मलई बर्फी

Submitted by सायो on 15 March, 2009 - 13:07
malai burfi
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

१ कन्डेन्सड मिल्कचा कॅन(साधारण ८ oz)
2 कप मिल्क पावडर (कार्नेशन ब्रॅन्डची नॉन फॅट ड्राय मिल्क)
अनसॉल्डेड बटर- १ स्टिक,
चवीप्रमाणे पिठीसाखर.
शोभेकरता बदाम, पिस्ता,केशर इ.

क्रमवार पाककृती: 

मायक्रोवेव्ह मध्ये चालणार्‍या खोलगट बोलमध्ये साखर, ड्रायफ्रूट्स सोडून सर्व जिन्नस एकत्र करुन घ्यावेत.३ मिनिटांकरता मायक्रोवेव्ह करुन घ्यावेत. बाहेर काढून एकदा नीट ढवळून घ्यावेत. परत मायक्रोवेव्हला टाकून दोन मिनिटं गरम करावं. परत एकदा बाहेर काढून ढवळून घेऊन पुन्हा मायक्रोवेव्हला १ मि. गरम करावे.
बाहेर काढून केशर, बदाम ,पिस्ते इ. ड्रायफ्रूटस घालवीत. आणि चांगलं घोटून चवीप्रमाणे पिठीसाखर घालावी व तूप लावलेल्या प्लेटमध्ये पसरुन गार झाल्यावर वड्या पाडाव्यात. वरुन हवे असतील त्याप्रमाणे बदाम, केशर, पिस्ते पसरावेत.
ह्याचेच पेढे करण्याकरता: वरील प्रमाणेच घोटून घेतल्यावर थोडं गार होईपर्यंत थांबून पेढे वळावेत.

वाढणी/प्रमाण: 
साधारण १२,१३ वड्या.
अधिक टिपा: 

इथे ८ औंसाचा कन्डेन्स्ड मिल्कचा/मिल्कमेडचा कॅन मिळत नाही. जो मिळतो तो १४ औंसाचा आहे. तेव्हा तो सगळा वापरला तरी चालेल (पान क्र. २ वर ह्याबद्दल लिहिलेलं आहे)
मूळ रेसिपीत जरी पिठीसाखर घाला असं म्हटलं असलं तरी साखर घालावी लागत नाही.

माहितीचा स्रोत: 
मैत्रिण
पाककृती प्रकार: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मला फारच कॉम्प्लेक्स यायला लागलाय आता.
मी पण केली होती गेल्या महिन्यात, पण खुप चिवट झाली होती म्हणुन इथे येऊन काही लिहील नाही.
चव खुप छान होती, सर्वानी आवडीने खाल्ली छानच आहे म्हणत Happy पण मी ईथे इतरांच्या म्.ब. चे फोटो बघितलेत न.. काय सुगरणी आहात तुम्ही.
माझी पुर्ण गुळगुळीत झाली होती, काजु कतली सारखी आणि चिवटही. Sad

धन्यवाद Happy हो अगदी मस्त लुसलुशीत झाल्या होत्या. चव तर सुरेख!!
मी_चिऊ, प्रमाण जसं सांगितल आहे ना अगदी तसच घेतलं तर बिघडायला नकोय खरंतर. (मी हे आता बिन्धास्त पणे सांगु शकते Happy
परत एकदा कर Wink

मृ इन्स्पायर्ड चॉकलेट मलई बर्फी Happy

choc burfi 1.jpg

एकदम ब्येष्ट झाली आहे. ह्यात भरपूर आक्रोड आणि थोडं जास्त तूप घातलं की थेट लोणावळ्याच्या मगनलालचं चॉकलेट वॉलनट फज होईल.

आली आली, पुन्हा मलईबर्फी वर आली!

मंजूडे, भरपूर आक्रोड घालण्याची कल्पना आवडली. पीकान्स घालून करून बघेन. Proud

पुन्हा साधारण तोच प्रोब्लेमो. यावेळी मॄ ची चॉकोवाली ट्राय केली..फक्त मुलं संभाळायचं काम आउट्सोर्स केलं होत Proud
मावेच वापरला पण थोड्या कमी का होईना गुठळ्याच आल्या मध्ये मध्ये. पण् चव अप्रतिम...स्लर्प्प्प् इ.इ. संपली चटाचट.

मला वाट्तं माझ्यासारख्या लई भारी शेफ क्याटेगरी लोकांना ढवळ्ण्यासाठीची टिप लागणार Wink किती वेळ, काय कंसिस्टसि इ.इ.

सायो थ्री तुकडॅज फॉर वंडरफुल बर्फी. (विकेंडला वर काढतेय सो ज्याच्या त्यांनी करून खा :P)

वेका, ढवळण्याची टीप नाही पण सगळ्या गुठळ्या मोडायला हव्यात मात्र. तसंच प्रत्येक मावेचं टेंप वेगळं असतं तेव्हा एक दोनदा करुन अंदाज येईलच.

या वेळेस शेवटच्या मिनिटाआधी मिश्रणाचे तीन भाग करून एकात चॉकलेट आणि वनिला इसेन्स टाकला, एकात थोडा कॅनमधला आमरस, आणि एकात नेहेमीप्रमाणे वेलदोडा पूड थोडीशी. आमरसवाली जरा ओलसर झालीये, पण चव अप्रतिम!! आणि सारखी येता जाता खायचा मोह होतो म्हणून 'बाइट साईझ्ड' तुकडे केले. Proud
असे:

barfi3.jpgbarfi.jpg

Pages