Submitted by साधना on 10 March, 2011 - 01:21
निसर्गमित्रांनो, इथे आपण आपले निसर्ग प्रकरण मागील पानावरुन पुढे चालु करुया....
आधीच्या गप्पा -
http://www.maayboli.com/node/21676
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
त्याला अननस धरेपर्यंत बराच
त्याला अननस धरेपर्यंत बराच काळ जाईल
दिडेक वर्ष लागतं ना? मी पण लावणार आहे आता.
जागू, कधी येऊ उरणला बाग
जागू, कधी येऊ उरणला बाग बघायला आणि अळुवड्या खायला?
जागू, कधी येऊ उरणला बाग
जागू, कधी येऊ उरणला बाग बघायला आणि अळुवड्या खायला
पुढच्या आठवड्यात जाऊया. माझ्याकडे चिल्लीपिल्ली बरीच जमणार आहेत, फ्लॅटमध्ये बसुन कंटाळलेली. उरणच्या बीचवर हुंदडतील तरी.
जिप्सि, साधना नक्की कधी येणार
जिप्सि, साधना नक्की कधी येणार ते सांगा.
साधना मी पण अननस लावलय. खुप छान रुजलय आता.
सुरंगिचे झाड बघायला गेलेले त्या वाडीत दिसलेले हे अननसचे रोपटे.

अननस लागतोय.

जागू अभिनंदन, फोटोग्राफी
जागू अभिनंदन, फोटोग्राफी दिवसेंदिवस बहरतेय. त्यामूळे जे बघतेस ते तसेच्या तसे आमच्यापर्यंत येतेय.
खरेच जागुची फोटोग्राफी
खरेच जागुची फोटोग्राफी बहरतेय... जागु सांगते गं. पुढच्या आठवड्यात पिरवाडीच्या बीचला जायचेय.
धन्स दिनेशदा. साधना नक्की
धन्स दिनेशदा.
साधना नक्की तारिख मला कळव्.आणि पाऊस सुरु व्हायच्या आत ये शक्यतो.
अननस एकदम सुदंर दिसते
अननस एकदम सुदंर दिसते ना.
मागे कुणी तरी पुर्ण वाढ्ण्याचे फोटो टाकले होते. ते पण मस्त होते.
हो हो ते फोटो तर खुपच सुंदर
हो हो ते फोटो तर खुपच सुंदर होते. त्यातली निळी फुल पण खुलुन दिसत होती त्या फोटोंमध्ये.
जागु, फोटो छान आलेत. ५
जागु,

फोटो छान आलेत.
५ वर्षापुर्वी गावाकडे शेतात २ एकर कापुस पहिल्यांदाच म्हणुन लावुन पाहिला, पुन्हा कापसाचं नाव काढल नाही.
अगदी सकाळी उठल्या बरोबर झाडांच्या जवळ जायचे (हवे तर दात ब्रश करत जावे ) मन प्रसन्न होते
दिनेशदा,
नविन आयडिया दिल्याबद्दल धन्यवाद ! :स्मितः
(....पण हे माझ्या लक्षात कसं आल नाही ??)
अननसाचे झाड आपल्याकडे (पुण्यात,सांगलीत) नीट येईल का ? तग धरेल का ? आल तरी त्याला फळे लागतील का ?
:स्मितः
अनिल, बेळगावला होतात अननस.
अनिल, बेळगावला होतात अननस. कोल्हापूरच्या बाजारात तिथूनच येतात. एक लावून बघ. दिड दोन वर्षे वाट बघावी लागेल.
निकिता, ते फोटो आरती ने पोस्ट केले होते.
दिनेशदा, धन्स ! आता मी अननस
दिनेशदा,

धन्स !
आता मी अननस घेतला कि त्याच्या बिया जपुन ठेवायला शिकेन.
जागु,

धन्स ! अननसाच झाड पहिल्यांदाच पाहायला मिळालं.
व्वाव छान आहे अननस
व्वाव छान आहे अननस
व्वा जागू छान आहे अननस आणि
व्वा जागू छान आहे अननस आणि फोटोग्राफी सुद्धा!
आता मी अननस घेतला कि त्याच्या
आता मी अननस घेतला कि त्याच्या बिया जपुन ठेवायला शिकेन. >>>>> अननसाच्या बिया?
अनिल अननस वाल्याकडून अननसाचा
अनिल अननस वाल्याकडून अननसाचा वरचा शेंडा घ्यायचा तोच लावायचा.
आता मी अननस घेतला कि त्याच्या
आता मी अननस घेतला कि त्याच्या बिया जपुन ठेवायला शिकेन.

