निसर्गाच्या गप्पा - २

Submitted by साधना on 10 March, 2011 - 01:21

निसर्गमित्रांनो, इथे आपण आपले निसर्ग प्रकरण मागील पानावरुन पुढे चालु करुया.... Happy

आधीच्या गप्पा -
http://www.maayboli.com/node/21676

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

पुर्वी त्याचा अतिरेक झाला होता. मग त्याच्या जोडीला पीतमोहोर आला, आणि दगडापेक्षा वीट मऊ असे झाले

Proud

मला पितमोहोर आवडतो. त्याचा पर्णसंभार अगदी भरगच्च असतो. झाड कायम हिरवेगार दिसते.

http://www.maayboli.com/node/23727

इथे प्रचि २० बघ. सध्या सगळीकडे फुललाय. काही ठिकाणी तांब्याच्या रंगाच्या अर्धा इंच रुंद नी दोन इंच लांब शेंगानी भरलाय

हा गुलमोहोर ह्या वर्षी टिपलेला.

अनिल, हा पितमोहोर मागे मी सुट्टीच्या दिवशी ऑफिसच्या दिशेने ह्या धाग्यावरही टाकला होता.

आर्या, कैलाशपतिच्या झाडाखाली, पिकलेले फळ फुटलेले असेल तर त्यातल्या बिया पावसाळ्यात रुजतील. या फळाला भयंकर दुर्गंधी येते. अगदी क्वचित झाडाखाली रोपे दिसतात.
नर्सरीतही मिळू शकतील म्हणा. पण या झाडाला ३०/४० वर्षानंतरच फूले येतात.

मी मागच्या आठवड्यात कर्नाळा जवळच्या ग्रो ग्रिन नर्सरीत गेले होते. तिथे मला सगळी आवडीची झाडे मिळाली ती पटापट उशिर झाल्याने उचलुन आणलि. परत एकदा फुरसतीत जायचा विचार आहे.
मी तिथुन बकुळ, बहावा, भारंग, मिरीवेल, हादगा आणि ब्राम्ही आणली.

विजय तुम्ही मला मिरी वेल घेतली होतित ना ? ती मला दिलीत तरी मी लावेन.

<<नर्सरीतही मिळू शकतील म्हणा. पण या झाडाला ३०/४० वर्षानंतरच फूले येतात.<<

हाहाहाहा...म्हणजे आता लावलं तर मी डोळ्यांना डब्बल भिंगाचा चष्मा लावुन बघेन ती फुलं!!! Light 1 Proud

तरी पण लावायलाच हवीत झाडे आर्या. आता आपण बघतोय, ती ज्या लोकांनी लावली असतील, ते लोक पण आता वृद्धच झाले असतील कि.
जागू , भारंगाचे झाड ? ते तर सहज उगवते ना ? म्हणजे पानांची / फूलांची भाजी करतो तेच ना ?

<<तरी पण लावायलाच हवीत झाडे आर्या. आता आपण बघतोय, ती ज्या लोकांनी लावली असतील, ते लोक पण आता वृद्धच झाले असतील कि.<<
अगदी अगदी.. मला अशी दुर्मिळ झाडे लावायला आवडेल. Happy

<<अग आर्या तुझि मुले, नातवंडे त्याचा आस्वाद घेतील. त्यांच्या डोळ्यांतुन तु बघ<<
हो गं !माझी नातवंड हे नयनाआज्जीचं झाडं असं म्हणतील मग! Proud

खुप वर्षांपासुन या झाडाची वाट बघत होते...ते परवाचा पाऊस पडुन गेल्यावर लगबगीनं भुईच्या वरती आलं! दरवर्षी याची बी लावुन रुजायची वाट बघत असायचे...ते यावर्षी माझ्यावर प्रसन्न झालं.
चला आता देवपुजेसाठी वर्षभर कापुस मिळणार. Happy
देवकपाशी:
Img00002.jpg

माझी भाची पण मला काल चिडवत होती. की आत्या तु आता एक नर्सरी काढ मग आम्ही त्याला आत्याची नर्सरी नाव देउ. पण आधी म्हातारी हो Lol म्हणजे नाव सुट होईल नर्सरीच.

पुण्यात अरण्यवाक् नावाची संस्था आहे तिने निसर्गसंवर्धनाच्या साठी खालील कार्यक्रम आयोजित केला आहे

Aranya Katta and Pune Eco Walk

Aranya Katta – Slide Show: “Astonishing Characteristics of Plants”

The Aranya Katta programme on this Thursday, would showcase some of
the most fantastic characteristics of our green friends that leave us
spellbound. Plants are capable of doing things which are beyond our
imagination. To know more about their fantastic feats, come and be a
part of this fantastic slide presentation delivered by the best man in
the field.
The presenter is Shri. S. D. Mahajan who is a renowned expert
botanist, environmentalist and educator with a vast experience and
research in this field.

