यंदा गणेशोत्सव ३१ऑगस्टला सुरु होत आहे. मायबोली गणेश उत्सवाचे हे २३ वे वर्ष.
या गणेशोत्सवात माययबोलीला २६ वर्षे पूर्ण होतील. आपल्या सगळ्यांच्या सहभागामुळे आणि सहकार्यामुळे गेली २६ वर्षे मराठीतली पहिली वेबसाईट सुरु आहे.
मायबोली गणेशोत्सव २०२२ साठी ज्या मायबोलीकरांना स्वयंसेवक म्हणून काम करायची इच्छा आहे त्यांनी कृपया या धाग्यावर आपापली नावे कळवावीत. गणेशोत्सवासाठी साधारण महिनाभर दिवसातली काही मिनिटे ते काही तास इतका वेळ द्यावा लागेल. इथे नाव दिलेल्या सभासदांशी प्रशासक संपर्क साधतील.
Submitted by संयोजक-मभादि on 3 March, 2022 - 07:15
नमस्कार मायबोलीकर मंडळी,
मराठी भाषा गौरव दिनाची सांगता झाल्याची घोषणा आता आम्ही संयोजक मंडळ करत आहोत. ज्यांची अभिवाचने अजून प्रकाशित होणे बाकी आहे, ती यथावकाश होतीलच. ह्या निमित्ताने समारोपाचे चार शब्द आम्ही लिहू इच्छितो.
दरवर्षी हा उपक्रम आपण आपल्या मायमराठीवरील प्रेम व्यक्त करायला एक निमित्त म्हणून राबवतो, असे म्हणू शकतो. आपल्या व्यक्तिमत्वाच्या जडणघडणीत महत्वाची भूमिका असणाऱ्या मराठी भाषेच्या सौंदर्यस्थळांची चर्चा घडावी, नवीन माहिती कळावी, अन पुढच्या पिढीला गोडी निर्माण व्हावी हा उद्देश याही वर्षी साध्य झाला. यासाठी नक्कीच आपण सर्व मायबोलीकर कौतुकास पात्र आहात.
माझी पहिली शाळा घाटकोपर , पंतनगर येथील शिवाजी शिक्षण संस्थेची मल्टिपर्पज टेक्निकल हायस्कूल - इन्ग्लिश मिडियम.
माझी पहिली इयत्ता झाली आणि आम्ही बोरिवलीला राहायला आलो. इथे मला जवळच्या इंग्रजी माध्यमाच्या शाळेत प्रवेश मिळाला नाही. त्यामुळे सुविद्या प्रसारक संघाच्या सुविद्यालयात प्रवेश घेतला.
घाटकोपरला असतानाच मी घरीच मराठी लिहायला वाचायला शिकलो होतो, त्यामुळे इथे दुसरीत प्रवेश घेता आला. आता आठवत नाही, पण मराठी लिहायला वाचायला मला माझ्या बहिणीने शिकवले असणार. ती माझ्यापेक्षा दहा वर्षे मोठी. ती मराठी माध्यमातूनच शिकलेली.
मोडी लिपीची अक्षरेही गिरवलेली आठवतात.