![malai burfi](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/recipe_images/2020/09/12/malai-barfi_0.jpg)
१ कन्डेन्सड मिल्कचा कॅन(साधारण ८ oz)
2 कप मिल्क पावडर (कार्नेशन ब्रॅन्डची नॉन फॅट ड्राय मिल्क)
अनसॉल्डेड बटर- १ स्टिक,
चवीप्रमाणे पिठीसाखर.
शोभेकरता बदाम, पिस्ता,केशर इ.
मायक्रोवेव्ह मध्ये चालणार्या खोलगट बोलमध्ये साखर, ड्रायफ्रूट्स सोडून सर्व जिन्नस एकत्र करुन घ्यावेत.३ मिनिटांकरता मायक्रोवेव्ह करुन घ्यावेत. बाहेर काढून एकदा नीट ढवळून घ्यावेत. परत मायक्रोवेव्हला टाकून दोन मिनिटं गरम करावं. परत एकदा बाहेर काढून ढवळून घेऊन पुन्हा मायक्रोवेव्हला १ मि. गरम करावे.
बाहेर काढून केशर, बदाम ,पिस्ते इ. ड्रायफ्रूटस घालवीत. आणि चांगलं घोटून चवीप्रमाणे पिठीसाखर घालावी व तूप लावलेल्या प्लेटमध्ये पसरुन गार झाल्यावर वड्या पाडाव्यात. वरुन हवे असतील त्याप्रमाणे बदाम, केशर, पिस्ते पसरावेत.
ह्याचेच पेढे करण्याकरता: वरील प्रमाणेच घोटून घेतल्यावर थोडं गार होईपर्यंत थांबून पेढे वळावेत.
इथे ८ औंसाचा कन्डेन्स्ड मिल्कचा/मिल्कमेडचा कॅन मिळत नाही. जो मिळतो तो १४ औंसाचा आहे. तेव्हा तो सगळा वापरला तरी चालेल (पान क्र. २ वर ह्याबद्दल लिहिलेलं आहे)
मूळ रेसिपीत जरी पिठीसाखर घाला असं म्हटलं असलं तरी साखर घालावी लागत नाही.
३००+ ईस खुशीमे एखादं
३००+ ईस खुशीमे एखादं व्हेरिएशन करावं म्हणतेय![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
व्हेरिएशनः चॉकलेट मलईबर्फी :
व्हेरिएशनः
चॉकलेट मलईबर्फी : दीड कप नॉनफॅट मिल्क पावडर, अर्धा कप नेस्ले चॉकलेट पावडर, अर्धा स्टिक बटर, १४ औसांचा कार्नेशन स्वीटन्ड कन्डेन्स्ड मिल्क अख्खा टिन आणि एक लहान चमचा व्हॅनिला इसेन्स. चव नेहमीच्या चॉकलेटासारखी येईल असं वाटलं, पण मलईबर्फी-चॉकलेट अशी चांगली चव आली. पुन्हा एकदा सायो आणि मैत्रीण यांना धन्यवाद!
व्वॉव... एकदम खतरा दिसत्येय
व्वॉव... एकदम खतरा दिसत्येय गं बर्फी मृण्मयी![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
किलिंग आहे चॉकोलेट बर्फी.
किलिंग आहे चॉकोलेट बर्फी.
भारी दिसतेय मृ.
भारी दिसतेय मृ.
धन्यवाद! चवीला लागतेय पण
धन्यवाद!
चवीला लागतेय पण कातिल! 'ब्राउनी' म्हणून उपेक्षीत ठेवणार्यांना चव कळल्यावर अर्धीअधिक गायब!
अरे देवा, बघुनच मेले मी. खरच
अरे देवा,
बघुनच मेले मी. खरच कातिल बर्फी.
फार भारी दिसतेय चॉकलेटबर्फी
फार भारी दिसतेय चॉकलेटबर्फी![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मस्त!!
मस्त!!
