(मी गणोत्सवानिमित्त एक छोटासा प्रयोग/गंमत केली आहे. एकाच शीर्षकाच्या साधारण समान संकल्पनेला किंवा धारणेला छेद देणाऱ्या दोन कथा एकत्र देऊन पण संयोजकांनी दिलेली वेगवेगळी सुरुवात वापरून ते विच्छेदन अधिक प्रभावी करण्याचा प्रयत्न केला आहे. पहिल्या कथेत देह हीच ओळख मानणारा योगी आणि दुसऱ्यात प्रथमदर्शनी देहाचेच आकर्षण वाटणारी नायिका.....)
देह
काहीच सुचत नाहीय. सगळीकडे फक्त अंधारच अंधार. कानावर फक्त पाण्याचा आवाज पडतोय. मनाला एक अनामिक हुरहूर लागून राहिलीय.
आज ध्यानात मन लागत नाही त्यात तो फकीर. अशी कशी कुणालाही दीक्षा देऊ. बाबाजी ब्राह्ममुहूर्ताला ???...
"अरे मधू, तुला त्याला मार्गदर्शन करायचे होते. तुझ्या नकारामुळे त्याने जलसमाधी घेतलीये".
पण बाबाजी, त्या मुस्लिम फकीरास मी साधनेत सहायता करू शकणार नव्हतो, अपवित्र, अस्वच्छ ,गैरहिंदू अशा पापी व्यक्तीस मदत करून मीही मार्गाहून पदच्युत झालो असतो.
"मधू, तुझे या जन्मातले तप या अपराधाने नष्ट झाले आहे. आता तुला या फकीराच्या धर्मात जन्म घेऊन त्याच्याप्रमाणे अनंत अडचणींचा सामना करावा लागेल."
जशी आपली आज्ञा बाबाजी , माझा अपराध मला उमगला. हा देह मी अलकनंदेला अर्पण करून पुन्हा येईन तेव्हाही तुम्हीच माझे गुरू व्हावे ही प्रार्थना !!
तथास्तु.
डुबूक्क.........
***************
देहच
"गाडीत एकटी, दूरचा प्रवास आणि हवी ती गाणी लावायचं स्वातंत्र्य. अजून काय हवं असं वाटत असतानाच समोर लक्ष गेलं आणि ..."
(देऊ का याला लिफ्ट , हॉट टूरिस्ट दिसतोय.)
हाय , माझे नाव अनिका !
मी निखिल , मला एअरपोर्टवर सोडशील का?!
हो ये ना, ती backpack जरा मागे टाक आणि तिथे बस.
मी इथे हॉस्पिटलमध्ये माझ्या मामाला भेटायला आले होते. आज मी खूप खूश आहे कारण तो बरा होत आहे. We can have drinks if you like...
नाही,... सध्या औषधं चालू आहेत.
नो प्रॉब्लेम ड्यूड.
मी महिन्याभरापूर्वी प्रागला आलो होतो. फिरायलाच. हे फ्लायर एअरपोर्टवर बघितलं, आणि परत थांबलो.
कसलं फ्लायर...
तू नंतर बघ, मी bags घेऊन उतरतो. थँक्यू फॉर द राईड, अनिका !!
स्पायनल सेल डोनेशन!!!
याच्यामुळे आज माझा मामा..... आणि मी आभार सुद्धा ....... निखीSSSSल......
-------
©अस्मिता
मायबोली गणेशोत्सव २०२१
दोन्ही छान आहेत.
दोन्ही छान आहेत.
छान !
छान !
पहिली सुरुवात करताच ओळख पटली.
हे असं वाचलं की हरवायला होतं.
मस्त ग!
मस्त ग!
दोन्ही छान आहेत.
दोन्ही छान आहेत.
दुसरी जास्त आवडली.
दुसरी जास्त आवडली.
