आज मी पिणार आहे!
आज मी पिणार आहे!
उतरून माळ्यावरली मी स्वप्ने जिणार आहे.
सांगून ठेवा नियतीला आज मी पिणार आहे..
चुकले होते फार माझे, हिशोब काढून ठेवा,
जमेल तर आजच सारा, चुकता मी करणार आहे!
कुठे पळाली मदीराक्षी ती, आणा शोधून,
बसवून समोर तिला, डोळ्यातून पिणार आहे!
लोक जे म्हटले वाईट मला, चुकून सामोरे येऊ नका,
दिसल्याबरोबर सांगून ठेवतो, बांबू मी सारणार आहे!
घे म्हणता वारूणी लावली ज्यांच्यासवे,
उपकार तुमचे मानायाला थेंब उडवणार आहे
चढवून घेतले दुःखास जेव्हा,
मी कोडगा जाहलो,
आज उरल्या फटाक्यांची, दिवाळी करणार आहे!