मलई बर्फी

Submitted by सायो on 15 March, 2009 - 13:07
malai burfi
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

१ कन्डेन्सड मिल्कचा कॅन(साधारण ८ oz)
2 कप मिल्क पावडर (कार्नेशन ब्रॅन्डची नॉन फॅट ड्राय मिल्क)
अनसॉल्डेड बटर- १ स्टिक,
चवीप्रमाणे पिठीसाखर.
शोभेकरता बदाम, पिस्ता,केशर इ.

क्रमवार पाककृती: 

मायक्रोवेव्ह मध्ये चालणार्‍या खोलगट बोलमध्ये साखर, ड्रायफ्रूट्स सोडून सर्व जिन्नस एकत्र करुन घ्यावेत.३ मिनिटांकरता मायक्रोवेव्ह करुन घ्यावेत. बाहेर काढून एकदा नीट ढवळून घ्यावेत. परत मायक्रोवेव्हला टाकून दोन मिनिटं गरम करावं. परत एकदा बाहेर काढून ढवळून घेऊन पुन्हा मायक्रोवेव्हला १ मि. गरम करावे.
बाहेर काढून केशर, बदाम ,पिस्ते इ. ड्रायफ्रूटस घालवीत. आणि चांगलं घोटून चवीप्रमाणे पिठीसाखर घालावी व तूप लावलेल्या प्लेटमध्ये पसरुन गार झाल्यावर वड्या पाडाव्यात. वरुन हवे असतील त्याप्रमाणे बदाम, केशर, पिस्ते पसरावेत.
ह्याचेच पेढे करण्याकरता: वरील प्रमाणेच घोटून घेतल्यावर थोडं गार होईपर्यंत थांबून पेढे वळावेत.

वाढणी/प्रमाण: 
साधारण १२,१३ वड्या.
अधिक टिपा: 

इथे ८ औंसाचा कन्डेन्स्ड मिल्कचा/मिल्कमेडचा कॅन मिळत नाही. जो मिळतो तो १४ औंसाचा आहे. तेव्हा तो सगळा वापरला तरी चालेल (पान क्र. २ वर ह्याबद्दल लिहिलेलं आहे)
मूळ रेसिपीत जरी पिठीसाखर घाला असं म्हटलं असलं तरी साखर घालावी लागत नाही.

माहितीचा स्रोत: 
मैत्रिण
पाककृती प्रकार: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मी १ जान पासुन पावर योगा सुरू केलेय.. शिवाय सोबत रुजुता दिवेकरच्या पुस्तकातले सल्लेही पाळतेय... Proud

म्हणुन अगदी मोकळ्या मनाने, जराही गिल्टी फिल करुन न घेता मी काल बर्फीचा एक तुकडा खाल्ला बाबा........

अजुन १०-१२ तुकडे खायचा मोह होत होता पण काय करणार?? लेकीच्या शाळेतुन या बर्फीची जोरदार मागणी आली होती. गेल्या वेळी चिकट टॉफी झालेली तरी तिथल्या पोरींना आवडलेली.......

नशिबाने यावेळी ब-यापैकी झाली ......
(रच्याकने एवढे खाऊन वर मग पॉवर योगा करुन उपयोग तरी काय???? Proud )

यंदा अंजीर फ्लेवरने केली बर्फी. अंजीर भिजत घातले, त्याची दुधात पेस्ट केली आणि सुरुवातीला सगळ्या मिश्रणात कालवली. मस्त चव आलीये. बर्फी खाल्ल्यावर लगेच अंजीराची चव कळत नाही पण हळुहळु स्वाद उतरत जातोय. थोडक्यात वर दिलेल्या प्रमाणास चार अंजीर जरा कमी पडतात तेव्हा पुढल्या वेळी सहा-सात घालेन Proud

४०० ग्रॅम स्किम कंन्डेन्स मिल्क ला किति ग्रॅम मिल्क पावडर घेऊ? स्किम असेल तर साखर घालावी लागेल का?

लागला एकदाचा मुहुर्त बर्फीला. परवा केली होती. अप्रतिम झाली. माझे २ शब्द Happy

३ मिनिटांकरता मायक्रोवेव्ह करुन घ्यावेत. बाहेर काढून एकदा नीट ढवळून घ्यावेत. परत मायक्रोवेव्हला टाकून दोन मिनिटं गरम करावं. परत एकदा बाहेर काढून ढवळून घेऊन पुन्हा मायक्रोवेव्हला १ मि. गरम करावे. >>> मला इथे जरा कंन्फुजन झाले. अ‍ॅक्चुली मी टोटल ३ मिनीट ठेवले मावे मधे. दर १ मिनीटाने बाहेर काढुन नीट मिसळुन घेतले.

