पाभे की बात क्र. ९
जनगणना २०२६-२७ साठी सरकारने साहित्य दिलंय ते बघितलं का?
टोपी लहान मुलांच्या डोक्याची, मोठ्या शिक्षकांच्या डोक्यावर बसत नाही. पिशवी पहिल्या दिवशीच चेन तुटते. शार्पनर पेन्सिलला टोक लावायच्या आतच तुटतो. पेन आणि मार्कर उठतच नाहीत. एरीयाच्या झेरॉक्स एकच मिळेल. आपसात झेरॉक्स करून घ्या. कार्यक्षेत्र २० किमी दूर असेल. दोन क्षेत्र असेल तर त्यात ६, ८ किमी अंतर असेल. सगळं सामान अशा अतिशय उत्कृष्ट दर्जाचं.
----------------------------------------------------------------
मितरों,
सध्या २०२७ च्या जनगणनेच्या निमित्ताने 'हिंदी' तसेच 'संस्कृत' भाषेंची नोंद करण्याबाबतचे काही भावनिक संदेश पसरवले जात आहेत. आपली संस्कृती, प्रार्थना आणि श्लोक यांच्याबद्दल आपल्या मनात आदर असणे अत्यंत स्वाभाविक आहे. परंतु, जनगणनेसारख्या महत्त्वाच्या प्रक्रियेत केवळ भावनिक आवाहनाला बळी पडण्यापूर्वी, आपण आपला इतिहास, आपल्या संतांची शिकवण आणि आपल्या खऱ्या मायबोलींचे - मराठी, कोंकणी, मालवणी, वऱ्हाडी, अहिराणी भाषांचे - भविष्य काय, याचा अत्यंत गांभीर्याने विचार करणे गरजेचे आहे.
एप्रिल २०२३ मधे, भारताच्या लोकसंख्येने आकडेवारित चीनला मागे टाकत पहिला क्रमांक पटकावला असे विविध बातम्यांत प्रसिद्ध झाले आहे. आज जगामधे सर्वात मोठी लोकांची संख्या भारतात आहे. या बातमीने आपण आनंदी व्हायला हवे का एव्हढ्या मोठ्या लोकांच्या संख्येसाठी अन्न, वस्त्र , निवारा, रोजगार यांच्या काळजीने गंभिर व्हायला हवे? दोन्हीही.
संयुक्त राष्ट्रसंघाच्या प्रसिद्धी माध्यमांतून प्रसारीत झालेल्या या बातमीला आधार आहे भारताने २०११ मधे घेतलेल्या जनगणनेचा.