पाऊस्

नको नको रे पावसा

Submitted by संतोष वाटपाडे on 20 July, 2014 - 03:13

नको नको रे पावसा
माझ्या भुईला भिजवू
लोक पाहतात सारे
नको उगाच लाजवू

तिची ओली झाली साडी
वारा झोंबतो अंगाला
नको पाहू टकमक
तिच्या सोनेरी रंगाला

निथळती कोर्‍या सरी
गोर्‍या गोर्‍या कायेवरी
निळे उत्ताण डोंगर
झाले तेव्हा भरजरी

थेंब साचले चंदेरी
पापणीच्या पानावर
तुझी नजर फ़िरते
ओलावल्या रानावर

केस मोकळे सुटले
पदराचा मेळ नाही
जा रे लबाडा माघारी
पहा वेळकाळ काही

तिने लपावे रे कुठे
आडोशाला घर नाही
तिच्या संयमाला वेड्या
कुणाचीही सर नाही

गेला पाऊस कुणीकडे...शोधूयात? चला...!

Submitted by विज्ञानदासू on 9 July, 2014 - 06:20

लगानच्या "काले मेघा काले मेघा पानी तो बरसा दो..." या गाण्याची प्रचिती सध्या सगळ्यांनाच येत आहे.पण इथे ढग काळे असण्याऐवजी सफेद रंगाचे जमा झाले आहेत.गेल्या वर्षी अशीच स्थिती होती आणि त्याच्याही गेल्यावेळी पाऊस जुलैपर्यंत फरपटत गेला.आता पावसाची तेही मान्सूनसारख्या,ही गत का झाली? कोणी म्हणाले जागतिक तापमान वाढ,कुणी म्हणते प्रदुषण,कुणी जंगलतोड आणखी बरेच काही.माबोवरपण चर्चा झाली,बाहेरही बघितले पण याविषयावर गुरुवर्य डॉ.माधव गाडगीळांचा लेखपण आला,तरीही लोकांना पाऊस रुसला असेच वाटले.

ओळखीचा पाऊस

Submitted by रीया on 2 March, 2012 - 05:32

"ओळखीचा पाऊस"

अशाच एका संध्याकाळी
पाऊस होता मुसळधार
अनोळखी ही नजर माझी
शोधत होती एक आधार

तोच म्हणे पाऊस अचानक
अनोळखी मज म्हणशी का गं
माझीच सखे अनेक रूपे
तुझाच जणू अविभाज्य भाग

मी ही राणी पोटामध्ये
लखलखणारी वीज ठेवतो
तरीही खोट्या आनंदाने
ढगामधुनी गडगडतो

तू ही अशीच ठेवतेस ना ग
हृदयामध्ये दाबून कळ
हास्य घेउनी ओठांवरती
मनामधले झाकतेस वळ

मीही बघ न जमिनीला
भेटायाला वरून येतो
जाताना मी होऊन रिता
तिला प्रफुल्लीत करून जातो

तुझीही ओंजळ संपून जाते
तुझ्याच सार्‍या लोकांसाठी
तुझी स्वप्ने तुझ्या अपेक्षा
तुझ्या मनाची होते माती

वेदनेचे रूप माझे

गुलमोहर: 
Subscribe to RSS - पाऊस्