निसर्गाच्या गप्पा - २

Submitted by साधना on 10 March, 2011 - 01:21

निसर्गमित्रांनो, इथे आपण आपले निसर्ग प्रकरण मागील पानावरुन पुढे चालु करुया.... Happy

आधीच्या गप्पा -
http://www.maayboli.com/node/21676

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हेच ते रांजणाचे झाड्,बालाजी मंदिराजवळील.

या शिवाय्,नेरुळ स्टेशनला पश्चिमेस ५०६ नंबरच्या बस थांब्यला लागूनच अजून एक झाड आहे. ते मात्र लहान आहे.

हे रांजण्,ठाण्याला जिल्हा परिषद कार्यालय ते कोर्ट या रस्त्यावर मे अखेरपर्यंत मिळतात. भाव साधारणतः विजय म्हणतात तेवढाच असतो. मात्र आमच्या जत्रेत ही रांजणं,१२० रु.किलोला विकले जात होते.

दिनेशदा,
धन्स ! फुलांचे फोटो अगदी वेगळी आणि खास, तेही आजच्या दिवशी !
Happy

जिप्सी,
या यादींमधला ३. तरवडीचे झुडुप (पिवळे फुल) तेवढा माहित आहे, पानमळ्याभोवती असलेल्या कुंपणात हा एक मुख्य भाग असतो, पानंळ्यातील केळी काढली की फक्त याच तरवड्याची पानांचा उपयोग ती पिकवण्यासाठी होत असलेला लहानपणापासुन पाहिलं आहे.

विजयजी,
धन्स ! रांजण पहिल्यांदाच पाहायला मिळाला !

कैलास धन्यवाद फोटोंबद्दल. मागे तुम्ही अमदाबादी मेवा म्हणुन लिहिलेले. मी रांजणे पाहिली नाहीत अजुन. कदाचित खल्लीही असतील पण वेगळ्या नावाने. आता झाड पाहिन मुद्दाम.. (तरी मला झाड कुठेतरी पाहिल्यासारखे वाटत होतेच.. Happy बहुतेक कोकणात भरपुर आहेत ही झाडे)

आणि जिप्स्याच्या फोटोतली फूले आंबोलीला भरपूर आहेत.

आम्बोलीला अशी दिसणारी फुले खुप होती पण फुलांचा आकार मोठा आणि त्यात केसर भरपुर होते. आपण महिमंडणगडावर पाहिली होती तीच.. फुले येऊन गेल्यावर याला गोल हिरवी फळे लागलेलीही पाहिलीत यावेळी. दिसायला अगदी वाघाटीसारखीच पण काही फळे मोसंब्याएवढी मोठी होती. तुम्ही याचे नाव काहीतरी मडक्यावरुन सांगितलेले (जसे कुंभी तस्सेच काहीतरी) मी फोटो काढला नाही. मी यावेळेस आंबोलीला फिरायला म्हणुन बाहेर पडले तेव्हा रात्र झालेली, त्यामुळे बरेच पाहायचे आणि फोटवायचे राहुन गेले. आता पुढच्या वेळेस उरलेले. आताच आईशी बोलत होते. मे महिन्याच्या शेवटी परत आंबोलीभेटीचा प्रोग्रॅम आखतोय Happy जिप्य्सा, भेट जास्त दिवसांची असेल तर तुला कळवेन. पण मे मध्ये पावसाळा एवढा जोमात नसतो. पावसाळ्यासाठी जुलैमध्ये जाणे योग्य राहिल.

अनिल, धन्यवाद तरवडीच्या माहितीबद्दल. Happy

मे महिन्याच्या शेवटी परत आंबोलीभेटीचा प्रोग्रॅम आखतोय जिप्य्सा, भेट जास्त दिवसांची असेल तर तुला कळवेन.>>>>> साधना, जुलै/ऑगस्ट महिन्याचाच बेत कर. Happy (मे मध्ये १२ दिवस उत्तरांचल टुरवर आहे, परत भटकायला गेलो तर घरातुन हाकलतील. :फिदी:)

जिप्स्या छान. मला तुझ्यासारखे फोटो कधी काढता येतील.
दोन दिवसापूर्वी वारस च्या शोढात असताना हा द्रूष्टीस पडला.वारस वारस म्हणून मी एकदम नाचायलाच लागलो. पण लगेच कळून चूकल की हा त्याचा जूळा भाऊ.छान मंद वासाचा.
समूद्रशींगी. याचेच आणखी दोन भावंड आहेत. मेढशिंगी/भेडशींगी आणि गूड्मूर्की.
समूद्र शींगी . dolichandrone.
rsz_samudrashingi.jpg
हेच फूल थोडे कोमेजले की असे दीसते.
rsz_samudashingi1.jpg
पण छान वारस च्या शॉधात मला खूप झाडे दिसतात.