अनिल, तुझ्या मुळ शेतकरी असण्यावर मला संदेह आहे
कापसाचे काय झाले? सविस्तर लिहीना इथे. कापसालाही उसासारखा हमी भाव दिला जातो बहुतेक. पेपरात भाव येतो कधीमधी.
उसासारखेच कापसानेही जमिनीचे नुकसान होते असे मी 'एक होता कार्वर मध्ये वाचलेले. मुळ पिक नुकसान करत नाही तर माणसाच्या हावरटपणामुळे नुकसान होते.
काय हे जादुचे पान!! अगदी कुठे
काय हे जादुचे पान!!
अगदी कुठे कुठे नेते हे मला.
बोंड्यातुन फुटणारा कापुस बघुन ऊगाच त्याला स्पर्श करावासा वाटतो. कधितरी असा स्पर्श केलाय, केव्हा, आठवत नाही.
ऊस, दिवाळीच्या आसपास खुप ऊस यायचे घरात. सगळ्या लहान मुलांना घेउन सोलुन खाण्यात काय मज्जा यायची विचारुच नका.
पण ते सगळं कुठेतरी हरवलं. कित्येक दिवसात छान गच्च भरलेला ऊस पाहिलेला नाही. आणि समजा मिळाला तरी दातांनी सोलता येइल कि नाही कोण जाणे.
अनिल काही अगदीच चुकिचे बोलत
अनिल काही अगदीच चुकिचे बोलत नाही. गोव्याकडच्या अननसात बारिक बिया असतात. म्हणजे सालीलगतच असतात. पण त्या रुजत नाहीत.
आपण राणीच्या बागेत गेलो होतो त्यावेळी अंब्रेला ट्री बघितले होते. मला त्या झाडाला कधी फुलोरा आलेला दिसला नाही. इथे केनयात मात्र त्यांना भरपूर फुले येतात. झाडांच्या बाबतीत एक पॉलिसी दिसते, जर प्रत्येक फूल आआराने लहान असेल, तर त्याचा गुच्छ केला जातो. (अशोक, आंबा अनेक उदाहरणे आहेत. ) इथे या झाडाचे फूल, अगदी छोटेसे. आकार तसा खास नाहीच पण या सगळ्या फूलांचा मिळून जो गुच्छ तयार होतो, तो मात्र अनोख्या आकाराचा. याचा रंग पण सुंदर असतो. पावसाळी हवेमूळे मला रंग नीट पकडता आला नाही.
माझा प्रश्ण. झाडासंबंधी पण
माझा प्रश्ण. झाडासंबंधी पण औषधी.
डोक्यात आलेले १ खुळ म्हणुन सध्या घरी गव्हांकुर रसाचे सेवन सुरु करायचा घाट घातला आहे.
१२ तास गहु भीजत टाकतो - १२ तास मोड आणायला. मस्त ४-४ ट्रे वाले २ स्टँड आणले आहेत. माती / खत. सगळा जामनीमा झाला.
तर प्रश्ण असा हाये के त्या मेल्या बुरशीला ही खबर लागली व ती त्या मातीवर आपले हात पाय
पसरु लागली आहे. (१ हलकी पांढरी लेयर आहे) त्यात आता वरुण राजा कृपा करायला सुरुवात करतोये.
काय करावे? ती बुरशी नॉर्मल आहे का? (नक्कीच नसणार... ) तर काही फवारणी / खत / औषध? रासायनीक नको.
दिनेशदा मस्त फुलोरा
दिनेशदा मस्त फुलोरा आहे.
मोनालिप गव्हाला मोड न आणता तसेच कुंडीत थोडे खुरपुन लावले व रोज त्याला पाणी दिले तरी उगवतील. त्यामुळे बुरशीचे प्रमाणही कमी होईल कदाचित.
जागू, बघते प्रयत्न करुन. पण
जागू, बघते प्रयत्न करुन. पण ज्या पुस्तकातुन वाचुन केले त्यानी मोड आणुन लावा असे सांगीतले. अजुन एक कमी मोड आलेले असले की जास्त रोपे येत नाहीयेत हा अनुभव आला आहे.
तरीही ट्राय करते.
अनिल, तुझ्या मुळ शेतकरी
अनिल, तुझ्या मुळ शेतकरी असण्यावर मला संदेह आहे

