Submitted by पुरंदरे शशांक on 28 April, 2022 - 04:01
चैत्र पहाट
पहाटे शशी बिंब अस्तावताना पिसे लाविते मन्मना हुर्हुरी
सुखावून गात्री जडावून नेत्री दिठीही सख्याची उरी शिर्शीरी
हळू वात मंदावलेला सुखावे उभा वृक्ष डोले सुपर्णातुनी
तनू रोमरोमी हळुवार जागे खुणा रेशमाच्या मऊ स्पर्शुनी
कळी मोगर्याची टपोरी फुलोनी सुवासात न्हाते जरी यामिनी
सुखाच्या तिरी देह निद्रिस्त दोन्ही खुळी कंकणे लोप नादावुनी
उजाडेल आता रवी बिंब पूर्वे दिशा व्यापुनी सर्व तेजाळुनी
उसासून गंधाळुनी म्लान आता निजे मोगरा शांत केसातुनी.....
................,........................
शशी.....चंद्र
पिसे....वेड
हुर्हुरी...हुरहुर
दिठी....नजर
गात्र....अंग
शिर्शीरी....शिरशिरी
वात..... वारा
तनू...तन...शरीर
यामिनी....रात्र
कंकणे....बांगड्या
.............................................
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
सुंदर आणि रोमांचक..
सुंदर आणि रोमांचक..
तुमच्या कविता छान वृत्तबद्ध
तुमच्या कविता छान वृत्तबद्ध असतात. सुंदर!
आहाहा sssss
आहाहा sssss
सुमधूर, नादमय रचना.. अप्रतिम!
सुमधूर, नादमय रचना.. अप्रतिम!
शशांकदा मस्तच आहे कविता.
शशांकदा मस्तच आहे कविता.
छान आहे ही!
छान आहे ही!
सुंदर व समयोचित !
सुंदर व समयोचित !