निसर्गाच्या गप्पा - २

Submitted by साधना on 10 March, 2011 - 01:21

निसर्गमित्रांनो, इथे आपण आपले निसर्ग प्रकरण मागील पानावरुन पुढे चालु करुया.... Happy

आधीच्या गप्पा -
http://www.maayboli.com/node/21676

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सुरणाचं फूल पहिल्यांदाच पाहिलं. Happy
दिनेशदा, त्या फळाचे फणसाच्या गर्‍यांसारखे सुटे भाग होतात. आतून एकदम लालभडक असतात. आत्ता मी हा फोटो माझ्या इंटरप्रिटरला दाखवून विचारल्यावर तिने सांगितलं, " आम्ही ह्याच्यात खोबरं आणि साखर घालून गोड पदार्थ बनवतो. शर्बत सुद्धा बनवतो."
मालेच्या भाजीमंडईत मी हे फळ सुट्टं करून मांडलेलं बघितल्याचं आत्ता आठवलं मला. मालेत गेल्यावर जमलं तर फोटो काढून टाकते इथे.
फुले काही तिला ओळखता आली नाहीत.

कुणी सांगेल का? (दिनेशदा ?)
डिसी सारख्या ठिकाणी हिरवा चाफा टिकेल का? मी मोगरा कुंडीत लावला आहे आणि तो गेली १० वर्षापासुन आहे. मला सुगंधी फुले आवडतात. म्हणुन भारतातुनच आणायचा विचार आहे. पण टिकणार असेल तर.

रुणुझुणू, वर्णन केवड्याच्या फळाला पण लागू होतेय. झाड किंवा किमान इंग्लिश नाव मिळाले तरी शोधता येईल. तूमच्या कडे झाड आहे म्हणजे, त्या कूळातलेच असण्याची शक्यता आहे.

सुमंगल, मोगरा येत असेल तर हिरवा चाफा तग धरु शकेल. पण हिरव्या चाफ्याचे मोठे झुडुप होते. ते कुंडीत नाही मावणार. सुंगधी फुले आणि आटोपशीर पसारा म्हणुन मी, कुंती, म्हणजेच मुराया एक्सॉटिकाचे नाव सूचवेन. ते झाड तिथल्या नर्सरीत मिळेल.

रुणुझुणू बहुतेक ते हे फळ आहे.
Seashore Screw Pine, Pandanus tectorius, त्याचे स्थानिक नाव. Kashikeyo

सुमंगल, मुंबईत मिळेल, पण रोपटे नेता येते का ? कारण अगदी रोपटे म्हणालो तरी ते फूटभर उंच असणार. त्याच्या बिया पण रुजू शकतात. ज्यांच्याकडे फळावणारे झाड आहे, ते बिया देऊ शकतील.

मग बिया आणणे जास्त सोयीस्कर होईल.

दिनेशदा, मी गेल्यावर्षी तुमच्या मदतिने कुंडीत खत बनवले होते. त्यात पपईच्या बिया टाकल्या. छान २/२.५ फुट ऊंच झाडे वाढली. मग सप्टेंबरात घरात घेतली. त्यांना आणि ईतर कुंड्यांना एकत्र दिव्याखाली ठेवले. सगळे ठिक ठाक होते. पपई खुप टवटवित नसुन मलूल होती. मेच्या पहिल्या आठवड्यात बाहेर काढली कि ऊन्हात फुलतील. पण एक दिवस तापमान खुप खाली गेलं आणि सातही झाडे चक्क मेली. खुप खुपलं. मोगरे आणि कढीलिंब पण तपकिरी झालेत पण मेले नाहित. आता वाट पहाते आहे केव्हा ऊन्ह वाढतय आणि माझे मोगरे आणि कढीलिंब बहारतात ते.

माझ्या कुंड्या २.५ फुट ऊंच आणि २.५ फूट व्यासाच्या आहेत. गरज वाटल्यास मी मोठ्यापण घेउ शकते.
थोडी झाडे नीट झालीत कि फोटो टाकेन.

तसेच मी भारतातुन निशिगंधाची कंद आणली होती. ती लावली तर पाने भरपुर आली पण एकही काडी (फुलांची) लागली नाही. का?

हे असे होतेच झाडाच्या बाबतीत. पण लगेच दुसरी झाडे लावायची.
निशिगंधाला तिकडचे हवामान आवडले वाटतं. पाने जोमदार आहेत म्हणजे येणारा तूरा पण चांगला येईल.

