आपल्या लतादीदी.
त्यांची गाणी कानावर पडलीच नाहीत असा कोणी शोधूनही सापडणार नाही. त्यांच्या चाहत्यांची तर गोष्टच न्यारी! ते येता जाता गाणी ऐकतात, गुणगुणतात, अगदी संग्रही ठेवतात.
तर मग चला, यंदाच्या मराठी भाषा दिवसाच्या निमित्ताने लता मंगेशकरांच्या गाण्यांच्या भेंड्या खेळूया. ह्या गानसम्राज्ञीला आपल्याकडून ही गीत-आदरांजली.
--------------------------------------------------------------
खेळाचे नियम-
१. गाणी/भजन/अभंग मराठी असावीत आणि लता मंगेशकरांनी गायलेली असावीत
२. झब्बू देणाऱ्या/री ने मुखड्याच्या पूर्ण ओळी लिहाव्यात.
३. भेंड्या २ प्रकारे खेळू शकता :
अ- पारंपरिक पद्धतीने, म्हणजे शेवटच्या अक्षरावरून पुढचे गाणे
ब- मुखड्यातील कुठल्याही शब्दापासून पुढील गाणे लिहा
उदा-
'असा बेभान हा वारा, कुठे ही नाव नेऊ
नदीला पूर आलेला, कशी येऊ,कशी येऊ'
यातील 'कशी' ह्या शब्दाचा उल्लेख करून पुढील झब्बू
' बाळा होऊ कशी उतराई
तुझ्यामुळे मी झाले आई'
अर्थात तो शब्द,मुखड्यातच असावा.
वरीलपैकी कुठल्याही एका पद्धतीने पुढचं गाणं दिलंत तरी चालेल
४. एकाचवेळी एकाहून अधिक जणांकडून गाणी आल्यास पाहिजे ते गाणे पकडून पुढे खेळ चालू ठेवता येईल.
५. शब्दाची पुनरावृत्ती झाली तर चालेल, परंतु गाणं वेगळं असावं.
मग रंगू देत गाण्याची मैफल.
सुरुवात करायला, वरचे 'बाळा होऊ कशी उतराई' हे गीत घेऊ शकता.
जीव
जीव
कळा ज्या लागल्या जीवा, मला की ईश्वरा ठाव्या !
कुणाला काय हो त्याचे ? कुणाला काय सांगाव्या ?
वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरी
वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरी
पक्षीही सुस्वरे आळविती
कल्पवृक्ष कन्येसाठी लावुनिया
कल्पवृक्ष कन्येसाठी लावुनिया बाबा गेला,
वैभवाने बहरुन आला, याल का हो बघायाला!
सूर्य-चंद्र तुमचे डोळे दुरुनीच ते बघतात, कमी नाही आता काही कृपादृष्टीची बरसात
पाच बोटे अमृताची पंचप्राण तुमचे त्यात, पाठीवरी फिरवा हात या हो बाबा एकच वेळा
कन्या
कन्या
कन्या सासुऱ्यासी जाये
मागे परतोनि पाहे
हरवले ते गवसले का
हरवले ते गवसले का
गवसले ते हरवले का
का -- क
का -- क
कमोदिनी काय जाणे तो परिमळ
भ्रमर सकळ भोगीतसे
भ्रमर
भ्रमर
रुणुझुणू रुणुझुणू रे भ्रमरा सांडितू अवगुणू रे भ्रमरा
सौभाग्य सुंदरू रे भ्रमरा भोगीतू निष्चळू रे भ्रमरा
(अंताक्षरी सगळी वाचली नाहीये, सो रिपीट असेल तर दुसरं कुणी द्या)
रा-
रा-
राजाच्या रंग म्हालीं सोन्याचा बाई पलंग
रूप्याचं खांब त्येला मोत्याची झालर
राजा
राजा
माज्या सारंगा, राजा सारंगा
डोलकरा रं, धाकल्या दीरा रं
चल जावंया घरा
रंगा येई वो येई
रंगा येई वो येई
विठाई किठाई माझे कृषाई कान्हाई
ई/इ
ई/इ
इंद्र जिमी जंभपर बाढव सुअंभ पर
राघव सदंभ पर रघुकुलराज है
(हे मराठी म्हणून चालावे!)