विजय मेढशिंगी फार दुर्मिळ आहे.
जिप्स्या, तिट लावून टाक बरं झाडांना.

साधना, रांजण नाही मला दिस्ले कधी कोकणात. विकायला तरी नसतात.
आणि वाघाटीचा वेल असतो. त्याच्या फळाचा फोटो विजयनेच दिला होता इथे.
कुंभाची झाडे मोठी असतात. पाने पोपटी आणि मोठी असतात. पण यात फूलांचे २ प्रकार आहेत. एक शूभ्र असतात आणि एकात थोडी गुलाबी छटा असते.याची फळे फिक्क्ट पोपटी रंगांची आणि एखाद्या कुंभासारखीच असतात म्हणून तर हे नाव. पण हे झाड ओळखायची महत्वाची खूण म्हणजे या फूलांना येणारी असह्य दुर्गंधी. साधारण नासलेल्या दूधासारखा गंध असतो हा. पाऊस पडला असेल तर झाडाखालून जाणे अशक्य व्हावे, इतका वाईट असतो.

<<<<<जिप्स्या, तिट लावून टाक बरं झाडांना>>>>> दिनेशदा, अगदि अगदि. काय सुंदर टपोर्‍या कळ्या आहेत ! Happy

दिनेशदा, तुमचा मुचकुंद मला पुण्यातही भेटला अगदी योगायोगाने तेही पुण्याच्या तुळशीबागेजवळ. ईतकी वर्षे जातेय तिथे पण कधी लक्षच गेले नाही

नमस्कार मंडळी,
हे इथे पेस्ट करणं बरोबर आहे का माहित नाही पण, तुम्हाला ही बातमी नक्कीच वाचायला आवडेल

http://epaper.pudhari.com/details.aspx?ID=173998&boxid=12351328&pgno=1&u...

Happy

मंडळी आजच्या मुंबई मिररमधली ही बातमी वाचा. निसर्ग किती किमयागार आहे ना?

Crowds flock to see the world’s smelliest flower

IANS :Posted On Monday, April 25, 2011 at 04:05:31 AM

London The Titan Arum plant, nicknamed the ‘Corpse Flower’ because of its pungent smell of rotting flesh, is in full bloom after 75 years at the University of Basel, Switzerland. It was expected to remain open until Easter Sunday.

The eight-foot plant, indigenous to Indonesia’s rainforests, has the largest unbranched shoot in the world. On average, they bloom once in a decade.

Titan Arum is coveted by collectors and plant enthusiasts around the world because of its strange blooming patterns.

Twelve of them are housed at the Royal Botanic Gardens, Kew, in the Princess of Wales Conservatory among hundreds of other tropical plants, according to Daily Mail.

When the plants are ready to pollinate, the stem heats up to release a pungent smell which lasts for three days.

The largest Arum at Kew gardens weighs 200 pounds and grows quarter of an inch an hour. It guzzles liquid fertiliser and potassium to maintain its strength while bedded in roomy surroundings.

flower.jpg

जिप्सी, विजयजी
अप्रतिम फोटो !
Happy
मेढशिंगी फुल पहिल्यांदाच पाहिलं

जिप्स्या, तिट लावून टाक बरं झाडांना
दिनेशदा,
हे 'तिट' म्हणजे काय कळेल का ?
Happy

मामी,
अजब आणि भन्नाट फुल आहे ...
Happy

आस, त्याची खास फूले बघितली का ?

अनिल, छानच बातमी. त्या बागेत पिवळा टॅबेबुया, मोठी करमळ, सीताअशोक, झकरांदा, तामण, बॉटलब्रश, कैलाशपति, चंदन, कॅशिया, गुलमोहोर अशी अनेक मोठमोठी झाडे आहेत.

मामी, आपल्याकडचे सूरणाचे फूल पण असेच असते. असेच म्हणजे रुपाने, आकाराने नाही. आणि गंधही तोच. मी जागूला सांगून ठेवलेय, फोटो काढायला.
पण टेक्नीकली ते जगातील सगळ्यात मोठे फूल नाही, कारण तो छोट्या फूलांचा गुच्छ आहे. जगातील
सगळ्यात मोठे फूल, म्हणजे Rafflesia हे साधारण ३ फूट व्यासाचे असते.

आस, तुळशीबागेत तर आहेच आणि शिवाय चांदणी चौकातून N D A रोडकडे जायला वळले की (बहुतेक) Lotus Court या हॉटेलसमोर,आणि सहकार नगर नं १ जयशंकर सोसायटीच्या अलिकडे जी ऑलिंपिक बिल्डिंगमधे पण मुचकुंदाचे वृक्ष आहेत.सोललेल्या केळ्यासारखी फुले असतात.आणि वास पण असतो. पण तुळशीबागेतला वृक्ष खूपच मोठा आहे.त्यामानाने हे दोन्ही खूप छोटे आहेत.
मामी खरंच खूप सुंदर फूल.

हे खास विजय साठी, गोव्याच्या पद्धतीचे आंबाड्याचे रायते.

आणि हे साधनासाठी,
कुंभाच्या फूलाचे दोन प्रकार आणि फळे

दिनेशदा,
विजय साठी, गोव्याच्या पद्धतीचे आंबाड्याचे रायते
साधनासाठी, कुंभाच्या फूलाचे दोन प्रकार आणि फळे
आणि
माझ्यासाठी ही यादी मी लिहुन घेतली आहे ..नंतर नक्की उपयोगी पडेल
(पिवळा टॅबेबुया, मोठी करमळ, सीताअशोक, झकरांदा, तामण, बॉटलब्रश, कैलाशपति, चंदन, कॅशिया, गुलमोहोर)
Happy

ह्या शुक्रवारी सकाळी निसर्गाची भटकंती केली. त्यात ही फळे सापडली. हे आंबाडे वाटत नाहीत. कोणी ओळखेल का ? की आंबाडेच आहेत ?

दिनेशदा, शांकली, कधी फुलते हे मुचकुंदाचे झाड? मी नाही पाहिलेय कधी. पण पहायचे मात्र नक्की आहे. मी गेले तेव्हा झाडावर सुकलेल्या फुलांसारखे काहितरी होते .

जागू, वेगळीच फळे आहेत ही. शिवाय मोठी झाल्यावर आणखीनच वेगळी दिसताहेत.
आश, या दिवसातच फूलत असणार. याची पाने मोठी आणि गच्च पर्णसंभार असल्याने फूले झाडाखालून नीट दिसत नाहीत. आणि दुपारपर्यंत कोमेजतातही. म्हणून जवळ एखादी इमारत असेल, तर त्याच्यावरुन बघावे लागेल.
केळ्याच्या सालीसारखी, पिवळट सोनेरी रंगाची बाह्यदले असतात. आणि त्याच्यामधे साधारण धोत्र्याचे फूल जसे असते तसे एक पांढरे फूल असते.
झाडाखाली, केळ्याच्या सालीसारखा कचरा दिसतोय, म्हणजे फूले नक्कीच येत असणार.

केळ्याच्या सालीसारखी, पिवळट सोनेरी रंगाची बाह्यदले असतात. >> हो असे होते झाडावर. पण मी संध्याकाळी ६:३० वाजता बघितले ते झाड म्हणुन मला फुले नाही दिसली कदाचित.

दिनेशदा तसेच मला काल अजुन एक झाड दिसले . सुपारीच्या कुळातले होते. बरेच उंच आणि त्याला लाल रंगाची भरपुर छोटी फळे आली होती. पण कॅमेरा जवळ नसल्याने फोटो नाही काढता आला.

काल आणि आज पुण्यात जॅकरांदाचे झाड पाहिले Happy
आतापर्यंत फोटोतच पाहत होतो काल आणि आज प्रत्यक्ष पहायला मिळाले. Happy
पुण्याला जाताना शिवाजीनगर स्टेशन प्लॅटफॉर्म नंबर १ च्या शेवटी दिसले (लोणावळ्याच्या दिशेने). Happy थोडाफार बहर होता. फलटणवरून परत येताना हडपसर आणि स्वारगेट दरम्यानही थोडाफार फुलोरा असलेली झाडे ५-६ दिसली. :-).

मुंबई-पुणे एक्स्प्रेसवर बहावा मस्तपैकी बहरला आहे. Happy मला एक पांढरा बहावाही दिसला.

(रच्याकने, दिनेशदा चालत्या गाडीतुन ओळखीचे झाड शोधण्याचा तुमचा छंद मलाही जडायला लागला आहे. :-)).

म्हणजे नजर तयार झाली तर. आता प्रवासाची तयारी करायला घेतली असशील ना. कॅमेरासाठी जास्तीची मेमरी कार्डस ने.

Pages