नाही ना, तुरे आलेच नाही. मी ४ वर्षापासुन पोसतेय. ह्या सर्दीत ते पण गळाले. पुण्याला माझ्या बहिणिकडे खुप छान काड्या लागतात.
मी कंदं खुप खोलवर खोवायला हवी होती का?
नवीन आणली तर पुन्हा तुम्हाला विचारुन लावेन.

माझ्याही घरी निशिगंधाची पाने भरपूर आली आणि एक तुराहि आलाय पण गेल्या ४-५ महिन्यापासुन तो तेव्हढाच आहे. Sad त्याची काहिच वाढ होत नाहीये. Sad

अर्थात, वातावरण तुम्हाला सहायकच आहे. आम्ही ह्या थंडीत अडकतो. असो, तुमच्या निशिगंधाचा तुरा फुलावा हि शुभेच्छा.

सुमंगल, भारतात एकदा तूरा येऊन गेला की कंद उपटतात. त्यातले कांदे वेगळे करतात आणि सुटे सुटे लावतात, असे आमची माती आमची माणसं मधे सांगितल्याचे आठवतेय.

माझ्यासारख्या माणसाला स्वप्नं तरी कसली पडावीत ? बहरलेल्या झाडांचीच. आज ती स्वप्न पेंटब्रशमधे चितारली. अक्षरशः मिनिटभरात रेखाटली..

हा माझ्या स्वपनातला झकरांदा

हा बहावा उर्फ अमलताश

आणि हा गुलमोहोर

दिनेशदा,
सुंदर चित्रे !
पेंटब्रशमधे चितारलेली झाडे देखील इतकी सुंदर दिसु शकतात हे पहायला मिळालं...
Happy

परवा गावाकडे जाताना रेल्वेतुन गुलमोहराची शेकडो बहरलेली लालभडक झाडे दोन्ही बाजुला पहायला मिळाली, बहुतेक सातार्‍याच्या पुढे ही झाडे जास्त दिसतात,हे पाहताना खुप मस्त वाटल, काही ठिकाणी पाऊस पडुन गेला होता.
गुलमोहराची काही झाडे खुप लालभडक फुले असलेली तर काही कमी लाल असलेली दिसली ...

पण झकरांदाला स्वप्नातील अस म्हणण्याच कारण सांगता येईल का ?

साधना, अगदी याच आकाराचा गुलमोहोर मी पाहिलाय. बहुतेक फोटो पण असणार माझ्याकडे शोधायला हवा. आणि झकरांदा मूळात असाच वाढतो. आपल्याकडे तो उंचाडा होत जातो.

अनिल, गुलमोहोरात दोन छटा असतात. तू लहानपणी पुणे सातारा प्रवास केला असलास तर तूला कदचित आठवत असेल. या रस्त्यावर दोन्ही बाजूने वडाची झाडे होती (हो ज्योतिबाहून कोल्हापूरला जाताना आहेत तशीच ) ती साधारण २००० साली कापण्यात आली. (रस्ता रुंदीच्या कामात.) ते काम चालू असताना मी त्या रस्त्यावरुन प्रवास केला होता. त्या काळात शंभरच्या वर मी कापलेले बुंधे मोजले होते. सगळे मीटरभर व्यासाचे !

यो / जिप्सी, पुर्वी आपल्याकडे लोपामुद्रा नावाची सभासद होती. तिने मला जांभळी झुंबरे असलेल्या झाडाचा फोटो पाठवला होता. शोधून बघतो.

पुर्वी आवडायचा नाही. (आता चालतो) कारणे अशी !
१) तो आपला नाही.
२) त्याची पानगळ उन्हाळ्यात होते. म्हणजे ज्यावेळी सावली हवी असते त्यावेळी त्याच्यावर पाने नसतात.
(आपला पिंपळ, ऐन वैशाखात छान सावली देतो.)
३) त्याचा लालभडक रंग, उन्हाळ्यात डोळ्यांना त्रास देतो.
४) पुर्वी त्याचा अतिरेक झाला होता. मग त्याच्या जोडीला पीतमोहोर आला, आणि दगडापेक्षा वीट मऊ असे झाले.

पण हे पुर्वीचे पुर्वग्रह. आता झाडेच कमी झाल्याने, कुठलीही का असेना, झाडे असावीत असे वाटते.

Pages