आपल्या लतादीदी.
त्यांची गाणी कानावर पडलीच नाहीत असा कोणी शोधूनही सापडणार नाही. त्यांच्या चाहत्यांची तर गोष्टच न्यारी! ते येता जाता गाणी ऐकतात, गुणगुणतात, अगदी संग्रही ठेवतात.
तर मग चला, यंदाच्या मराठी भाषा दिवसाच्या निमित्ताने लता मंगेशकरांच्या गाण्यांच्या भेंड्या खेळूया. ह्या गानसम्राज्ञीला आपल्याकडून ही गीत-आदरांजली.
--------------------------------------------------------------
खेळाचे नियम-
१. गाणी/भजन/अभंग मराठी असावीत आणि लता मंगेशकरांनी गायलेली असावीत
२. झब्बू देणाऱ्या/री ने मुखड्याच्या पूर्ण ओळी लिहाव्यात.
मराठी भाषेत अनेक बोलीभाषा अंतर्भूत झाल्या आहेत. अनेक रंगांनी नटलेली गोधडीच जणू! त्यामुळे मराठीमध्ये कितीतरी गोष्टींना, शब्दांना "आमच्या भागात हे असं म्हणतात" असं म्हणून झटक्यात प्रतिशब्द सांगता येतात. गोधडीलाच कुठे कोणी 'वाकळ' म्हणेल, कोणी 'लेपटं' म्हणेल, कोणी आणखी काही म्हणेल. कधीकधी हे शब्द अर्थाला अगदी सारखे नसतीलही, पण एकाच शब्दाच्या किंवा अर्थाच्या अनेक छटा, आणि त्याचबरोबर आपल्या मराठीच्या अंगची समृद्धी ते आपल्याला दाखवून जातात. ह्या मराठी भाषा दिनाच्या निमित्ताने ह्या उपक्रमात आपल्याला असे प्रतिशब्द किंवा सारख्या अर्थाचे शब्द देण्याचा खेळ खेळायचा आहे.
दागिने किंवा अलंकार हे व्यक्तींच्या सौंदर्यात भर टाकतात. त्याचप्रमाणे मराठी भाषेच्या सौंदर्यात भर टाकणारे भाषेचे अलंकारदेखिल आहेत. आपल्यापैकी काहींनी ते शाळेत शिकलेही असतील. मराठी भाषा दिवसाच्या निमित्ताने आपण त्या अलंकारांचे काही खेळ खेळू, म्हणजे ते अलंकार काय आहेत हे कळायला सोपे जाईल आणि जरा मजाही येईल. तसे भाषेचे अलंकार अनेक आहेत, परंतु तूर्तास आपण काही निवडक अलंकार खेळासाठी घेऊ या. २५ फेब्रुवारी ते १ मार्च या काळात रोज एकेका अलंकाराचा खेळ खेळला जाईल.
तर आजचा अलंकार आहे 'अनुप्रास'.
नमस्कार मंडळी,
जगभरात पसरलेल्या मराठी मायबोलीने मराठी माणसांना मायबोलीच्या प्रेमळ धाग्यात गुंफलं आहे. हे अंतर कमी करण्यासाठी आपल्या मायबोली वर साजरे होणारे उत्सव, उपक्रम ह्यांचा महत्वाचा वाटा आहेच.
नवीन आव्हाने स्वीकारत मायबोली वरचे उपक्रम केवळ लिखित स्वरुपात न ठेवता, मायबोलीवरचे साहित्य लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आणखी एक माध्यम वापरायचा प्रयत्न मागील काही वर्षांपासून आपण करत आहोत.
अकार चरणयुगुल | उकार उदर विशाल |
मकार महामंडल | मस्तकाकारे ||
अशा शब्दांत संत ज्ञानेश्वरांनी त्यांच्या कल्पनेतलं श्रीगणेशाचं शब्दचित्र उभं केलं. मराठी भाषा दिवसाच्या निमित्ताने आपल्या बालकलाकरांसाठी संधी आहे आपापल्या कल्पनेतलं चित्र साकार करण्याची. परंतु हे काव्यरुपी चित्र नसून प्रत्यक्ष अक्षरचित्र असणार आहे.
![IMG-20220219-WA0016.jpg](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/u79483/IMG-20220219-WA0016.jpg)
मराठी भाषेवरील प्रेमामुळे, आपुलकीमुळे आपण सर्व कधी ना कधी 'मायबोली' ह्या संस्थळावर आलो. इथले लेख, कथा, कादंबर्या, कविता, गज़ला, उपक्रम, गप्पा, ह्या सगळ्यांमध्ये कुठे तरी आपण रमलो, आणि इथलेच झालो. मराठी भाषेची आवड इथल्या प्रत्येकातच कुठे तरी दडली आहे, आणि ती वेळोवेळी कलागुणांमधून दिसून येते. मराठी जरी आपली भाषा असली, तरी तिची रोजच्या व्यवहारातल्यापेक्षा वेगळी अशी एक गोडी आपण कुठेतरी एखाद्या गाण्याच्या दोन ओळींमध्ये 'अर्थ नवा गीतास मिळावा' अशी अनुभवलेली आहे.
मराठी भाषेत उत्तमोत्तम कवी, गायक ह्यांना तोटा नाही. आपले थोडेसे अधिकच लाड ह्या बाबतीत झाले आहेत की काय, असंही कधीकधी वाटतं. लता मंगेशकर, भीमसेन जोशी ही नावंच घ्या ना! ह्यातले अनेक लोक आता आपल्यात नाहीत. परंतु 'केशवसुत कसले मेले? केशवसुत गातचि बसले!' असं गोविंदाग्रजांनी म्हटलं, तसंच ह्या सार्यांचंही आहे. ह्यातल्या अनेकांची वयंही झाल्याचं आपल्याला कळत नाही, इतकं त्यांच्या शब्दांत आणि गाण्यांत चैतन्य आहे. सरस्वतीची ही मुलं खर्या अर्थाने चिरंजीव झाली आहेत म्हणा ना! असं असलं, तरी रूढार्थाने आपण त्यांची जयंती साजरी करू शकतो, आणि त्यांच्या कलेचा आनंद नव्याने लुटू शकतो, हे तर आहेच.
नमस्कार माबोकर,
'सुचेतस आर्टस' ही अभिवाचन, ऑडिओबुक्स, भाषांतर यामधे काम करणारी संस्था आहे.व आम्ही मराठी भाषा संवर्धनासाठी काम करतोय.
ह्या वर्षी आम्ही प्रथमच 'कविता/गजल सादरीकरण स्पर्धा २०२२' आयोजित करत आहोत.
आपण ह्यात वैयक्तिक किंवा सांघिक भाग घेवू शकता.
अधिक माहितीसाठी मला संपर्क करावा - ७७०९०७३००८ / pisalvinita@gmail.com
नमस्कार,
मायबोलीला ह्यावर्षी तब्बल २५ वर्षॆ पुर्ण झाली आणि मायबोली गणेशोत्सवाचे देखील हे २२ वे वर्ष आहे. २०२१ च्या ह्या गणेशोत्सवातील वेगवेगळ्या उपक्रमांना भरभरुन प्रतिसाद दिल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे मन:पुर्वक अभिनंदन आणि आभार.
एक प्रथा म्हणून तर आहेच पण पडद्याआडचे संयोजकांचे अनुभव आणि आनंद तुम्हा सगळ्यांबरोबर वाटुन घेण्यासाठी मनोगताचे 4 शब्द लिहायला हवेतच.