निसर्गाच्या गप्पा - २

Submitted by साधना on 10 March, 2011 - 01:21

निसर्गमित्रांनो, इथे आपण आपले निसर्ग प्रकरण मागील पानावरुन पुढे चालु करुया.... Happy

आधीच्या गप्पा -
http://www.maayboli.com/node/21676

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

झाड दिसल आणि नाव माहित नसेल तर फार बेचैन व्हायला होत ना नाव कळे पर्यंत.
जागू तू पण फोटो टाक , तूझ्या फोटोची क्लॅरीटि चांगली असते.
दिनेशदा नाव सांगा आता ह्याच.
ह्याची फळ पक्षी बहूदा खात नसावेत कारण मी बघितल त्या झाडावर भरपूर फळ होती.

मे फ्लॉवर.
मे महिन्यात वळवाचा पाऊस झाला की ह्याच्या कंदाला कोंब फूटतो, व त्या कोंबालाच हे फूल येते.
कळा धरल्यावरच मग पाने येतात. माझ्याकडे कुंडीत आहे हे झाड.
कुंडीतल्या झाडाला मात्र अंदाजे जूनमध्ये येतात फूले, कारण आपण वर्षभर पाणि देतो ना झाडांना. कदाचित मार्चच्या आसपास पाणि तोड्ले व मे मध्ये परत सूरू केले तर मेमधेच फूलेल कूडींतील झाड.

ह्याला बाजुला कंद फुटत नाही का ? ही माझ्या माहेरी आहे. मागच्या वर्षीही एकच फुल आले होते. ह्यावर्षी पण एकच कोंब वर आला आहे.

जागू, मे फ्लॉवरच म्हणतात. पण मे फ्लॉवर म्हणून आणखी बरीच फूले ओळखली जातात. मी पण काही वर्षांपुर्वी याचा फोटो टाकला होता इथे.
साधना, पार्ले सांताक्रूझ भागात अनेकांच्या घरी दिसतो हा ! एकापेक्षा जास्त फूलेही येतात आणि कंद देखील फूटतात.

बापरे माझ्यासाठी दोन्हीही टोक आहेत ग. बर मी कधी ठाणा किंवा कल्याणला आले तर तुला कळवेन. मला संपर्कातुन नंबर दे तुझा.

जागु,
छान फोटो आलाय ..!
Happy

साधना,
कापुस अगदी (कुणाच तरी ऐकुन) एक प्रयोग म्हणुन केला होता,आमच्या भागात कापुस बघायलाही मिळत नाही अजुन कारण तिकडच हवामान चालत नसणार.
ऊस तर त्या भागात खुपच आहे ,आणि आता इकडच्या नदीकाठच्या बहुतेक जमीनीला (लोकांनादेखील) ऊसाशिवाय पर्यायही नाही अशी परिष्थिती आहे,ऊसदेखील काळजीपुर्वक,जास्त करुन घरच्या लोकांनी राबुन, कष्टाने केला, उत्पादन चांगल निघाल तरच परवडतो नाहीतर आंतरबट्यातच.एकुण शेतीचही तसच आहे.
Happy

उजू, तो गुलाबी फुलांचा गुच्छ आहे ना त्याचे नाव काय आहे? मी त्यातल्या निळ्या रंगाचे रोप आणले होते महाबळेश्वराहून, पण ते फार जगले नाही. तुझे रोप फारच सुंदर दिसतय. आणि रंग पण मस्त आहे. ही फुलं कोमेजताना त्यांचा रंग जरा बदलतो का? माझ्या निळ्या फुलांचा हिरवा व्हायचा.

दिनेशदा,गोरखचिंचेच्या फुलांचा फोटो लवकरच टाकीन,काल खरंतर रविवार होता,जमलं असतं,पण मी फोटोंच्या बाबतीत नवर्‍यावर अवलंबून आहे.त्यामुळे त्याला रविवारी कामाला लावणे म्हणजे एक दिव्यच असते. आता माझी मीच प्रयत्न करीन.शिवाय तो वृक्षही माझ्या ऑफिसच्या जाण्या-येण्याच्या वाटेवर नाहीये.पण तरी मी निश्चयच केलाय स्वतःच फोटो काढून बघण्याचा.

हि तुतारीची फूले आपल्याकडे पण तुरळक दिसतात. इथे मात्र या फूलांना धोत्र्याप्रमाणे समजतात आणि शंकराला वाहतात.

एकेक फूल, सहज १५ ते २ सेमी लांबीचे असते. आणि झाडाला किती लागतात ते बघा.

उजु,जागु,
छान फोटो !
Happy
शांकली, conifer cone हे काय असतं ? त्याचा उपयोग कशासाठी होतो ?
दिनेशदा,
ही मस्त फुले पाहुन आपल्याकडे पावसाळ्यातला येणारा धोतर्‍याचा बहर आठवला.
Happy

पारसी कॉलनीतल्या झाडांची ओळख
वेळः १२ जून २०११ सकाळी ८ वा.
जमायचे ठिकाणः टिळक पुलाजवळचा चंदू हलवाई

जागू, या झाडाला फार नाही पानी घालायचे. त्याला जरा ताण पडू द्यायचा, म्हणजे खोड पोसले जाईल.
माधव, पारसी कॉलनीत ब्रम्हदंड आणि बहावा अगदी बघण्यासारखा आहे.

Pages