन्स्ड मिल्क आणलंय म्हणजे पिठीसाखर घालायला नको नां?
२) २ कप म्हणजे साधारण क्वांटिटी किती हवी काही अंदाज?
३) मायक्रोवेव्हचं तापमान किती हवं असं काही आहे कां?
१. अजिबात नको साखर. २.
१. अजिबात नको साखर.
२. मेजरींग कपने दोन कप मोजून घे.
३. मावेचं टेंप खाली, वर न करता हायस्ट टेंप. ला टाक.
ओके थँक्स
ओके थँक्स
शेवटी एकदाची झाली करून
शेवटी एकदाची झाली करून
आज बनवली फायनली फेमस मलई
आज बनवली फायनली फेमस मलई बर्फी.
मी नेस्लेचं स्वीटन्ड कन्डेन्स्ड मिल्क वापरलं त्यामुळे पिठीसाखर वापरावी लागली नाही. नॉन फॅट ड्राय मिल्क पावडर ऐवजी फुल फॅट वापरली. इथे दिसली नाही मला नॉन फॅट.
बटर एक पूर्ण स्टीक (माझ्याकडे १०० ग्रॅमची एक स्टीक होती) वापरण्यापेक्षा कमी वापरलं तर चालेल असं वाटतंय. माझ्या मायक्रोवेव्हला पॉवर लेव्हल १० सिलेक्ट केली तर १४०० वॅटला सुरु होतो. मी ८ वर (८०%) पहिली ३ मिनीटं चालवलं ते सगळं मिश्रण बोलच्या बाहेर ओघळलं होतं. नंतरची २ मिनीटं पॉवर लेव्हल ६ व शेवटचं १ मिनीट पॉवर लेव्हल ४ वर चालवलं. बाकी मिश्रण व्यवस्थित होतं पण खूप बटर दिसत होतं. वड्या थोड्या मऊ झाल्यात पण चवीला छान झाल्या.
हा फोटो
मृण्मयीने साहित्यासकट फोटो टाकले त्यामुळे कळायला खूप सोपं गेलं. त्याकरिता मृ तुला स्पेशल थँक्स. सायो तुलाही अनेक थँक्स. परत नक्कीच बनवून बघेन.
आडो, मस्त दिसतायत. फुल फॅट
आडो, मस्त दिसतायत. फुल फॅट मिल्क पावडर होती त्यामुळेही तुपकट झाली असं असू शकेल.
पुढच्या वेळी बटर कमी घाल.
मी आज परत केली बर्फी.
मी आज परत केली बर्फी. ह्यावेळी संत्र्याची साल छोट्या किसणीवर किसून घातली. साधारण (अर्धा टिस्पून).
चवीला मस्त झालीय एकदम.
प्राचीच्या बर्फीचा फोटो दिसत
प्राचीच्या बर्फीचा फोटो दिसत नाहीये..
प्राची,
परत टाक.
एकदाचा मुहूर्त लागला धन्स
एकदाचा मुहूर्त लागला
धन्स सायो
छान दिसतेय बामा.
छान दिसतेय बामा.
वा
वा
बामा, मस्त दिस्तेय बर्फी!
बामा, मस्त दिस्तेय बर्फी!
मस्तं फोटो आडो, बाईमाणुस .
मस्तं फोटो आडो, बाईमाणुस :).
दीपांजली, फोटो टाकला आहे.
दीपांजली, फोटो टाकला आहे.
आता संक्रांतीनिमित्त तीळमलई
आता संक्रांतीनिमित्त तीळमलई बर्फीचे व्हेरीएशन शोधून काढा कोणीतरी
आज केली मलई बर्फी शेवटी!
आज केली मलई बर्फी शेवटी! मस्त झालीये. मी दोन औंस तूप, १६ औंस नॉनफेट मिल्क पावडर, १४ औंस कंडेंस्ड मिल्क घेतले व ४ टेबलस्पून दूध शिंपडले. आधी सगळं मिक्स करुन घेतले, २ मिनिटे फुल पावर वर गरम केले, काढून ढ्वळले - असे एकूण तीनदा केले (६ मिनिटे). अगदी शेवटी ढ्वळून घेतल्यावर केशर-ईलायची सिरप घातले. साखर अजिबात लागत नाही. आत्ता ताटलीत थंड करत ठेवले आहे - मस्त आळले आहे. वड्या नक्की पडतील. फोटो नाही काढू शकले - माझा केमेरा चालत नाही:( सायो, धन्यवाद! माझ्याकडे आता ह्या वड्या वरचेवर होतील.
अमी
छानच झाली ही बर्फी सायो
छानच झाली ही बर्फी सायो धन्यवाद... आज संक्रांतीच्या हळदीकुंकुसाठी केलीये
काही लोकांची बर्फी ग्रॅन्युलर
काही लोकांची बर्फी ग्रॅन्युलर (कलाकंद सारखी) (माझीही तशीच झाली होती) तर काही जणांची एकदम स्मूथ दिसते .. असं का बरं होत असेल?
मिल्क पावडरच्या texture नुसार
मिल्क पावडरच्या texture नुसार होतय गं ते सशल.
केशर इलायची सिरपची आयडीया चांगली आहे. याच नव्हे इतर मिठाईमध्ये पण वापरायला.
Pages