निसर्गाच्या गप्पा - २

Submitted by साधना on 10 March, 2011 - 01:21

निसर्गमित्रांनो, इथे आपण आपले निसर्ग प्रकरण मागील पानावरुन पुढे चालु करुया.... Happy

आधीच्या गप्पा -
http://www.maayboli.com/node/21676

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हे बदाम,काजु आणि आक्रोड अशा सारख्या फळांची आवरण खुप कठिण/टणक का असतील बरं ?

अनिल, बदाम,काजु आणि आक्रोड ही फळे नाहीत तर फळांच्या बिया आहेत. या बियांच्या आत जो गर असतो तो आपण खातो. निसर्गाने आपल्यासाठी हा गर किंवा बिया बनवल्या नाहीत तर पुढे जाऊन झाड निर्माण व्हावे यासाठी बनवलाय. आणि बी रुजायला योग्य वातावरण मिळेपर्यंत रुजणारा भाग म्हणजेच गर सुरक्षित राहावा यासाठी वर टणक आवरण.

काय रे जिप्स्या, हिरवा चाफा नाही पाहिला ! पाहिला असशील पण त्याची फूले लवकर दिसत नाहीत म्हणून ओळखला नसशील. हिरवी असताना दिसत नाहीत आणि पिकून पिवळी झाली कि लगेच गळून जातात.

साधना, यावर्षी ओले काजूगर २ रुपये नगानी विकले गेले. काजू फोडायला फुंकणी उत्तम. आता फुंकण्याच दिसणार नाहीत कुठे ! आता काजू बोंडाचा रस बाटलीत पण मिळतो. गोव्याला मिळाला होता. छान लागतो.

जागू, तूमच्या भागात नाहीत का काजूची झाडे ? कोकणापेक्षा लांब अशी झाडे बघितली ती बेळगाव, राधानगरी आणि जव्हार मधे. अनिल बेळगावमधे आहेत कि खूप झाडे.

साधना, सविस्तर खुलाशाबद्दल धन्यवाद.आम्हा पुण्याकडच्या लोकांना काजू बद्दल खरंच इतकी माहिती नसते.ज्यांचे नातेवाईक कोकणात रहातात त्यांना असेल माहिती.आणि आंबा,नारळ,फणस इ. मंडळी कोकणाव्यतिरिक्त दिसतात तरी,पण काजू फक्त कोकणातच! त्यामुळे परत एकदा आभार.
जागू तू सुगरणच आहेस गं.... काजूची उसळ काय,ते ईस्टर साठी केलेले bird's nest काय, मजा आहे बुवा.

साधना,
बेळगावमार्गे तिल्लारीला आणि आजर्‍याला जाताना काही काजुची झाडे पाहायला मिळाली तिही जाता जाता बसच्या खिडकीतुन. (कारण उतरुन बघायच असतं हे आता समजतयं)

शांकली धन्स ग.

दिनेशदा आहेत आमच्याकडे काही भागात काजुची झाडे. पण मी अजुन का लावले नाही ह्याचे मला आता आश्च्यर्य वाटत आहे. आता एखादी काजुची बी घेउन लावतेच. माझ्या ऑफिसच्या एंट्रिला सध्या खुप काजु लागलेत. येता जाता सगळे काठी घेउन त्या झाडाखाली काजु पाडताना दिसतात लोक.

ईस्टर साठी केलेले bird's nest << अहो ते तर लाजो ने केले आहेत नां ??

मी चिपळूण ला गेलो की परशूराम ला पायी जायचो भटकत मामाच्या मुलाबरोबर. जाताना वाटेत कैर्‍या , आणि काजूची बोंडे खुप खाल्लीयेत.

सचिन मी आत्ता तिच पोस्ट टाकायला आले होते की ते ईस्टर साठी केलेले bird's nest मी नव्हते केले. मघाशी लिहता लिहता राहुन गेल.

सॉरी हं! हा माझा वेंधळेपणा म्हणायचा. पण तरी काजूच्या उसळीसाठी जागूला appreciation! लाजो ला राग नाही ना येणार?

जिप्सी, नाही तो जागूच्या फोटोमधलाच. तेच फूल "पिकून" पिवळे होते. खरे तर तसे पिकल्यावरच त्याला जास्त वास येतो, पण ते लगेच गळूनही जाते. मग त्याला हिरवी फळे लागतात, तीपण पिकून पिवळी होतात, त्यांनाही तसाच वास येतो.

