मलई बर्फी

Submitted by सायो on 15 March, 2009 - 13:07
malai burfi
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

१ कन्डेन्सड मिल्कचा कॅन(साधारण ८ oz)
2 कप मिल्क पावडर (कार्नेशन ब्रॅन्डची नॉन फॅट ड्राय मिल्क)
अनसॉल्डेड बटर- १ स्टिक,
चवीप्रमाणे पिठीसाखर.
शोभेकरता बदाम, पिस्ता,केशर इ.

क्रमवार पाककृती: 

मायक्रोवेव्ह मध्ये चालणार्‍या खोलगट बोलमध्ये साखर, ड्रायफ्रूट्स सोडून सर्व जिन्नस एकत्र करुन घ्यावेत.३ मिनिटांकरता मायक्रोवेव्ह करुन घ्यावेत. बाहेर काढून एकदा नीट ढवळून घ्यावेत. परत मायक्रोवेव्हला टाकून दोन मिनिटं गरम करावं. परत एकदा बाहेर काढून ढवळून घेऊन पुन्हा मायक्रोवेव्हला १ मि. गरम करावे.
बाहेर काढून केशर, बदाम ,पिस्ते इ. ड्रायफ्रूटस घालवीत. आणि चांगलं घोटून चवीप्रमाणे पिठीसाखर घालावी व तूप लावलेल्या प्लेटमध्ये पसरुन गार झाल्यावर वड्या पाडाव्यात. वरुन हवे असतील त्याप्रमाणे बदाम, केशर, पिस्ते पसरावेत.
ह्याचेच पेढे करण्याकरता: वरील प्रमाणेच घोटून घेतल्यावर थोडं गार होईपर्यंत थांबून पेढे वळावेत.

वाढणी/प्रमाण: 
साधारण १२,१३ वड्या.
अधिक टिपा: 

इथे ८ औंसाचा कन्डेन्स्ड मिल्कचा/मिल्कमेडचा कॅन मिळत नाही. जो मिळतो तो १४ औंसाचा आहे. तेव्हा तो सगळा वापरला तरी चालेल (पान क्र. २ वर ह्याबद्दल लिहिलेलं आहे)
मूळ रेसिपीत जरी पिठीसाखर घाला असं म्हटलं असलं तरी साखर घालावी लागत नाही.

माहितीचा स्रोत: 
मैत्रिण
पाककृती प्रकार: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

व्हेरिएशनः

चॉकलेट मलईबर्फी : दीड कप नॉनफॅट मिल्क पावडर, अर्धा कप नेस्ले चॉकलेट पावडर, अर्धा स्टिक बटर, १४ औसांचा कार्नेशन स्वीटन्ड कन्डेन्स्ड मिल्क अख्खा टिन आणि एक लहान चमचा व्हॅनिला इसेन्स. चव नेहमीच्या चॉकलेटासारखी येईल असं वाटलं, पण मलईबर्फी-चॉकलेट अशी चांगली चव आली. पुन्हा एकदा सायो आणि मैत्रीण यांना धन्यवाद!

chocolate-malai-barfee-maayboli.jpg

धन्यवाद!

चवीला लागतेय पण कातिल! 'ब्राउनी' म्हणून उपेक्षीत ठेवणार्‍यांना चव कळल्यावर अर्धीअधिक गायब!

बर ही फ्रिज मध्ये किती दिवस टिकेल हे सांगाल का? (मला माहितेय केली की लगेच गट्ट्म होईल पण तरी विचारतेय)

कुणाला फ्रिज मध्ये ठेवायची गरजच पडली नसेन Wink

हाईला.
मृ काय दिसतेय ती बर्फी.

ही करुन न पाहिलेली मीच उरलेय फक्त. करणार करणार थोडे स्थिरस्थावर झाले की.

मी ही बर्फी करण्याह्चा असफल प्रयत्न केला होता. Happy तेव्हा किचनमधे अगदीच नविन असल्याने काय तरी घोटाळा केला होता. Happy

आता पुन्हा एकदा करून बघेन.....

.

मृण साष्टांग नमस्कार! Happy
काय निगुतीने करत असतेस एकेक! Happy

सायो, मब झिंदाबाद! Happy
(मला जमली नाही म्हणून काय झालं! :P)

सह्ही दिसतेय चॉ म ब. ह्या चॉ ब वर पिस्त्यांऐवजी (नट्स) व्हाईट चॉकलेट किसून घातले सर्व्ह करताना तरी छान दिसेल असं वाटतं.

धन्यवाद!

