हेमलकशाचे श्रमसंस्कार शिबिर
बाबा आमट्यांनी श्रमाला प्रतिष्ठा दिली आणि त्यातूनच आनंदवन, हेमलकसा, सोमनाथ यां ठिकाणी प्रकल्प उभे राहिले. 'श्रम हि है श्रीराम हमारा' हा त्यांचा नारा होता. 'अपंग, कुष्ठरोगी जर असे आदर्श प्रकल्प उभारू शकतात, तर तुम्ही मागे का?', असा सवाल ते नेहमी तरुणांना करत. तरुणांनी श्रमाला महत्त्व द्यावं, घाम गाळावा, हा त्यांचा आग्रह असे. त्यातूनच बाबांनी सोमनाथला श्रमसंस्कार शिबिर सुरू केलं. स्वतः श्रम केल्याशिवाय कष्टकर्यांची दु:खं कळत नाहीत, श्रमाचं महत्त्वही पटत नाही, हे जाणून बाबांनी ही शिबिरं दरवर्षी घेतली जाऊ लागली. या शिबिराला दरवर्षी भारतभरातून लहानमोठी मंडळी हजेरी लावतात. श्रमदान करतात.