यामिनी

चैत्र पहाट

Submitted by पुरंदरे शशांक on 28 April, 2022 - 04:01

चैत्र पहाट

पहाटे शशी बिंब अस्तावताना पिसे लाविते मन्मना हुर्हुरी
सुखावून गात्री जडावून नेत्री दिठीही सख्याची उरी शिर्शीरी

हळू वात मंदावलेला सुखावे उभा वृक्ष डोले सुपर्णातुनी
तनू रोमरोमी हळुवार जागे खुणा रेशमाच्या मऊ स्पर्शुनी

कळी मोगर्‍याची टपोरी फुलोनी सुवासात न्हाते जरी यामिनी
सुखाच्या तिरी देह निद्रिस्त दोन्ही खुळी कंकणे लोप नादावुनी

उजाडेल आता रवी बिंब पूर्वे दिशा व्यापुनी सर्व तेजाळुनी
उसासून गंधाळुनी म्लान आता निजे मोगरा शांत केसातुनी.....

Subscribe to RSS - यामिनी