आपल्या लतादीदी.
त्यांची गाणी कानावर पडलीच नाहीत असा कोणी शोधूनही सापडणार नाही. त्यांच्या चाहत्यांची तर गोष्टच न्यारी! ते येता जाता गाणी ऐकतात, गुणगुणतात, अगदी संग्रही ठेवतात.
तर मग चला, यंदाच्या मराठी भाषा दिवसाच्या निमित्ताने लता मंगेशकरांच्या गाण्यांच्या भेंड्या खेळूया. ह्या गानसम्राज्ञीला आपल्याकडून ही गीत-आदरांजली.
--------------------------------------------------------------
खेळाचे नियम-
१. गाणी/भजन/अभंग मराठी असावीत आणि लता मंगेशकरांनी गायलेली असावीत
२. झब्बू देणाऱ्या/री ने मुखड्याच्या पूर्ण ओळी लिहाव्यात.
३. भेंड्या २ प्रकारे खेळू शकता :
अ- पारंपरिक पद्धतीने, म्हणजे शेवटच्या अक्षरावरून पुढचे गाणे
ब- मुखड्यातील कुठल्याही शब्दापासून पुढील गाणे लिहा
उदा-
'असा बेभान हा वारा, कुठे ही नाव नेऊ
नदीला पूर आलेला, कशी येऊ,कशी येऊ'
यातील 'कशी' ह्या शब्दाचा उल्लेख करून पुढील झब्बू
' बाळा होऊ कशी उतराई
तुझ्यामुळे मी झाले आई'
अर्थात तो शब्द,मुखड्यातच असावा.
वरीलपैकी कुठल्याही एका पद्धतीने पुढचं गाणं दिलंत तरी चालेल
४. एकाचवेळी एकाहून अधिक जणांकडून गाणी आल्यास पाहिजे ते गाणे पकडून पुढे खेळ चालू ठेवता येईल.
५. शब्दाची पुनरावृत्ती झाली तर चालेल, परंतु गाणं वेगळं असावं.
मग रंगू देत गाण्याची मैफल.
सुरुवात करायला, वरचे 'बाळा होऊ कशी उतराई' हे गीत घेऊ शकता.
प्रेमस्वरूप आई वात्सल्यसिंधू
प्रेमस्वरूप आई वात्सल्यसिंधू आई
बोलावू तूज आता मी कोणत्या उपायी
या चिमण्यांनो परत फिरा रे,
या चिमण्यांनो परत फिरा रे, घराकडे अपुल्या
जाहल्या तिन्हीसांजा जाहल्या
मी सोडून सारी लाज..
मी सोडून सारी लाज..
अशी बेभान नाचले आज कि घुंगरू तुटले रे..
तिन्हीसांजा सखे मिळाल्या, देई
तिन्हीसांजा सखे मिळाल्या, देई वचन तुला
आजपासुनी जिवे अधिक तू, माझ्या हृदयाला
लटपट लटपट तुझं चालणं मोठ्या
लटपट लटपट तुझं चालणं मोठ्या नखऱ्याच , बोलणं ग मंजुळ मैनेच
बाई ग , बाई ग ग बाई ग
बाई बाई, मनमोराचा
बाई बाई, मनमोराचा
कसा पिसारा फुलला
बाई बाई मनमोराचा कसा पिसारा
मोगरा फुलला मोगरा फुलला
फुले वेचिता बहरु कळियासी आला
मोगरा
मोगरा
माळ्याच्या मळ्यामंदी पाटाचं पानी जातं
गुलाब जाई जुई मोगरा फुलवितं
लेक लाडकी या घरची
लेक लाडकी या घरची
होणार सून मी त्या घरची
चिंब पावसानं रान झालं आबादानी
चिंब पावसानं रान झालं आबादानी
झाकू कशी पाठीवरली..चांदनगोंदनी बाई
वादलवारं सुटल ग, वार्यानं
वादलवारं सुटल ग, वार्यानं तुफान उठलं ग
भिरभिर वार्यात, पावसाच्या मार्यात, सजनानं होडीला पान्यात लोटलं
वादलवारं सुटलं ग
गजानना श्रीगणराया
गजानना श्रीगणराया
आधी वंदू तुज मोरया
बाई
....
तुज मागतो मी आता
तुज मागतो मी आता
मग द्यावे एकदंता
तुज मागतो मी आता मज ध्यावे
मी काट्यातून चालून थकले
तू घोड्यावर भरदारी
माझ्या ढोलावरी जीत ही
नगं दाखवू तू शिरजोरी
मी
मी
मी रात टाकली
मी कात टाकली
मी मोडक्या संसाराची बाई लाज टाकली
बाई
बाई
बाळगू कशाला व्यर्थ कुणाची भीती गं
बाई जडली आताss दोन जिवांची प्रीती गं
बाई गं, बाई गं
जीव
जीव
किती जिवाला राखायचं राखलं
राया तुम्ही जाळ्यात पाखरू टाकलं
वारा गाई गाणे, प्रीतीचे तराणे
वारा गाई गाणे, प्रीतीचे तराणे
धुंद आज वेली, धुंद फुल पाने
नववधू प्रिया मी बावरते
नववधू प्रिया मी बावरते
लाजते, पुढे सरते
शोधू मी कुठे कशी प्रिया तुला
प्रिया
शोधू मी कुठे कशी प्रिया तुला
प्रीती का देई साद ही, मजला...
ही
ही
हा महाल कसला, रानझाडी ही दाट
अंधार रातीचा कुठं दिसंना वाट
कुणा द्वाडानं घातला घाव, केली कशी करणी
सख्या रे घायाळ मी हरिणी
निळ्या आभाळी कातर वेळी चांद
निळ्या आभाळी कातर वेळी चांद चांदणे हसते
मी हुरहुरते मनात झुरते दूर गेले पती
तिन्हीसांजा सखे मिळाल्या
तिन्हीसांजा सखे मिळाल्या,
देई वचन तुला.
आजपासुनी जीवे अधिक,
तू माझ्या हृदयाला.
चांद मातला, मातला त्याला कशी
चांद मातला, मातला त्याला कशी आवरू
अंगी वणवा चेतला, मला कशी सावरू
सावर रे सावर रे उंच उंच झुला
सावर रे सावर रे उंच उंच झुला
सुख मला भिवविते सांगू कसे तुला
कोणाचे धरायचे ते सांगा. मी
कोणाचे धरायचे ते सांगा. मी आधी दोन ओळी लिहून घेतल्या होत्या मग उरलेल्या दोन लिहिल्या.
मला
मला
दे मला गे चंद्रिके प्रीती तुझी
रानहरिणी दे गडे भीती तुझी
अन्जू, वरती पाहता हे गाणे
अन्जू, वरती पाहता हे गाणे भरत यांनी आधीच लिहून झालंय.
झुलतो बाई रास झुला झुलतो बाई रास झुला
नभ निळे रात निळी कान्हाही निळा
सुख येता माझ्या दारी
सुख येता माझ्या दारी
सुखासवे तो उदया येईल
सुखासवे तो उदया येईल दिन सोन्याचा संसारी
Pages