Date: 2 June 2011
Medium: Marathi
Time: 6.30 – 8 pm
Venue (Not for Enquiry): Ramchandra Rathi School, Panditrao Agashe
School campus, opp. Law College, Law College road, Pune 4

All are cordially invited.

Pune Eco Walks: “Vetaal Tekdi”

Aranyavaak’s Pune Eco Walks series offers a visit to the Vetaal Tekdi
in Pune, this Sunday on the occasion of World Environment Day. This
walk will focus upon the urban ecology of Pune along with the flora,
fauna, geology and their interactions with each other related to the
hills of Pune.
As part of our World Environment Day celebrations, Aranyavaak has
organized this walk free of charge to all.

Date: 5 June 2011
Medium: Marathi / English
Time: 7 - 9 am
Admission on first come first served basis for limited number only.
Please call to confirm attendance.

--
Mr. Hrishikesh Talwalkar
Founder-Head
ARANYAVAAK
12, Sneh Park, Lane 19,
Dahanukar Colony, Kothrud,
Pune 411038 INDIA
Tel: +91 20 2545 0517
Cel: +91 98221 94650
Email: aranyavaak@gmail.com

कापुस ओसांडतानाचा फोटो काढलेला नाही पण त्या आधीचा आहे.
प्रचि १

प्रचि २

प्रचि ३

जागू,
खरेच कित्तीकित्ती झाडे लावतेस. छान मोकळी जागा असावी तुझ्याकडे. आणि सगळं करण्यासाठी वेळ सुद्धा. मला खरेच खुप आवड आहे पण वेळ नाही देऊ शकत मी फार. साथीला थंड बर्फाळ हिवाळा; सगळं घरात आणावे लागते. फारच डोईजड होतं. असो, तुझा फुललेला बगिचा बघुन्/ऐकुन बरे वाटते. Happy

साधना कदाचित पावसाळ्यात त्याची रोपे पण फुटतील ती पण देईन तुला.

आर्या अग धिराच फळ चांगल मिळत.

सुमंगल मला रोज नाही ग वेळ मिळत झाडांकडे बघायला. माझी पण तारेवरची कसरत असते सगळी. पण आठवड्यातले एक दोन दिवसांतला अर्धा ते १ तास मी देते झाडांना. आता उन्हाळ्यात रोज पाणी घालाव लागत. ते मी कधी कधी संध्याकाळी ७ ला पण घालते. ऑफिसमधुन गेल्यावर. कधी कधी घरातल्यांपैकीही कोणीतरी घालत. बरेचवेळा आमचा गडीच घालतो. तो पण रोज नाही येत पंधरा दिवसातुन ३-५ दिवस येतो. पण सध्या तो गावाला गेल्यामुळे मी घालते. बाकी झाड आणण्याच, भाज्यांच्या बियाण्या आणण्याच काम मिच करते. आणि म्हणतात ना की आवड असेल तर सवड मिळते.

व्वा दिनेशदा अननस रुजला बरंका कुंडीत....................................

त्याला २ बाजुंनी तुरे यायला लागलेत. लेक तर सकाळ/संध्याकाळ जावुन बघत असते.

अगदी सकाळी उठल्या बरोबर झाडांच्या जवळ जायचे (हवे तर दात ब्रश करत जावे ) मन प्रसन्न होते.
आणि झाडांशी गप्पा मारायला आपली / परकी असा भेदभाव करु नये. रस्त्यावरची झाडे पण गप्पा मारतात आपल्याशी.

साक्षी१, त्याला अननस धरेपर्यंत बराच काळ जाईल, पण त्या झाडाची वाढ बघणे हे पण आनंददायी असते !

अगदी सकाळी उठल्या बरोबर झाडांच्या जवळ जायचे (हवे तर दात ब्रश करत जावे ) मन प्रसन्न होते. >>>> खरयं, १० मि. जरी झाडांजवळ घालवली तरी पुढचा सगळा दिवस मस्त जातो.

पावसाळा हिवाळ्यात आमच्या अंगणात मस्त प्राजक्ताचा सडा पडतो तेंव्हा मि सकाळी चहा घ्यायला जाउन त्या झाडाखालच्या ओटीवर बसते. आणि इतर वेळी खिडकी उघडून त्याच्या कट्यावर बसुन चहा घेइपर्यंत झाडे न्याहाळते.

Pages