मराठी भाषा दिवस २०२२ - उपक्रम - लता मंगेशकरांच्या गाण्यांच्या भेंड्या
Submitted by संयोजक-मभादि on 25 February, 2022 - 01:50
आपल्या लतादीदी.
त्यांची गाणी कानावर पडलीच नाहीत असा कोणी शोधूनही सापडणार नाही. त्यांच्या चाहत्यांची तर गोष्टच न्यारी! ते येता जाता गाणी ऐकतात, गुणगुणतात, अगदी संग्रही ठेवतात.
तर मग चला, यंदाच्या मराठी भाषा दिवसाच्या निमित्ताने लता मंगेशकरांच्या गाण्यांच्या भेंड्या खेळूया. ह्या गानसम्राज्ञीला आपल्याकडून ही गीत-आदरांजली.
--------------------------------------------------------------
खेळाचे नियम-
१. गाणी/भजन/अभंग मराठी असावीत आणि लता मंगेशकरांनी गायलेली असावीत
२. झब्बू देणाऱ्या/री ने मुखड्याच्या पूर्ण ओळी लिहाव्यात.
विषय: