Submitted by साधना on 10 March, 2011 - 01:21
निसर्गमित्रांनो, इथे आपण आपले निसर्ग प्रकरण मागील पानावरुन पुढे चालु करुया....
आधीच्या गप्पा -
http://www.maayboli.com/node/21676
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
शांकली मी पण तिथूनच आणले आहे
शांकली मी पण तिथूनच आणले आहे ते झाड. आणि हो ह्याचा पण रंग फिकुट्तो नंतर फूल सूकताना.
अगदि सफेद होतो.
कृपया ही वेल कोणती हे सांगा
कृपया ही वेल कोणती हे सांगा ना -
अनिल,confer cone हा एक
अनिल,confer cone हा एक प्रकारचा बी धारक असतो.बराचसा टणक असतो. त्यात खूप बिया असतात.सूचिपर्णि वृक्षांवर हे बी धारक असतात. खरंतर बी धारक हा नेमका मराठी शब्द नाही,पण मला हाच शब्द सुचला.
शांकली, पाने कलिंगडाच्या
शांकली, पाने कलिंगडाच्या पानासरखी दिसताहेत. त्या वर्गातीलच वेल असावा.
कुंडीत कदाचित टरबुजाच्या बिया
कुंडीत कदाचित टरबुजाच्या बिया पडल्या होत्या त्या रुजल्या असाव्यात वाटतं, कारण माझ्या मुलींनी तुला आवडतात ना वेली असं म्हणून कुठल्यातरी बिया कुंडीत टाकल्या होत्या (बहुधा त्या टरबुजाच्या असाव्यात). म्हणून मुद्दाम पाना-फुलासकट फोटो टाकला.
दिनेशदा,गोरखचिंच आणि या वेलीचे फोटो अपलोड मात्र नवर्याने करून दिलेत.)कालची comment वाचल्याचा परिणाम!)
मझ्याकडेही यावर्षी मे फ्लॉवर
मझ्याकडेही यावर्षी मे फ्लॉवर आलय, मी विचारणार त्याच दिवशी जागूनी फोटो टाकला आणि आयतीच माहिती मिळाली. हल्ली ऑफिसातून लिहिता येत नाही.
सुधीर
शांकली तो वेल टरबुजाचाच
शांकली तो वेल टरबुजाचाच आहे.
जो![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
शांकली मला गोरखचिंचेचा फोटो
शांकली मला गोरखचिंचेचा फोटो दसत नाही.
उजु, गोरखचिंचेचे फोटो प्रकाश
उजु,
गोरखचिंचेचे फोटो प्रकाश चित्र या सदरात बघ.
शांकली, धन्स. वेल कलिंगडाची
शांकली,
धन्स.
वेल कलिंगडाची वाटते.
अनिल, धन्यवाद कशाबद्दल?
अनिल, धन्यवाद कशाबद्दल?
आजच मित्राच्या कॉलेज मध्ये
आजच मित्राच्या कॉलेज मध्ये जाणे झाले. ( तो प्राचार्य आहे )
तेथे आवारात ही फुले दिसली.रंगसंगती एकदम मोहक वाटली.
ह्या झाडाला /फुलाला काय म्हणतात?
गोल्डन ड्युरांटा
गोल्डन ड्युरांटा
शांकली माझ्याकडेही कलिंगडाचे
शांकली माझ्याकडेही कलिंगडाचे वेल आले आहेत![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
हो, वरचा गोल्डन ड्युरांटाच आहे. आपल्याकडे बागेच्या चौकोनी महिरपीसाठी नी कुंपणासाठी बहुतेक वेळा ह्याला नी माल्पिजीयाला वापरतात. खुप छान दिसतो.
ही फळे सुद्धा कसली ते प्लीज
ही फळे सुद्धा कसली ते प्लीज सांगा.
गोल्डन ड्युरांटा माझ्याकडे
गोल्डन ड्युरांटा माझ्याकडे आधी भरपुर होता. पण त्याच्यामुळे दुसरी झाड झाकली जायची. म्हणुन मीकाढायला सांगितला अजुन २-३ झाडे आहेत. ह्याची फुले खरच खुप मोहक असतात. मलाही खुप आवडतात. कुंपणाला किंवा एखादी किनार आखण्यासाठी ह्याचा चांगला वापर होतो. पानेही पोपटी छान दिसतात. मी तर फुलांबरोबर प्लॉवरपॉटमध्येही लावते कधी कधी. पण हे लावल्यावर त्यांची सारखी छाटणी करावी लागते.
शायर अनोखे आहे झाड. अशी फळे
शायर अनोखे आहे झाड. अशी फळे येणारी काहि झाडे माहित आहेत. पण हे त्यातले नव्हे. फूलांवरुन ओळखता आले असते कदाचित.
झाडाची फळे हीच त्याची फुले
झाडाची फळे हीच त्याची फुले आहेत बहुतेक. एवढी फळे तीही अगदी बालपणापासुन ती पिकलेल्या म्हातारपणात अशा वेगवेगळ्या रुपात तरीही एकही फुल फुललेले किंवा कोमेजलेले नाही असे होणारच नाही...
ficus family तले असावे का?
ficus family तले असावे का? फळांवरून (की फुलांवरून) तसे वाटतेय.