स्वाती, सगळे घटक एकत्र करून, मायक्रोवेवमधे ३ मिनिटं ठेवले, थालपे की ही बर्फी होते. (बेसनलाडू जमले की साष्टांग नमस्कार स्वीकारावा! Happy )

हा!!! भरपुर गाजत असलेली म.ब. मी पण केली आज!!.. वीकएण्ड ला करणार होते पण धीर धरेना Happy
अप्रतिम!!!! कुणा़कुणाला धन्यवाद देवू?? सायो, तिची मैत्रीण, सिंडरेला, मृण्मयी, रूनी, मंजुडी आणि सगळ्यांनी इथे लिहिलेल्या टिप्स बद्द्ल अनेकानेक धन्यवाद Happy
इतकी वेरिएशन्स आहेत इथे मला तर कुठली करू आणि कुठली नको असे झाले होते.. आज केली नॉर्मल आणि चॉ. म.ब.
नेक्ट टाईम संत्रा म.ब. करणार
malaibarfi1.JPGmalaibarfi2.JPG

आम्ही अजून बेसिक रेसिपिच शिकतोय Happy
पण खास ठरवून केली...घरी ही रेसिपी हीट आहे. (सगळे गोडाचे चाहते असल्यामुळे साधारण माहित होतंच...:) ) .पण माहित नाई काय गोंधळ घातला मी मध्ये मध्ये दूध पावडरीचे सुके तुकडे येताहेत......तरी ढवळायला घोवाला लावलं होतं...
असो..गोड मानून घ्या. पुढच्या वेळी मृ ची चॉको वाली पद्धत करायचा विचार आहे.....खास या रेसिपीसाठी दूध पावडरचा डब्बा आणलाय तेव्हा ही पुन्हा पुन्हा बनेल याची खात्री तर आहेच..

धन्सं अ टन्स सायो आणि समस्त मार्गदर्शक्स.... Happy

खादाडी

वेका, जर मायक्रोवेव्हमध्ये केली असेल तर, जो काहि टाईम सेट केला असेल त्यानंतर भांडं मायक्रोवेव्हच्या बाहेर काढून नीट ढवळून घ्या. मिल्क पावडर चाळणीने चाळून घेणे हाहि एक ऑप्शन आहे.

माधुरी, मस्त दिसतायत बर्फ्या.
वेका, बेटर लक नेक्स्ट टाईम. वरची नीट ढवळायची सूचना वापरुन बघा.

माधुरी, सुंदर आलाय फोटो! लुसस्लुशीत दिस्तेय बर्फी!

वेका, तुमची मलईबर्फी मस्त खमंग वाटली. सुके तुकडे म्हणजे बहुतेक दुधाच्या भुकटीचे गोळे मिश्रणात राहिलेत. आउटसोर्स केलेलं काम बरोबर झालेलं नाही. Proud

अरे देवा. मृ काय जबरदस्त दिसत आहे चॉकोलेट बर्फी.
माधुरी, सुरेख रंग आलाय बर्फीचा. >>आउटसोर्स केलेलं काम बरोबर झालेलं नाही. :P>>> अनुमोदन. Proud
मी आता रेनबो मलई बर्फी करणार. Happy

वा वा फारच छान दिसतेय बर्फी Happy

सीमा, लवकर येऊ देत रेनबो बर्फी. हिरव्या रंगासाठी बागेतलाच आहे म्हणून पुदिना नाही तर ढो मि घालू नकोस बर्का Wink

हा हा हा...

आउटसोर्स केलं कारण बर्फीचीमागणी पण तिथुनच जास्त होती... Happy

पुढच्या वेळी ती सुचना नक्की अमलात आणण्यात येईल....दूध पावडर चांगली वस्त्रगाळच होती सो चाळण्याची आवश्यकता वाटत नाही....

ब्लेमिंग सेशन साठी चांगलं न ढवळण्याचा मुद्दा वापरता आला असता पण चव आवडल्यामुळे त्याची गरज पडली नाही.... Wink

सो ऑल द्~ट एन्डस वेल यु नो...संपली पण लाँग विकेंड आणि एक आणखी दिवसात.....फोटो आधीच काढला होता हे नशीब... Happy

ही घ्या कलाकन्दची कृती
१ डबा कंडेंसड मिल्क, ५००gm पनीर
दोन्ही फूड प्रोसेसर मधे फिरवून घ्या आणि जाड बुडाच्या पातेल्यात काढा
जास्त गोड हवे असेलतर १/२ वाटी साखर घाला
मंद आचेवर ठेवून ढवळत रहा. साधारण १२-१३ मिनिटात मिश्रण कडेने सुटू लागते आणि गोळा व्हायला लागते. ती स्टेज आली की गॅस बंद करायचा अन मग तूप लावून ठेवलेल्या ट्रे/ ताटात ते पसरवायचं. थोडे थन्ड झाले की वडी पाडा
कलाकन्द तयार

Pages