श्रेष्ठ रामभक्त श्री लक्ष्मणजी
जनक वचन पूर्ति राघवे शिरोधार्या
सहज वनी निघाले सोडूनी ती अयोध्या
प्रभु तरी मज तुम्ही बंधू सौमित्र बोले
विचरत तुज पाठी काननी सौख्य झाले
रमत न मन भक्ता भोग भिंगुळवाणे
चरण तरी प्रभूचे योगचि मुख्य होणे
समजुत बहु काढी राघवे लक्ष्मणाची
वचन मज निभाया कानने एकलाचि
दृढतर वचनांनी बंधू नाकारिले ते
तुज सह तरी येणे हेचि कर्तव्य साचे
विरघळत प्रभूचे चित्त या भक्त योगे
सहचर सुख मोठे काननी राघवाते
विपरित जरी काही येत दृष्टीपुढे ते
कर तरी पुढती ये घेतसे वार मोठे
चैत्र पहाट
पहाटे शशी बिंब अस्तावताना पिसे लाविते मन्मना हुर्हुरी
सुखावून गात्री जडावून नेत्री दिठीही सख्याची उरी शिर्शीरी
हळू वात मंदावलेला सुखावे उभा वृक्ष डोले सुपर्णातुनी
तनू रोमरोमी हळुवार जागे खुणा रेशमाच्या मऊ स्पर्शुनी
कळी मोगर्याची टपोरी फुलोनी सुवासात न्हाते जरी यामिनी
सुखाच्या तिरी देह निद्रिस्त दोन्ही खुळी कंकणे लोप नादावुनी
उजाडेल आता रवी बिंब पूर्वे दिशा व्यापुनी सर्व तेजाळुनी
उसासून गंधाळुनी म्लान आता निजे मोगरा शांत केसातुनी.....
शरदातील पूनवशशी भासतो कसा।
कोजाग्रती तरी पहात हासतो कसा।।१।।
पिठूर शांत चांदणे धरणीवरी कसे।
वर्षवी तो संजीवनी जागतो कसा।।२।।
रमले की मीत्रसखे नृत्य गायनी ते।
न्याहाळीत प्रियतम सजण पाहतो कसा।।३।।
एकाकी कुणी ललना खिन्न का ऊभी।
तीज प्रियतम विरह अशात दाहतो कसा।।४।।
पूनवअवस परिपाठा जाणतो'विकास'।
नियतीचा खेळ कुणासी ग्रासतो कसा।।५।।
- विकास सोहोनी
दिलीप कुमारचे एवढे जबरदस्त काम क्रांतीमधे झालेले आहे की केवळ त्याच्याबद्दलच्या आदराने बाकी सर्व गोष्टींकडे दुर्लक्ष करावे (सुरूवातीलाच एक संवाद म्हणताना तो स्वतःच्या मुलाला कडेवर घेताना किंचित हसतो, हे इम्प्रोव्हायझेशन नक्कीच त्याचे असणार. असे अनेक सीन्स आहेत), पण हळुहळू इतर जण त्याला वरचढ होतात :). लक्ष्मीकांत प्यारेलाल ची काही श्रवणीय गाणी आहेत ("लुई शमाशा उई" जर स्वतंत्रपणे ऐकले तर "vintage LP" आहे - मस्त ठेका आणि त्याहून जबरी लताचा आवाज), काही गाण्यांतील जमून गेलेली देशभक्तीपर वाक्ये, अशा काही genuine moments चित्रपटात नक्की आहेत. त्यात तेव्हाचा हा अतिप्रचंड हिट चित्रपट.