सचिन, ते परशुरामाचे मंदीर जंजिर्‍याच्या सिद्दी ने बांधून घेतले असे वाचले मी. मी कधी गेलो नाही तिथे.

युनिसेफ कडून जाहिरात व डोनेशनसाठी एक पाकिट आले. त्यात काही पॅम्प्लेट्स होती व एक १ इंच चौरस आकाराचे छोटुस्से पाकीटही होते. त्यात मॉर्निंग ग्लोरीच्या मोजून ४ बीया होत्या. त्या मी कुंडीत टोचल्या. त्या जर का थोड्या खोल पेरल्या गेल्या असतील तर त्या येतील का?
कारण या बीयांनंतर ३/४ दिवसांनी टोचलेल्या तांबड्या भोपळ्याच्या बीया अगदी मातीची ढेकळे फोडून वर आल्या आहेत. मस्त कोंब दिसताहेत. प्लीज सांगा.
श्रीकांत , जागू मोगर्‍याबद्दल धन्यवाद.

मानुषी, जर त्या बिया उगवायच्या असतील, तर आताही उगवतील.
भोपळ्याच्या वेलीला मात्र श्रावणात चांगले भोपळे लागतील. तोपर्यंत पानांची भाजी होईलच.

वॉव ती ओल्या काजूची उसळ काय झक्कास दिस्तेय जागु. साधना, दादरला ओले काजू मिळतात पण ते जेन्युईन असतात का? की सालंवाले काजू पाण्यात भिजवून विकतात देव जाणे. ते इतके ओलेकंच असतात की जे भारीभक्कम पैसे देतो ते पाण्याचे देतो बहुधा. सालंवाले काजू पाण्यात घालून साधारण तसा इफेक्ट येईल ना?

माझं लहानपण कोकणातच गेल्याने आता त्या सगळ्या जुन्या आठवणि झाल्या. ते ओले काजू, ते वेगळवेगळ्या प्रकारचे काजूची बोंडं . ते लोले काजू फोडण्याची पण वेगळीच पद्धत असते. नाहीतर त्याचा चीक ऊडाला तर काही खरं नाही.
आणि हो, ते फुंकणीचे तर मी विसरलेच होते. फुंकणी किंवा हातोडी ने हळुवारपणे भाजलेले काजू फोडणे
ह्यातील आनंद काय वर्णावा !

मामी, ओले काजू वाळवून ठेवतात आणि मग ते पाण्यात भिजवून विकतात. दादरला जे भिजवलेले मिळतात, ते घेतले तर त्याचा वापर लगेच करावा लागतो. पण त्याच विक्रेत्यांकडे वाळवलेले ओले काजू असतात. त्याचा भाव दुप्पट असतो, पण वर्थ इट. ते आणून आपल्याला हवे तेव्हा भिजवून वापरता येतात.
सालवाले काजू भिजवले तर ती चव येत नाही. पण हा फरक जाणकारांनाच कळतो.

हे माझ्या ऑफीसमधील तमिळ भाषेतील कणी-कोन्ना नावाचे झाड. जानेवारी-एप्रिल पर्यंत नुसत्या शेंगाच असतात. नंतर पिवळ्या रंगाचि फुले व आता हिरवी पाने.Kani-Konna 2_0.JPG

परशुरामाचे मंदीर जंजिर्‍याच्या सिद्दी ने बांधून घेतले<< अरे वा हे माहित नव्हते, आणि त्या वयात एवढी चौकस बुद्दी सुद्धा नव्हती Proud , सगळे लक्ष तिथल्या झाडांवर, आंबे, काजु आणि कोकम शोधण्यात, तिथे पोहोचल्यावर मेन रोड वरच एक घरगुती दुकान आहे तिथे कोकम सरबत प्यायचे मग पुढे परशुराम मंदिरात जाऊन दर्शन घ्यायचे आणि बाहेर पडल्यावर बापटांकडे जाऊन यथेच्च सोलकढी प्यायची हा कार्यक्रम महिन्यातुन दोन वेळा तर होयचाच.

मामी, बर्‍याचश्या हॉटेलात ओल्या काजूच्या नावाखाली तोच प्रकार खपवला जातो.