कातिल एकदम.. मस्तच, अगदी
कातिल एकदम..
मस्तच, अगदी प्रोफेशनल!!
बर ही फ्रिज मध्ये किती दिवस
बर ही फ्रिज मध्ये किती दिवस टिकेल हे सांगाल का? (मला माहितेय केली की लगेच गट्ट्म होईल पण तरी विचारतेय)
कुणाला फ्रिज मध्ये ठेवायची गरजच पडली नसेन![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
सिंडी आणि मृण या धाग्याची जान
सिंडी आणि मृण या धाग्याची जान आहेत.
मृण काय दिसतेय बर्फी.
हाईला. मृ काय दिसतेय ती
हाईला.
मृ काय दिसतेय ती बर्फी.
ही करुन न पाहिलेली मीच उरलेय फक्त. करणार करणार थोडे स्थिरस्थावर झाले की.
मी ही बर्फी करण्याह्चा असफल
मी ही बर्फी करण्याह्चा असफल प्रयत्न केला होता.
तेव्हा किचनमधे अगदीच नविन असल्याने काय तरी घोटाळा केला होता. ![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
आता पुन्हा एकदा करून बघेन.....
.
.
मृण साष्टांग नमस्कार! काय
मृण साष्टांग नमस्कार!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
काय निगुतीने करत असतेस एकेक!
सायो, मब झिंदाबाद!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
(मला जमली नाही म्हणून काय झालं! :P)
सह्ही दिसतेय चॉ म ब. ह्या चॉ
सह्ही दिसतेय चॉ म ब. ह्या चॉ ब वर पिस्त्यांऐवजी (नट्स) व्हाईट चॉकलेट किसून घातले सर्व्ह करताना तरी छान दिसेल असं वाटतं.
धन्यवाद! स्वाती, सगळे घटक
धन्यवाद!
स्वाती, सगळे घटक एकत्र करून, मायक्रोवेवमधे ३ मिनिटं ठेवले, थालपे की ही बर्फी होते. (बेसनलाडू जमले की साष्टांग नमस्कार स्वीकारावा!
)
बेसनलाडू जमतात, ना पा चे लाडू
बेसनलाडू जमतात, ना पा चे लाडू जमले की सा न स्वीकारावा. कुणी करायचं राहिल्यास मागून घ्यावा![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
मृण्मयी, अफलातुन दिसतेय बर्फी
मृण्मयी, अफलातुन दिसतेय बर्फी![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
हा!!! भरपुर गाजत असलेली म.ब.
हा!!! भरपुर गाजत असलेली म.ब. मी पण केली आज!!.. वीकएण्ड ला करणार होते पण धीर धरेना![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
![malaibarfi1.JPG](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/u285/malaibarfi1.JPG)
![malaibarfi2.JPG](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/u285/malaibarfi2.JPG)
अप्रतिम!!!! कुणा़कुणाला धन्यवाद देवू?? सायो, तिची मैत्रीण, सिंडरेला, मृण्मयी, रूनी, मंजुडी आणि सगळ्यांनी इथे लिहिलेल्या टिप्स बद्द्ल अनेकानेक धन्यवाद
इतकी वेरिएशन्स आहेत इथे मला तर कुठली करू आणि कुठली नको असे झाले होते.. आज केली नॉर्मल आणि चॉ. म.ब.
नेक्ट टाईम संत्रा म.ब. करणार
आम्ही अजून बेसिक रेसिपिच
आम्ही अजून बेसिक रेसिपिच शिकतोय![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
पण खास ठरवून केली...घरी ही रेसिपी हीट आहे. (सगळे गोडाचे चाहते असल्यामुळे साधारण माहित होतंच...:) ) .पण माहित नाई काय गोंधळ घातला मी मध्ये मध्ये दूध पावडरीचे सुके तुकडे येताहेत......तरी ढवळायला घोवाला लावलं होतं...