हे हिंदू शक्ती संभूत दिप्ती
हे हिंदू शक्ती संभूत दिप्तितम देजा
हे हिंदू तपस्या पूत ईश्वरी ओजा
हे हिंदूश्री सौभाग्य भूतीच्या साजा
हे हिंदू नृसिंहा प्रभो शिवाजी राजा
जीवनात ही घडी अशीच राहू दे
जीवनात ही घडी अशीच राहू दे
प्रीतीच्या फुलावरी वसंत नाचू दे
रंगविले मी मनात चित्र देखणे
आवडले वेडीला स्वप्न खेळणे
स्वप्नातील चांदवा जीवास लाभू दे
घडी
घडी
घडी घडी अरे मनमोहना देखता हसुनि गुणिजना
रे सजणा नको रे बोलू मसी
अरे! हे गाणं सकाळच्या कामगार
अरे! हे गाणं सकाळच्या कामगार सभेत लागायचं ते ऐकत जेवण करुन शाळेत गेलेलं आठवतंय. नंतर कधीच ऐकलं नाही. आज तुम्ही लिहिल्यावर डोक्यात एकदम चाल वाजू लागली! कमाल!
सी/स
सी/स
सुन्या सुन्या मैफिलीत माझ्या तुझेच मी गीत गात आहे
अजूनही वाटते मला की अजूनही चांदरात आहे
संधीकाली या अशा, धुंदल्या
संधीकाली या अशा, धुंदल्या दिशा दिशा
चांद येइ अंबरी
चांदराती रम्य या, संगती सखी प्रिया
प्रीत होई बावरी
चांद केवड्याची रात आलिया
चांद केवड्याची रात आलिया सामोरा
राजा माझ्या अंबाड्याला बांधावा गजरा
मस्तच, सकाळपासून गाणी
मस्तच, सकाळपासून गाणी लिहिणाऱ्या सगळ्यांचे कौतुक.
रात
रात
आली हासत पहिली रात
उजळत प्राणांची फुलवात
ने मजसी ने परत मातृभूमीला
ने मजसी ने परत मातृभूमीला
सागरा प्राण तळमळला
लटपट लटपट तुझं चालणे मोठ्या
.
एडिट केलं. झालंय.
लखलखले आभाळ निळे
लखलखले आभाळ निळे
रोहिणीला चंद्र मिळे
निळ्या आभाळी, कातरवेळी
तोंडाला, हाताला पट्टी. झालेलीच गाणी मी लिहितेय.
ळ == ल
ळ == ल
लटपट लटपट तुझं चालणं मोठ्या नखर्याचं
चालणं ग मोठ्या नखर्याचं बोलणं ग मंजुळ मैनेचं
नारी ग हो नारी ग .. हो नारी ग.
( अंजू तुम्ही काढून टाकलं तरी आधीचा पण नेमका ल आहे. हे होऊन गेलंय का?)
हो लटपट झालंय. मनीमोहर यांनी
हो लटपट झालंय. मनीमोहर यांनी लिहिलंय बघा पहिल्याच पानावर.
नंतर मी निळ्या आभाळी लिहिलं होतं, तेही झालंय हरपेन यांनी लिहिलं आहे. म्हणून मी दोन्ही एडिट केली.
निळा:
निळा:
श्रावणात घननिळा बरसला रिमझिम रेशीमधारा
उलगडला झाडातून अवचित हिरवा मोरपिसारा
हे युट्यूब वर सापडलं. अजिबात
हिरवा...
हे युट्यूब वर सापडलं. अजिबात माहीत नव्हतं.
हिरव्या कुरणी घडली कहाणी बाई नवलाची
नाजूक हरिणी गेली करून शिकार वाघाची.
चंद्रा रे मी तुझी रोहिणी
चंद्रा रे मी तुझी रोहिणी
पाहते तुला मोहुनी, लाजुनी
नी
नी
नीज माझ्या नंदलाला, नंदलाला रे
शांत हे आभाळ सारे.... शांत तारे, शांत वारे
या झर्याचा सूर आता
मंद झाला.... मंद झाला रे
Pages