पुण्यातील पब्लीकसाठी :
१] मी मिल्कमेडचा डबा जवळपास पुर्ण ( २ चमचे मिल्कमेड काढुन घेतले ) वापरला [ मला वाटते त्यामुळे थोडासा चिकटापणा जाणावला. पुढच्यावेळि अजुन २ चमचे कमी घालेल ]
२] मिल्क पावडर मी "नॅशनल टी डेपो" (मंडई जवळ ) मधुन आणली.
३] चितळेंकडे मिळाते तसेच लोणी माझ्या घराजवळील एका दुकानात मिळाते ते वापरले.

सायोची ही वर्ल्डफ्येमस बर्फी घरी देखिल फार फ्येमस आहे. ऐनवेळी आलेल्यांसाठी किंवा ठरवून आलेल्यांसमोरही, 'अगंबाई गोड करायचं राहूनच गेलं, आता अगदी १५ मिनिटं द्या' असं म्हणत, अगदी त्यांच्यासमोर खरंच १५ मिनिटांत करता येते. Proud मग तेवढ्या वेळात बहुतेक केळीचं शिकरण (विथ ५ वेलदोडे) या पदार्थाच्या तयारीत असणारे ते पा.रा. इंप्रेस होतात. तर अशी मज्जा! Proud एरवी देखिल गोडाची, म्हणजे करण्या, वागण्या सर्व बाबतीत बोंबच असल्यामुळे १५ मिनिटांतला हा जादूचा गोड पदार्थ वारंवार होतो. पण काही मायबोलीकरांनी (तेही पार्लेबाफावरले असावे, काय हे दुर्दव पार्ल्याचं!) बर्फी बिघडवली म्हणे. मग मायक्रोवेवओव्हनापासून, गाय बरी नसेलपर्यंत सगळ्यावर दोषारोपण झालं. पण आपला झेंडा इथे सॉलिडच गाडला गेला असल्यामुळे अगदी पायरीपायरीने पाककृती टाकण्याचा अट्टहास आहे. तर हे घ्या...

तयारी. (चांदीवर्ख उगाच दिखाऊपणाला. नसला तरी काऽही बिघडत नाही.)

malaibarfikruti-1.jpgmalaibarfikruti-2.jpgmalaibarfikruti-3.jpg

अगदी एक मिनिटात बाहेर काढल्यावर बरंच चिकट, पण एकेका मिनिटानंतर बाहेर काढून, नीट ढवळून पुन्हा मिनिटभर मायक्रोवेव्ह केल्यावर साधारण ३-४ मिनिटांनंतर असं भगराळ रूप येतं.

malaibarfikruti-4.jpgmalaibarfikruti-5.jpg

मग गोळा ताटात घ्या.

malaibarfikruti-6.jpg

थापा. सजवा.

malaibarfikruti-7.jpg

वड्या पाडा.

malaibarfikruti-8.jpg

अहाहा, काय दिसतंय ते रुपडं.

>>>गाय बरी नसेलपर्यंत सगळ्यावर दोषारोपण झालं.>>> Rofl महान आहात. असं कुणाचं डोकं चाललं ?

मृ, Rofl मस्त! मस्त! मस्त दिसतीये!
आता करावीच म्हणते. तरी बिघडली तर काय दोषारोपण करावे ते ठरवून ठेवावे झालं Happy

गाय बरी नसेल Rofl

पण स्टेप बाय स्टेप कृती मस्तच वाटतेय. आता काहीतरी खोटच काढायची म्हटलं तर त्या डब्यांची तोंडं कॅमेर्‍याच्या दिशेला चालली असती. Proud

दिनेशदा,
मी आपल्या रेसिपीज नेहेमीच वाचत असते. पुष्कळदा आमच्या घरच्याच पाकक्रुती आहेत असे वाटते.
मी भारतात असताना सामंतांकडूनच लोणी आणत होते दादर टी टी हून. सामंतांचे दुकान अजूनही त्याच ठिकाणी आहे का?

दिपा ७३ याच धाग्याची आधीची पाने वाचा.. उत्तर सापडेल ( घरगुती लोणी )
मृण्मयी ___/\___ बये तुला. एव्हडे स्टेप बाय स्टेप फोटु टाकलेस Happy
पिस्ता टाकल्यामुळे छानच दिसतेय जास्त Happy
तु सायोचेच प्रमाण वापरले की काही बदल केला तेही सांग. बर्‍याच लोकांनी कन्डेन्सड मिल्क जास्त आणी साखर कमी वापरले आहे.
आता मी पुन्हा एकदा करणार. मला सांगा वर्ख मला पुण्यात कुठे मिळेल ?

Pages