Submitted by दत्तात्रय साळुंके on 25 April, 2018 - 04:45
मी शृंगारतो सुखदु:खेही
ओसाड गावी सारा भूतांचाच आवाज आहे
माणसाने बोलायचे नाही... हा रिवाज आहे
रोरावतो मनातल्यामनात लाटेत प्राण नाही
नेभळा समुद्र सारा कसा विसरला गाज आहे
फुलावे कसे कळयांनी येथे पुष्करणीत आता
ऋतू बहराचा येथला कसा ... दगाबाज आहे
लाक्षागृह अजुनी कसे नाक्यानाक्यावर धुमसते
मारावयास पांडवा शकुनी ... कावेबाज आहे
खुराडेच प्रिय ज्यांना कसे आकाश कवेत घ्यावे
कोंबडीचे कुटुंबीय सारे ......... टोळीबाज आहे
मी शृंगारतो सुखदु:खेही ....केव्हाही कुठेही
कलंदराच्याच जगण्याचा माझाही बाज आहे
© दत्तात्रय साळुंके
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
वाहवा, दत्तात्रयजी, फारच छान
वाहवा, दत्तात्रयजी, फारच छान !!!
महेशजी खूप धन्यवाद
महेशजी खूप धन्यवाद प्रतिसादासाठी....
सुंदर!!
सुंदर!!
अक्षयजी खूप धन्यवाद …
अक्षयजी खूप धन्यवाद …
अप्रतिम गजल
अप्रतिम गजल
क्या बात है ..
क्या बात है ..
छान गजल.
छान गजल.
निलेशजी , शशांकजी ,
निलेशजी , शशांकजी , भास्कराचार्यजी खूप धन्यवाद …
वृत्तबद्धतेचा थोडा सराव
वृत्तबद्धतेचा थोडा सराव गरजेचा वाटला
अभ्यास व्हावा