मलई बर्फी

Submitted by सायो on 15 March, 2009 - 13:07
malai burfi
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

१ कन्डेन्सड मिल्कचा कॅन(साधारण ८ oz)
2 कप मिल्क पावडर (कार्नेशन ब्रॅन्डची नॉन फॅट ड्राय मिल्क)
अनसॉल्डेड बटर- १ स्टिक,
चवीप्रमाणे पिठीसाखर.
शोभेकरता बदाम, पिस्ता,केशर इ.

क्रमवार पाककृती: 

मायक्रोवेव्ह मध्ये चालणार्‍या खोलगट बोलमध्ये साखर, ड्रायफ्रूट्स सोडून सर्व जिन्नस एकत्र करुन घ्यावेत.३ मिनिटांकरता मायक्रोवेव्ह करुन घ्यावेत. बाहेर काढून एकदा नीट ढवळून घ्यावेत. परत मायक्रोवेव्हला टाकून दोन मिनिटं गरम करावं. परत एकदा बाहेर काढून ढवळून घेऊन पुन्हा मायक्रोवेव्हला १ मि. गरम करावे.
बाहेर काढून केशर, बदाम ,पिस्ते इ. ड्रायफ्रूटस घालवीत. आणि चांगलं घोटून चवीप्रमाणे पिठीसाखर घालावी व तूप लावलेल्या प्लेटमध्ये पसरुन गार झाल्यावर वड्या पाडाव्यात. वरुन हवे असतील त्याप्रमाणे बदाम, केशर, पिस्ते पसरावेत.
ह्याचेच पेढे करण्याकरता: वरील प्रमाणेच घोटून घेतल्यावर थोडं गार होईपर्यंत थांबून पेढे वळावेत.

वाढणी/प्रमाण: 
साधारण १२,१३ वड्या.
अधिक टिपा: 

इथे ८ औंसाचा कन्डेन्स्ड मिल्कचा/मिल्कमेडचा कॅन मिळत नाही. जो मिळतो तो १४ औंसाचा आहे. तेव्हा तो सगळा वापरला तरी चालेल (पान क्र. २ वर ह्याबद्दल लिहिलेलं आहे)
मूळ रेसिपीत जरी पिठीसाखर घाला असं म्हटलं असलं तरी साखर घालावी लागत नाही.

माहितीचा स्रोत: 
मैत्रिण
पाककृती प्रकार: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सग़ळ्यांना धन्यवाद! अरुणिमा, <<<कच्च राहिलं कि मिश्रण चिकट होतं>> यासाठी विशेष! मिश्रण नक्की मग कच्चं राहिलं होतं, कारण मी खूप कमी पावरवर आणि त्या मानानी कमी वेळ मायक्रोवेव केलं होतं बहुतेक.

हे सगळ वाचल्यावर मी करुन(च) पाहिल्या वड्या.( रेसीपीमध्ये"बटरची अख्खी एक stick" हे वाचुन केल्या नव्हत्या. :P) मला आवडल्या. सायो छान रेसीपी. Happy नेक्स्ट टाईम मी केशर वगैरे add करेन बहुदा flavour साठी.

चाफा, मिश्रण चिकट होत म्हणजे कच्चा राहिल होत बहुदा. मी मायक्रोवेव्ह फुल्ल पॉवर वर ठेवला होता. तु microwave च नेहमीच जे setting आहे तेच ठेवुन बघ. थोडक्यात setting मध्ये काही ढवळाढवळ करु नको. Happy
लाजो वेळ मिळाला कि तुझी रेसीपी टाक. माझ्याकडे खुप जास्त cream शिल्लक आहे. Happy

मलइ बर्फिच्या बेसिक रेसीपीत अर्धा चमचा व्हॅनिला इसेन्स व अर्धी वाटी हर्शे चॉकोलेट पावडर व एक वाटी
पीठीसाखर घातली. टेक्श्चर अमेझिन्ग आहे. व चव पण. वरून वर्ख लावायला हवा होता. आज जेवण सोडून बर्फीच खावी असे वाट्ते आहे.

