१ कन्डेन्सड मिल्कचा कॅन(साधारण ८ oz)
2 कप मिल्क पावडर (कार्नेशन ब्रॅन्डची नॉन फॅट ड्राय मिल्क)
अनसॉल्डेड बटर- १ स्टिक,
चवीप्रमाणे पिठीसाखर.
शोभेकरता बदाम, पिस्ता,केशर इ.
मायक्रोवेव्ह मध्ये चालणार्या खोलगट बोलमध्ये साखर, ड्रायफ्रूट्स सोडून सर्व जिन्नस एकत्र करुन घ्यावेत.३ मिनिटांकरता मायक्रोवेव्ह करुन घ्यावेत. बाहेर काढून एकदा नीट ढवळून घ्यावेत. परत मायक्रोवेव्हला टाकून दोन मिनिटं गरम करावं. परत एकदा बाहेर काढून ढवळून घेऊन पुन्हा मायक्रोवेव्हला १ मि. गरम करावे.
बाहेर काढून केशर, बदाम ,पिस्ते इ. ड्रायफ्रूटस घालवीत. आणि चांगलं घोटून चवीप्रमाणे पिठीसाखर घालावी व तूप लावलेल्या प्लेटमध्ये पसरुन गार झाल्यावर वड्या पाडाव्यात. वरुन हवे असतील त्याप्रमाणे बदाम, केशर, पिस्ते पसरावेत.
ह्याचेच पेढे करण्याकरता: वरील प्रमाणेच घोटून घेतल्यावर थोडं गार होईपर्यंत थांबून पेढे वळावेत.
इथे ८ औंसाचा कन्डेन्स्ड मिल्कचा/मिल्कमेडचा कॅन मिळत नाही. जो मिळतो तो १४ औंसाचा आहे. तेव्हा तो सगळा वापरला तरी चालेल (पान क्र. २ वर ह्याबद्दल लिहिलेलं आहे)
मूळ रेसिपीत जरी पिठीसाखर घाला असं म्हटलं असलं तरी साखर घालावी लागत नाही.
वा वा मलई बर्फीला मरण नाही
वा वा मलई बर्फीला मरण नाही
प्राचीने केलेली बर्फी कातील आहे. आडोची दुसर्या फोटोतली बर्फी (ट्रेकिंगला जाऊन आल्यागत) ढेपाळलेली वाटतेय
कीप इट अप म. ब.
सिंडी, तू भारतात असताना तुला
सिंडी, तू भारतात असताना तुला भेटलेल्या माबो मैत्रिणींना तुला निरोप द्यायला सांगितला होता की 'म ब खुशाल आहे. अधून मधून वर येतेय'
सिंडे, हो बर्फी थोडी
सिंडे, हो बर्फी थोडी ढेपाळलेलीच होती. १ दिवस फ्रीजमध्ये ठेवल्यावर मात्र वठणीवर आली.
आली ही बर्फी परत वर
आली ही बर्फी परत वर
मलई बर्फीचं अजून एक व्हेरीएशन
मलई बर्फीचं अजून एक व्हेरीएशन
केली मलई बर्फी शेवटी! मि गॅस
केली मलई बर्फी शेवटी! मि गॅस वर केली, छान झालेलि. ग्रॅन्युलर बर्फी हवि असेल तर वेगळी मिल्क पावडर वापरावि लागेल का? माझी बर्फी smooth झाली होती मि nestle मिल्क पावडर वापरलि होती. कंडेन्स्ड मिल्क टीन मधुन काढुन काचेच्या बाटलीत फ्रिज मधे ठेवले आहे. ते किति दिवस टिकेल?? कि लगेच वापरुन संपवावे? ते अजुन कशात वापरता येइल?
अवंतिका, कन्डेन्स्ड मिल्क
अवंतिका, कन्डेन्स्ड मिल्क फ्रिजमधे ठेवलेत तरी शक्यतो लवकर संपवा. ते वापरून केक, खीर, लाडू इत्यादी पदार्थ करता येतात.
www.nestle.com इथे पहा.
Thanks मंजूडी मगाशि तुला
Thanks मंजूडी
मगाशि तुला thanks म्हनायच राहिल. तु दिलेल प्रमाण वापरुन बनवलि होति बर्फी
(No subject)
(No subject)
म हा न ! कशी रंगवलीयेत ?
म हा न ! कशी रंगवलीयेत ?
