त्याला लिहावच लागेल
तो एका सरळ रेषेत चालतो
मध्येच कुठे यु टर्न, कुठे टर्न टू लेफ्ट
कुठे टर्न टू राईट,
मग हळू हळू दिसू लागतात
डीव्हायडर ने वेगळे केलेले समाजाचे लवलेश
कुठे अश्रूंच्या पडलेल्या थेंबानी बनलेले
वेडेवाकडे, पुसटशे डाग
कुठे काळ्या पॅरालल चालणाऱ्या रेषेखालील
तुंबलेल्या भावनांची गटारे
कुठे वाहणाऱ्या पाण्याची बंदिस्त पाईपलाईन
तर कुठे , कुठे मागे पडत चाललेली रेलचेल
कुठे हरवतो मनाच्या नो पार्किंग स्पेस मध्ये
तिथल्या गाड्यांच्या काचेवरची धूळ झटकली जाते
सगळ क्लिअर दिसायला लागत
पुन्हा तो चालायला लागतो सगळ विसरून