मी शृंगारतो सुखदु:खेही
Submitted by दत्तात्रय साळुंके on 25 April, 2018 - 04:45
मी शृंगारतो सुखदु:खेही
ओसाड गावी सारा भूतांचाच आवाज आहे
माणसाने बोलायचे नाही... हा रिवाज आहे
रोरावतो मनातल्यामनात लाटेत प्राण नाही
नेभळा समुद्र सारा कसा विसरला गाज आहे
फुलावे कसे कळयांनी येथे पुष्करणीत आता
ऋतू बहराचा येथला कसा ... दगाबाज आहे
लाक्षागृह अजुनी कसे नाक्यानाक्यावर धुमसते
मारावयास पांडवा शकुनी ... कावेबाज आहे
खुराडेच प्रिय ज्यांना कसे आकाश कवेत घ्यावे
कोंबडीचे कुटुंबीय सारे ......... टोळीबाज आहे
मी शृंगारतो सुखदु:खेही ....केव्हाही कुठेही
कलंदराच्याच जगण्याचा माझाही बाज आहे
विषय: