Submitted by साधना on 10 March, 2011 - 01:21
निसर्गमित्रांनो, इथे आपण आपले निसर्ग प्रकरण मागील पानावरुन पुढे चालु करुया....
आधीच्या गप्पा -
http://www.maayboli.com/node/21676
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
ficus family तले असावे का?
ficus family तले असावे का? फळांवरून (की फुलांवरून) तसे वाटतेय.
फळे तशीच आहेत पण पाने मात्र फायकस फॅमिलीतली नाहीत. या फॅमिलीत पानांच्या जागी कोंब येतो, तो मोठा होऊन त्याचे आवरण गळून पडल्यावर पान बाहेर पडते.
अगं, या फुलावर नैसर्गिकरित्या परागीभवन झाले तर छानच, पण ही जर थोडी मोठी होऊन गळून गेली तर पुढच्या वेळेस पेंटब्रशने दुस-या फुलावरचे पराग असल्या फुलांवर शिंपड, म्हणजे तुला कलींगड मिळेल
माझ्या कलिंगडालाही वरच्यासारखी ओव्हरी धरलीय. पण मी परागीभवनाचा प्रयोग केला नाहीय अजुन :
अनिल, तु येऊन गेलास काय मुंबईत? मी गेले दोन दिवस खुप कामात होते त्यामुळे मेल चेकली नाही.
उजु फुले मस्त आहेत. कुठे मिळाली??
वाकुंदी मस्त दिसतेय. वेल बघायला हवी मिळते का ते नर्सरीत.
वावळा इथे खुप आहे नव्च्या मुंबईत. माझ्या ऑफिसच्या दारातही एक आहे. डिसेंबरमध्ये हिरव्यागार बियांनी भरुन गेला होता. नंतर त्या बीया चॉकलेटी होऊन खाली पुंजक्यानी पडल्या होत्या. मी त्या वेचुन त्याचे पंख नी बीवरचा पापुद्रा अलगद काढुन आतली बी खात होते दुपारच्या जेवणानंतर.
हे तारा गावच्या युसुफ मेहेर
हे तारा गावच्या युसुफ मेहेर अली मध्ये सापडलेले झाड. तिथल्या रहिवाश्याला नाव विचारले तेंव्हा त्यानी ह्याचे नाव बिबळा सांगितले.
त्याला छोटी फळे होती आणि देठाला लागुन फुलाचा आकार होता.
आरे वा.. हे झाड मी खुप ठिकाणी
आरे वा.. हे झाड मी खुप ठिकाणी पाहिलेय पण नाव माहित नव्हते.
अगं तारा सेंटरम्ध्ये गांडूळशेतीही करतात, तु पाहिली असशिल. तिथे गांडूळे विकत मिळतात. १० वर्शांपुर्वी रु.४ ला १ गांडुळ होते. ही जरा वेगळ्या जातीची गांडूळे असतात. लांबीला कमी ४-५ इंच आणि थोडीशी जाड. ही कचरा विघटनाचे काम आपल्या नेहमीच्या गांडूळांपेक्षा लवकर करतात. नव्या मुंबईत मला ७-८ इंच लांब पण अगदी दो-याएवढी बारीक गांडूळे दिसतात. गावी मोरीच्या मागे खणलेकी ७-८ इंच लांब आणि चांगलीच जाडजुड गांडूळे मिळायची. (कपडे वाळत घालायच्या दोरीएवढी जाड) ती गांडूळे तुझ्याइथे कदाचित मिळतील. ती सुद्धा कचरा विघटनाचे काम लवकर करतील. आमच्याइथली दो-याएवढी गांडूळे काही कामाची आहेत असे वाटत नाही. मी गो-ग्रीनला जाणार आहे. तेव्हा १०-१२ गांडूळे आणेन विकत
साधना नाही पाहीले ग मी तिथे
साधना नाही पाहीले ग मी तिथे गांडूळ खत. अग तिन ठिकाणी जायचे होते त्यामुळे निवांत पाहताच नाही आलं. मी पण परत जाणार आहे. तेंव्हा आणेन.
@ साधना, वावळा म्हणजे पापणी
@ साधना, वावळा म्हणजे पापणी का? चपटी बी असते. गोल चॉकलेटी वाळलेल्या पानासारखे पुंजक्याने असते, बाजुचे पान काढुन वरील आवरण काढुन मधली चपटी इटुकली पांढरी पिवळी बी खायची तेच का हे?
जागूच्या फोटतल्या झाडाची
जागूच्या फोटतल्या झाडाची फूले, अश्वगंधाच्या फूलासारखीच दिसताहेत अगदी.
साधना, ती गावची कदाचित गांडूळे नसतील. पण मुंबईत दिसतात ती पण खतनिर्मिती करु शकतील. पावसाळा संपत आला कि ती खोल जमिनीत जातात. पण ती असतातच.
वावळचा फोटो जवळुन द्याच
वावळचा फोटो जवळुन द्याच कोणीतरी.
तो केपीचा धागा वाचल्यावर मी
तो केपीचा धागा वाचल्यावर मी घरी एका प्लॅस्टीकच्या बलदिला खाली होल पाडून त्यावर लादीचा छोटा तुकडा टाकला. त्यावर नारळाच्या शेंड्या टाकुन थोडी माती टाकुन दगडांखाली मिळालेली ६-७ गांडळे टाकली व आता त्यावर रोज ओला कचरा टाकतेय. बालदी आता भरत आली आहे. पण गांडूळे छोटीच आहेत.
शायर हटेला यांनी जो फोटो
शायर हटेला यांनी जो फोटो टाकलाय तो फळांचाच आहे,कारण त्याची काही मि.मि.आकाराची फुले आणि त्याच झुडुपाला आलेली लाल फळे पुणे विद्यापिठात पाहिली,त्या फुलाचे फोटो लवकरच अपलोड करीन. आणि गोरखचिंचेच्या पूर्ण झाडाचे फोटो पण त्याच प्र चि मधे टाकलेत.
धन्स शांकली. आणि या बरोबरच या
धन्स शांकली.
आणि या बरोबरच या धाग्यावरील पोस्ट क्र.१००० संपन्न होत आहे.
(No subject)
जागू,तू ज्या झाडाचा फोटो
जागू,तू ज्या झाडाचा फोटो टाकला आहेसना तो बिबळा/बीजा असू शकेल,पण बिबळ्याची फुलं पिवळी असतात आणि हा वृक्ष उन्हाळ्यात फुलतो.याच्या बिया पण वावळाच्या बियांप्रमाणे असतात, पंखधारी.बिबळा म्हणजे Pterocarpus marsupium
जागू, तुमच्या पध्दतीनी
जागू, तुमच्या पध्दतीनी गांडुळं मरुन जाण्याची शक्यता जास्त वाटते. तुमच्या ह्या पध्द्तीनी कंपोस्ट चांगलं होईल.
गांडुळ खत करण्याबाबत काही :
१. या साठी लागण्यार्या बिन विकत आणणं सोयीचं पडतं. कारण त्या जाळीच्या असतात. गांडुळ जिवंत प्राणी. त्याची हवेची गरज आपल्यासारखीच असते.
२. कमीत कमी २ बिन तरी पाहिजेतच.
३. पहिली बिन बरीचशी भरली की मग त्यात गाडुळं आणून टाकावीत. बिनचं झाकण बंद करावं. ( विकतच्या बिनचे हे झाकण सुध्दा जाळीचं असतं. )
४. आता नवीन ओल्या कचर्या साठी दुसरी बिन वापरायला सुरवात करावी.
५. सुमारे तीन आठवड्यांनी पहील्या बिनचं झाकण काढुन अगदी वरच्या थरातली माती हातात घेऊन पहा. किंचित ओलसर , अगदी एकसारखी भुसभुशीत अशी माती मिळेल. हेच गांडुळखत. हे खत म्हणजे काय तर गांडुळांची विष्ठा.
६. गांडुळं वरती टाकल्यामुळे काय होतं, ती जे काय मिळेल ते खात खात, विष्ठा टाकत, खाली खाली जातात. त्यामुळे खताचा थर वरती राहातो आणि गांडुळं खाली राहातात. वरचं खत लागेल तसं काळजीपुर्वक काढावं. असं करत साधारण खालपासुन ३-४ ईंच एवढा थर ठेवून वरचं खत काढून घ्यावं. यात जर एखादं गांडु़ळ आलं तर ते परत बिन मधे टाकून द्यावं.
७. एव्हाना दुसरी बिन ओल्या कचर्याने भरत आली असेल. आता पहिल्या बिन मधला खत काढुन खाली राहिलेला थर, ज्यात गांडुळं आहेत तो, दुसर्या बिन मधे वरती पसरावा. झाकण लावून वरील प्रमाणे खत होण्याची वाट पहावी.
काही उपयुक्त सुचना:
-- ह्या बिन वर थेट पाऊस वा थेट सूर्यप्रकाश पडणार नाही याची काळजी घ्यावी.
-- जाळीचे बिन व जाळीचे झाकण मस्ट आहे. गांडुळांना हवा मिळणे गरजेचे आहे.
--गांडुळांना कागदाचा पुठ्ठा खायला खूप आवडतो. आपल्या वह्यांचे , खोक्यांचे जे पुठ्ठे असतात त्याचे बारीक तुकडे करुन ओल्या कचर्या बरोबरच बिन मधे टाकावेत. ओला कचरा देखील बारीक तुकडे करुन टाकला तर खत होण्याची प्रोसेस वेगाने होते.
--यात गांडुळं मल्टीप्लाय होणं देखील अपेक्षित आहे. म्हण्जे एका बिन मधलं गांडुळ कल्चर दोन बिन मधे टाकता येतं.
हे मी केपींच्या गांडुळ खताच्या धाग्यावर पण टाकते.
माझे काका हे गांडुळ खत बनवत असत. मी त्यांच्याकडे काही दिवस राहिले होते, तेव्हा हे शिकले.
मी स्वतः कंपोस्ट बनवते. अगदी घरगुती पध्दतीने. त्या बद्दल नंतर लिहीते.
शायर हटेला तुम्ही ज्या लाल
शायर हटेला तुम्ही ज्या लाल फळांचा फोटो टाकला होता त्याच्या फुलांचे फोटो इथे देत आहे. पुणे विद्यापिठात हे झुडुप दिसले. पण याचे नाव काही मला माहिती नाही; तेही लवकरच कुणाला तरी विचारून सांगीन.
monalip | 13 June, 2011 -
monalip | 13 June, 2011 - 15:58
@ साधना, वावळा म्हणजे पापणी का? चपटी बी असते. गोल चॉकलेटी वाळलेल्या पानासारखे पुंजक्याने असते, बाजुचे पान काढुन वरील आवरण काढुन मधली चपटी इटुकली पांढरी पिवळी बी खायची तेच का हे>>>>>>>
जागू | 13 June, 2011 - 16:08
वावळचा फोटो जवळुन द्याच कोणीतरी>>>>>
हा घ्या वावळ्याचा फोटो.
शांकली,जागु, अनिल, साधना ती
शांकली,जागु, अनिल, साधना ती फूल मला महाबळेश्वरला होती.
वावळच्या बीया मी पण भरपूर खाल्या आहेत. आधी आमच्या एरीयात वावळच मोठ झाड होत.
शांकली,जागु, अनिल, साधना ती
शांकली,जागु, अनिल, साधना ती फूल मला महाबळेश्वरला होती.
वावळच्या बीया मी पण भरपूर खाल्या आहेत. आधी आमच्या एरीयात वावळच मोठ झाड होत.
शायर हटेलाचे वावळाचे फोटो
शायर हटेलाचे वावळाचे फोटो मस्त आहेत. बेलापुर स्टेशनच्या आवारातही आहे वावळाचे मोठे झाड.
उजू,त्या फुलांना बहुधा
उजू,त्या फुलांना बहुधा महाबळेश्वरमधे dancing balls म्हणतात.काही कळ्या छोट्या बॉल्स सारखा दिसतात, फार सुंदर फूल आहे हे. शायर तुम्ही काढलेले वावळाचे फोटो एकदम छान! स्पष्ट आलेत.
