
१ कन्डेन्सड मिल्कचा कॅन(साधारण ८ oz)
2 कप मिल्क पावडर (कार्नेशन ब्रॅन्डची नॉन फॅट ड्राय मिल्क)
अनसॉल्डेड बटर- १ स्टिक,
चवीप्रमाणे पिठीसाखर.
शोभेकरता बदाम, पिस्ता,केशर इ.
मायक्रोवेव्ह मध्ये चालणार्या खोलगट बोलमध्ये साखर, ड्रायफ्रूट्स सोडून सर्व जिन्नस एकत्र करुन घ्यावेत.३ मिनिटांकरता मायक्रोवेव्ह करुन घ्यावेत. बाहेर काढून एकदा नीट ढवळून घ्यावेत. परत मायक्रोवेव्हला टाकून दोन मिनिटं गरम करावं. परत एकदा बाहेर काढून ढवळून घेऊन पुन्हा मायक्रोवेव्हला १ मि. गरम करावे.
बाहेर काढून केशर, बदाम ,पिस्ते इ. ड्रायफ्रूटस घालवीत. आणि चांगलं घोटून चवीप्रमाणे पिठीसाखर घालावी व तूप लावलेल्या प्लेटमध्ये पसरुन गार झाल्यावर वड्या पाडाव्यात. वरुन हवे असतील त्याप्रमाणे बदाम, केशर, पिस्ते पसरावेत.
ह्याचेच पेढे करण्याकरता: वरील प्रमाणेच घोटून घेतल्यावर थोडं गार होईपर्यंत थांबून पेढे वळावेत.
इथे ८ औंसाचा कन्डेन्स्ड मिल्कचा/मिल्कमेडचा कॅन मिळत नाही. जो मिळतो तो १४ औंसाचा आहे. तेव्हा तो सगळा वापरला तरी चालेल (पान क्र. २ वर ह्याबद्दल लिहिलेलं आहे)
मूळ रेसिपीत जरी पिठीसाखर घाला असं म्हटलं असलं तरी साखर घालावी लागत नाही.
बालहट्टामुळे मलई बर्फी पुन्हा
बालहट्टामुळे मलई बर्फी पुन्हा एकदा…

प्लेटमधला चूरा हा चूरा नसून बालकलाकाराने केलेली सजावट आहे.
आमच्याकडे पुढच्या आठवड्यात
आमच्याकडे पुढच्या आठवड्यात होणार आहे. मुलीने डिमांड केली आहे.
सायो, खूप काळानंतर पुन्हा
सायो, खूप काळानंतर पुन्हा एकदा केली बर्फी आणि तितकीच चांगली झाली.

यावेळी मुलीने केली आणि मी फक्त देखरेख केली
अरे वा मिलिंदा, मस्त रंग आला
अरे वा मिलिंदा, मस्त रंग आला आहे.
Pages