मराठी भाषा दिवस २०२२ - उपक्रम - लता मंगेशकरांच्या गाण्यांच्या भेंड्या

Submitted by संयोजक-मभादि on 25 February, 2022 - 01:50

आपल्या लतादीदी.

त्यांची गाणी कानावर पडलीच नाहीत असा कोणी शोधूनही सापडणार नाही. त्यांच्या चाहत्यांची तर गोष्टच न्यारी! ते येता जाता गाणी ऐकतात, गुणगुणतात, अगदी संग्रही ठेवतात.

तर मग चला, यंदाच्या मराठी भाषा दिवसाच्या निमित्ताने लता मंगेशकरांच्या गाण्यांच्या भेंड्या खेळूया. ह्या गानसम्राज्ञीला आपल्याकडून ही गीत-आदरांजली.
--------------------------------------------------------------
खेळाचे नियम-

१. गाणी/भजन/अभंग मराठी असावीत आणि लता मंगेशकरांनी गायलेली असावीत

२. झब्बू देणाऱ्या/री ने मुखड्याच्या पूर्ण ओळी लिहाव्यात.

३. भेंड्या २ प्रकारे खेळू शकता :
अ- पारंपरिक पद्धतीने, म्हणजे शेवटच्या अक्षरावरून पुढचे गाणे

ब- मुखड्यातील कुठल्याही शब्दापासून पुढील गाणे लिहा
उदा-
'असा बेभान हा वारा, कुठे ही नाव नेऊ
नदीला पूर आलेला, कशी येऊ,कशी येऊ'

यातील 'कशी' ह्या शब्दाचा उल्लेख करून पुढील झब्बू

' बाळा होऊ कशी उतराई
तुझ्यामुळे मी झाले आई'

अर्थात तो शब्द,मुखड्यातच असावा.

वरीलपैकी कुठल्याही एका पद्धतीने पुढचं गाणं दिलंत तरी चालेल

४. एकाचवेळी एकाहून अधिक जणांकडून गाणी आल्यास पाहिजे ते गाणे पकडून पुढे खेळ चालू ठेवता येईल.

५. शब्दाची पुनरावृत्ती झाली तर चालेल, परंतु गाणं वेगळं असावं.

मग रंगू देत गाण्याची मैफल.

सुरुवात करायला, वरचे 'बाळा होऊ कशी उतराई' हे गीत घेऊ शकता.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

माझे हा शब्द घेऊन(माझ्या ऐवजी)
किंवा आता शब्द पण आहे आधीच्या गाण्यात(मागील पान शेवटचे गाणे)

आता विसाव्यांचे क्षण माझे
सोन्याचे मणी
सुखे गोवीत गोवीत त्यांची
ओढतो स्मरणी
(कालच पहिल्यांदा ऐकलं, माहीत नव्हतं)

सोनियाचे मणी असा शब्द आहे.. म्हणून सोनियाचे शब्द घेऊन पुढचं गाणं >>
अजि सोनियाचा दिनु,
वर्षे अमृताचा घनु
पाहिला रे हरि पाहिला रे
सबाह्यअभ्यंतरी अवघा व्यापक मुरारी

हरी

आज गोकुळात रंग खेळतो हरी
राधिके जरा जपून जा तुझ्या घरी

तुझ्या
गोड तुझ्या त्या स्वप्‍नामधली
दाखव मजला तुझी माऊली

घट
घट डोईवर घट कमरेवर
सोडी पदरा नंदलाला

रे
भावभोळ्या भक्तीची ही एकतारी
भावनांचा तू भुकेला रे मुरारी

दिवस बदलला की झालेली गाणी पुन्हा चालतात का ?
तसे असेल तर, मी हर्पेनना उगाच सांगितले..... माफ करा हर्पेन

तू

कोकिळ कुहुकुहु बोले
तू माझा तुझी मी झाले

राहिले

जाहल्या काही चुका अन् सूर काही राहिले
तू दिलेले गीत माझे आवडीने गायिले

गीत -गीते
भय इथले संपत नाही
मज तुझी आठवण येते
मी संध्याकाळी गातो
तू मला शिकविली गीते

मी -->
प्रेम तुझ्यावर करिते मी रे
सांगितल्याविण ओळख तू रे

प्रेम

प्रेमा काय देऊ तुला
भाग्य दिले तू मला

तुला

ऐरणीच्या देवा तुला ठिणगी ठिणगी वाहू दे
आभाळागत माया तुझी आम्हावरी राहू दे

तुला
आज गुज सांगते तुला, छंद एक लागला मला
पहाटची उठून मी उगीच चुंबिते फुला फुला

फुला -

जाहली जागी पंचवटी
कळ्या फुलांचे सडे सांडले झाडांच्या तळवटी

Pages