>>तप या अपराधाने नष्ट झाले आहे. आता तुला या फकीराच्या धर्मात जन्म घेऊन>> यात चटकन अपराधाचे प्रायश्चित्त म्हणून फकिराच्या धर्मात जन्म असं कनोटेशन डोक्यात आलं. प्रायश्चित्त 'अनंत अडचणींचा सामना' हे अर्थात तुला म्हणायचं आहे हे समजलं, पण टिपिकल स्टोरिओटाईप असेल, किंवा आधीच्याच वाक्यात मुस्लिम स्टिरिओटाईप अधोरेखित झाला असेल म्हणून असेल, किंवा आधी इतका द्वेषपूर्ण बोलणारा माणूस दुसर्या क्षणाला अपराध उमगला म्हणतो म्हणून असेल थोडं निगेटिव्ह वाटलंच. मा.बु.दो.
आवडल्या. दोन वेगळ्या
आवडल्या. दोन वेगळ्या सुरवातींवर एकाच शिर्षकाची शशक लिहीण्याची आयडिया भारीच आहे.
दोन्ही मस्त.
दोन्ही मस्त.
काय मस्त पुस्तक दिसतय गं. तू
काय मस्त पुस्तक दिसतय गं. तू वाचलयस?
_______________
कदाचित मी खरेदी करेन. ९८%
दोन्ही आवडल्या
दोन्ही आवडल्या
दोन्ही चांगल्या जमल्यात
दोन्ही चांगल्या जमल्यात
सर्वांचे आभार.
सर्वांचे आभार.
बु.दो. वगैरे काही नाही अमित , दोन पुस्तकांचे वरवरचे सार आहे त्यामुळे शतशब्दात पोचूच शकत नाही म्हणून ते असे अकस्मात/abrupt वगैरे वाटू शकते. बाबाजीचे आणि मधूचे नाते आणि जन्मोजन्मी वेगवेगळ्या दुराग्रहांमुळे आलेल्या अडचणी यावर मिनमिनता प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केलायं. मी केवळ We are all connected on a higher level of consciousness
हे अधोरेखित केलंय.
सामो, निरंतर सफर व हिमालयवासी गुरूच्या योगी शिष्याचे आत्मकथन हेही वाच.
नक्की अस्मिता.
नक्की अस्मिता. अगं त्या श्री एम यांची बरीच पुस्तकं दिसतायत.
दोन्ही छान
दोन्ही छान
दोन्ही शशक मस्त!
दोन्ही शशक मस्त!
दोन्ही छान.
दोन्ही छान.
अफाट कल्पनाशक्ती...!
अफाट कल्पनाशक्ती...!
छानच लिहिल्या आहेत दोन्ही कथा..!!
संकल्पना चांगली आहे.
संकल्पना चांगली आहे.
रच्याकने -
'पण संयोजकांनी दिलेली वेगवेगळी सुरुवात वापरून ते विच्छेदन अधिक प्रभावी करण्याचा प्रयत्न'
मधील विच्छेदन म्हणजे काय ?
अमितवशी काहीशी सहमत.
अमितवशी काहीशी सहमत.
मला दुसरी कथा जास्त आवडली.
दोन्ही शशक आवडल्या.
दोन्ही शशक आवडल्या.
सर्वांचे आभार.
सर्वांचे आभार.
हे ते विच्छेदन>>>
समान संकल्पनेला किंवा धारणेला छेद देणाऱ्या एकाच शीर्षकाच्या दोन कथा एकत्रितपणे लिहिणे .
कळलं अस्मिता. धन्यवाद.
ओह ओके आता कळलं अस्मिता.
धन्यवाद.
हर्पेन
हर्पेन
देह आहे विच्छेदन लागणारच...
देह आहे विच्छेदन लागणारच...
छान आहेत दोन्ही शशक.
छान आहेत. हटके कल्पना आहे
छान आहेत. हटके कल्पना आहे
ईसी बात पे माझीही रिक्षा फिरवतो..
मी मागे एकदा लाडका या एका शीर्षकाच्या /संकल्पनेच्या तीन शशक लिहिल्या होत्या ते आठवले
तिहेरी शतशब्दकथा - लाडका - लाडका - लाडकी
https://www.maayboli.com/node/45405