सचिन, सिद्दी ची मुलगी आणि जावई यांचे जहाज समुद्रात भरकटले होते. त्यावेळी त्याने तिथे नवस केला होता.
देऊळ हिंदूंचे, पैसा मुसलमानाचा आणि ते बांधले किरिस्तांवांनी. त्यामूळे त्यात तिन्ही शैली एकत्र झाल्या होत्या. म्हणजे भिंतीवरील नक्षी, कमानी वगैरे मुसलमानी पद्धतीची (तिथेच बाहेर हातपाय धुण्यासाठी हौद आहे) घुमट युरोपीयन पद्धतीचे आणि देव्हार्‍याचे कोरीवकाम हिंदू पद्धतीचे असे होते तिथे. पण बाबरी प्रकरणानंतर या खुणा नष्ट केल्या गेल्या, असे पण वाचले.

हो, गावी फुंकणीच हाताशी असायची काजु फोडायला.. Happy
गावची फुंकणीही अगदी भरभक्कम असते. कोणाच्या डोक्यात घातली तर पाणी मागणार नाही Happy
मागे मी इथे बेलापुरला शेगडी पेटवत होते पण फुंकणीच नव्हती. पडद्याचा पाईप पडलेला जवळच. तो फुंकणी म्हणुन वापरायचा अयशस्वी प्रयत्न केला गेला Happy

युनिसेफ कडून जाहिरात व डोनेशनसाठी एक पाकिट आले. त्यात काही पॅम्प्लेट्स होती व एक १ इंच चौरस आकाराचे छोटुस्से पाकीटही होते. >>>>> मानुषी, अशाच मी पण पेरल्या होत्या बिया, अगदी नविन कुंडी आणली त्यासाठी. या विचाराने की रोप आल्यावर आपल्याला कळायला हवी, नाहीतर तण समजुन आपणच उपटुन टाकु....... पण..... काहीच उगवल नाही...... शेवटी मागच्या आठवड्यात मिरचीच्या बिया टाकल्या त्याच कुंडीत आणि छान रोप आली आहेत.

साधना, त्या फुंकणीचा आवाज, झालेला धूर, लाकडाच्या जळणाचा वास, काजीच्या देठातून निघून फर्फर पेटणारे तेल.... सगळं जाणवलं.
त्या फुंकणीचे उपयोगही अनेक. काजी फोडायला, लसूण ठेचायला, आठल्या फोडायला आणि हो कुत्रे हाकलायला देखील.

एकंदरीतच तुम्हा कोकणी लोकांची (मला माहित नाही हं की तुम्ही कोकणातले आहात का नाहीत मी आपलं तुमच्या लिखाणावरून तसं म्हणतिये) काहीतरी वेगळीच गम्मत असायची वाटतं.की आम्हा इतर लोकांना जळवण्यासाठी अशा गमती जमती लिहिताय ऑ! फुंकणी म्हणजे काहीतरी सॉल्लिड प्रकार दिसतोय.कुत्र्याला पण हाकलायला वगैरे उपयोग व्हायचा म्हणजे चांगलीच दणकट असणार! गमतीचा भाग सोडल्यास मागचे दिवस आठवून कित्ती मज्जा येते नाही?अजून अशा गमती जमती लिहा नं म्हणजे आम्हाला पण कोकणात गेल्यासारखं वाटेल.

शांकली, मी रुढार्थाने कोकणातली नाहीय. आंबोली तसे घाटमाथ्यावर आहे पण आवडी सगळ्या कोकणीच आहेत, भाषाही तीच..

गावी लोखंडाची जाड फुंकणी असते. आणि सैपाकघरात फुंकण्याव्यतिरिक्त अजुन खुप उपयोग आहेत तिचे.

कुत्र्याचे म्हणाल तर माझ्या जुन्या घरात मी कुत्रे पुढच्या दारातुन आत येऊन मागच्या दाराने बाहेर पडलेले पाहिलेय. ते फिरत फिरत सैपाकघरात गेले असेल तर फुंकणीचा मार नक्कीच खाल्ला असेल.

शांकली, तशी कुठल्याही लहान गावात ती मजा असतेच. तिथले लोक उपलब्ध साधनांचा कल्पक उपयोग करुन घेतात. लहान मूले निसर्गातील घटकांचा खेळण्यासाठी मस्त उपयोग करुन घेतात.
नलिनीने सांगितलेली एक आठवण तर मला विसरताच येणार नाही. चिंचेची साल अखंड काढायची. मग त्यात दूध टाकून (ते तिथे मुबलक असते) ती साल भिंतिला टेकून उभी ठेवायची. थोड्या वेळाने दूध विरजून त्याचे घट्ट दही होते. मग सालीतून अलगद ती दह्याची कवडी काढायची आणि मटकवायची.

Pages