माझ्या ऑफिसच्या जवळ ह्या
माझ्या ऑफिसच्या जवळ ह्या फुलांची वेल आहे. नाव आहे विलायती वाकुंदी/Cryptostegia grandiflora आत्ता पावसाळ्यात ही वेल फुलांनी अगदी डवरलेली असते.अगदी सौम्य आणि फिकट जांभळा रंग त्या हिरव्याकंच पानांवर अगदी उठून दिसतो.
आणि ही तिची कळी!
हा वावळ/Holoptelea integrifolia. माझ्या ऑफिसच्या दारातच आहे.जवळ जवळ २०/२५ मीटर उंच आहे हा. श्री. महाजनसर याला पुण्याचा ग्रामवृक्ष म्हणतात.याच्या बुंध्याचा घेर अंदाजे १ मीटर असावा.याची फुलं इतकी छोटी असतात की पानांच्या गर्दीत दिसतच नाहीत. पण याच्या बिया मात्र दिसतात.त्या पंखधारी असतात.
वावळाच्या पानांचा त्यातल्या त्यात जरा जवळून घेऊ शकलेला फोटो.
शांकली पहिलांदाच पाहीला हा
शांकली पहिलांदाच पाहीला हा वावळ.
शांकली, हो फुले आकारानी साधी
शांकली, हो फुले आकारानी साधी असली तरी रंग मोहक असतो. आणि बराच वेळ अशी टवटवीत असतात. पण रंग इथे दिसतोय त्यापेक्षा किंचीत गडद असतो ना ? काही काही फुलांचे नेमके रंग फोटोत पकडता येत नाही.
हुश्श. झाल सगळं वाचून. दोन
हुश्श. झाल सगळं वाचून. दोन दिवसात २ महिन्यांच वाचून काढल.![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
दिनेशदा, जागू, साधना, जिप्सी, शंकली, उजू, अनिल, आर्या, डॉक्टरसाहेब, शायर, आणि सर्व मंडळी, सर्वांना धन्यवाद. खूप खूप फोटो आणि माहीती दिल्याबद्दल. आता दररोज वाचणार. (लिहिलेले वाचणार :खोखो:)
अगदी बरोबर दिनेशदा,नेमके रंग
अगदी बरोबर दिनेशदा,नेमके रंग कॅमेर्यात खरंच पकडता येत नाहीत, आणि आपल्या डोळ्यांच्या लेन्स जे 'बघू' शकतात ते कॅमेर्यात पकडणं मला तरी अवघड वाटतं.विलायती वाकुंदी आणि वावळाचे फोटो भर पावसात काढलेत संध्याकाळी. ऑफिसमधले लोक 'हिच्या डोक्यावर परिणाम वगैरे झालाय वाटतं' अशा नजरेनं माझ्याकडे पहात होते. आज २/३ जणांनी सहानुभूतीपूर्वक मला विचारलं सुद्धा are u ok? what were u doing yesterday? मी मनातल्या मनात कपाळाला (माझ्या) हात लावला. तरी मी हार जाणार नाहीये, जमतील तितके वेगळ्या वृक्षांचे फोटो काढण्याचा प्रयत्न करणार आणि इथे अपलोड करणार.
साधना,तू टरबुजं खायला माझ्याकडे ये आणि कलिंगडं खायला मी तुझ्याकडे येईन.
शांकली आम्ही वाट बघतोय
शांकली आम्ही वाट बघतोय वेगवेगळ्या झाडांची.
शांकली, विलायती वाकुंदी ही
शांकली,
विलायती वाकुंदी ही वेल बहुतेक पाहिलयं,याला लहान लालसर्/काळी अगदी लहान फळेही लागतात, याचे देठ,पान तोडले की चिक येतो,याचा चिक बहुतेक विषारी असतो असं लहानपणी ऐकल्यासारख वाटतयं.
ऑफिसमधले लोक 'हिच्या डोक्यावर परिणाम वगैरे झालाय वाटतं' अशा नजरेनं माझ्याकडे पहात होते.
![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
आपल्या सभोताली असणार्या, आपल्या जीवन मरणाशी अगदी जवळचा संबध असणार्या या निसर्गाचा,झाडांचा,पानाफुलांचा गंधही नसणारी (यंत्रवजा) अनेक जिवंत,एकांगी माणसं तर आपल्या अजुबाजुला खुप आहेत,यांचा विचार खुप करण्यात अर्थ नक्कीच नाही.या लोकांच निसर्गाबद्दलच वाचन,अभ्यास माझ्या मते खुप कमी असतो किंवा नसतो यामुळेच त्याच महत्व त्यांना काहीच कळणार नाही,त्यामुळे तुम्ही बिनधास्त फोटो काढत चला.
मी बघा कसे स्वतःला उलटे
मी बघा कसे स्वतःला उलटे टांगून घेतलेअय ते.
![21052011380.jpg](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/u5699/21052011380.jpg)
मला नीट बघायच आहे, हे बघा.
उजु, फुलांची रंगसंगती मस्तच
उजु,
फुलांची रंगसंगती मस्तच आहे.
वर मी जो वेलीचा फोटो टाकलाय तिला आता फळ धरलंय -त्याचा फोटो -
शांकली मस्तच ग. उजु छान फुले
शांकली मस्तच ग.
उजु छान फुले आहेत.
उजु, फोटो छान
उजु,
फोटो छान आलेत.
शांकली,
वाह ! किती छान जवळुन फोटो घेतलाय
वेल किती नाजुक दिसते ना !
Pages