एप्रिल २०२३ मधे, भारताच्या लोकसंख्येने आकडेवारित चीनला मागे टाकत पहिला क्रमांक पटकावला असे विविध बातम्यांत प्रसिद्ध झाले आहे. आज जगामधे सर्वात मोठी लोकांची संख्या भारतात आहे. या बातमीने आपण आनंदी व्हायला हवे का एव्हढ्या मोठ्या लोकांच्या संख्येसाठी अन्न, वस्त्र , निवारा, रोजगार यांच्या काळजीने गंभिर व्हायला हवे? दोन्हीही.
संयुक्त राष्ट्रसंघाच्या प्रसिद्धी माध्यमांतून प्रसारीत झालेल्या या बातमीला आधार आहे भारताने २०११ मधे घेतलेल्या जनगणनेचा.
या विषयावर लिहावे का नको असा विचार बरेच दिवस मनात घोळत होता. निमित्त झाले एका जेष्ठ मैत्रिणीच्या भेटीचे. आमच्या वयात साधारण ३५ वर्षाचे अंतर आहे. तिला आंटी / काकू / मावशी / आजी म्हटलेले आवडत नाही म्हणून मैत्रीणच आहे ती माझी, फ्रेंड-सखी. जोडीदार वैतरिणीपार. स्वतः सेवानिवृत्त. अपत्ये तीन. एक मुलगा तरुणपणीच निवर्तला, दुसरा दूरदेशी संपन्न-सुखी आयुष्य जगतो आहे. मुलगी स्वतःच्या शहरातच थोडे दूरवर सासरच्या मोठ्या संयुक्त कुटुंबात राहते. मैत्रीण आनंदी आणि प्रेमळ स्वभावाची आहे. मुलगा-मुलगी-सून-जावई-नातवंडे-व्याही सर्वांशी उत्तम संबंध आहेत, सगळीकडे येणे-जाणे आहे.
आपले वृद्ध पालक आपल्यासोबत राहत असोत किंवा वेगळे राहत असोत, त्यांची काळजी वाटणे हे साहजिक, स्वाभाविक आहे. आपल्या मात्या-पित्यांना त्यांच्या आयुष्याचा उत्तरार्ध हा विनासायास, आनंदाने व निरामय आरोग्याने व्यतीत करता यावा असे बहुतेकांना नक्कीच वाटत असणार! परंतु प्रत्यक्षात ते साध्य होतेच असे नाही. नोकरी-व्यवसायातून सेवानिवृत्त होऊन आपला वेळ उत्तम प्रकारे घालवणारे जसे अनेक ज्येष्ठ नागरिक आहेत तसेच व्याधी अथवा अन्य काळजी - चिंतांमुळे ह्या काळाचा व्यवस्थित आनंद न घेऊ शकणारेही बरेच वृद्ध आहेत.
सध्याच्या काळात लोकल आणि ग्लोबल हे परवली चे शब्द झालेले आहेत. internet क्रांती आल्यापासून 'think global-act local' हा आजच्या युगाचा मंत्रच बनला आहे.साधारणपणे सामाजिक कामे किंवा क्वचित प्रसंगी व्यावसायिक निर्णय घेताना हे शब्द वापरले जातात. म्हणजे जगाला भेडसावणारया समस्यांवर आपापल्या स्थानिक पातळीवर उपाय शोधावे, किंवा जगातील trends पाहून आपल्या व्यवसायात बदल करावेत इत्यादी. पण परवा विचार करताना मला 'think global-act local' चा एक वेगळाच अर्थ उमगला. जो अगदी प्रत्येक माणसाच्या आयुष्याला लागू पडू शकतो. प्रत्येक जण आचरणात आणू शकतो.