इथे भारतात मावा खवा इ. मध्ये भेसळीचे प्रकार आहेत असे टीवीवर दाखवत आहेत. तेन्वा ही बर्फीच उत्तम.
सायोनारा, धन्यवाद.

प्राजक्ता !
मी almost सायोनारा चीच रेसिपी follow केली.
माझ्याकडे condensed milk नव्हतं म्हणून मी evaporated milk वापरलं. आणि ते गोड नसतं म्हणून साखर घातली.
२ वाट्या दीप ची मिल्क मावा पावडर , १ वाटी साखर , १४ oz evaporated milk, २-३ चमचे साजूक तूप सगळं microwave मध्ये ३ मिनिटे ठेवलं. ढवळून परत ३ मिनटे ठेवलं. आणि मग वेलदोडा पूड घालून परत 2 मिनिट ठेवलं. तूप लावलेल्या ताटावर सगळं पसरवलं. थोडं पातळ होतं पण रात्रभर fridge मध्ये ठेवून दुसर्या दिवशी मस्त बर्फी झाली.
ह्या बर्फ्या करायला खूप सोप्या आहेत आणि लागतात पण मस्त !! Happy

हाय आज गड्बडीत दिल्लीला जायचे प्लॅन केले. लोणी नाही म्हणून तूप घातले + व्हॅनिला इसे+ चॉकोलेट.
तूप जरा जास्त झाले पण दिल्लीकरांना चालते. राजमलाइ टाइप चव आली आहे. ( अंदाजे)

सायोच्या मलई बर्फीचा टीरापी फारच कमी झालाय आज-काल म्हणून काल केली Proud शेवटी एक मिनिट मावे करायच्या आधी गोडायव्हाचा मिल्क चॉकोलेट बार घातला. मस्त लागतेय.

barfee.JPG

सहीच की ग सिंडे. मी खुप महिन्यांत बर्फी केली नाहीये. मला वाटतं दिवाळी नंतर नाहीच.
इशान खातो का?

आली आली. म. ब. वर आली. गोडायवा मिल्क चॉकलेट बारची आयडिया मस्त. कोको पावडर घालून बर्फीचा चिकट लगदा झाल्यापासून चॉकलेटाचा नाद सोडला होता. किती घातलंस?

वा माझी फेवरिट बरफी परत आली का वर. चॉकोलेट बार ची आय्डिया मस्त आहे. मी हर्शेची पावडर घातली होती एकदा दोनदा मस्त झाली. तो हार्टशेप पण छान आला आहे.

नवीना बदामाच्या आजू बाजू ला एकेक चारोळी लावली तर स्मायली दिसेल Happy

काजू लावला मी. चारोळी नव्हती माझ्याकडे आणि बर्फी पण थोडीच राहिली आता. पुढल्यावेळेस लक्षात ठेवेन. थँक्यु मामी आणि सिंडरेला.

करुन पाहीली काल....छान झाली..कलाकंद सारखा फ्लेवर आला..कंडेन्स्ड मिल्क आणि मिल्क पावडर वापरलं फक्त..साखर अजिबात घातली नाही तरी छान झाली,,
या बर्फीचं पुनर्नामकरण "नो कटकट बर्फी" करायला हवं.. मनापासुन धन्स सायो..

आज पूजेला प्रसाद म्हणून शिर्‍याच्या जोडीने ही बर्फी केली. सुंदर झाली आहे.
धन्यवाद सायो!!

आज परत एकदा प्रयत्न केला आणि ,........
मस्तच झाली एकदम.. अजुन कापली नाहीये.. कापल्यावर फोटो जमले तर डकवेन, मुलीच्या डब्यात भरुन शाळेत धाडायची, तोवर फोटो काढायला जमले तरच...

ती फक्त करणार आहे. खाणारे असं कुठे म्हणालीय ? Proud
वा,वा. अजरामर रेसिपी आहे ही सायो. पण मी सध्या करणारही नाही आणि कुणी करुन दिली तरी खाणारही नाही Wink

Pages