शुगोल, छान माहिती. इथे, हजार
शुगोल, छान माहिती.
इथे, हजार पोस्ट्स झाल्या म्हणून सर्वांना हा गुलाब. हा माझ्या घरासमोरच्या फूटपाथवरच उमलला होता. रोजचेच दृष्य असले तरी माझी उत्सुकता काही कमी होत नाही, प्रत्येक फूल असे हतात घेऊन कुरवाळतोच.
आमच्याकडे या दिवसात आकाश बहुतांशी ढ्गाळच असते. सूर्य क्वचितच दिसतो. पण कधी कधी असे विलोभनीय काहीतरी दिसते. हे ऑफिसमधून बाहेर पडता पडता दिसले. मोबाइलमधून टिपलेय.
तसेच कडक ऊन आणि त्याचवेळी पाऊस असे पण कधीकधी होते. हे माझ्या पश्विमेकडच्या खिडकीतून टिपलेले दृष्य.
आणि त्याचवेळी घराच्या पूर्वेकडच्या खिडकीतून मात्र हा नजारा दिसत होता.
शुगोल खुप खुप छान माहिती
शुगोल खुप खुप छान माहिती सांगितलीस. मला कंपोस्टखताबद्दलही डीटेल हवी आहे. मला वाटत ते माझ्यासाठी जास्त सोयीस्कर आहे.
साधना तसेच सर्व निसर्गप्रेमिंना १००० पोस्टच्या शुभेच्छा.
@ शायर हटेला, तुमच्यासाठी ते
@ शायर हटेला, तुमच्यासाठी ते दिनेशदांनी पाठवलेले गुलाब घ्याच. सही फोटो. मी याला पापणी म्हणायचे. नाव आत्ता कळाले. BTW हे झाड कसे लागते? या बिया रुजतात का फांदी लावतात? अजुन १ अशात मी जिथे मिळेल तिथे हि बी खाउन पाहिली पण ती पुरेशी जाड नसते, तिला दळ नसतो असे का?
दिनेशदा, तुमच्या कडे फुटपाथवर
दिनेशदा, तुमच्या कडे फुटपाथवर गुलाब उगवतात???? ते सुद्धा इतके सुंदर???? : बेशुद्ध पडणारी बाहुली :
त्या वावळाचा उपयोग काये?
त्या वावळाचा उपयोग काये? दिनेशदा तुमची ड्युटी लागली. light घ्या पण माहिती द्या.
ही वावळ कुठेतरी पाहील्यासारखी
ही वावळ कुठेतरी पाहील्यासारखी वाटतात.
मोनालिप, डॉ कैलासांनी इथे
मोनालिप, डॉ कैलासांनी इथे वावळाबद्दल लिहिले होते.
अमि, गुलाबासाठी केनयाची माती आणि हवामान खूप पोषक आहे. इथून खूप निर्यात होते त्यांची. यात खुप रंग दिसतात पण यांना सुगंध अजिबात नसतो. आणि इथल्या बायका केसात फूले माळत नाहीत.
दिनेश्दा मला तुमचा लेख
दिनेश्दा मला तुमचा लेख मिळाला, डॉक. नाही, तुम्ही दिलेल्या नावावरुन गुगलुन काही माहिति मिळाली अजुन त्या लेखात असेल तर वाचायला आवडेल. लिन्क देउ शकाल का?
अरे हो, तुमच्या लेखात डॉक्टरांनी दिलेले फोटो मस्त आहेत.
मोना ती लिंक टाक ना इथे.
मोना ती लिंक टाक ना इथे.
http://www.maayboli.com/node/
http://www.maayboli.com/node/21157 व मी गुगललेल्या काहि -
http://enchantingkerala.org/ayurveda/ayurvedic-medicinal-plants/aavil.php &
http://www.ijddr.in/Dacuments/IJDDR%20JAN-MARCH%202011%20ISSUE%20PDF/NO....
गुगललेली पहिली वर अजुन बर्याच झाडांची माहिती आहे.
धन्स मोना.
धन्स मोना.
Pages