ह्या मार्झेपान कँडिज (?)
ह्या मार्झेपान कँडिज (?) आहेत. कृपया कुणी तरी मलई बर्फीला असे आकार आणि रंग देऊन इथे फोटो/कृती डकवावी
वाटलंच , म्हणूनच कळीचा
वाटलंच , म्हणूनच कळीचा प्रश्न विचारला
परवाच एकदा परत केली. मस्तच
परवाच एकदा परत केली. मस्तच झाली. नवर्याच्या ऑफिसमध्ये एकदम हिट झाली.
सिंडी, मला वाटलं म ब आहे.
सिंडी, मला वाटलं म ब आहे. पुढच्या वेळेला भेटलीस शिसान करणार् होते
मस्त दिसतायत, एकदम रियल.
अजुन एक. ह्या वेळी दिनेशदा
अजुन एक.
ह्या वेळी दिनेशदा आणि लाजोची पद्धत वापरली
मस्त झाल्या.
मस्त दिसतेय बर्फी प्रीति.
मस्त दिसतेय बर्फी प्रीति.
सगळ्यांनीच मस्त मस्त फोटुच
सगळ्यांनीच मस्त मस्त फोटुच टाकले आहेत
Gas वर करायची पद्धत कुणी सांगु शकेल का? म्हण्जे आच, वेळ इ.इ.
रच्याकने, पान ६ वरचा मॄ चा स्टेप बाय स्टेप फोटोचा प्रतिसाद माझ्या मते तरी AWard winning आहे ..
वेका, मी नेहमी गॅसवरच करते.
वेका, मी नेहमी गॅसवरच करते. बटर, कंडेंसड मिल्क, मिल्क पावडर असं सगळं भांड्यात एकत्र करून गॅसवर ठेवायचं. मंद आचेवर. साधारण १२-१३ मिनिटात मिश्रण कडेने सुटू लागते आणि गोळा व्हायला लागते. ती स्टेज आली की गॅस बंद करायचा अन मग तूप लावून ठेवलेल्या ट्रे/ ताटात ते पसरवायचं. पेढे करायचे असतील तर गॅसवर थोडं १-२ मिनीटं जास्त वेळ ठेवायचं. मिश्रण कोमट /साधारण हाताला चटके बसणार नाही इतपत गार झालं की पेढे वळायचे. पूर्ण गार झाल्यावर पेढे वळू नये. त्याला चिरा जातात.
आभार्स बिल्वा.. लगेच
आभार्स बिल्वा.. लगेच लिहिल्याबद्द्ल
झेपणेबल वाटतंय ..
आली का परत वरती मलई बर्फी..
आली का परत वरती मलई बर्फी.. आता मात्र करायलाच पाहिजे
ही रेसिपीच एकदंरित अवॉर्ड विनिंग आहे !!
>> रेसिपीच एकदंरित अवॉर्ड
>> रेसिपीच एकदंरित अवॉर्ड विनिंग आहे
अगदी सौ टका.....
भारी फोटो आहे प्रीति!! कोणती
भारी फोटो आहे प्रीति!! कोणती पद्धत वापरलीस ते नाही कळले.
बिल्वा, धन्यवाद! मी आता पुढल्या वेळेला गॅसवरच करेन.
आमची पण मलई बर्फी (आली
आमची पण मलई बर्फी (आली बर्का वर.... )
फक्कड होते.
आणि आता परत परत होईल.
लई भारी रे आर्फ्या
लई भारी रे आर्फ्या
वा वा आर्फी. १०० पैकी १००
वा वा आर्फी. १०० पैकी १०० एकदम
मस्त पाकृ! अगदी मला मलई
मस्त पाकृ! अगदी मला मलई बर्फी / कलाकन्द असे काहीतरी करायची इच्छा झाली होती आणि हा धागा वर आला. आमच्याकडे अजून मावे घेतला नाहिये..पण बिल्वाताईन्नी सान्गितल्याप्रमाणे करून बघीन आधी..तुम्हा दोघीन्चे आभार..
वा, मस्त. आता सिंडी खूष होईल.
वा, मस्त. आता सिंडी खूष होईल.
अरे वा ! आर्फी काकांना जमलीये
अरे वा ! आर्फी काकांना जमलीये बर्फी
आर्फी ची बर्फी लै भारी हा
आर्फी ची बर्फी लै भारी
हा धागा अजरामर आहे
Pages