असो..गोड मानून घ्या. पुढच्या वेळी मृ ची चॉको वाली पद्धत करायचा विचार आहे.....खास या रेसिपीसाठी दूध पावडरचा डब्बा आणलाय तेव्हा ही पुन्हा पुन्हा बनेल याची खात्री तर आहेच..
धन्सं अ टन्स सायो आणि समस्त मार्गदर्शक्स....![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
वेका, जर मायक्रोवेव्हमध्ये
वेका, जर मायक्रोवेव्हमध्ये केली असेल तर, जो काहि टाईम सेट केला असेल त्यानंतर भांडं मायक्रोवेव्हच्या बाहेर काढून नीट ढवळून घ्या. मिल्क पावडर चाळणीने चाळून घेणे हाहि एक ऑप्शन आहे.
माधुरी, मस्त दिसतायत
माधुरी, मस्त दिसतायत बर्फ्या.
वेका, बेटर लक नेक्स्ट टाईम. वरची नीट ढवळायची सूचना वापरुन बघा.
माधुरी, सुंदर आलाय फोटो!
माधुरी, सुंदर आलाय फोटो! लुसस्लुशीत दिस्तेय बर्फी!
वेका, तुमची मलईबर्फी मस्त खमंग वाटली. सुके तुकडे म्हणजे बहुतेक दुधाच्या भुकटीचे गोळे मिश्रणात राहिलेत. आउटसोर्स केलेलं काम बरोबर झालेलं नाही.![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
अरे देवा. मृ काय जबरदस्त दिसत
अरे देवा. मृ काय जबरदस्त दिसत आहे चॉकोलेट बर्फी.![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
माधुरी, सुरेख रंग आलाय बर्फीचा. >>आउटसोर्स केलेलं काम बरोबर झालेलं नाही. :P>>> अनुमोदन.
मी आता रेनबो मलई बर्फी करणार.
वा वा फारच छान दिसतेय बर्फी
वा वा फारच छान दिसतेय बर्फी![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
सीमा, लवकर येऊ देत रेनबो बर्फी. हिरव्या रंगासाठी बागेतलाच आहे म्हणून पुदिना नाही तर ढो मि घालू नकोस बर्का![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
हा हा हा... आउटसोर्स केलं
हा हा हा...
आउटसोर्स केलं कारण बर्फीचीमागणी पण तिथुनच जास्त होती...
पुढच्या वेळी ती सुचना नक्की अमलात आणण्यात येईल....दूध पावडर चांगली वस्त्रगाळच होती सो चाळण्याची आवश्यकता वाटत नाही....
ब्लेमिंग सेशन साठी चांगलं न ढवळण्याचा मुद्दा वापरता आला असता पण चव आवडल्यामुळे त्याची गरज पडली नाही....
सो ऑल द्~ट एन्डस वेल यु नो...संपली पण लाँग विकेंड आणि एक आणखी दिवसात.....फोटो आधीच काढला होता हे नशीब...![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
ही घ्या कलाकन्दची कृती १ डबा
ही घ्या कलाकन्दची कृती
१ डबा कंडेंसड मिल्क, ५००gm पनीर
दोन्ही फूड प्रोसेसर मधे फिरवून घ्या आणि जाड बुडाच्या पातेल्यात काढा
जास्त गोड हवे असेलतर १/२ वाटी साखर घाला
मंद आचेवर ठेवून ढवळत रहा. साधारण १२-१३ मिनिटात मिश्रण कडेने सुटू लागते आणि गोळा व्हायला लागते. ती स्टेज आली की गॅस बंद करायचा अन मग तूप लावून ठेवलेल्या ट्रे/ ताटात ते पसरवायचं. थोडे थन्ड झाले की वडी पाडा
कलाकन्द तयार
आता या बाफवर फोटो टाकायला
आता या बाफवर फोटो टाकायला मनाई केली पाहिजे. एकसे एक भारी फोटो येताहेत म.ब.चे![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
Pages