साधना,
शेतीमध्ये शेकडो प्रकारच्या जातीची पिके,फळझाडे असतील,...
त्यामुळे एक अननस माहीती नाही याचा अर्थ असा काढण्यात अर्थ नाही...
तशा तुला खाऊच्या पानाच्या वेलीच्या जाती किती आहेत ते माहित आहे का ?

दिनेशदा, umbrella tree च्या
दिनेशदा, umbrella tree च्या फुलांचा फोटो फारच छान आला आहे,इथे पुण्यात ही झाडं तशी बरीच आहेत पण ही फुलें इतकी छोटी छोटी असतात शिवाय पानांच्या पिसार्यात ह्या मंजिर्या पटकन दिसत नाहीत. पण काही मि.मि.आकाराच्या या गुलाबी चांदण्या दिसल्या की अगदी भरून पावल्यासारखं वाटतं.साधारणतः इथे उन्हाळ्याच्या सुरुवातीला फुलतात ही मंडळी,पण फुलू की नको अशा संभ्रमात असल्यासारखी वाटतात.भरभरून फुलून येणं यांना बहुधा जमत नाही (असं आपलं मला वाटतं बरं का).मनात कुढत असावीत बिचारी! मला मात्र यांच्या पानांचाच आकार आणि ठेवण फार आवडते.
बाय द वे खूप दिवसांनी तुम्हा सर्वांना भेटून खूप आनंद झाला. मी खूप miss करत होते ह्या गप्पांना.
शांकली, मला आधी वाटायचे हा
शांकली, मला आधी वाटायचे हा तूरा आला कि झाडाची वाढ थांबत असेल. तर तसे होत नाही. या फूलोर्याच्या मधूनच नवीन पालवी फुटते आणि झाड वाढत राहते. याची फळे वगैरे अजून बघितली नाहीत.
माझ्या बघण्यात मात्र हे झाड
माझ्या बघण्यात मात्र हे झाड बहुतेक करून avenue tree म्हणून लावल्याचेच आहे. खरंतर हे परकीय आहे,सावली फारशी देत नाही पण बहुधा पानांच्या अनोख्या रचनेमुळे ते लावत असावेत. मला आणखीन एक गंमत दिसलिये. पुण्यात टिळकरोडला मेहेंदळे म्युझिक हाउस आहे.तिथे फूटपाथवर एक मोठा गोरखचिंचेचा वृक्ष आहे;त्याला फुलं आलियेत्.जमलं तर मी त्यांचे फोटो काढून इथे अपलोड करीन.फक्त माझ्याकडे प्रोफेशनल कॅमेरा नाहिये त्यामुळे फोटो कितपत चांगले येतील या बद्द्ल मी जरा साशंक आहे.बघू,काढून तर बघते.
बरेच दिवसांनी ईथे आल्यामुळे
बरेच दिवसांनी ईथे आल्यामुळे फार वाचावे लागले. पण एकदम फ्रेश वाटले.
शांकली, त्या फूलांचे फोटो
शांकली, त्या फूलांचे फोटो अगदी सकाळी जाउन काढावे लागतील. तेव्हा ती फुले शुभ्र असतात मग थोडी काळवंडतात. आणि कसेही आले तरी हवेतच फोटो.
ह्या झाडाच नाव काय आहे? हि
ह्या झाडाच नाव काय आहे?



हि ह्याची फळ.
हा अजून एक फळांचाच फोटो.
उजु हेच झाड माझ्या सोसायटीत
उजु हेच झाड माझ्या सोसायटीत आहे. मी पण फोटो काढुन इथे टाकणार होते. मलाही ह्याच नाव हवय.
Pages