नवा धागा काढून लिहिण्याइतका जीव या लेखनात नाही, म्हणून हे मी आधी प्रतिसाद म्हणून लिहिलं होतं या उपक्रमाच्या धाग्यावर. (इतकी वर्षं सुप्तावस्थेत असणार्या आयडीच्या लेखनावर काही प्रतिक्रिया येतील असं मला वाटलं नव्हतं. ) पण हे नव्या धाग्यात हलवावं असं तिथे अनेकांनी सुचवलं. त्यामुळे हा नवा धागा काढतेय.
***
बकेट लिस्ट म्हटलं की काही तरी भव्य दिव्य, सहजी अप्राप्य किंवा खरंच साध्य केल्यावर फार समाधान वगैरे वाटेल अशा लिस्ट माझ्या डोळ्यासमोर येतात. मी आजवरचं आयुष्य 'वन थिंग अॅट अ टाईम'... किंवा 'लिव्हिंग बाय द डे', थोडक्यात अंथरुण पाहुन पाय पसरावे अशा म.म. पणे जगल्याने असेल, किंवा अजुन बकेट लिस्ट करुन एकेक टिक ऑफ करत जाऊया म्हणायचं 'संध्याछाया भिवविती हृदया' वय झालं नसेल म्हणून असेल अशी लिस्ट वगैरे काही बनवली नाहीये, आणि तसं काही करेन असं सध्या वाटत ही नाही. एखादा विचार मनात आला तर तो कल्पनेबाहेरचा असला तर फार वेळ मनात रहातच नाही, आणि शक्य असेल तर पूर्णच करतो.
काहीच सुचत नाहीय. सगळीकडे फक्त अंधारच अंधार. कानावर फक्त पाण्याचा आवाज पडतोय. मनाला एक अनामिक हुरहूर लागून राहिलीय. तेवढ्यात दरवाजा उघडला जातो.
बाहेरून उजेडाचा एक कवडसा आत येतो त्याचवेळेस आतलाही दिवा लागतो. एकदम सगळे प्रकाशीत झाल्याने आजूबाजूला काय आहे ते दिसते. आज कोण जाणार काय माहिती? मी इकडे तिकडे पाहतोय.
डोळ्यांचे हिरवे केस दिसतात, सगळ्या रोमा जागेवर दिसतात. मला जरा बरे वाटते. पण अजून धाकधूक आहेच. तेवढ्यात एक हात आतमध्ये येतो. सगळे एकदम भयचकीत होऊन पहात राहतात.
(मी गणोत्सवानिमित्त एक छोटासा प्रयोग/गंमत केली आहे. एकाच शीर्षकाच्या साधारण समान संकल्पनेला किंवा धारणेला छेद देणाऱ्या दोन कथा एकत्र देऊन पण संयोजकांनी दिलेली वेगवेगळी सुरुवात वापरून ते विच्छेदन अधिक प्रभावी करण्याचा प्रयत्न केला आहे. पहिल्या कथेत देह हीच ओळख मानणारा योगी आणि दुसऱ्यात प्रथमदर्शनी देहाचेच आकर्षण वाटणारी नायिका.....)
देह
काहीच सुचत नाहीय. सगळीकडे फक्त अंधारच अंधार. कानावर फक्त पाण्याचा आवाज पडतोय. मनाला एक अनामिक हुरहूर लागून राहिलीय.
सदस्य झाल्यापासूनचा कालावधी - 11 वर्ष 2 months
म्हणजे माझ्या सदस्यत्वाचा आणि मायबोलीचा कालावधी जवळजवळ सारखाच आहे. कारण ११ गुणिले २ म्हणजे २२ त्यात फक्त ३ मिळवले की आलेच की २५. त्यामुळे मी देखिल आठवणी लिहिण्यास लायक आहे असं मी मानते.
तर..........
काहीच सुचत नाहीय. सगळीकडे फक्त अंधारच अंधार. कानावर फक्त पाण्याचा आवाज पडतोय. मनाला एक अनामिक हुरहूर लागून राहिलीय. तेवढ्यात दरवाजा उघडला जातो.
पाहतो, तर खोलीबाहेर माय उभी. मी डोळ्यांतून जमिनीवर सांडलेलं पाणी पटापट पुसतो. खरं म्हणजे मला आत्ता खोलीत अजून कुणीच नको असतं.
"काय रे, काय झालं? असा एकटा कुढत बसू नकोस."
माझा मायबोली सदस्यत्वाचा कालावधी एक अंकीच आहे पण तरीही या विषयावर आवर्जून लिहावेसे वाटले कारण या उपक्रमासाठी प्रॉम्प्ट म्हणून दिलेले प्रश्न! या प्रश्नांची उत्तरे शोधायला आवडतील असे वाटले त्यामुळे लिहीत आहे. मी माबोवर कशी आले ते आठवत नाही पण सदस्यत्व घेण्याची मुख्य कारणे म्हणजे बेफिकीर आणि नंदिनी यांच्या कथा किंवा कथा मालिका! इतक्या उत्तम लिखाणाला दाद देता यावी म्हणून मी सदस्य झाले. गेल्या आठ वर्षात माझ्या आयुष्यात मायबोलीचे एक स्वतःचे असे हक्काचे स्थान तयार झाले आहे.
गेल्या काही गणेशोत्सवांमधे लोकप्रिय झालेला : खेळ शब्दांचा !
आपण नेहमी वेगवेगळ्या प्रकारांचे झब्बू खेळत असतोच. कधी पत्त्यांचा , कधी गाण्यांचा तर कधी म्हणींचा. या वर्षीही आपण खेळणार आहोत शब्दांचा झब्बू. प्रकार सोप्पा आहे एकदम. दररोज एक विषय असेल. त्याला धरून आपण झब्बू खेळायचा आहे. या उपक्रमातून आपण खेळ तर खेळणार आहोतच त्याचबरोबर वापरात असलेले किंवा नसलेले असे मराठी शब्द वापरणार आहोत. काहींना सगळे शब्द माहिती असतील तर काहींना नवीन शब्द कळतील आणि त्यांचा आपल्या दैनंदिन जीवनात उपयोगही करता येईल.
काही नियम :
१) संयोजक दर दोन दिवसांनी एक विषय देतील.